काहीतरी गौडबंगाल आहे हे मात्र नक्की झालं.
पण मनाच्या कोपऱ्यात त्याची काळजी वाटत होती. त्या भूत बंगल्यात परत जायची इच्छा नव्हती. पण एकदा मला माझ्या मनाची शांती हवी होती. संध्याकाळ व्हायला आली होती, झपझप पावलं टाकत मी वाड्या समोर पोहोचले. भव्य वाडा तसाच दिमाखात उभा होता. सगळीकडे शांतता पसरलेली. जोरात आवाज दिला, “हॅलो….” तसा तो आवाज चारी बाजूला घुमला.
“श्री, तू आहेस का ईथे?” कसंलाच प्रतिसाद नाही. काही वेळ मी उत्तराची वाट पाहिली. छे, काही उत्तर नाही. जाऊदे मीच आत जाते. मी स्वताशीच पुटपुटले.
पाठीवरची बॅग त्या चौथऱ्यावरच टाकून त्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोल्यांकडे जायला लाकडी पायऱ्यांचा तो रुंद जिना चढायला लागले. जिन्यातला अंधात वाहून वर चढायची इच्छा होतं नव्हती. मात्र तरीही मी हिम्मत करून आत जायला निघाले, “श्री, ऐकतोस का? श्री?” कित्येकदा हाक मारूनही त्याने ओ दिली नाही. आता मात्र मला शंका यायला लागली, मला सांगितलेली माहिती पूर्णपणे खरी नाही. यात काहीतरी खोट नक्कीच आहे जे माझ्यापासून लपवलं जात आहे. थरथरत्या पावलांनी मी जिना चढत होते, या बाजूला मी आधी का आले नाही याचा विचार करत असं तानाच समोर एक भलामोठा हॉल नजरेस पडला. भीतीनं घशाला पडलेली कोरड पाहून आणि वर सुन्न झालेलं डोकं ते समोरच दृश्य पाहुन काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. खिडकीतून येणार सौम्य प्रकाश आणि खिडक्यांच्या फटीतून वाहणारी हवा अजूनच अंगावर काटा उभा करत होती. समोर त्या मोठ्याश्या दगडी चौथऱ्यावर एक पेटी ठेवलेली दिसत होती, मी थरथरत्या हातानेच त्यावरची धूळ साफ केली. कुरकरुणारी कडी काढत भीतीचा आवंढा गिळत पेटीची कडी काढून आत डोकावले. ई…..!! त्या कुजलेल्या मांसाच्या घाण वासाने ओकारी आली. समोर जे बघत होते ते पाहून मी धाडकन जमिनीवर कोसळले.
“सूरी…” त्याचा आवाज कानावर पडला. तोच मोहक आवाज मला त्याच्याकडे आकर्षित करत होता. डोळे किलकिले करून मी आजूबाजूला नजर फिरवली. मात्र तो कुठेही दिसेना. “तू… कुठेयस मला दिसत का नाही.?” मी घाबरंल्या स्वरात थार्थरणारा स्वर लपवत म्हणाले.
“तू का आलीस परत सुरे? तू का आलीस?” त्याचा आवाज त्या हॉल मध्ये घुमत होता.
“मी? मी का आले? तू कोण आहेस? मला सांग तू कोण आहेस इथे काय करतोस?”
“मी? इथे का? ऐकायचंय तुला?” तो कुत्सित हास्य हसला. तू का आलीस इथे? का आलीस? मी बोलावलं?” तो पुन्हा त्याच कुत्सित स्वरात हसला.
“म्हणजे?” मी गडबडून विचारलं.
“म्हणजे या वेळी मात्र मी तुला बोलावलं नाही. तू स्वतःहून आलीस.”
अंधाऱ्या जागेतून तो पुढे आला त्याचा तो भयानक अवतार पाहून मन थर्रर्रल आता त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता दिसत होती, “श्री, तू बरा आहेस ना?”
“हे बघ श्री, मला माहित आहे तू कोणत्या परिस्थिती मध्ये आहेस. पण घाबरू नको मी आहे तुझ्या सोबत, कायमची. आपण चांगल्याल्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ. तुझ्यावर चांगले उपचार घेऊ.” मी त्याच्याकडे एक एक पाऊल टाकत पुढे सरकत होते. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीत मात्र कुठलीच हालचाल नव्हती.
“श्री, ऐकतोयस ना?” मी आवंढा गिळत त्याला विचारलं. तो काहीसा भावनिक होऊन विचार करत असावा. एवढ्या वेळात मला समाजयचे ते मी समजून गेले होते. तो पुन्हा त्याच स्थितीत होता ज्याची तो स्वतःलाच भीती होती. फक्त अजून काही वेळ मला वाट पहायची होती. मात्र नियती याहून वेगळी असावी.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतील मी हाताने स्पर्श करणार तेवढ्यात बाहेर अबुलन्सचा आवाज घुमू लागला. त्या आवाजाने त्याने चमकुन माझ्याकडे पाहिलं, पुढे काही घडायच्या आत त्याने रागाने माझा गळा आवळला. “का? असं का केलंस तू?” त्याचे डोळे रागाने लालबुंद झालेले मला दिसत होते. त्याच्या घोगऱ्या आवाजाने खोलीत आवाज दुमदुमला.
“तुला बरं करण्यासाठी आम्ही मदत करू श्री. विश्वास ठेव.” माझ्या गळ्याभोवतीचा पाश घट्ट होतं होता, “आता हा खेळ माझ्या मरणा सोबतच संपेल.” तो त्याच घोगऱ्या आवाजात म्हणाला. श्वास घेणं आता जवळजवळ बंदच झाल्यात जमा होता, मी श्वास गुदमरून डोळे झाकले तोच माझ्या गळ्याभोवतीचा त्याचा हात सैल झाला, भोवळ येऊन तो स्वतःच खाली कोसळला.
“श्री….”
कुठल्याश्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलं होतं. मी पहिल्यापेक्षा जास्तच अस्वस्थ होतो, कारण आता मला माझा भूतकाळ छळायला लागला होता. भूतकाळाचे अनेक ओरखडे माझ्या मनावर अजूनही ताजेच होते. त्या आठवणीने नकळत हात मानेवर गेला, जुन्या आठवणीचे ओरखडे मनावर आता हावी व्हायला लागले. “नाही नाही, मी काही केलं नाही. प्लिज मला सोडा.” मी ओरडत होतो. किंचाळत होतो मात्र कुणीही माझं काहीच ऐकलं नाही.
भयानकता वाढवणारा तो अँबुलन्स चा आवाज माझ्या डोक्यात इतका भिनलेला होता की जुन्या आठवणींच्या नुसत्या ओझरत्या विचाराने मी बेभान होतं होतो. पण हे लोक असं का वागतात, काही झालेलं नाही मला मी कुठेही जाणार नाहीय मी ठणकावून सांगितलं. पण ते ऐकायला तयार नाहीत. “आई….!” मी रडलो, किंचाळलो, माझ्या आरडा ओरडण्याचा त्यांच्यावर काडीचाही फरक जाणवला नाही. विनवण्या केल्या पण त्या चार लोकांची घट्ट पकड मला सोडवता येईना. मला दंडाला धरून ओढणाऱ्या चा मी हातावर कडकडून चावा घेतला. त्यांच्या विळख्यातून सुटायचा हा प्रयत्न ही काही जमला नाही. दोन मजबूत हातानी घट्ट विळखा घातला. मागून जोरात तडाखा बसला तशी त्या अंधाऱ्या खोलीत मी कोलमडलो. अगं दीच बंद आत हवा तरी कुठून येत होती ते कळलं नाही. पण मी कितीही आरडा ओरडा जरी केला असं ता तरी काही उपयोग नव्हता. माला जायचं नाहीय पण… जावं लागेल.
एका कोपऱ्यात शांत बसून घेतलं, स्वताशीच एक गडगडाटी हसू हसलो. का कळत नाही या लोकांना त्या शक्ती ज्या मी अनुभवतो. ते सगळं.... कसं समजावू?
वेडा नाही मी. पण काही गोष्टी आहेत ज्या मला पूर्ण कराव्या लागतील. तुझ्या मनात चालेली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात येतीय. मी त्या ठिकाणी ज्या गोष्टी अनुभवल्या त्या खऱ्या आहेत. दुनियेसाठी मी नक्कीच वेडा आहे पण मी बरा होऊ शकत नाही. माझी सुटका माझ्या मरणानंतरच.
सुर्वी -
रात्री उशिरा घरी येऊन बॅग ठेवली मी त्याच्याच विचारात होते की टेबलावर ठेवलेला फोन खाणानला. “हॅलो सुर्वी मॅडम का? मॅडम, तुम्ही ऍडमिट केलेल्या पेशन्टने गळफास लावून घेतला. जागेवर गेला बिचारा.” समोरच्याचे शेवटचे शद्ब अस्पष्ट ऐकू आले. कानात फक्त त्याचे शब्द घुमत होते, “माझी सुटका माझ्या मरणानंतरच” माझ्या शिक्षण आणि मानसशास्त्र इथे हरलं होतं. त्याला शोधण्यासाठीची धडपड , माझं प्रेम हरलं होतं. अंगातले त्राण संपले तशी डोळ्यासमोर अंधारी आली. मी धडकन जमिनीवर कोसळले.
त्याच्यासोबत अनुभवलेली एक एक गोष्ट डोळ्यासमोरून जात होती, मला होणारे भास होते की सत्य? या कोड्यांबरोबरं तो ही एक कोडं बनून राहिला, कायमचा.
आज तीस दिवस झाले माझ्या रूम मध्ये मला आता खूप सुरक्षित वाटायला लागलं होतं. म्हणजे मी कुणालाही आमच्या दोघांच्या विचारांत व्यत्यय आणण्यासाठी जागाच दिली नव्हती. पण त्या दिवशी कोणीतरी दार धडकन तोडलं…!! कुठलेसे लोक येऊन मला चला म्हणत आहेत. मी त्यांना विचारलं श्री तिथेच एक का..? ते हो म्हणालेत, बर झालं तो असेल त्याला भेटता येईल…,
पण कुठे आणून सोडलं यांनी मला आजूबाजूची लोकं ओरडतात माझ्या विचारांत व्यत्यय येतो. मला नाही आवडत. अजिबात नाही आवडत .. म्हणून काल त्या एका बाईचं डोकं मी भिंतीवर आपटून आपटून तिला शिक्षा केली, हो केलंच पाहिजे ना आम्ही दोघे बोलत असताना सारखी मध्ये मध्ये लुडबूड करत असते.