Like whose karma - 7 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | जैसे ज्याचे कर्म - 7

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

जैसे ज्याचे कर्म - 7

जैसे ज्याचे कर्म! (भाग ७)
छाया! श्रीमंत आईबापाची एकुलती एक लाडात वाढलेली हट्टी मुलगी! तिने एखादी गोष्ट मागावी आणि ती तिला न मिळावी असे कधीच होत नसे. किंबहूना एखादे वेळी आईबाबांकडून नकार मिळणे तर सोडा पण तशी शक्यता दिसताच ती आकाशपाताळ एक करायची. डॉ. गुंडे शहरातील एक प्रतिथयश आणि तितकेच श्रीमंत असे डॉक्टर! छाया जसजशी मोठी होत गेली तसतसे तिच्या आईचे लक्ष तिच्यावरून कमी होत गेले. दिवस दिवस त्या दोघींची भेट होत नसे. तिची आई सतत बाहेर असायची. अनेक संस्था, मैत्रिणींचे अनेक समूह, सामाजिक कार्य यासाठी ती कायम बाहेरच असायची त्यामुळे एकप्रकारे छाया आईकडून दुर्लक्षित होत असे. त्यामुळे छायाही सातत्याने मित्र- मैत्रिणींसोबत असायची. कॉलेज- शिकवणी झाल्यावरही ती तासनतास मित्र- मैत्रिणींसह कधी सिनेमा, कधी हॉटेलिंग, कधी लाँग ड्राईव्ह, कधी आउटिंग अशा विविध कारणाने बाहेर असायची.
त्यादिवशीही सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ती बाहेर निघण्याची तयारी करीत असताना तिच्या मैत्रिणीचा निशा आगलावे हिचा फोन आला. दोघी जीवाभावाच्या नसल्या तरीही चांगल्या मैत्रिणी होत्या. छायाने फोन उचलताच निशा म्हणाली,
"छाये, घरीच आहेस ना?"
"हो ग. काय झाले?"
"काही नाही ग. तुझ्याकडे येतेय?"
"घरी येतेस? का? आपण आज- आता- ताबडतोब नेहमीप्रमाणे भेटणारच होतो ना?"
"हो ग. पण एक वांधा झालाय. तुझ्या बाबांना माझी तब्येत दाखवावी असा माझ्या बाबांचा हट्ट आहे..."
"तुझी प्रकृती माझ्या बाबांना दाखवायची? निशे, वेगळे काही नाही ना?"
"छायटले, फोनवरच कसे सांगू? घरी आल्यावर निवांत बोलू की. ठेवते. येते. तू जाऊ नकोस कुठे." असे म्हणत निशाने फोन ठेवला.
'निशीला बाबांना दाखवायला आणतात. म्हणजे नक्कीच काही तरी विपरित घडले आहे. कदाचित निशा प्रेग्नंट तर नसावी? तसेच असेल म्हणून तिला बाबांकडे आणत आहेत. दुसरा कोणता आजार असता तर तिला दुसऱ्या डॉक्टरकडे नेले असते. बाबांकडे येणारे पेशंट म्हणजे सर्व महिलाच असतात त्यातही प्रेग्नंट बायका अधिक असतात... बाप रे! निशा, हे तू काय करुन बसलीस? कोण असणार निशाचा असला मित्र? तसे तिचे काय पण माझेही अनेक मित्र आहेत. पण या आमच्या सर्व मित्रांमध्ये प्रशांत जिवलावे जरा वेगळाच आहे. मंत्र्याचा मुलगा आहे. लाडावलेला आहे. शिवाय हँडसम, बलदंड आहे. तशा राजबिंड्या तरुणाला पाहताच कोणत्याही तरुणीच्या मनात त्याच्याबद्दल सहज आकर्षण निर्माण होते. निशा जरा जास्तच त्याच्याजवळ जात असते. तशी निशाही आत्यंतिक सुंदर आहे. शिवाय तिच्या सौंदर्याला बेधडक, बिनधास्त स्वभावाची जोड असल्याने तीही सर्वांना आकर्षित करीत असते. प्रशांत- निशा या दोघांमध्ये तर तसे संबंध नसावेत? पण कसे शक्य आहे? प्रशांत तर माझ्या...' छाया तिच्या विचारात गुंग झालेली असताना तिची आई तिथे आल्याचे पाहून वास्तवात परतलेल्या छायाने विचारले,
"आई, आज तू घरी कशी? मिटींग वगैरे नाही का?"
"अग, होती म्हणजे आहे पण मिस्टर अँड मिसेस आगलावे येत आहेत आत्ता. म्हणून कँसल केली. आणि हो त्यांची मुलगी... काय नाव तिचे..."
"निशा..." छाया पटकन म्हणाली.
"हां... हां... छाया! तुझी मैत्रीण आहे वाटते. तीही येणार आहे."
"निशा येणार आहे? कशासाठी?"
"तुझ्या बाबांना दाखवायचे आहे असे तिची आई म्हणाली. आता निशाला दाखवायचे की तिच्या आईला ते माहिती नाही पण माझी संध्याकाळ खराब झाली हे मात्र नक्की. छाये, ते निशाला घेऊन येत आहेत म्हणजे तीच प्रेग्नंट नाही ना? छाये, तू तिची मैत्रीण आहेस. जशी संगती तशी गती अथवा दुर्गती! संगतीचा परिणाम किंवा दोष म्हणा तू तिच्या नादी लागून काही वेडेवाकडे पाऊल उचललेले नाहीस ना..." छायाची आई विचारत असताना रखमाने आत येऊन जिवलावे कुटुंबीय आले असल्याची माहिती दिली तशी छायाची आई बाहेर गेली न गेली की निशाने तिच्या खोलीत प्रवेश केला आणि धावत जाऊन ती छायाच्या गळ्यात पडली. अर्थात हा आजच्या तरुणाईच्या स्वागताचा एक भाग आहे.
"निशे, काय त्रास होतोय ग तुला?"
"मला काही त्रास होत नाही पण माझ्या आईला दाट शंका आहे की, मी प्रेग्नंट आहे म्हणून..." निशाने सहजतेने सांगितले.
"अग पण, तुला काय वाटते? तुझे कुण्या मुलाशी तसे..."
"छाये, कुणाशी संबंध असल्याशिवाय का एम.सी. येत नाही?"
"म्हणजे?"
"होय! दोन महिने झाले आहेत मला..."
"माय गॉड! निशे, तू लग्नाच्या आधी प्रेग्नंट आहेस आणि तरीही तू सिरीयस नाहीस. तुला कळतंय का?..."
"मग काय झाले यार! आहेत ना तुझे बाबा, आता करतील मला मोकळी. त्यासाठीच तर आलो आहोत ना? तुझ्या बाबांचा हातखंडा आहे ना त्यात. मग कशाला भ्यायचे?"
"निशे, अग, मग तो कोण आहे त्याला माहिती आहे का?"
"त्याला माहिती आहे. दुपारीच त्याला भेटून सांगितले. तोही म्हणाला, पाडून टाक. नसती झंझट नको म्हणून. 'केली मजा, मिळाली सजा' असे नको म्हणाला..."
"तू अशा दिव्याला तयार आहेस?"
"ऑफकोर्स! माय डियर, छाया! मी तयार आहे म्हणून तर आलीय ना... तुझ्या बाबांकडे?"
"कोण आहे हा?" छायाने वेगळ्याच शंकेने विचारले.
"असून असून असणार कोण, जिवलावे प्रशांतशिवाय असणार कोण?"
"क.... क... काय?..." छाया विचारत असताना तिथे आलेली रखमा म्हणाली,
"निशाताई, तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे..." रखमाच्या पाठोपाठ निशा बाहेर गेली आणि छाया विचारात पडली...
'प्रशांत! माझा मित्र! निशाचा जिवलग! अजून कुणाकुणाशी ह्याचे संबंध असतील? निशाप्रमाणे माझेही अनेकदा प्रशांतसोबत शारीरिक संबंध आलेले आहेत. म्हणजे मीही... नाही.. नाही... निशाप्रमाणे मी गाफील राहिलेली नाही. मी प्रत्येकवेळी गोळी घेतली आहे. पण एखादे वेळी त्या गोळीनेच धोका दिला तर? 'पाडून टाक' असा निशाला सल्ला देणाऱ्या निर्लज्ज प्रशांतचे सोडा पण निशाही जणू सर्दी झाली अशा थाटात दवाखान्यात आलीय तेही गर्भपात करायला?...' तशा विचारात गुरफटलेल्या छायाला अचानक काही तरी आठवले आणि ती मनोमन दचकून पुटपुटली,
"माय गॉड! निशाप्रमाणे मीही प्रेग्नंट नाही ना? नाही... नाही...असे होणार नाही. प.. प... पण माझी पाळी चुकलीय त्याचे काय? यावेळी प्रथमच दुसरा महिना संपत आलाय पण पाळी आली नाही. अरे, बाप रे! एका केवळ एका चुकीची शिक्षा पोटात घर करतेय की काय? दोन महिन्यांपूर्वी नेहमीप्रमाणे मी प्रशांतसोबत हॉटेलमध्ये गेले होते आणि नेमकी त्यावेळी गोळी घरीच विसरले होते. मी प्रशांतला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकला नाही. उलट 'काही होणार नाही' असे मलाच समजावत होता. त्यानंतरही दोन तीन वेळा प्रशांतसह शारीरिक संबंध ठेवले पण गोळी घेतली होती. एकदाच गोळी घेतली नाही तर...' तितक्यात तिचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर प्रशांतचे नाव पाहताच छायाला नेहमी होणारा आनंद झाला नाही, तिच्या शरीरात तरंग उठले नाहीत उलट तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. स्वतःवर संयम ठेवून ती म्हणाली,
"हं बोल..."
"काय झाले डार्लिंग? आवाज डाऊन दिसतोय. बरे, निशी आलीय का तुझ्या बाबांकडे?"
"निशा? माझ्या बाबांकडे? कशाला?"
"माय बेबी, तुझ्या बाबांकडे तुझ्या वयाच्या मुली कशासाठी येतात?"
"म्हणजे?"
"होय! ती प्रेग्नंट आहे. ती तुझ्यासारखी काळजी घेत नाही ना? आता भोगतीय तिच्या बिनधास्तपणाची फळे..."
"प्रशांत, ही वेळ माझ्यावरही येऊ शकते..." छाया बोलत असताना मध्येच प्रशांत म्हणाला,
"शक्यच नाही. तू अशी निर्धास्त वागत नाही आणि तशी वेळ तुझ्यावर आली तरी तुला चिंता करण्याचे कारण नाही कारण तुझे बाबाच ते कर्म पार पाडतील.... विना फी!... बिनबोभाट सारे पार पडेल." असे म्हणत प्रशांतने हसत हसत फोन बंद केला आणि सर्वस्व गेल्याप्रमाणे छाया पलंगावर बसली... ती निराश होती की, तिचा संताप उडाला होता काही समजत नव्हते. 'निशाप्रमाणे आपल्यावरही तशी वेळ येईल का? किंवा दोन महिने झाले म्हणजे... मी ही... मलाही दिवस गेले आहेत की काय?... त्यादिवशीची एक चूक महागात पडेल की काय? तसे झाले असले तर, माझी शंका खरी असेल तर मी बाबांना काय सांगू? कोणत्या तोंडाने बाबांना सांगू? काय करु आणि काय नको...' तितक्यात रखमाचे तिथे आगमन झाले. छायाने रखमाकडे बघितले. त्यावेळी रखमाच्या नजरेत वेगळेच भाव तिला दिसले. ती तिच्या नजरेला नजर न मिळविता खोलीबाहेर पडली. जेवणाच्या टेबलावर कधी नव्हे ते आईबाबा तिची वाट पहात होते. तिने बाबांकडे पाहिले. त्यांची नजर जणू तिला विचारत होती,
'छायाबेटी, या तुझ्या मैत्रिणीप्रमाणे तुही कोणती चूक केली नाहीस ना? बाळे, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ग...' त्यांच्याकडे पाहण्याची हिंमत न झालेली छाया मुकाट्याने खुर्चीवर बसली...
००००