असे म्हणतात कि देव भक्ताला आपणच आपल्या दारी बोलावतो अशीच एक कथा आहे विभाची
श्री देव दामोदर गोव्यातील प्रसिद्ध देवता पैकी एक शंकर रूपी दामोदर गोव्यातील वास्को शहरात वास करत आहे श्रावण महिन्यातला दामोदरचा सप्ताह हा मुख्य उत्सव जो भक्ती सह उत्साहात साजरा केला जातो
विभा पाचवीत असेल सप्ताह निमित्त पेपर मध्ये पुरवणी आलेली विभा लहान असल्याने पेपर फक्त चित्र पाहण्यासाठी पाहत असे असेच तिने पुरवणी हाती घेतली देव दामोदरचा पाषाण रूपी भव्य फोटो पाहून विभा ला भीती वाटली तिने पुरवणी तिथेच ठेवली आणि धूम ढोकळी
असेच दिवस पुढे गेले विभा मोठी झाली तरी ती गोष्ट ती विसरली नाही दहावी बारावीची लडाई सराईत पार केली पदवीधर होऊन तिनी चांगली नोकरी मिळवली
मुलगी लग्नाची झाली म्हुणुन तिच्या आई बाबा नि योग्य स्थळ शोधण्यास प्रारंभ केला
अनेक स्थळ आली त्यात एक स्थळ वास्को वरून चालून आले स्थळ चांगले असल्याने दोघी कडून होकार आला आणि देवाचे आमंत्रण असल्यासारखे विभा वास्कोकार झाली
सासरी निघताना दामोदरच्या मंदिरात जाऊन सुखी संसारासाठी आशीर्वाद घेऊन विभा सासरी निघाली
तिचे भावी आयुष्य सुरु झाले आपण आपले सगळे सोडून आल्याची खतं तिला वाटत असे पण आयुष्यात कुछ पाने के लिये कुछ खोना पडता हे मन घट्ट करून विभा संसारात रुळण्यास तयार झाली नोकरी आणि घर सांभाळायचे तिनी ठरवले आणि ती नोकरी करू लागली
तिच्या नोकरीचे ठिकाण देव दामोदराचे मंदिर जवळच होते नवीन असल्याने हि गोष्ट तिला माहित नव्हती हळू हळू तिला नवखे रस्ते तिला आपले वाटू लागले
दर सोमवारी ती मंदिरात जाऊ लागली देवाच्या चरणी नतमस्तक होऊ लागली
आता तिची ती भीती भक्ती बनली होती दर दिवशी देवाचे दर्शन घेतल्याखेरीस तिला प्रसन्न वाटत नव्हते तिच्या दिवसाची सुरवात देवाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरवात होऊ लागली
आपली सुख दुःख कष्ट विभा देवाला सांगू लागली देव हि तिचे निमूटपणे ऐकून घेऊ लागला असे तिला वाटू लागले आपले सगळे प्रश्न देवाच्या पायाशी ठेऊन विभा देवालाच उत्तर शोधण्यास सांगू लागली तिच्या मुखी दामबाबा पाव हेच नाव येऊ लागले
आपल्या पाठीशी दामोदर असल्यास आपण कुठल्याही संकटास सामोरे जाऊ शकतो हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला आणि भक्तांचं आणि देवाचं एक अतूट नातं निर्माण झाले
तिची लहानपणीची गोष्ट तिला अजूनही आठवणीत होती पण त्या भीती पेक्षा आताची भक्ती तिला अधिक जवळची वाटू लागली
विभा संसाराच्या तारेवरच्या कसरत आपल्यापरीने पार करण्याचे पर्यंत करत असे कधी हरत रागावत तर कधी शाबासकीची थाप घेऊन विभा पुढे चालत होती तिला लिखाणाची आवड होती कॉलेज मध्ये असताना तिने खूप साऱ्या कविता लिहिल्या होत्या परत एकदा आपली आवड जोपासावी असे तिनी ठरवले सासरी येताना तिनी आपली लिखाणाची डायरी हि सोबत आणली होती तिनी डायरी खूप दिवसांनी उघडली प्रत्येक पान तिला आपलेसे वाटू लागले नव्या जोमाने परत एकदा तिनी लेखणी उचली आणि परत एकदा आपली लेखक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी पर्यंत करू लागली आणि ती बऱ्या पैकी यशस्वी हि झाली
विभाचे भावी आयुष्य देवाने आपल्या स्थळात लिहिले आहे ह्याचे संकेत तिला लहानपणीच दिले असावे पण विभाला ते काही कळले नाही विभाची लहानपणीची भीती आता नाहीशी झाली
लहानपणी भीती पोटी पळणाऱ्या विभाची भीती देवाने अलगद तिला आपल्या दारी बोलवून काढली आणि आपण तूचा माय बाप आहे आणि तशीच तूंचि काळजी घेतो ह्याची जाणीव करून दिली
लहानपणीची ती गोष्ट आठवली कि विभाला हसू येत आणि आश्चर्य वाटत कि दामोदर देवाची कृपा तिच्या नकळत तिला लहानपणापासून आता पर्यंत साथ देत होती