The First Look of Love - 2 - The Last Part in Marathi Love Stories by tejal mohite books and stories PDF | प्रेमाची पहिली नजर - 2 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

प्रेमाची पहिली नजर - 2 - अंतिम भाग

क्रमशः

अखेर एक मोठया राञी नतंर तो दिवस आला.
आज

तेजस आपल्याला मनातल सानिकाला सांगणार होता.तेजसने खूप तयारी केली होती. सकाळ झाली सानिका 6 वाजता उठली कधी नव्हे ते ती लवकर उठली होती. तशीची तीची झोप पूर्ण नव्हती झाली .रात्रभर तेजस ला भेटायच हया खूशीत तीला झोप काय लागली नाही. आनंद इतका होता की रात्र जागून पण तीला आळस येत नव्हता.जितका तेजस तीला भेटायला अधीर झाला होता तितकीच ती देखील होती. सानिकानी ऑफिसच्या सरांना सकाळी मेसेज करून सांगितलं "सर मला आज बर वाटतं नाही. मी आज येऊ शकत नाही "
त्यावर सरांचा मेसेज आला " ओके, टेक केअर".

सानिकाने ह्या आधी अस कधीच खोटं बोलू घरी राहाली नव्हती. आणि आज तर घरी पण खोटं बोलू तेजसला भेटायला जायच होत. तीच्या साठी अवघड होते पण तीला तेजस साठी सगळ करावस वाटतंत होत. हूरहूर लागली होती. भीती पण वाटत पण भेटीची ओढ अधिक होती.
सानिका तयारी करून लागली आज कोणता ड्रेस घालू?🤔🤔. तेजसला मी कोणत्या ड्रेस मध्ये छान दिसेल ??सानिकाने कपाटा मधले सगळेच ड्रेस खाली घेतले. जास्त भारी घालून गेले ऊगीचच घरी संशय येईल.त्या पेक्षा साधंच काही तरी. तसं ही तेजसला मीच आवडते . मग मी कोणत्याही ड्रेस घातला तरी आवडल. सानिका स्वतःताशी बोलत होती.मध्येच हासत होती मध्येच डोळे लाजने मिटत होते.
तेजसचे पण सानिका पेक्षा काही कमी नव्हते.तो सप्नात इतका रमला होता की त्याला लवकर जागच आली नाही.मग नुसती धावपळ चालू होती. सानिकाला पंधरा कलर आवडायचा म्हणून तेजस पंधरा रंगाचा शर्ट काढून इस्त्री करून घातला. (आवडत्या व्यक्तींच्या भेटायला जायचं असेल तर सगळ काही करू वाटतं) तेजसच आवरल मग लक्षात आलं "आरे आपण काही गिफ्ट पण घेतल नाही" हे कसं विसरलो मी. 🤦‍♂️ तेजस विचार करून लागला काय दयाव??तेजस घरातून आवरून बाहेर पडला.सानिकाच्या घरासमोरून जाताना गाडीची स्पीड कमी करून हाॅन वाजवत गेला.
सानिकाचा कानावर हाॅनचा आवज पडला.सानिकाचे हार्टबीट्स वाढले तीने घट्ट डोळे मिटले. हाॅन हा एक इशारा होता. मी निघलो तू पण ये लवकर. आज सानिकाला आरशाचा लवकर निरोप घेऊ वाटतं नव्हता.अस वाटत होत तेजस साठी अजून सजाव सवराव.सानिका मैत्रीनीच्या घरी गाडी लावून जाणार होती.तस मैत्रिणीला कल्पना पण दिली होती.
सकाळचे दहा वाजले होते.तेजसने ठरवले होते सानिका आली की गणपती बाप्पाच्या मंदिरात जाईच. आधी आशिर्वाद घेयचा.मग सानिकाला घेऊन मस्तपैकी काॅफी शाॅप मध्ये जाईच.तेजसनी सानिका साठी परफ्यूम गिफ्ट म्हणून घेतला. तेजस वेळच्या 15 मिनिटं अधीच पोचलला .सानिकाची वाट बघत थांबला.
सानिका तयारी करून रूम मधून खाली येत होती. आईला जाते म्हणून सांगायला आईच्या रूम जवळ गेली तेव्हा तीच्या आई पप्पांनच बोलने कानावर पडल आणि ती तिथेच थांबते.
सानिकाचे पप्पां आईला सांगत - आपला सानिकाच लग्नाच वय झालं आपण आता मुलगा बघायला सुरुवात करू .माझ्या मित्राचा मुलगा .चांगला शिकलेला आहे. शिवाय माझ्या पाहण्यातला आहे.

सानिकाची आई- आहो पण एकदा सानिकाला पण विचारु

सानिकाचे पप्पां-हो विचारू,माझा सानिका वर माझ्या खूप विश्वास आहे. ती मला कधी नाही बोलणार नाही.

सानिकाची आई-खरच आपली मुलगी खूप समजूतदार आहे .आपल्याला शब्दा बाहेर जाणार नाही.

सानिका सगळ ऐकते तीची पावलं अपोआप मागे जातात. ती रूम मध्ये जाऊन दार लावून खूप रडू लागते. आई वडीलचा तिच्यावर इतका ठेवतात आणि आज त्याना फसवणून तेजसला भेटायला चाली होती .लहानपणापासून आई पासून काही लपवले नाही. आज मी तिलाच खोटं बोलून चाले होते.तेजस साठी मी घरच्याना अस नाही दुखवू शकत. तेजस वर माझ खूप प्रेम आहे पण मला त्याला पुढे साथ दयाला जमणार नसेल तर का त्याला खोटी स्वप्ने दाखवू.

आज सानिकाला माहित होत तेजस प्रपोज करणार आहे. पण तिला तिच उत्तर कळाले होत. पण तेजस समोर जाऊन नाही म्हणायची हिंमत तीच्या कडे नव्हती.
तिकडे तेजस एक एक क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो. 11.30वाजता. तेजस स्वतःताशी " काय ग सानिका आज तरी लवकर आवराच ना" अजून किती वाट बघायला लागतेस?.हासून पुन्हा स्वतःशीच बोलू लागला काय करणार तुझा वर प्रेम केले. वाट बघायची सवय लावली पहिजे. वेळ हळूहळू सरकत होता. पण सानिकाचा काहीच पत्ता नव्हता. 12 वाजले शेवटी तेजस सानिकाला काॅल करतो पण सानिका फोन उचलत नाही. सानिका गाडी वर असेल म्हणून फोन उचलत नाही असा त्याचा समज होतो.
मॅडम ना गाडी चालवताना फोन बोलेल आवडत नाही. परत फोन केला तर चिडतील त्यापेक्षा वाट बघू म्हणत तेजस वाट बघू लागला.
सानिकाच्या मैत्रीच घर मंदिरा पासून 5 मि. अंतरावर होते.12.30 वाजतात तेजस परत काॅल करतो आता तर फोन स्विच स्विच ऑफ लागतो.तेजस आता सानिकाची खरच काळजी वाटू लागली. काळजी पोटी तो सानिकाच्या मैत्रिणीच्या घराकडे चालू लागला..मनात एक झाल की एक विचार येत होते. सानिका कुठे आहेस ग तू? तूझा फोन का बंद आहे?
तेजस सानिकाच्या मैत्रिणीच्या घरासमोर गेला. तेजस तिला ओळखत असल्यामुळे त्याने तीला विचारल सानिका आली होती का?
तिची मैत्रीण-ती येणार होती पण अजून कशी काय आली नाही माहित नाही .फोन पण लागत नाही.
तेजस सानिकाच्या काळजीत पडला काय झालं समजायला मार्ग नव्हता. स्वराज ला फोन केला तर तो अजून प्रश्न विचारत बसले.तेजस खूप अस्वथ झाला. तिकडे सानिका रडून रडून तेजसच पासून लांब राहणाचा निणय घेते.





(जे सहजासहजी मिळत ते प्रेम कसल.कठीण परिस्थितीत मनात टिकून राहते. कधी साथ सोडून जात नाही ते खर प्रेम. सानिकाच पण खूप प्रेम आहे तेजसवर .त्यापेक्षा आई वडीलावर प्रेम आहे. मग ती कशी आई वडीलाची साथ सोडल?तीला तेजसची पण साथ सोडायची नव्हती म्हणून एक सुंदर नात्याची सुरुवात होणाआधीच तीने माघार घेतली.)

तेजस सानिकाच्या काळजीत पडला काय झालं समजायला मार्ग नव्हता. स्वराज ला फोन केला तर तो अजून प्रश्न विचारत बसले.तेजस खूप अस्वथ झाला. तिकडे सानिका रडून रडून तेजसच पासून लांब राहणाचा निर्णय घेते.सानिका आईला डोक दुखत कारणं सांगून घरी राहते.पण रूम मधून काय बाहेर येत नाही.

तेजसच्या मनात विचार येतो सानिकाला ऑफीस मध्ये काही तरी काम आल असेल ती तिकडे गेली असेल कदाचित. एकदा ऑफीसला जाऊन बघितलं पाहिजे. तेजस सानिकाच्या ऑफिसच्या दिशेने गेला. ऑफिस पार्किंग मध्ये सानिकाची गाडी दिसली नाही. मग कुठे गेली सानिका?? तेजस मध्ये मध्ये सानिकाला फोन पण करत होता तो पण फोन स्विच ऑफच लागत होता.सानिका घरी तर नसेल ना. पण कस कळणार ती घरी आहे की नाही??
तेजस घरी निघून जातो.सानिकाच्या घरा समोर जाताना सानिकाची गाडी दिसती. सानिका घरीच आहे तरी मला का भेटायला आली नाही? तेजसच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ निर्माण झाले होते. त्याला त्याच्याच राग येत होता
तेजसला खूप वाईट वाटतात होत आज त्याने सुटटी काढून खास सानिकासाठी वेळ काढला होता. पण सानिकाला त्याच काही नाही उलट फोन बंद करून बसली. तेजस घरी न जाता तसाच बाहेर निघून जातो.शांत एकांत जाऊन बसतो. आज पहिल्यांदा सानिकाच अस वागणं त्याला खटकल होत. तरी पण तो तिला फोन करत असतो. पण फोन काही लागत नव्हता फोन रागात फेकून देणार तर तो मोबाईलचा वाॅलपेपर बघतो आणि एकदम शांत होतो. त्याने काल रात्रीच स्वतःताचा वाॅलपेपर चेज करून सानिकाचा वाॅलपेपर ठेवला होता. तेजसला सानिकाचा राग येत नव्हता पण सानिकाच अस वागणं त्याला कळत नव्हतं. आज त्याने ठरवलं त्याप्रमाणे काही झाल नाही म्हणून थोडा उदास झाला. थोडावेळ गेला वर तो नाॅमर झाला .काही झालं तरी सानिका वर त्याच जीवपाड प्रेम होत. सानिका आज नाही आली काही कारण असू त्याला त्याची परवा नव्हती.
रात्री तेजस स्वराजला भेटायला सानिका च्या घरी गेला. खर तर त्याला सानिकाला बघायच होत. तेजस घरी आला तरी सानिकाच्या समोर येत नाही. खूप वेळ वाट बघतो सानिका आता येईल बाहेर नंतर येईल पण सानिका बाहेर येत नाही .तेजस उदास होऊन घरी निघून जातो.
दुसर्या दिवशी सकाळी सानिका ऑफीसला जाताना तेजस समोर असतो तरी त्याकडे बघत पण नाही .तशीच पुढे निघून जाते. तेजसला सानिकाच अस अचानक बदलेल रूप काही कळत नव्हतं.तेजस आवरून ऑफीसला जातो. त्याच मन कामात लागत नाही. सतत सानिकाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तीच वागणं अस्वस्थ करत होत.तेजसच्या मनात आल माझ काही चूकल असेल तर साॅरी बोलव.तेजस सानिकाला फोन करतो बराच वेळ फोन वाजतो पण सानिका फोन काही उचलत नाही. तेजस फोन वर फोन करतो पण सानिका एक पण फोनला उत्तर देत नाही. बरेच मेसेज करतो पण त्याला ही ती रिप्लाय देत नाही.
सानिका दिवसेंदिवस तेजस सोबत असच वागत होती. हया गोष्टीचा त्रास त्याला होता तितकाच तिला पण होत होता. दोन आठवडे झाले पण सानिका तेजस सोबत एकदाही बोली नाही.
एके दिवशी तेजस ऑफीस मधून लवकर निघतो. सानिका ऑफीस मधून बाहेर निघायचा टाईमला ऑफीस खाली येऊन थांबतो.सानियाची वाट बघत असतो . सानिका ऑफीस मधून बाहेर पडते .ती लांबूनच बघून तेजसला ओळखते.तेजस सानिकाच्या गाडी शेजारी थांबला असतो. सानिका गाडी जवळ येती .
तेजस -सानिका काय झाल तुला, अस का वागते??

सानिका-बाजूला सरक .मला जाऊदे

तेजस -सानिका मी तुझ्याशी बोलायला आलो.

सानिका- का आलास? मी नव्हत बोलवल. मला नाही बोलयच तुझ्या सोबत

तेजस- झाल काय ते तर सांग, अशी का वागते
(सानिका तेजसच्या बोलकडे लक्ष देत नाही हीकडे तिकडे बघत असती.)

( मग तेजसचा पार चढतो तो रागात बोलू लागतो)
तेजस -तूला काही कळत नाही का? का अशी वागते?तुला दिसत नाही का?तुझा अशा वागणाचा किती त्रास होतो मला. मुद्दाम करती का? तुझ्यामुळे माझ मन नाही लागत. सारखा तूझा विचार येतो मनात.

सानिका -मग नको करू विचार.

तेजस- मी काय करायच काय नाही तू नको सांगू..
नेमका प्रोब्लेम काय आहे?मला पण कळू दे.

सानिका- प्लीज माझ्या पासून लांब रहा. मला तुझ्या सोबत नाही बोलयच.माझ्या समोर पण येऊ नको.

तेजस -तुला नाही सांगयच ना नको सांगू. पण मित्र म्हणून तरी बोल माझ्या सोबत

सानिका -नाही बोलच मला

तेजस-( रागात) - ठीक आहे. राहतो लांब. तूझ्या समोर पण येत नाही. पण तू जर माझ्या समोर आली तर मी तुझ काही ऐकणार नाही.
(तेजस रागात निघून जातो)

दोघेही आपापल्या वाटेने निघून जातात. एकमेकांनी एकमेकांन पासून लांब रहीच बोले पण ते जमणार होत का? एका क्षणात मनाने जोडलेल नात तूटन शक्य आहे का?

सानिका घरी निघून जाते.आज जे झाल त्यात ती पण खूश नव्हती.तिला तेजस पासून लांब राहिच कधी जमलं नव्हतं.ती दोन आठवडे बोलत नव्हती पण त्याला बघतला शिवाय तिला राहवत नव्हते. सगळच आपल्या मनासारख होत नाही. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नसत ना.काही वेळस त्याग करून पुढे जाव लागत. सानिकाला सगळ मंजूर होत.
सानिका घरी पोहचली पण मनाने तेजस जवळच राहील होत.तेजस ह्या आधी अस कधी ओरडून बोला नव्हता. सानिका रूम मध्ये जाऊन दार लावून खूप रडू लागते. तेजस पासून लांब राहीच. त्याला कधी बघायच नाही. सानिकाला सगळ्या गोष्टी खूप दुखवत होत्या. पण तिला आई वडीलांना दुखवायच नव्हते.मनाची समजूत काढून ती शांत झाली .सानिकाला वाटत होत थोडे दिवस गेले की सगळ पहिला सारखे होईल .मग तेजसची आठवण नाही येणार. पण तेजस आज रागात होता ना की त्याची काळजी वाटू लागली होती.
रात्रीचे अकरा वाजले पण तेजसचा काही पत्ता नव्हता. तेजसची वाट बघत सानिका खिडकीतून खाली बघत होती.तीला तेजसची आई सानिका घरी येताना दिसली. सानिका पळत खाली आली. तेजसची आई स्वराज सोबत बोलत होत्या.

तेजसची आई- तेजस अजून घरी आला नाही? फोन केला तर .फोन बंद लागतोय.तुला काही सांगातल का?कोणत्या मित्रांबरोबर जाणार ते?

स्वराज-नाही काकू, आज आमच काही बोलन पण झाल नाही. टेन्शन नका घेऊ येईल तो.

हे सगळं ऐकून सानिकालाच टेन्शन येतं होत. तिला माहीत होतं हे सगळं तिचा मुळे होत. स्वतःताला ती दोष देत होती.सानिकाच्या मनात नको ते विचार येत होते. स्वराज तेजसला फोन करत होता पण फोन काय लागत नव्हता. सानिकाच काळजीने धडधड वाढत होती. पण त्याची वाट बघणं हाच एक पर्याय होता.
थोड्यावेळाने तेजसचा गाडीचा आवाज आला तेव्हा कुठे तीचा जीव भांड्यात पडला.तेजस घरी आला होता. तो सरळ त्याच्या घरी गेला.रोज सानियाच्या घरा समोरून जाताना सानिकाला शोधणारे डोळे आज सानिकाच्या घराकडे पण बघत नव्हते.
त्यादिवसा नंतर तेजसच वागणं बदलले. त्याचे स्वराज कडे येण पण बंद झाले. तो लवकर ऑफीसला जात आणि उशीर घरी येत. सानिका समोर तो जात पण नव्हता.. हळूहळू तो सानिकाच्या नजरेस पण पडत नसे.नाही म्हणायल तरी सानिका तेजसला मिस करत सानिका कधी एकांत रडत. तर सगळे समोर असेल तरी तेजसच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं.दिवसेंदिवस तेजस सानिका पासून लांब जात होता .

आयुष्यात आपण निर्णय घेतो पण आपणच त्यात खूश नसेल तर काय उपयोग..सानिकानी निर्णय घेतला पण खूश नव्हती. येणारे दिवस पूढे ढकलत होती .तीला आशा होती पूढे चागंल होईल .मनाचे दार किती लावली तरी प्रेमाची झुळूक पण स्पर्श करून जातेच.असच काहीसं दोघांच्या आयुष्यात पूढे झाले.

सानिका आणि तेजस जवळ जवळ माहिनाभर एकमेकांन समोर आले नाही.काही दिवसांनी काॅलनी मधील एका मुलीचे लग्न होते. काॅलनी मधले लग्न म्हणजे अगदीच जवळचं लग्न होते. त्यात ती मुलगी सानिकाची बाल मैत्रीण. सानिकाला जाण्याशिवाय तसा पर्याय पण नव्हता. लग्नाला तेजस आणि त्यांचे घरचे पण येणार होते. सानिकाला तेजस समोर जावे लागणार म्हणून आधी लग्नास येईला नकार देत होती. पण मैत्रिणीच्या आग्रहाखातर तीला जावच लागणार होते. अखेर मैत्रिणीच्या हट्ट पुढे लग्न जाण्याचा निर्णय सानिका घेते.

लग्नाच्या आदल्या रात्री सानिकानी हातभर मेहंदी काढली.तीला भीती पण वाटत होती तेजसच समोर आला तर. काय होईल ?आणि काय नाही ? मनात अनेक विचार आणि प्रत्येक प्रश्नाला ह्रदयाच्या ठोकाची साथ.प्रत्येक प्रश्नाला तिची अस्वस्थ वाढत होती. तीला विचार करता करता झोप लागली .ती सकाळीच जाग आली.

आज ती सकाळपासून बैचेन होती. कशातच मन लागत नव्हते ..हे आजच नाही गेले काही दिवस असच चालू होतं. सानिकाच्या घरचे सगळे लग्नाला आले. लग्नाचा हाॅल फुलानी शुशोभीत केला होता. येणारा पाहूनची उत्तम व्यवस्था केली होती.सगळी कडे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. पाहुण्यांच्या पाहुणचार ते जेवण्या पर्यंत उत्तम व्यवस्था केली होती. पाहुण्यांनी लग्न हाॅल गजबजून गेला होता. छोट्या चिलीपिलाची नुसती लुडबुड चालू होती. हिकडून तिकडे नुसतीच धावत होती. सानिका मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभी होती. तीची नजर गर्दी मध्ये पण तेजसला शोधत होती.बरेच दिवस होऊन गेले तेजसला बघून.

सानिकांनी अबोली रंगाची साडी नेसली होती. हात मेहंदीनी रंगलेले हातात रंगीत बांगड्या. कोणची पण नजर पडावी अशी ती दिसत होती.लग्नाच्या हाॅल बाहेरच तिच लक्ष होते.येणारा जाणारं कडे लक्ष लावून बसली होती.(खरच खूप बेचैन मन होत कोणाची तरी मनापासून वाट बघताना.डोळे ,मन त्याच वाटेला लागले असतात )

सानिका मनाची समजूत काढत होती. पण आज मन काही ऐकत नव्हते. सारखे लक्ष हाॅल बाहेर प्रवेशद्वाराकडे जात होत. समोरून तेजसची आई येताना बघून सानिकाच ह्रदय धडधड करू लागल .आज रोखून न शकणारी नजर तेजस ला शोधत होती. एक क्षण पण डोळ्यांना गमावून चालणार नव्हता. आज पापण्या पण तेजसला पहिल्या शिवाय मिटणार नव्हता. तेजसला समोर बघून हदय इतक धडधडू लागल. .श्वासची गती वाढत होती . हळूहळू चेहरा खूलत होता. सगळी लाज डोळ्यात उतरली.आणि डोळ्यासमोर तेजसच्या आठवणी गोळा झाला. ती पहिली नजर ती फक्त नजर नव्हती तर प्रेमाची पहिली नजर होती . पहिल्या नजरेत तो आपल्यास वाटला होता. आज तिच प्रेमाची नजर पुन्हा पुन्हा तेजस वर पडत होती.

तेजसनी लाल रंगाचा शॅट घातला होता. तेजसला सगळे रंग छान दिसत पण लाल शॅट मध्ये जास्तच हाॅडसम दिसत होता. सानिका लांबून लपून लपून तेजस कडे पाहत होती.लग्न लागला बराच वेळ होता.

तेजसचे बरेच मित्र मैत्रिणी लग्नाला आले होते.तेजस आणि त्यांचे फ्रेंडस् मस्त गप्पा मारत होते. त्यात 2 मुली पण होत्या. सानिका लांबून सगळे बघत होती. त्या 2 मुली तिच्यासाठी अनोळख्या होत्या. बाकी सगळी मूल जवळपास राहणारी होती. त्याचा धिंगाणा मस्त चालू होता.

तेजसच्या मैत्रिणी तेजस सबोत सेल्फी काढत होत्या .सानिका त्याना बघून जेलेस होत होती. तिच्या रोमा रोमांत आग उसळली .तिला तिच्या शिवाय दुसर कोणी तेजस जवळ बघू वाटतं नव्हत.

(सानिका वळती तेजस कडे पाठ करून थांबती. मनात नाही तेजसचा विचार नाही करायचा. तो कोणा सोबत असला तरी काय फरक पडतो?आता नाही बघायच त्याकडे. मी सोडून सगळ्या मुलीकडे लक्ष आहे त्याच)

अचानक कोणी तरी सानिकाचा हात पकडत. सानिका मागे वळून बघते तर तेजस तिच्या समोर असतो.

सानिका-(हात सोडत )😳 तेजस

तेजस-खूप वेळ झाले बघतोय ,तू माझ्या कडे बघते

सानिका-😨 नाही.. हात सोडना (हात सोडनाचा प्रयत्न करते)

तेजस-(हात घट्ट पकडून) फरक पडतो ना... मला अस दुसरा मुली सोबत बघून (हासत)😂😂

सानिका-कोणा सोबत पण बोल?कोणा सोबत पण सेल्फी काढ?मला काय करायचंय..

तेजस-अस का??मग तू का जेसल होती?नसेल होत तर बघू नको.

सानिका-नाहीच बघत तूझ्याकडे.(सानिका मान्य करत नाही ती त्याकडे बघत होती)

तेजस-ठीक आहे मग..नको बघू मी परत जातो माझ्या मैत्रिणीच्या जवळ.

सानिका (तिच्या डोळ्यांत पाणी येत ) -हात सोडना

तेजस-नाही.आधी मान्य कर..तू बघत होती...मग सोडतो

सानिका-तेजस कोणी तरी बघेल ना..सोडना हात

तेजस- नाही..नाही

सानिका- तेजस इथे नको बोलायला, कोणी पण बघेल.

तेजस- चल मग बाहेर जाऊन बोलू.

सानिका- ठीक आहे.

तो तिचा हात सोडतो. दोघांही सगळ्याची नजर चुकवून हाॅल मधून बाहेर पडले.

(हाॅलच्या बाहेर)

तेजस- सानिका आज तू खूप क्यूट दिसते.तूला सारखं बघावस वाटतं.

सानिका-(लाजते)

तेजस-तसा मी पण काही कमी हाॅडसम दिसत नाही.म्हणून तर तू मला चोरून चोरून बघत होती.

सानिका (काही न बोलता तेजस कडे बघते )

तेजस- सानिका काही तरी बोलना..किती दिवस झाले तूझा नीट आवाज पण ऐकला नाही. किती दिवसाने तूला बघतो.आज मन भरून तूला बघू दे ..

सानिका-😥

तेजस- सानिका का वागते अस.. मला त्रास होतो तूला कळत नाही का??तूला अजून त्रास द्यायचा आहे का?

सानिका-(इमोशनल होऊन) नाही रे.. तूला त्रास देऊन मला आनंद होतो का? मला पण त्रास होतोय ना..(सानिका रडू लागली)

तेजस तिला मागे खेचले.. आणि तिला घट्ट मिठी पकडून ठेवल..दोघांनाही धडधडतं होत..त्याच्या ह्रदयाची होणारी धडधड सानिकाला जाणवत होती.तिने डोळे मिटले. पण ती काही बोलत नाही पाहुन त्याने अजून घट्ट मिठीत पकडले.

तेजसच्या मिठीत जाऊन सानिकाच्या मनात इतके दिवस साचल होत ते सगळे अश्रुने बाहेर येऊ लागले.

सानिका - साॅरी तेजस मी जे वागले तूला खूप त्रास दिला ना मी.

तेजस- सानिका i love you so much... मी तुझ्या पासून लांब राहू शकत नाही. बोल ना तुझ्या आयुष्यात मला समावून घेशील का? मला तूझा बनवशील का?

(सानिका रडायला लागते. तिला आनंद पण होत होता तीच प्रेम तिच्या समोर होत.)

तेजस-अग वेडे रडतेस काय मला उत्तर दे.? अजून किती वेळ मला त्रास देणार आहेस.??

सानिका- अजिबात नाही..तुला त्रास झाला तर मला नाही होणार का? आणि मला तुला अजून त्रास नाही द्यायचा .तूझा पासून लांब राहून कशी जगले मलाच माझ माहित. पण काय करू माझ पण खूप प्रेम आहे तुझ्यावर .तूझ्यासाठी तूझा पासून लांब रहीले. मला तुला कधीच सोडून जायच नव्हत.म्हणून तुला साथ देण्याआधी मी तुझ्यापासून लांब गेले.

तेजस -तू का रडतेस ग? मी आहे ना तुझ्यासोबत .मग का मला सोडून जाशील? .. आणि तू विचार केला तरी मी तुला सोडून जाऊ देईल का?

( सानिका तेजसला आई बाबांच्या तीच कडून असलेल्या अपेक्षा सांगते .)

सानिका- सगळ्या आई वडीलच्या आपल्याला मुलाकडे काही तरी अपेक्षा असतात.. आणि का असू नये.माझ्या आई पप्पांना माझ्यावर विश्वास आहे .त्यासाठी मी त्यांच विश्र्व आहे. मग त्याच्यासाठी मी त्यांना आवडत्या मुलासोबत लग्न करायला तयार झाले.

तेजस - सगळ्यांच्या घराच्याना हेच वाटतं .ते त्याच्या जागी बरोबर आहेत पण आपण पण काही चुकी करत नाही. आपण बोलू त्यांच्या सोबत काही तरी मार्ग नक्की निघेल.

सानिका - पण घरचे तयार होतील का? आणि नाही झाले तर??😰

तेजस - तू नको टेन्शन घेऊ. मी आहे ना.माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे.आजही तो दिवस आठवतो तूला पहिलादा तूझा घरासमोर गाडी चालू करताना पाहिलं. तेव्हा पासून माझ्या मनात तूझा चेहरा आहे. मला तू कधी दिसली नाही तरी मला वेड्या सारख होत.तूझासोबत मैत्री झाली त्यानतंर खरा अर्थाने जगायला शिकलो.माझ प्रेम तूझासोबत आयुष्यभर राहण्यासाठी आहे. तू आता पर्यंत कधी घरच्यांच्या विरुद्ध जाऊन काही केलं नाही. पुढे पण नको करू.
आपण बोलू त्यांच्या सोबत समजावून सांगू ते स्वतः हून परवानगी देतील खात्री आहे मला.माझ्यापासून लांब जाईचा निर्णय घेतला पण तू खुष राहू शकली नाही पुढे कशी खुष राहणार होती? तू खुष नसेल तर घरचे तरी कसे खुष होतील?

सानिका -मला माफ कर.. मी खूप चुकीचा विचार करत होते. ह्या पूढे मी कधीच तुला माझ्या पासून लांब करणार नाही.

तेजस-मी कधी पासून तूझाच झालो आहे. पण तूच माझ्या पासून लांब जात होती.बर ते सोड.. हया पुढे आपण एकमेकांन सोबत राहीच.काही परिस्थिती आली तरी एकमेकांना साथ देयची .

सानिकाला आज तेजसच्या बोलण्यात विश्वास जाणवत होता. तिला त्याच बोल पटत होत आणि मान्य पण होत. सानिका परत तेजसला मिठी मारली. दोघांमधला दूरावा आज नाहीसा झाला. आज खरा अर्थने त्यांच्या प्रेमाचा विजय झाला.

समाप्त..🙏

प्रेमाची पहिली नजर ही माझी पहिलीच कथा आहे .पहिल्यादा कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला. कळत नकळत काही चुकलं असल्यास क्षमस्व. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील माफ करा. कथा लिहिण्याचा पहिलाच अनुभव होता . खूप वेगळा पण छान अनुभव मिळाला. अजून खूप काही लिहावस वाटतं होते . पण वैयक्तिक कारणांमुळे वेळ काढून लिहणे जमत नव्हतं . मला कथा वाचून नक्की सांगा माझ्या प्रयत्न कसा वाटला ??