Kiti saangaychany tula - 3 in Marathi Love Stories by प्रियंका अरविंद मानमोडे books and stories PDF | किती सांगायचंय तुला - ३

Featured Books
Categories
Share

किती सांगायचंय तुला - ३

"ए वतन वतन मेरे आबाद रहे तू,
मै जहा रहू जाहा मे याद रहे तू"


दिप्ती च्या मोबाईल चा अलार्म वाजतो. तशी ती जागी होते. पहाटेचे पाच वाजले असतात. ती पटकन फ्रेश होऊन येते आणि जॉगिंग साठी बाहेर पडते. बाहेर पाऊसाची रिपरिप सुरू असते. अंधार जास्त असल्याने ती ठरवते की आधी थोडी एक्सरसाईज करू मग जॉगिंग ला जाऊ.
एक्सरसाईज कुठे करायची म्हणून ती सगळी कडे बघते. तिला प्रकाश दिसतो. दिप्ती त्या दिशेने जाते.
तिला एक शेड दिसतो. तिथेच हा लाईट लागलेला. ते शेड चार खांबांवर उभे होते.. शेड मध्ये चार खुर्च्या आणि त्याच्या समोर टी टेबल असतो. अगदी राजेशाही काळातली बनावट जशी असते तसचं होत ते. शेड च्या अगदी समोर काचेची एक भिंत होती. पण ती काच अशी होती की आत मध्ये जी व्यक्ती आहे तिला बाहेरच सगळ दिसणार पण बाहेरच्या व्यक्तीला मात्र फक्त स्वतःच प्रतिबिंब दिसणार. आरश्या मध्ये बघितल्या सारखं. दिप्ती वॉर्म अप करून मग पुश अप्स स्टार्ट करते. पण तिला कुठे माहिती असत की तिला कोणी तरी बघत आहे ते ही त्या काचेच्या भिंती मागून. शिवा च जिम होत ते. म्हणजे त्याने बनवून घेतल होत स्वतःसाठी. त्याला बाग दिसणार पण बागेतील व्यक्तीला तो नाही दिसणार. दिप्ती ला बघून तो बघतच राहतो. हातातले डंबेल खाली ठेऊन तो त्या भिंती जवळ येतो. त्याला कश्याचेच भान नसते. तो फक्त आणि फक्त तिलाच बघत असतो.पण दिप्ती मात्र तिच्या वर्कआऊट मध्ये मग्न असते. आधी पुश अप्स, मग चिन अप्स आणि मग थोड मेडीटेशन करायला ती बसते. शिवा आताही तिलाच बघत असतो. तो कधी तिच्या समोर येऊन उभा होतो हे त्याला ही कळत नाही. दिप्ती मात्र शांत बसलेली असते. डोळे मिटून दोन्ही हात समोर ठेऊन.
"किती शांतता आहे यांच्या चेहऱ्यावर"- तो स्वतःशीच विचार करतो.
थोड्यावेळाने दिप्ती आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवते आणि डोळे उघडताच तिची नजर तिच्या कडे बघत असलेल्या शिवा वर जाते. तिला थोड अवघडल्या सारखा वाटत. शिवा आताही त्याच्याच विचारत तिच्या कडे बघत असतो. हे सगळ श्रुती दिप्ती च्या मागे उभी राहून बघत असते.
"गुड मॉर्निंग दादा" - श्रुती दिप्ती जवळ येऊन शिवाला म्हणते. तसा तो भानावर येतो.
"गुड मॉर्निंग"- शिवा
" काय बघत होता तु?"- श्रुती त्याला बारीक डोळे करून विचारते.
" मी, कुठे काय, काही नाही. असच आलो होतो, बागेत फिरायला." - शिवा नजर चुकवत म्हणतो.
" आज चक्क जिम सोडून इकडे आणि ते पण पावसात तू बागेत फिरणार. बाय द वे.. बाग तिकडे आहे इकडे नाही." श्रुती शेड बाहेर बोट दाखवत म्हणते.
"माहित आहे मला"- शिवा तिच्या डोक्यावर एक टपली मारून निघून जातो. पण त्याची नजर मात्र दिप्ती कडेच असते.
"गुड मॉर्निंग डार्लींग"- श्रुती दिप्ती ला मिठी मारत म्हणते.
"गुड मॉर्निंग"- दिप्ती हसत उत्तर देते.
तसं श्रुती च लक्ष दिप्ती च्या हाताकडे जाते. " अग हे कधी लागलं तुला?" - श्रुती काळजीने विचारते.
"काही नाही ग काल रात्री रूम मध्ये चुकून ग्लास पडला माझ्याकडून तेव्हा लागलं काच उचलताना."- दिप्ती तिला समजावत म्हणते.
"कोणी सांगितलं होत तुला नसत्या उचापती करायला, मला सांगायचं होत ना. नाही तर बोलवायचं होत कोणाला पण. घरात एवढे नोकर तर आहे."- श्रुती तिला रागवत म्हणते.
" उशीर झाला होता खूप, म्हणून नाही सांगितलं. आणि हो एवढ नाही लागलं. होईल ठीक लवकर."- दिप्ती
" तू नेहमी अशीच करते यार, तुला काही दुःख असेल की सांगत नाही.जा मी तुझी मैत्रीण नाही ना"- श्रुती लटक्या रागात म्हणते.
" तूच तर माझी हक्काची मैत्रीण आहेस, आता तू अशी रुसली तर मग मी कोणाशी बोलू"- दिप्ती चे श्रुती चे गाल ओढत म्हणते.
तशी श्रुती हसते.
"चला मी येते जॉगिंग करून"- दिप्ती
" अग पण पाऊस"- श्रुती
दिप्ती तिच्या कडे बघून हसते.
" अरे हो विसरलेच होते मी... जा तू"- श्रुती काही तरी आठवून म्हणते.
शिवा इकडे रूम मध्ये दिप्ती चा विचार करत असतो. "त्यांच्या कडे बघून वाटत नाही त्या एवढ्या फिटनेस फ्रिक असतील. म्हणजे एवढ्या सिंपल आहेत त्या... आणि तरी किती सुंदर .... रिअली आय एम इंप्रेस." आणि अचानक त्याला आपण काय बोलून गेलो याची जाणीव होते. आणि तो ऑफिस ला जाण्यासाठी तयार व्हायला बाथरूम मध्ये जातो.
काही वेळा नंतर दिप्ती जॉगिंग करून परत येते.
"गुड मॉर्निंग कॅप्टन"- सयाजी राव हॉल मध्ये बसलेले असतात.
"गुड मॉर्निंग काका"- दिप्ती हसून उत्तर देते.
" पावसात पण जॉगिंग ला गेली होती"- सयाजी राव
दिप्ती काही बोलणार त्या आधी श्रुती तिथे येत म्हणते,
" बारिश मे आर्मी कभी रुकती नही. बरोबर ना दिप्ती."
दिप्ती फक्त हो म्हणून मान हलवते.
" कॉलेज मध्ये असताना पण असच करायची, आणि मी विचारलं की हे उत्तर मिळत होत."- श्रुती सयाजी रावांकडे बघून म्हणते.
" ते तर खरचं आहे, जा बेटा आवरून घे. मग मला तू बनवलेली कॉफी प्यायची आहे"- सयाजी राव दिप्ती ला म्हणतात.
"आता येते पटकन"- अस म्हणून दिप्ती तिच्या रूम कडे जाते.
रूम मध्ये जात असताना तिला शिवा चा आवाज येतो, तो त्याच्या म्युसिक प्लेअर वर गाणं लावून बेसुऱ्या आवाजात गाण म्हणत असतो.


" सोना सोना इतना भी कैसे तू सोना,
तेरे इश्क में जोगी होना मैनु जोगी होना."


गाण म्हणत असताना त्याच्या डोळ्यासमोर फक्त दिप्ती चा चेहरा येत होता.
दिप्ती हसून तीच्या रूम मध्ये जाते. थोड्या वेळात ती तीच आवरून खाली हॉल मध्ये येते. श्रुती, तिचे बाबा आणि आई डायनिंग टेबल वर बसलेले असतात.
दिप्ती सगळ्यांकडे बघून गोड हसते आणि किचन कडे जाते. आणि कॉफी करून घेऊन येते. शिवा पायऱ्या उतरत असताना त्याची नजर दिप्ती वर जाते. ती ट्रे घेऊन डायनिंग रूम मध्ये येत असते. तो तिला बघतच राहतो.
लेमन येलो कलर चा कॉटन चा सलवार सूट घातला असतो तिने. केस नीट एका क्लचर मध्ये बांधलेले. कपाळावर मधोमध लाल रंगाची टिकली, चेहऱ्यावर मेकअप एेवजी तेज आणि हास्य, डोळ्यांवर चष्मा.
तो थोडा वेळ तिथेच थांबतो तसाच तिला बघत.
"अरे शिवा, आज एवढ्या लवकर ऑफिस ला जात आहे?"- सयाजी राव शिवा ला विचारतात.
तसा तो भानावर येत म्हणतो, "हो आज मीटिंग आहे अर्जंट, आणि आज लवकर घरी येईल म्हणत होतो."
"का दादा, आज काही आहे का घरी?"- श्रुती त्याला खट्याळ पने म्हणते कारण तिने शिवाला दिप्ती कडे अस भान हरपून बघताना पाहिलेलं असत.
" तू खूप बोलायला लागली आहे इतक्यात, मार पाहिजे का? ऑफिस मधून आल्यावर बघतो तुला"- शिवा थोडा रागात म्हणतो.
दिप्ती सगळ्यांना कॉफी देते. आणि शिवाच्या समोरच्या खुर्चीवर बसते.
" वा दिप्ती काय कॉफी बनवली यार तू, जी चाहता है तेरे हातो को चुम लू"- श्रुती एक नजर शिवा कडे बघून म्हणते.
तसा शिवा श्रुती कडे डोळे मोठे करून बघतो आणि दिप्ती कडे बघतो. ती खाली मान घालुन असते. सयाजी राव आणि सुचित्रा ताईंच्या नजरेतून हे सुटत नाही. पण त्यांना आनंदही होतो. त्यांना तर दिप्ती पहिल्या दिवसापासून आवडली होती. दिप्ती यायच्या आधी श्रुती ने तिची खूप स्तुती केली होती. दिप्ती सारखी मुलगी आपल्याकडे सून म्हणून यावी हे त्यांनाही वाटत होत.
शिवा नाश्ता करून उठतो आणि श्रुती च्या डोक्यावर मारून सगळ्यांना बाय करून ऑफिस ला जातो.
नाश्ता झाल्यावर दिप्ती श्रुती ला तिने काय डेकोरेशन करायच ठरवल आहे ते सांगते. श्रुती ला ते खूप आवडत.
डेकोरेशन साठी काय काय लागणार आहे ते सगळ साहित्य ती नोकरांना आणायला लावते.
गणपती ची स्थापना करण्यासाठी एक मोठा चौकोनी आकाराचा ओटा असतो. अगदी हॉल च्याच एका भिंतीला लागून. नेहमी बाप्पा ची स्थापना तिथेच व्हायची.
दिप्ती त्याची पाहणी करत असते. तेवढ्यात एक नोकर तिथे येऊन म्हणतो, "ताई, आणली मी माती, कुठे ठेऊ?"
"दादा तिथे ठेवा, " - दिप्ती ओट्या कडे बोट दाखवत म्हणते. मग स्वतःची ओढणी आणि केस नीट बांधून घेते.
जवळ जवळ चार तास लागतात तिला सगळ सामान जमवायला. तो पर्यंत दिप्ती चौरंग सजवायला घेते. त्यासाठी लागणारा लाकडाचा पत्रा ती कापत असते, पण तिला हाताला लागलं असल्याने तिला काही केल्या ते शक्य होत नाही. श्रुती दुसऱ्या कामात व्यस्त असते. मात्र तिचा प्रयत्न सुरूच असतो.
तेवढ्यात मागून तिला आवाज येतो, " मी काही मदत करू का?"
तशी ती आणि श्रुती मागे वळून बघतात तर शिवा त्यांना हाताची घडी घालून डाव्या बाजूने दरवाज्याला टेकून उभा दिसतो.
" हो हो ये, हे एवढ काप ना. तिला नाही कापता येत आहे रे, तिला लागलं आहे ना"- श्रुती
दिप्ती च्या हाताकडे बघून शिवा म्हणतो," हे कसं आणि कधी लागलं तुम्हाला?"
तशी दिप्ती त्याच्या कडे आश्चर्याने बघते आणि विचार करते," ह्यांच्या समोरच तर लागलं होत तरी विचारत आहेत कस लागलं ते"
"अरे काल रात्री लागलं, चुकून तिच्या हाताने ग्लास पडला नी फुटला, काचा उचलताना लागलं. मला पण नाही सांगितलं तिने काल"- श्रुती स्पष्टीकरण देत म्हणते.
तो मनात विचार करतो " म्हणजे ह्यानि खर सांगितलं नाही तर " आणि दिप्ती कडे बघून म्हणतो " मग हे ड्रेसिंग कोणी करून दिलं?"
" मी स्वतः केलं"- दिप्ती पत्रा कापत म्हणते.
तसा शिवा गालात हसतो.
श्रुती त्याच्या कडे बघून म्हणते, "तुला काय झालं गालात हसायला?"
" काही नाही, पाणी आन माझ्यासाठी, खूप तहान लागली आहे."- शिवा
" तिकडं न आला तेव्हा पिऊन यायचं ना. पण तू आज लवकर कसा काय आला?" श्रुती
"सकाळी सांगितलं होत ना, लवकर येईल म्हणून, विसरली काय?"- शिवा
" हो सांगीतलं होत... एक मिनिट, तू आम्हाला मदत करायला आला ना लवकर?" - श्रुती आनंदी होऊन विचारते.
"तस काही नाही आहे, मीटिंग लवकर होणार होती आणि काही काम नव्हत आज म्हणून लवकर आलो"- शिवा स्पष्टीकरण देत म्हणतो.
"पण..." श्रुती
"आता तू पाणी आणणार आहे की नाही?" शिवा थोडा चिडून म्हणतो.
"चिडू नको, घेऊन येते"- श्रुती पटकन उठते आणि किचन कडे जाते.
शिवा दिप्ती च्या हातातून लाकडाचा पत्रा घेत म्हणतो, "तुम्ही खर का नाही सांगितलं श्रुती ला?"
" कारण ती खूप पझेसिव आहे माझ्या साठी. मला हर्ट झालेलं नाही आवडत तिला. आणि काल जे झालं ते मी तिला सांगितलं असत तर ती चिडली असती तुमच्यावर. आफ्टर ऑल तुमचीच बहीण आहे ती. मला कुणाचा मुड ऑफ करायचा नाही आहे म्हणून नाही सांगितलं."- दिप्ती अगदी शांतपणे उत्तर देते.
दिप्ती च्या अश्या वागण्याने तो आणखीच इंप्रेस झाला होता. काही वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही.
शिवा त्याचं काम करत असतो तर दिप्ती तीच. पण शिवा अधून मधून तिलाच बघत असतो.
"किती मन लावून काम करत आहेत ह्या. किती शांत चेहरा पण अस का वाटत ह्या शांत चेहऱ्यामागे काही तरी दडलेले आहे हे मात्र नक्की."- शिवा तिला एकटक बघत मनात म्हणतो..
"घे पाणी"- श्रुती त्याच्या समोर ग्लास करून म्हणते.
तसा तो भानावर येतो. दिप्ती ला कॉल येतो म्हणून ती कॉल रिसिव्ह करण्यासाठी रूम बाहेर जाते.
"का बघत होता तू तिच्याकडे?"- श्रुती शिवाला डोळे बारीक करून विचारते.
" कोणाकडे आणि कधी?"- शिवा खाली मान घालून विचारतो.
"आंधळी आहे का मी? तू बघत होता दिप्ती कडे, सकाळी बागेत, मग नाश्त्याला आला तेव्हा आणि आता पण."- श्रुती
"काही नाही ग, माझ्या मुळे खूप त्रास झाला त्यांना काल रात्री...." शिवा आपण काय बोलून गेलो म्हणून मान खाली घालून बसतो आणि विचार करतो आता ही नक्की आपल्याला नाही सोडणार. थोडी नजर वर करून श्रुती कडे बघतो तर ती मोठे डोळे करून काय अस विचारते.
" माझी शपथ तुला सांग लवकर, काय झालं होत काल रात्री." - श्रुती त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेऊन म्हणते. आता तर शिवा ला सगळ सांगणं भाग होत.
तो काल रात्री काय झालं ते सगळ नीट सांगतो. काच त्याच्या मुळे लागली दिप्ती ला हे ऐकुन तर श्रुती त्याच्या वर काय म्हणून ओरडते आणि म्हणते," यार दादा तू अस कस करू शकतो? ती पाहुणी आहे आपली, आणि तिने तुझ्या कडे बघितल नाही हे काही कारण झालं का राग यायच. आणि राग आला तरी आम्ही होतो ना. आमच्या वर काढ ना राग. तिला कशाला....."
" म्हणून त्यांनी खोटं सांगितलं तुला, माहित होत त्यांना तू चिडणार माझ्यावर. माहित आहे मला चूक झाली माझ्या कडून. म्हणून तर ठरवल मी की ऑफिस मधून लवकर यायचं आणि त्यांना डेकोरेशन मध्ये मदत करायची."- शिवा श्रुती ला मध्येच थांबवत म्हणतो.
" अरे वा... मला नाही केली कधी मदत. हेच कारण आहे की आणखी काही कारण मदत करण्याचं "- श्रुती खट्याळ पणें हसत म्हणते.
" हेच कारण आहे आणखी काही नाही, जास्त विचार नको करू"- शिवा
श्रुती मात्र त्याला अस बघून गालात हसत असते..q
" तुझ्या मैत्रिणी कडे बघून वाटत नाही त्या वर्कआऊट पण करत असतील. "- शिवा आश्चर्य वाटत म्हणतो.
" हो तिच्या प्रोफेशन साठी खूप इंपॉर्टन्ट आहे फिटनेस"- श्रुती उत्तरते.
" खूप धावपळ करावी लागत असेल ना. एका दिवशी किती सारे ऑर्डर्स येत असतील " - शिवा
" ऑर्डर्स? काय बोलतोय तू , तुला काय वाटत कोण आहे दिप्ती"- श्रुती थोडी गोंधळलेली असते.
" अरे त्या इव्हेंट प्लॅनर आहे ना, तूच तर म्हटल होत काल"- शिवा थोडा चिडून म्हणतो.
"इव्हेंट प्लॅनर?"- श्रुती विचार करते "म्हणजे ह्याला माहित नाही तर दिप्ती कोण आहे ते. माझ्या मैत्रिणी ला त्रास देतो काय? भाऊराया जेव्हा तुला कळेल ना ती कोण आहे ते तेव्हा मजा येईल तुझी. शॉक होशील तू"
" हो इव्हेंट प्लॅनर आहे ती."- श्रुती गालात हसत म्हणते.
दिप्ती तिथे येते तर श्रुती तिला विचारते " कुणाचा कॉल होता ग, एवढा वेळ लागला तुला"
" ऑफिस मधून होता. मीटिंग चतुर्थी नंतर आहे. पोस्टपोन झाली मीटिंग. तेच सांगण्यासाठी फोन आला होता"- दिप्ती
"मस्त म्हणजे आता तुला खूप वेळ मिळेल डेकोरेशन साठी. आणि दादा पण हेल्प करणार तुला"- शिवा कडे बघत श्रुती म्हणते.
" दुसरीकडे पण ऑर्डर्स आहे का?"- शिवा दिप्ती ला विचारतो.
" ऑर्डर्स म्हणजे.?"- दिप्ती थोडी गोंधळून म्हणते..
" हो दुसरी कडे पण आहे ऑर्डर्स"- श्रुती पटकन गोष्ट सांभाळत म्हणते.
दिप्ती डोळ्यांनीच काय म्हणून विचारते तर श्रुती तिला काही नाही म्हणून हात खेचत खाली बसवते.
रोज शिवा लवकर यायचा ऑफिस मधून, फक्त दिप्ती ला मदत करण्यासाठी.
डेकोरेशन मध्ये दिवस कसे निघून जातात दिप्ती ला कळत नाही. ती सगळ्यांसोबत रुळली होती. फक्त शिवा सोडून.
आणि बाप्पाचा आगमनाचा दिवस अखेर आला. उद्या सायंकाळी स्थापना आणि महाआरती असते.. आणि त्यानंतर जेवण. तशी रित होती दिक्षित कुटुंबाची. मित्र मंडळी, कंपनी चे लोक आणि नातेवाईक सगळ्यांना आमंत्रण होते.
"तुझ्या साठी उद्या एक सरप्राइज आहे रात्री."- श्रुती दिप्तिला म्हणते.
"सरप्राइज ? पण काय"- दिप्ती उत्सुकतेने विचारते.
" सरप्राइज आहे ना मग आताच कस सांगू. पण एक आहे , तू रडून देशील सरप्राइज बघून." - श्रुती तिची उत्सुकता तानत म्हणते.
" अस ,बघू अस काय सरप्राइज देतात तर मॅडम"- दिप्ती हसत म्हणते.


******क्रमशः