तुझाच मी अन माझीच तू...भाग २६
रायन कधी नव्हे ते एकदम चांगला वागला होता. त्याने नकळत आभा शी सगळे शेअर सुद्धा केले होते. पण अरायण खर तर असा कधीच नव्हता.. ही मे बी ही आभा ची जादू होती पण स्वतःच्या वागण्यामुळे रायन जरा अस्वस्थ झाला होता. स्वतःचे असे वागणे त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईजिंग वाटत होते..आपण चुकीचे वागलो असं राहून न राहवून त्याला वाटत होते.. त्यामुळे रायन ची आभा च्या डोळ्यात पहायची हिम्मत होईना.. पण आता आभा काय बोलणार ह्याकडे रायन चे लक्ष लागून राहिले होते. आभा जरा वेळ शांत होती.. ती काहीतरी विचार करतीये हे रायन ला जाणवले होते.. त्यामुळे आभा काय बोलते हे ऐकायची रायन ची उत्सुकता ताणली गेली होती.. तो उठला.. तो एकदम उठला हे पाहून आभा ला काहीच कळेना.. तिला कदम वाटून गेले तो तिच्यावर चिडला.. असे वाटायचं काहीच कारण नव्हते पण आभा ला रायन बद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटायला लागला होता त्यामुळे असेल कदाचित पण रायन च्या अचानक उठ्ण्यामुळे आभा ला काहीच कळेना..
"कुठे जातोस?" आभा ने रायनला वेळ न दवडता रायन ला प्रश्न केला.. "आपण बोलतोय ना.." आधी चांगला असलेला तिचा मूड एकदमच बदलला.. आणि एकदम तिच्या बोलण्याचा सूर बदलला
"कॉफी सांगून येतो... तुला काही हवंय?" शेवटी शांता भंग करत आभा ने बोलायला चालू केले. रायन चे बोलणे ऐकून आभा स्वतःशीच हसली. "काय विचार करत असतेस आभा.." ती स्वतःशी बोलली आणि गोड हसली.
"मला नको काही...आणि मी जास्ती कॉफी नाही पीत.. तू आण.. आणि एक सांग ऑफिस मध्ये तुझ काम अजून किती वेळ आहे?" आभा ने रायन ला प्रश्न केला..
"का ग.." आभा च्या प्रश्नाचा रोख न समजून रायन ने आभा ला प्रश्न केला...
"फार महत्वाच नाही.. पण मला तुला हे विचारायचं आहे की आज संध्याकाळी तुला वेळ आहे?"
"संध्याकाळी मोकळाच असतो.. का विचारते आहेस असे प्रश्न?" अजूनही रायन ला आभा ला काय सांगायचे आहे ते कळत नव्हत आणि त्याने प्रश्नार्थक मुद्रेनी परत आभा ला विचारले..
"तू मला तुझ्या भूतकाळ सांगितलास ना? त्याबद्दल बोलायचं आहे जरा..सो कॅन वी मीट आउट?" आभा ने रायन ला डायरेक्ट बाहेर भेटण्यासाठी विचारले पण आभा च्या अचानक अश्या प्रश्नाने रायन जरा गोंधळूनच गेला.. म्हणज असं त्याच्या आयुष्यात पहिल्यांदीच होत होते की त्याला समोरून असा प्रश्न इकायला मिळत होता.
"अ..अ.." रायन विचार करायला लागला, "आभा इतकी बोल्ड आहे की अनोळखी मुलाला सुद्धा लगेच भेटायला तयार झाली? वॉव.. आभा इज अॅन इंटरेस्टिंग गर्ल.." विचार करता करता त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आले.
"काय झाल? इतका का विचार करतोयस? डोंट वरी..फक्त जनरल ह.. इट्स नॉट अ डेट.. आय अॅम नॉट अस्किंग यु फॉर डेट...डोंट टेक मी रॉंग.." आभा ने लगेच स्वतःचा मुद्दा समोर मांडला.. तिला कोणालाही चुकीचा सिग्नल द्यायचा नव्हता.
"आय नो आय नो! इतक्या लगेच डेट वर मी सुद्धा जात नाही...आणि डेट साठी विचारत पण नाही.. पण तुला अचानक असं का वाटलं?"
"म्हणजे इथे आजू बाजूला लोकं असतात ना... मी स्पष्ट बोलते पण माझी मतं फक्त ज्या माणसापर्यंत हवी त्याच्यापर्यंत पोचावी असं वाटत मला.. माझी मते सगळ्या जगाला कळावी असं मला आवडत नाही..म्हणजे मी आत्ता तुझ्याशी बोलते आहे सो फक्त तुझ्याशीच संवाद व्हावा. सो इथे बोलायला मला थोड ऑकवर्ड होईल.. मी माझी मते एकदम स्पष्टपणे मांडते.. पण ही जागा योग्य आहे असं वाटत नाहीये.. म्हणजे मी काहीतरी बोलायचे आणि ते ऐकून कोणीतरी काहीतरी वेगळाच अर्थ निघू शकतो.." आभा एकदम सिरिअस होऊन बोलली..
आभा चे बोलणे ऐकून रायन पण थोडा सिरिअस झाला. तो कॉफी सांगयला जाणार होता पण खुर्चीवर बसला. आणि आभा कडे पाहत बोलायला लागला,
"तुझे विचार एकदम क्लीअर आहे ग आभा. म्हणजे मला आत्ता हे प्रकार्ष्याने जाणवलं.. तू खरच वेगळी आहेस.. आणि खूप अॅडिक्टिव्ह आहेस.. आणि आय मीन इट..तुझ्याशी बोलत रहावस वाटत... सतत!!" रायन आभाकडे पाहत बोलला.. आभा त्याच्याशी मोकळेपणाने बोलायला लागली आणि आता रायन ने स्वतःला थांबवून ठेवले होते ते सैल सोडले..
"आहेतच माझे विचार खूप क्लीअर..उगाच खोट सांगत का जगू मी? मी मुक्तपणे आयुष्य जगते...आणि मी स्वतंत्र आहे.. बाय द वे, चालेल का तुला?"
"हो हो.. मला काय प्रॉब्लेम.. एक तर मला कॉफी फार आवडते आणि तुझ्या सारखी कंपनी कॉफी साठी मिळाली तर दुग्धसाखर युग का काय ते.." रायन हसत बोलला.. रायन च्या बोलण्याने आभा ला नकळत हसू आलं,
"नो नो...दुग्धशर्करा योग म्हणायचं आहे का तुला रायन?"
"हो हो तेच तेच.. हसू नकोस ग... माझा शिक्षण झालं कॉन्वेंट मध्ये.. सो जरा विक आहे काही ठिकाणी चुकतो..ग!! मराठी थोड कच्च राहील... आणि तू प्लीज हसू नकोस अशी.."
"मग काय रे..सॉरी म्हणजे अस हसायला नको पण दुग्ध साखर कुठून आणलस आणि युग? मला नाही झालं हसू थांबवता आले नाही.." हसू कंट्रोल करत आभा ने बोलायचा प्रयत्न केला..
"कोई नही आभा..सॉरी काय त्यात? तू हसू शकतेस.. म्हणजे हासच..हसतांना तू एकदम छान दिसतेस.. आणि तू एकदम मनमोकळी हसतेस..मस्त व्हाईब आली..तू मस्त आहेस एकदम!! आपल्या ऑफिस मध्ये तुझ्यासारखं कोणीच नाही बघ.." रायन आभा ला अधिकाधिक इम्प्रेस करण्याचा एकही प्रयत्न सोडत नव्हता...त्याचे बोलणे ऐकून आभा ने कपळावर आठ्या आणल्या.. आणि तिला जाणवलं काहीतरी चुकत आहे.. तिने पटकन जीभ चावली..
"ओके मग.. आपण संध्याकाळी ccd.. आता मी जाते.. थोड काम करून निघेन.. तुझ्याशी गप्प मारून मस्त वाटल रायन!!" इतक बोलून आभा लगबगीने तिथून निघून गेली... पण तिने ccd कोणत,किती वाजता हे सांगितले नव्हतेच... रायन च्या ही गोष्ट लक्षात आली. आभा ने त्याच्याबरोबर ट्रिक केली होती... तिने भेटायचं हे तर सांगितलं पण बाकीची माहिती न देता ती तिथून निघून गेली..आता काय करायचं ह्या विचारात रायन पडला..त्याने आभा कुठे दिसते का पहिले पण आभा तिथून निघून गेली होती.. रायन ला हसू आले.. ह्यावेळी आभा शी बोलतांना तो जरा गोंधळून गेला होती.. "आभा मध्ये काहीतरी जादू आहे.. आय वॉंट हर.." रायन ने आपले विचार इथेच थांबवले.. आणि तो सुद्धा काम करायला डेस्क वर गेला.. त्याने जातांना आभा चा डेस्क पाहिला पण तो डेस्क रिकामा होता.. तो जरा वैगालाच..त्याने आभा बरोबर आखलेले सगळे प्लान्स त्याला कँसल होतांना दिसले..त्याला एक मिनिट स्वतःचा रागच आला.. आता आजची संध्याकाळ विनाकारण वाया जाणार आणि ह्या गोष्टीने त्याला थोडे दुःख सुद्धा झाले.. पण तो इतक्या सहजासहजी गिव्ह अप करणार नव्हता.. आभा ला कश्याप्रकारे कॉन्टॅक्ट करता येईल ह्याचा तो विचार करायला लागला.. त्याच्या मनात विचार चक्र चालू झाले.. तो इतक्या सहज सहजी कोणतीच गोष्ट सोडत नसे. आणि त्याला जी हवी ती गोष्ट मिळाल्याशिवाय त्याला चैन पडत नसे..
क्रमशः