प्रीती आपली बॅग भरायला घेतली..चला म्हणजे आपण बालीला फायनाली जातो आहोत तर...हे बघून निनाद खुश झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी घरून निघताना मात्र प्रीतीचा पाय निघत नव्हता सारखे मुलांना कुरवाळून झालं,अनेक सूचना देऊन झाल्या आणि शेवटी रडून ही घेतले... मग मात्र निनाद वैतागला.
प्रित्स बस कर ना पाच-सहा दिवसांचा तर प्रश्न आहे. आत्ताच तू इतकी रडते आहे उद्या नीती सासरी गेल्यावर काय करशील आणि प्रीतम उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यावर मला वाटतं तू अमेरिकेलाच पोचशील त्याच्याबरोबर हो ना...
गप्प रे... तुला नाही कळायचं आई झाल्यावर काय होतं ते..
अरे... तु आई झाली म्हणून तुला फिलिंगस आणि मी बाप झालो म्हणून मला काही नाही ना.... तुला निदान रडता तरी येते मी तर ते पण करू शकत नाही....असे म्हणताच प्रीती ने तोंड वाकडे गेले..बघते तुला नंतर...थांब जरा.
शेवटी टॅक्सी आली आणि दोघा निघाले. जाताना कित्येकदा प्रीती ने मागे वळून बघितले असेल...तिला असे वागताना बघून निनाद अधिकच चक्रावला..प्रीती असे का वागत आहे?आजकाल काय झाले आहे हिला काही कळत नाही...छोट्या छोट्या गोष्टीवर चिडते, रडत काय बसते.काही होत तर नसेल ना हिला??
गाडीत थोड्यावेळ दोघा ही आपल्या विचारात गर्क होते...शेवटी निनाद ने शांतता तोडायला म्हटले प्रीती तुला माहितीये का मला अक्रूर असल्यासारखं वाटतंय..
कोण अक्रूर?? तिला काही कळेना..
अगं तो नाही का कृष्णाला न्यायला आलेला वृंदावन ते मथुरा... कृष्णाचा काका..तसे वाटतेय..सगळे वृंदावन नाही का अक्रूरला खाऊ का गिळू बघत होते आणि राग राग करत होते का तर कृष्णाला मथुरेला घेऊन चालला आहे... जसं मी तुला बालीला घेऊन चाललो...सेम सेम वाली फिलिंग होत आहे मला....
गप्प रे निनाद... काही बोलतो आजकल..असे म्हणत ती हसायला लागली...
नशीब माझे ..हसलीस तरी..मला वाटले आता पूर्ण ७/८ दिवस तू असाच चेहरा पाडून बसणार...प्रीती ऐक ना...पुन्हा असे नाही करणार प्लॅन.
फर्स्ट आणि लास्ट टाईम गलती हो गयी मॅडम ..माफ कर दो ना..मॅडम..त्याने नाटकी स्वरात म्हटले.
त्याची नौटंकी बघून प्रीती आणि टॅक्सी ड्रायव्हर दोघेही मनापासून हसले. पुढचा प्रवास छान गप्पा मारत झाला.
दोघं बालीला पोचले तेव्हा रात्र झाली होती.त्यांना घ्यायला रिसॉर्टची कार आली होती. दोघांनी रिसॉर्टमध्ये चेक-इन केले एक सुंदर वॉटर रिसॉर्ट बुक केले होते निनादने. रात्री अंधार असल्यामुळे जास्ती रिसॉर्ट बघता आले नाही आणि प्रीती खूप थकलेली वाटत होती म्हणून सरळ आपल्या कॉटेज वर गेले.
मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू काहीतरी जेवायला मागव.. असे म्हणत निनाद फ्रेश व्हायला गेला... प्रीतीने रूम सर्विस मधून निनादचे आवडते सूप आणि नूडल्स मागवल्या आणि वाट बघता बघता झोपून गेली..
थोड्यावेळाने निनाद बाहेर आला बघितले तर प्रीतीने सोफ्यावरच अंग टाकले आहे.त्याला पहिल्यांदा प्रीती लंडनला आलेली आठवली.अशीच आपल्या सोफ्यावर झोपून गेलेली तेव्हाही..आजही तिच्या जवळ जाऊन तिला न्याहाळत बसला...प्रीती तेव्हा तुला साद घातलेली मनाने तेव्हा तुझ्या मनाने उशिरा का होईना ऐकली माझी साद..आता ही तशीच साद देतो आहे तुला..ऐकू येईल तुला?? ह्या काही वर्षात माझी प्रिन्सेस कुठेतरी हरवली आहे ..तिला परत आण ना...
एरवी सुंदर दिसणारी प्रीती आता खूपच थकलेली वाटत होती..चेहरा थकलेला आहे.डोळ्याखाली हलकेच काळी वर्तुळ येत आहेत...बाकी स्किन तशीच नितळ आणि मऊमऊ...आपण तिला माऊ म्हणायचो आधी...मऊमऊ गाल होते म्हणून..कित्तींदा तिचे गाल ओढताना पाँड्स चे गाणे म्हटले आहे...हे आठवून आपसूक हसू आले....हलकेच तिचा पोनी सोडवला आणि छान केसमधून हात फिरवला...माझी सुंदर प्रिन्सेस ती !!!
मग तिला जागे करून बेड वर झोपवले.. झोपेत पण तिने प्रीतम झोप रे आता म्हणत निनादला थोपटले तसे त्याने डोक्यावर हात मारून घेतला..पक्की आई झाली आहेस प्रिन्सेस तू !!!!
विचार करत करत त्याने सूप घेतले आणि मग शांतपणे तिच्या बाजूला जाऊन पडला..झोप मात्र कोसो दूर होती..
हल्ली हे जरा जास्तीच होतंय..फॅमिली लाईफ काही राहिलीच नाही आपल्याला. जेव्हा बघावे तेव्हा मीटिंगस इंटरनॅशनल कॉलस आणि टूर्स .प्रितीचे ही तसेच काहीसे... तिच्याशी नीट बोलून सुद्धा जमाना झाला आता..तीही आजकाल बोलत नाही जास्त.कामापूर्ती बोलणे होते आजकाल फक्त.
तिचे मनमोकळे हसणे, जोक्स मारून हसवणारी,सतत काहीतरी कारण काढून चिडवणारी, त्याच्या वर अफाट प्रेम करणारी प्रीती हरवलं कुठे तरी ह्या वर्षामध्ये...विचार करता करता त्याचा कधीतरी डोळा लागला.
️️️️️️️️️️️️️️️️
दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला जाग आली तेव्हा प्रीती पुल मध्ये पाय टाकून बसली होती...तिला असे बघून त्याच्या चेहऱ्यावर आपसूक हसू आले.
हाय...लवकर उठलीस.झोपायच ना थोड्यावेळ ...सुट्टी वर आहोत...त्याने कॉफी देत म्हटले.
गुड मॉर्निंग...झाली झोप तुझी ?? सकाळी रोजचा वेळेवर जाग आली नंतर झोपच येईना म्हणून बाहेर येऊन बसली.सॉरी रात्री कधी डोळा लागला ना कळलेच नाही.....
नाष्टा करून येऊ चल...बाहेर जायचे की आज आराम करू या???. रिसॉर्ट खूप छान आहे हे..फिरून येऊ चल....
हम्म. फिरून येऊ..घरी पण फोन करायचा आहे....उठले असतील ना सगळे आत्ता...
दोघा छान तयार बाहेर नाश्ता करून रिसॉर्ट वर फिरून आले..अतिशय सुंदर अशी ५ स्टार प्रॉपर्टी , सुंदर कॉटेजस, प्रत्येक कॉटेजला प्रायव्हेट पुल , मोठं मोठं लॉनस, बॉलरुमस ..एकदम मस्त आलिशान असे रिसॉर्ट.बोलत बोलत ते कॉटेजवर पोचले.
तुला काय लॉटरी लागली आहे निनाद ..काय आहे हे...it's a five star property...are you mad..we can't afford this!!!!! तिने डोळे मोठ् करत म्हटले.
it's ok Prits...10th anniversary gift for both of us...and you need not worry about finances...I am there. chill relax and enjoy baby...
पण प्रीतीला बहुतेक पटले नाही ...ती खूप वैतागली. उगीच चीडचीड करू लागली तसे निनाद पण वैतागला..
दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली शेवटी ती काही ऐकत नाही म्हटल्यावर तिला सरळ मागे भिंतीवर ढकलले आणि तिला आपल्या हाताने दाबून धरले.त्याचा तो आवेश बघून प्रीती घाबरलीच कारण त्याची पकड खूपच मजबूत होती.आता तिचे मनगट दुखायला लागले होते..त्याच्या बोट रुतल्यामुळे प्रितीचे हात लाल व्हायला लागला होता.आज पर्यंत निनाद असा कधीच वागला नव्हता..
कधीच हात काय साधे रागावून त्याने डोळेही दाखवले नव्हते..हे नवीन रूप बघून प्रीती अजुनच घाबरली.
चूप एकदम चूप...काही आवाज नाही पाहिजे समजले...शांत हो जरा..त्याने आवाज चढवत म्हटले.तसे प्रीतीचा डोळ्यात अश्रू जमा झाले.कसेबसे ती त्यांना थोपवत होती...
त्याने आपला चेहरा तिच्या चेहऱ्यावर जवळ नेत म्हटले...बस कर ना प्रीती...का चिडचिड करतेय तू आजकाल...काय झाले आहे तुला ..सांग ना काय प्रोब्लेम आहे...काही होते आहे का तुला? कसले एवढे टेन्शन आहे ? जे माझ्याशी पण शेअर करता येत नाही आहे..सांग ना नको ना असे वागुस त्रास होतोय मला तुझ्या वागण्याचा...सांग ना...प्लीज..
सोड ना मला निनाद...मला लागत आहे ..प्लीज...तिने रडत म्हटले तसे निनाद च्या लक्षात आले आपली पकड खूप घट्ट होती ते..त्याने आपली पकड थोडी सैल केली पण प्रीतीला सोडले नाही..तू जो पर्यंत सांगणार नाहीस ..तुला सोडणार नाही...सांग आता पटकन..बोल.
प्रीती आता मात्र चांगलीच रडत होती..एकतर निनाद ने तिला असे घट्ट पकडले त्यामुळे लागले होते आणि पहिल्यांदा तो असे वागला होता त्याचे दुःख ही होत होते...
शेवटी रडत म्हणाली..मलाच नाही कळत आहे मी असे का वागते ते निनाद...माझी चिडचिड होते आहे सारखी. खूप प्रयत्न करते मी कारण शोधण्याचा ..पण मलाच नाही कळत मी अशी का वागते आहे ते...सॉरी ना..
काय करावे आता.. निनादला ही सुचेना...शेवटी तिला आपसूक जवळ घेतले आणि म्हणाला सॉरी...लागला ना तुला..बघू थांब बर्फ लावतो....असे म्हणत तिला जवळ घेतले बराच वेळ...त्याच्या मिठीत सामावून तीही शांत झाली..
तू ठीक आहेस...???
हम््मम .ठीक आहे..एक सांगू...पुन्हा नको असे वागू ना..मला भीती वाटली तुझी पहिल्यांदा... नीनु
I am very very sorry Princess...पुन्हा नाही असे होणार..तुला एक सांगू ..आपण ना खूप वर्षांनी असे भांडलो आहोत माहीत आहे...आता तुला बरं वाटेल बघ...
तसे प्रीती ने त्याला एक धपाटा घातला..शहाणा आहेस आणि दोघा हसत सुटले.......
a note from author
matrubharti car me pahilabyss आपले साहित्य प्रसिद्ध करत आहे.इथे स्टोरी publish व्हायला खूप वेळ लागतो...तसे कोणी कॉमेंट आणि follow hi karat nahi...interaction hot nahi..story Kashi ahe te Kalat nahi....कृपया वाचून निदान सारुया आवडले अंही आवडले ह्याची नोंद करावी...