Ek Chhotisi Love Story - 4 in Marathi Fiction Stories by PritiKool books and stories PDF | एक छोटीसी लव स्टोरी - 4

Featured Books
  • ઈર્ષા

      ईर्ष्यी घृणी न संतुष्टः क्रोधनो त्याशङ्कितः।  परभाग्योपजीव...

  • ફરે તે ફરફરે - 61

    ફરે તે ફરફરે - ૬૧   જુના જમાનાના લેખકો સવારનુ વર્ણન કરત...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 10

    ૧૦ મહારાણીની પ્રેરણા   કાંધલે જે કહ્યું તે સાંભળીને કરણ...

  • ઇડરિયો ગઢ

    ઇડરિયો ગઢવર્ષોથી મનમાં તમન્ના હતી અને એક ગૂજરાતી ફિલ્મ પણ વા...

  • આકર્ષણ બન્યુ જીવનસાથી - 1

    મહિનાનો પહેલો દિવસ અને ઍ પણ સોમવાર. અમારી ઓફિસ મા કોઇ જોબ મા...

Categories
Share

एक छोटीसी लव स्टोरी - 4


प्रीति आणि मंदार दोघे चहा च्या टपरीवर आले.बाहेर बरेच जण ग्रुप मध्ये होते. मंदार ला प्रीती बरोबर बघून थोडी कुजबुज झाली...मंदार नाहीतरी पॉप्युलर होताच त्याला प्रीती बरोबर बघून मुली हिरमुसलया...तर मुले खुश झाली..चला वाटेतला अडसर दूर झाला....
प्रीती आणि मंदार ने चहा घेतला आणि दोघे कोपऱ्यावर उभे राहिले ...शेवटी विषय काढायचा म्हणून प्रीती म्हणाली....किती रागावतो रे...कान बघ तुझे किती लाल झालेत ते...नशीब नाक नाही लाल झाले ....नाहीतर...
त्याला कळेल काय म्हणायचे होते ते..सरळ बोल ना ..माकड दिसला असतो ..माहिती आहे मला ..आई पण असेच म्हणते...राग आला की लाल लाल होतो मी..काय करू...कंट्रोल होत नाही....
येवढे रागावू नये मग शुल्क गोष्टीसाठी मग....मग नाही माकड होणार तुझे...का असे रागावला इतका....एवढे तर काहीच झाले नाही....
माहित नाही प्रीती...तू विषय नको काढू परत परत...सांगितलें ना तुला नाही आवडत....
दुसरी कोणी आहे का??? तिने विचारले....
तसे तर कोण नाही...पण ती ती नक्कीच नाही एवढे माहिती आहे...
मग ठीक आहे ...मनात म्हणाली ह्याने तर मनात ठरवून ठेवले आहे...अनुजा वाईट आहे ... हट्टी कुठला ...
दोघे परत कॉलेज मध्ये आले. बाकीचे सगळे लेक्चर बुंक करून कट्ट्यावर बसले होते...फक्त निनाद आणि अनुजा नव्हते..मग दोघे तिकडे जाऊन टाईमपास केला....खरे तर अक्षय प्रिया आज बरयाच दिवसांनी सगळ्या ग्रुप मध्ये बसले होते...त्या मुळे फुलं टाईमपास चालू होता....संध्याकाळ होत होती म्हणून मग सगळे निघाले. मंदार प्रीती बरोबर काही तरी बोलत चालला होता...बाकीचं सगळे थोडे पुढे मागे चाललेलं होते...प्रत्येक चा मनात एकच गोष्ट आली...प्रीती आणि मंदार ..काही असू शकेल..की फक्त अनुजा साठी मैत्री आहे ह्याची....
बघता बघता मंदार आणि प्रीती घट्ट मित्र बनले...आजकाल मंदार चे प्रीती शिवाय पण सुधा हलत नव्हते..प्रीती दिसली नाही की तो चिडचिड करायचा...उगीच इकडे तिकडे फिरत तिला शोधत बसायचा...ती दिसली की आपोआप त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचे...रोज तिला सकाळी गूड मॉर्निंग चे मेसेज आल्याशिवाय त्याचा दिवस सुरू नाही व्हायचा...आपल्या काय होतंय हे त्याला कळत नव्हते आणि कोणाला सांगता ही येत नव्हते...एक नक्की प्रीती त्याला आवडायला लागली होती...आणि ती त्याला अनुजा बरोबर बघत होती....
अनुजा ला मात्र मंदार मधला हा फरक जाणवत होता...पण एक निनाद शिवाय ती ने कोणाला काहीं सांगितले नव्हते...सगळ्यांनी तिलाच वेड्यात काढले असते....एकदा एनसीसी चे परेड प्रॅक्टिस सुरू होती ..अनुजा लॉबी मध्ये उभी राहून मंदारला बघत होती....सोबत निनाद होताच...
मंदार चे नजर मात्र..एक ग्रुप कडे लागून होती..अनुजा ने निनाद ला दाखवले...तो बघ ...त्या ग्रुप कडे बघतोय आणि गालात ल्या गालात हसतो ते...निनाद ने लगेच खाली जाऊन बघितले कोणता ग्रुप आहे ते....समोर ग्रुपमध्ये प्रीती आणि एक दोन जाणी होत्या....नक्की ह्यातली कुठली...प्रितीचे तर लक्ष पण नव्हते मंदार कडे.....
पण अनुजा खात्री देऊन सांगत होती ती दुसरी तिसरी कोणी नसुन प्रितीच आहे....निनाद मात्र आता ह्या प्रितिशी बोलले पाहिजे ...असे ठरवून निघाला....
त्याने प्रीतीला बाहेरच गाठले ...तिला घेऊन कट्ट्यावर बसला...इकडे तिकडे बघत...
बोलणार आहेस काय झाले ते ...निनाद...नक्कीच काही तरी महत्वाचे आहे हो ना ??
कसे बोलावे कळत नाही...तू रागवशील हे नक्की प्रीती...पण कुठून सुरू करू कळत नाही....
वेडा आहेस का ...निनाद...आपण लहानपण पासून मित्र आहोत ..बोलू शकतो ही ना...बोल काय झाले...खरे सांग...
प्रीती तुला मंदार आवडतो का ?? ?म्हणजे मित्र म्हणून नाही त्या पेक्षा जास्त म्हणून...बस येवढेच विचारायचे होते ..
काहीतरी काय बोलतोय ..वेड लागलंय तुला आणि त्या अनुजा ला पण...इथे प्रयत्न करते आहे अनु साठी आणि तुम्ही दोघे असे बोलता मला ...खरंच आहे ज्याचे करायला जावे भले तो म्हणतो माझेच खरे....प्रीती ने रागावून बोलली.
सॉरी ना प्रीती . चिडू नकोस ना..मी तुला आधीच सांगितले तू चीड शिल म्हणून...पण मला जे बघितले त्यावरून वाटले आणि विचारले ..आपण दोस्त आहोत ना..म्हणून विचारले
पण तुझ्या मनात असे का आले निनाद ...?? काहीतरी कारण असेलच नाही...उगीच काहीतरी असा सीरियस विषय तू काढणार नाही ....काय झालंय??खरे सांग.
मग निनाद ने अनुजा ने जे काही सांगितले दाखवले ते प्रीतीला सांगितले...
कर्म माझे...त्यादिवशी लायब्ररी मधून हाकलले आम्हाला..तो चिडलेले होता मग काय करू...म्हणून चहा घ्याला कॅन्टीन मध्ये जाणार जोत्तो तर म्हणाला टपरी वर जाऊ....म्हणून गेली...बस..आणि अनुजा शिवाय काहीच बोलणे होत नाही.
आजचे म्हणशील तर मला माहिती पण नव्हते आज प्रॅक्टिस आहे ते...मग कशाला उगीच उभी राहू . .बोलत होते मैत्रिणी शी ...निनाद तो माझ्याकडे बघतो... किवा बघत असेल तर तो दोष मला का मी काय केलंय....तूच सांग
..
तू काहीच केलं नाहीस पण अनुजा कसे समजावू...सांग ना..तुला माहिती आहे हट्ट आहे ती...स्वतचं खरे करेल....
म्हणून स्वतचे नुकसान करून घेतील ह्या स्वभावाने ...त्याला नाही आवडत ती..के खूप प्रयत्न केला रे त्याला समजवायचा ...पण इकटच नाही..नाव काढून देत नाही तिचे ...तर पुढे काय बोलू....उगीच गळ्यात पडते म्हणे...आता काय बोलू...असे म्हणत तिने निनाद ला सगळे खरे खरे सांगितले....
निनाद विचारात पडला...म्हणजे मंदार ला अनुजा नक्कीच आवडत नाही अनुजा ला मंदार आवडतो आणि प्रीती ला मंदार मित्र वाटतो.एखाद्या हिंदी फिल्म ची स्टोरी वाटतेय....ह्यात आपला रोल काय मग??? आपण काय करायचे..?दोघी मैत्रिणी आपल्या...त्यात अनु जास्ती जवळची एकाच बिल्डिंग मध्ये राहतो..तर प्रीती समजूतदार आणि सगळ्यांची लाडकी मैत्रीण...काय करायचे....प्रीती त्याच्याशी बोलून निघून गेली..निनाद मात्र आपलेच विचारात कट्ट्यावर बसलेला...त्याला अक्षय ने बघितले ..
काय रे काय झाले??? असा काय बसलास ...ठीक ना सगळे???कोणी ड्डीच केलंय तुला??
गप्प रे तसे काही नाही आहे ...मला जरा हेल्प पाहिजे ..म्हणजे गोष्ट आपल्याच मैत्रीची आहे ..काय करू कळत नाही...मोठा लोचा आहे रे...म्हणत त्याने अनुजा आणि प्रीती बदल सागितले....
ह्यावर अक्षय पण विचारात पडला बराच वेळ दोघांनी विचार ला..मग म्हणाला आयडिया डायरेक्ट हीरो शी बोलूया...काय आहे ते खरे सांग..मग पुढचं पुढे...दोंघानी मंदार ला गाठले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या..आणि मग अनुजा चा विषय काढला...त्याने थोडा वेळ ऐकून घेतले आणि मग शांतपणे म्हणाला..जी गोष्ट प्रीती ला सांगितले तीच तुम्हाला पण सांगतो..मला नाही आवडत अनुजा..बस ती माझ्या टाइपची नाही आहे तेव्हा मला तिच्या बरोबर काहीही घेणे देणे नाही...प्रीती माझी चांगले मैत्रीण आहे बस..अजून काही नाही सध्यातरी..आणि मी कॉलेज ला पोरी पटवायला आलेलो नाही जो येतो तो कुठ्यला तरी मुली बदल सांगत बसतो...
त्याने वैतागून म्हटले ... अक्षय आणि निनाद हसायला लागले काय करणार बाबा ते तरी तू पडलास राजकुमार..त्यांच्या स्वप्नातलेला..मग तुला सांगणार तरी कसे ..
दोष द्याच्या तर तुझ्या रूपा ला दे ...अजून काय सांगू ..लेका लक्की आहे ..मुली मागे लागतात तुझ्या...आणि मी बघ...निनाद म्हणाला...त्याचा तो अभिनय बघून सगळेच हसायला लागले....