ani goa bolu lagala in Marathi Short Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | आणी गोवा बोलू लागला ....

Featured Books
Categories
Share

आणी गोवा बोलू लागला ....

ल्लीच १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन साजरा झाला गोव्याने ६० वर्षात पदार्पण गेले ६० नंबरचा केक कापला सगळ्यांनी जलोष केला कोरोना चा काळ असल्याने काही लोकांची उपस्तिथ होती मीडिया ही आली होती एका पत्रकाराने गोव्याला म्हण्टले

"हैप्पी लिब्रेशन डे '

"थँक क्यू "

"काय ६० वर्ष झाली तुला कस वाटतंय"?

"छान चलती का नाम गाडी म्हणतात तसे "

"काय सांगशील ६० वर्षाच्या प्रवास बदल "

"बरं झालं हा तू प्रश्न विचारलास खूप काही सांगायचं आहे"

'म्हणजे"?

" तसा प्रवास छान होता कधी खडतर तर कधी सुंदर कुछ पाने के लिये कुछ खोना पडता हें तसाच खूप काही अनुभवलं ह्या वर्षात पण अजूनही एक खंत मात्र राहिली ती मात्र मी आज दूर करणार"

"कसली खंत "

'आहे जी दूर केली पाहिजे '

"गोवा म्हण्टल्यावर दारू मौज मस्ती हीच प्रतिमा जगावर आहे पण तसं नाही आहे गोवा म्हणजे फक्त दारू आणि मौज मस्ती नाही गोव्याला निसर्गाची देणगी आहे उत्तरेतून दक्षिणेपर्यंत गोवा समुद्रांनी वेढला आहे अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत पण दुर्देव लोक निसर्गाचा आनंद घेण्यापेक्षा व्यसन करून दंगा करण्यात धन्य मानतात तसेच पोहतात जलसमाधी हि घेतात पण नाव मात्र माझं वाईट होते

माझी भूमी म्हणजे परशुरामांची भूमी पावलो पावली श्रद्धा स्थाने मिळतील त्याचे उत्सव सर्व धर्मीय मिळून साजरे करतात मग शिगमोत्सव असो वा कार्निव्हल किंवा गणेश चतुर्थी क्रिसमस असो वा ईद सगळे एका जोशात असतात

आम्ही सुशेगाद म्हणजे जरा आळशी च म्हणा पण तेवढेच मेहनती आहोत काम करावं पण आनंदित राहून हा सुशेगादपणाचा उद्देश माझ्या भूमीतले लोक मजेत राहतात त्यांना पाहिलं कि मन प्रसन्न वाटत ह्या माझ्या भूमीत कित्येक नामवंत जन्मले ज्यांनी माझे नाव जगा समोर ठेवले आणि त्याच्या नावामुळे माझी माझे नाव अजून उंचावले

ही सगळी बरी बाजू असताना नेहमी वाईट बाजूच समोर येते कित्येक लोक आपल्या फायद्यासाठी व्यसनाचे दुकान उघडत्तात त्यात गरजवंतांना खेजतात आपला नफा कमवतात पण पकडले गेले कि नाव मात्र माझे च खराब होते खूप लोकांना म्हणताना मी ऐकलंय "गोव्यात ना सगळं चालतं गोवा म्हणजे मज्जा हे ऐकताना मन रागाने पेटून उठते काही लोकांच्या मुर्खपणामुळे माझी प्रतिमा वाईट बनत गेली"

"खरं आहे तूच"

"तेच ना गेली ६०वर्ष हि प्रतिमा लोकांना अशीच दिसत आहे मान्य आहे मी एक पर्यटन स्थळ आहे पण इथे आल्यावर किंवा इथल्या रहिवाश्यानी सुद्धा आपली जबाबदारी सांभाळ्याला हवी पर्यटन म्हणजे धांगडिगा नाही इथली संस्कृती हि जपली पाहिजे दुसऱयाच्या घरात गेल्यावर आपले वर्तन चांगले असायला हवे कि नाही तसेच घरातल्या माणसांनी सुद्धा आलेल्या पाहुण्यांना काही त्रास न होवो ह्याची काळजी घ्याल हवी कि नको आपण जर वाईट वागलो तर समोरचा तोच किता गिरवणार ना आपल्या राज्यात काही वाईट होऊ नये हि जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे ना आणि असल्याचं हवी तरच माझे नाव उंचावेल

माझ्या ह्या सांगण्याने कदाचित ह्या पुढे मला पहाण्याची नजर पर्यटकांची वेगळी असेल

आज कालची परिस्थिती बद्दल काय बोलू ह्या कोरोना ने तर माझ्या संस्कृतीवर गदा आणली ना कसले उत्सव ना कसले सण वाईट वाटते पाहून पहिलीच मी लहान राज्य त्यात त्या कोरोनाने कित्येक बळी घेतले अजूनही लढा चालू आहे वर्ष सरत आले तरी काही संपण्याचे नाव घेत नाही आणि काही दिवसांनी आपण नवीन वर्षाला स्वागत करणार आहोत पुढील वर्ष तरी नव्या उत्सहाचे असावे हीच अपेक्षा परत एकदा घुमू दे गोव्याच्या संस्कृतीचा ढोल ताशा "

हो घुमू दे मी जोरात ओरडली आणि माझे डोळे उघडले आणि माझ्या स्वप्ननातं गोव्याने आपले मन उलगडले