कादंबरी –प्रेमाची जादू
भाग -२२ वा
------------------------------------------------------------
१.
यश मित्राच्या घरी पोंचला , त्याच्या पाहुण्यांना हॉस्पिटलमध्ये admit केले . परिचयाचे
डॉक्टर ,तिथला स्टाफ माहितीचा ,यात आणखी एक गोष्ट महत्वाची ..एका सेवाभावी
संस्थेच्यावतीने चालणारे हे धर्मदाय हॉस्पिटल असल्यामुळे ..इथला खर्च डोळे पांढरे करणारा
नाहीये .”.हे यशने अगोदरच सांगितले ..
त्यामुळे मित्राच्या घरातील चिंताग्रस्त मंडळींना धीर आला.
पेशंटची व्यवस्था लावून झाल्यावर ..मित्र म्हणाला ..
चल ,बाहेरच्या हॉटेल मध्ये चहा घेत बोलू ,मला बरे वाटेल . यशने घड्याळात पाहिले ..
लंच-टाईम होण्यास थोडाच वेळ शिल्लक होता.., त्यामुळे लंच करून सरळ शो रूमला
जाऊन कामाला जुंपून घेणे सोयीचे होईल ,या विचाराने -
तो मित्राला म्हणाला ..ठीक आहे ,
हॉटेलमध्येच काही खाऊ या ..म्हणजे लंच होईल लगेच चहा पण होईल.
दोघेजन एका हॉटेलमध्ये येऊन बसले ..ऑर्डरप्रमाणे डीश आल्या , गप्पा करीत जेवण
सुरु झाले ..त्या ओघात ..मित्र म्हणाला ..
अरे यश ..
मागे मी तुला एक सुचना केली होती की ..आठवते का -
तुझ्या शो-रूम आणि ग्यारेज –वर्क्शोप मध्ये कुणीतरी
तुमच्या इथे असलेल्या छान वातावरणाचा गैरफायदा घेतो आहे ..याचा तू शोध घे ..
काही सुगावा लागला की नाही याचा ?
यश म्हणाला ..तू सांगितले खरे ..पण माझ्याकडूनच हे सगळे करण्यास उशीर आणि म्हटले तर
दुर्लक्ष होते आहे ..
पण मी याकडे देईन लक्ष , त्यासाठी वेळ देईन मी !..यशने मित्राला आश्वासन दिले .
दोघांच्या गप्पासोबत लंच चालू होता .
त्याच वेळी हॉटेलच्यासमोरच्या वर्दळीच्या रस्त्यवर एक पान टपरीसमोर
दोन बाईकवाल्यांची बाचाबाची सुरु झाली ..आणि मुद्याचे रुपांतर गुद्द्यात झाले ..
जाणरे येणारे ..बघे , भोवताली जमून त्या दोघांची फायटिंग पाहत होते .
ही मारामारी चालू असतांना ..यशच्या वर्कशोप मधले नारायणकाका तिथे आले आणि त्यांनी मारामारी
सोडवली ..आणि त्यातील एकाला आपल्या बाईकवर बसवून घेऊन गेले .
यशला एकदम आठवले ..
मागच्या वेळी याच माणसाला हाय - वे वरील मारामारीतून सोडवायला नारायणकाकाच आले होते ..
आजही तेच आलेत ..माणूस ही तोच आहे ..याचा अर्थ ?....
यशने मित्राला मागचा प्रसंग सांगितला .
ते ऐकून ..मित्र म्हणाला ..
यश .. नारायणकाका सोबत असलेला इसम कोण आहे , त्याच्याशी त्यांचे काय रिलेशन आहे ,?
हे माहिती करून घे ..
माझा तर अंदाज आहे ..
तुझ्या वर्कशोप आणि शो-रूम मध्ये जे काही गैरप्रकार घडत आहेत ..त्याच्याशी नारायणकाकांचा संबंध असेलच असे नाही .
त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे हे मला ही माहिती आहे ..
पण..त्यांच्यावर कुणी संशय घेणार नाही ..याचा फायदा .हा जो कुणी आहे , तो घेतोय असे मला वाटते आहे.
यश विचारात पडला ..मित्राची शंका आणि अंदाज चुकीचे नाहीत असेच वाटत होते .
नारायणकाका बद्दल त्याच्या मनात शंका नव्हतीच ..शंका आहे ती काकांनी ज्या माणसाला दोन वेळा
भांडणातून ,मारामारीतून सोडवले ..हे आपण स्वतहा पहिले ..
म्हणजे हा माणूस नक्कीच त्यांच्या जवळचा कुणीतरी असावा ..म्हणूनच तर ते हातावरचे काम सोडून
या माणसाच्या मदतीला येत आहे ..
काहीतरी घोळ नक्कीच आहे , याबद्दल आपल्याला काही संशय आलेला आहे “,
हे मात्र नारायण काकांना कळाले नाही पाहिजे .
यशने ऑफिसला फोन केला ..म्यानेजरकाकांना विचारले ..
काका ग्यारेज मध्ये तुम्ही स्वतः जा आणि पहा ,
नारायणकाका किती वाजता आले ..आता आहेत का ते पहा , नसतील तर ते किती वाजता परत आलेत
या बद्दल आणि मला अपडेट द्या . आणि हो कुणाला हे कळता कामा नये
.कुणाला काही संशय येता कामा नये .
या विषयावर आपण दोघे संध्याकाळी सविस्तर बोलू . बाय ..!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
मधुरा कोलेज आटोपून बाहेर पडली ..तिच्या मैत्रिणीनी आठवण करून देत म्हटले ..
मधुरा ..अग ,एक महिना होऊन गेला .
अजून आपल्याला सोयीचे घर मिळाले नाहीये .
सध्या राहतोय त्या घरमालकांनी रोज एकच टुमणे लावलय ..
हे बघा मुलींनो ..तुम्हाला त्रास दयाची इच्छा नाहीये ..पण, करणार काय ,आम्हालाच गरज आहे
म्हणून तुम्हाला घर रिकामे करा “असे म्हणावे लागते आहे ..
मुले असती तर ..त्यांना कधीच सोडावे लागले असते ..पण आम्हाला वाटते ..
मुलीच्या जातीला ..नको त्रास व्हायला ..
पण तुम्हाला या गोष्टीची कल्पना देऊन दोन महिनेझालेत ..आता नाही आम्ही थांबू शकणार .
.लवकरात लवकर ..घर रिकामे करा .
मधुरा ,तुझे बरे आहे बाई , तू तुझ्या दीदी सोबत राहतेस , पण आपण सगळ्या मिळून राहायचे
ठरवले आहे ..म्हणून तुला पण आठवण द्यावी लागते .
मधुरा म्हणाली – तुमचे बरोबर आहे , आणि मी दीदीला पण कल्पना दिली आहे ,
जीजू म्हणाले-
मी पण पाहतो आहे ..आता आपल्याला सोयीचे ..परवडणारे घर , त्यात studant मुली म्हटल्यावर
सहजासहजी नाही मिळत चांगले घर .
याशिवाय या भागात असलेले लेडीज होस्टेल अगोदरच भरलेले आहेत , अधे- मध्ये तिथे काही स्कोप
नाही.
मधुराला दीदीचे बोलणे आठवले .. ती म्हणाली होती एकदा ..
मधुरा , तू यशची ,त्याच्या घराच्या माणसांची मदत का घेत नाहीस ? तुझा प्रोब्लेम नक्कीच
सोडवेल यश.
तेव्हा मधुरा यशच्या ऑफिसमध्ये जॉबला नव्हती ,
आता तर आपण यशच्या ऑफिसमधले एक स्टाफ आहोत ,
तिथे तर यश आहे , म्यानेजर काका आणि ऑफिस स्टाफ मधल्या मुली आहेत .
त्या नक्कीच मदत करतील आपल्याला .
मधुरा मैत्रिणींना म्हणाली ..आता तुम्ही नका काळजी करू ..
मी आज माझ्या ऑफिसमधल्या स्टाफला आपली अर्जन्सी सांगते , या महिन्याच्या अखेरीस
आपला प्रोब्लेम नक्कीच सुटलेला असेल.
मधुराला मैत्रीण म्हणाली –
thank god- तुझ्यामुळे आमचा प्रोब्लेम सुटणार आहे. मधुरा तू जर आमच्या सोबत नसतीस
तर आमचे काही खरे नव्हते ..
मधुरा म्हणाली ..असे विचार करू नका , शांत रहा ,धीर सोडू नका .
मैत्रिणीला टाटा-बाय करून मधुरा स्कुटीवरून घरी निघाली . तिच्या येण्याची वाट पहात तिची दीदी
जेवणासाठी थांबलेली असते ..म्हणून मधुरा कॉलेजातून सरळ घरी येते.
ही वेळ बिल्डींग मध्ये राहणाऱ्या ..आणि मधुराच्या मागे मागे असणार्या रुपेशला चांगलीच पाठ झालेली
होती .
स्वतःची दुकानदारी सोडून ..तो मधुराच्या येण्याच्या वेळी बरोबर बिल्डींगच्या गेटसमोर उभा असतो ,
त्याला पाहून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत मधुराने गेट जवळच स्कुटी लावली ,आणि ती आत जाणार
तोच रुपेशने तिला थांबवीत म्हटले ..
मधुरा – मला वाटले होते ..गावाकडून आलेली तू एक गावंढळ पोरगी ..भोळी, भाबडी ,
इथल्या पोरी तर मला दाद देत नाहीत ..निदान ये मछ्ली तो जाल मे..
पण ,उलटेच झाले ..
वरून वरून सिधी साधी वाटणारी ,दिसणारी तू .
.तू तर मला उल्लू बनवणारी महाहुशार छोकरी निघालीस ..
असा -तसा , ऐरा -गैरा नाही तर अगदी यश सारखा मोठाबकरा पटवलाय , त्याच्या गाडीत बसून जाण्याइतकी दोस्ती ..
लफडेबाज निघालीस तू तर ..लकी आहेस ..मला मात्र कधी रीस्पोंस नाही दिलास .
तुझ्या दीदीला –जीजुला माहिती आहे का .तुझी ही भारी लव्ह स्टोरी ?
आता मीच सांगतो ..म्हणजे ..तुझे जीजू देतील तुला हाकलून ..
मधुरा न घाबरता त्याला म्हणाली ..
जीजुचा भाऊ आहेस म्हणून ..गप्प राहिले इतके दिवस ..पण आता ऐक ..
यशचे आई-बाबा ज्या गावचे आहेत न ..त्याच गावची आहे मी ..
दीदी आणि जीजू दोघे ही या सगळ्यांना खूप वर्षापासून ओळखतात ..
जीजू आणि दीदीला माहिती आहे ..उलट त्यांनीच सुचवले मला ..की यशची मदत घे
या सिटीमध्ये काही प्रोब्लेम नाही येणार तुला .
रुपेश ..यावरून तू समजून घे ..की मला त्रास देणे ,छेद काढणे थांबवले नाहीस तर
यश त्याच्या ग्यारेजमध्ये तुझी कशी सर्व्हिसिंग करील ..
तुला आयडीया आहे म्हणे या गोष्टीची ...
असे यशने सांगितले आहे मला .
मी यशच्या ऑफिसमध्ये जोब पण करते आहे..आता या पुढे हेही लक्षात असू दे रुपेश .
मधुरचे ऐकून घेत ..रुपेश चरफडत बाजूला झालाय ..त्याला पुरते कळून चुकले होते की
मधुरा “त्याच्यासाठी नसणारी मुलगी आहे.
पाठमोर्या रुपेश्कडे पाहून मधुराने .
.एक मोठी ब्याद टाळली “ या जाणीवेने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती वर जाण्यासाठी पायऱ्या चढू लागली ..
मनात विचार मात्र ..यश बद्दलचे होते ..
केवळ त्याच्या सोबत आपल्याला पाहून ..या पुढे रुपेश बिलकुल त्रास देणार नाही ..
थांक्यू रे यश ..मधुरा हे वाक्य मनाशी बोलतांना मनोमन लाजली ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
यशने घड्याळात पाहिले ..
संध्याकाळचे सात वाजत आले होते , ऑफिस स्टाफ आपापली कामेसंपवून घरी जाण्यास सुरुवात झाली होती .
म्यानेजरकाका एकटेच आहेत पाहून यशने त्यांना केबिन मध्ये बोलावून घेत म्हटले ..
काका – दुपारी मी तुम्हाला फोन करून काही करण्यास सांगितले होते ..
त्याबद्दल आता आपण डिटेल बोलू या ..
आता तुम्हाला पण या प्रकारातली गंभीरता समजली असेल ..
खुर्चीत बसत काका यशला सांगू लागले ..
आपले नारायणकाका .एक प्रामाणिक ,विश्वासू आणि एकदम हुशार अनुभवी कामगार माणूस
आहे “हे नव्याने सांगायची गरज नाही.
पण अशा चांगल्या माणसाला चक्कर मध्ये आणणारा ..इसम ..सोपान आहे त्याचे नाव ..
आय टी आय केलेला हा मुलगा .नारायणकाकांच्या बहिणीचा मुलगा ..
हा भाचा आता नाराय्न्काकंचा घर -जावाई पण झाला आहे. दोन-तीन वर्ष झालीत याच्या लग्नाला .
..हा सोपान्या त्यांचा जावाई झाल्यापासून नारायणचे दिवस आणि नशीब फिरले आहेत ..
काम-धंदा सोडून इतर उचापती आणि आगाऊ-धंदे करणार्या या जावयाने मामाचे -सासर्याचे - जगणे
अवघड करून टाकले आहे.
गेल्या वर्षात त्याने इतक्यांदा मारामारी केली आहे की.. कुणीतरी नारायणला फोन करतो ,
तसे हातातले काम सोडून नारयण ..भाचा –कम –जावायाला सोडवायला जातो ..
आज झालेला प्रकार त्यातलाच एक ...
यशने सगळे ऐकून घेत म्हटले ..
काका माझ्या कानावर अजून बर्याच गोष्टी आल्या आहेत ..त्याबद्दल मला खात्री करून
झाली की ..तुम्हाला सांगतो ..
मग ठरवू या , या नारायणकाकांचे काय करायचे ?
----------------------------------------------------------------------------------------------------
बाकी वाचू या पुढील भागात
भाग -२३ वा लवकरच येतो आहे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------