Lahan Pn Dega Deva - 2 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 2

Featured Books
Categories
Share

लहान पण देगा देवा - 2

भाग २

रमाला आता वेध लागले होते तिच्या लेकरांचे, आज ठरल्या प्रमाणे गणपतीची सजावट करायची, असच त्यांनी ठरवलं होत. आणि इथे मला प्रश्न तिला कसं समजवायचा कि आपली कोणतीही मुले येणार नाहीत हे सांगण्याचं. तरी सुद्धा एक फोन करून विचारवं म्हणून मी घरा बाहेर पडलो, कारण मी फोन करून येणार कि नाही विचारणार हे रमा ला कळता कामा नाही, म्हणून मी माझ्या मित्राच्या सुरेश च्या घरी गेलो, त्याच्या घरी पण अगदी माझ्या घरा सारखं पण फरक एकच कि आम्ही दोघे आहोत एकमेकां साठी, पण त्याच्या सोबत वाहिनी मात्र नव्हत्या, मग काय कधी शेतात तर कधी माझ्या सोबत वेळ घालवायचा.

कधी तर असं वाटत कि या मुलांना उगाच पंख दिले आज आकाशात इतके उंच उडाले आहेत कि ज्यांनी उडायला शिकवले त्यांना काय हवं नको याचा विचार पण करत नाही. आणि फोन करून विचारलं कि आम्ही कशाला येऊ इथे इतकी काम आहेत, पैसे पाठवले आहेत पहा काही हवं असेल तर सांगा मी इथूनच arrange करेल.

अरे पण त्यांना कोण सांगेल कि ज्यांनी पैसे कमवायला शिकवले, जगात वावरायला शिकवले त्यांना त्या गोष्टी ची गरज नसते, त्यांना आपल्या पाखरांचा सहवास हवा असतो, जाऊदे .

खूप विचार करून मोठ्या ला फोन लावला, आणि समोरचा आवाज एकूण खूप आनंद झाला, माझा नातू अथर्व, अरे अथर्व बाळा तू कधी आलास भारतात परत, आणि आलास एक पण फोन नाही ?

समोरून अथर्व, आजोबा आज सकाळीच आलो आहे आणि लवकरच येतो आहे मी तुमच्या कडे कोणी नाही आलं तरी मी येणार हा. आजी ला सांगा माझे लाडू बनव मला हवे आहेत.

ये रे बाळा लवकर ये तुझी वाट बघतो आहे. असं म्हणून आम्ही फोन ठेवला.

अथर्व माझा नातू, खूप हुशार London मध्ये असतो, तो आलं कि सगळे येतात नाहीतर मग वाट पहा त्याच्या भारतात परत येण्या ची . अथर्व ला आम्हा दोघांकडे राहायला फार आवडत पण शिक्षण आणि त्याच भविष्य या साठी आम्ही कधीच थांबलं नाही. पण तो एकमेव होता जो माझ्या रमा ला तिच्या मुलांच्या जवळ अनु शकतो.

आता आलं ना तो कि बोलणारच आहे मी त्याला, कि तुझ्या आजीचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर म्हणजे मी मोकळा झालो.

रमा ला हे सगळं सांगण्या साठी मी धावपळत निघालो, खूप आनंद झाला होता मला, असं झाला होत कि तिला कधी हे सांगले, म्हणून घरी निघालो आणि, अचानक समोरून येणाऱ्या गाडी कडे लक्षच गेले नाही.

अचानक खूप सारे आवाज काना जवळ घुमू लागले, डोळे उघडले तर रमा चा रडका चेहरा आणि सुरेश ची चालू असलेली धावपळ दिसू लागली, आणि शेजारी एक व्यक्ती येऊन उभी राहिली. आजोबा ठीक आहेत ना, काय तुम्ही असं काय महत्वाचं काम होत कि काही न बघता पळत निघालात.

डॉक्टर. साक्षी, गोड मुलगी, माझे आणि रमाचे सगळे उपचार तीच करत, वडील डॉकटर आणि आता तिने हि गाव सोडून न जात त्यांचं clinic सांभाळायला घेतलं होत.

डॉकटर साक्षी: अहो आजोबा मला नाही तर कमीत कमी आजी ला तरी सांगा काय झाला आहे ते

आग माझी पोर काही नाही ग उलट चांगली आनंदाची बातमी घेऊन निघालो होतो, आणि आनंदात काही सुचलं नाही.

काय हो अशी काय बातमी आहे जी माझी देखील तुम्हाला आठवण नाही आली, तुम्हाला काय झाला असत तर मी कोना कडे पाहणार होते?

अगं रमा तुझा अथर्व येणार आहे, साक्षी तुझा मित्र येतो आहे बरं. आता मला सांगा एवढी आनंदाची बातमी मी धावत पळत च येणार ना सांगायला.

आता अथर्व बदलू शकेल का या आजी आजोबांचे बालपण पाहू या.