तुझाच मी अन माझीच तू...भाग २५
आभा विचार करत होती तो रायन चा.. रायन चे स्पष्टपणे बोलण्याने आभा जर जास्तीच इम्प्रेस झाली होती.. इतक्या लगेच आणि इतक्या सहजपणे रायन ने आपली चूक मान्य करत त्यावर सुधारणा करतो आहे हे सुद्धा सांगितले होते. अर्थात, हाच रायनचा स्वभाव आभा च्या मनावर राज्य करायला लागला होता. तिला माहिती होते, एक तर कोणी आपली चूक इतक्या सहज मान्य करत नाही...पण रायन ने आभा समोर आपली चूक मान्य तर केली होतीच पण आपण कोणासाठी तरी बदलायचा प्रयत्न करतो आहोत ही गोष्ट सुद्धा त्याने बोलून दाखवली होती.. ह्यात कोणतीतरी म्हणजे तिच अशी धारणा आभा ने केली आणि रायन आपल्या साठी बदलायचा प्रयत्न करतंय ही गोष्ट आभा साठी आनंददायी तर होतीच.. ह्या प्रकाराने आभा च्या चेहऱ्यावर हसू स्थिरावले होते. आभा इम्प्रेस झाली असली तरी कोणाच्या जास्ती जवळ ती जाणार नव्हती आणि कोणाला जास्ती जवळ येऊन सुद्धा देणार नव्हती.. तिने ठरवल्या प्रमाणे खात्री केल्याशिवाय कोणत्याही निर्णयावर आभा येणार नव्हती पण जे होतंय ते मात्र ती एन्जॉय करणार होती.
आभा च्या मनातून राजस नकळत पुसला जात होता. आणि तिला रायन बद्दल एक प्रकारच आकर्षण वाटायला लागले होते. तसा रायन वाईट मुलगा नव्हताच पण बापाचे पैसे, काही तसदी न घेता मिळणारा ऐशो आराम आणि ज्या पद्धतीने रायन मोठा झाला होता ह्या चा परिणाम म्हणून रायन थोडा उर्मट, भरपूर माज असणारा झाला होता. इतके सगळे दुर्गुण असले तरी पण रायन इतकाही वाईट नव्हता. आभा रायन बद्दल फार महिती नव्हती पण तिची रायन बद्दल आजन जाणून घ्यायची इच्छा मात्र जागृत झाली होती..
"बाय द वे रायन.. आपण भेटून न दिवस सुद्धा झाले नाहीयेत तरी तू तुझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल मला सांगितल.."
"आय बिलीव्ह आभा...म्हणजे बघ ह.. तू माझ्या विचारांशी सहमत असशील का मला नाही माहिती.." रायन आभाकडे पाहून बोलला आणि एक मिनिटे शांत झाला...त्याचे बोलणे ऐकून आभा ला हसूच आले..
"तू सांगू शकतोस तुझे विचार.. तुझ्या विचारांशी मी सहमती दर्शवायची का नाही ते मी ठरवून सांगते तुला..आणि डोंट वरी.. मी कोणताही निर्णय लगेच घेत नाही सो आय शुअरली वोन्ट रीयॅक्ट निगेटिव्हली.. आय टेक माय टाईम.. फर्स्ट आय थिंक मगच मी पुढे जाते.." आभा हे बोलली पण तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास रायन ने हेरला आणि तो मनातच हसला, "अश्या मुलींशी डील करण्यात वेगळीच मजा असते... आभा वेगळीच आहे आणि आय नीड टू गो क्लोज टू हर..बाय हुक ऑर बाय क्रूक.." रायन मनात बोलला. रायन बोलायला वेळ लावतोय ह्याकडे आभा चे पूर्ण लक्ष होते. रायन मधेच हसत होता ही गोष्ट आभा च्या नजरेतून सुटली नव्हती.. आभा ने डोळे बारीक केले..
"बोल बोल रायन.. इतका काय विचार करतो आहेस बोलायच्या आधी?" आभा ने लगेचच रायन ला प्रश्न विचारला..
"ह काही नाही ग.. तू म्हणलीस ना तू कोणताही निर्णय लगेच घेत नाहीस.. सो त्यावरच जरा विचार करत होतो.. म्हणजे तू लगेच हरखून जात नाहीस की लगेच कोणाच्या मागे लागत नाहीत... तुझे वागणे एकदम वेगळे आहे... सो विचार करत होतो, आभा शी मैत्री करायला काय कराव लागेल.. आणि हे टास्क कदाचित अवघड असेल.." डोळे मिचकावत रायन बोलला. आणि त्याच्या बोलण्याने आभा भलतीच खुश झाली..तिने काही प्रयत्न सुद्धा न करता तिला बऱ्यापैकी भाव मिळत होता आणि ही गोष्ट आभ ला छान वाटत होती..तिला स्वतःचे हसू अजिबात लपवता आले नाही...
"आय सी.. म्हणजे तुला माझ्याशी मैत्री करायची आहे तर.. गुड टू नो... मैत्रीच नंतर बघू... म्हणजे यु हॅव्ह टू वेट.. आधी तू काहीतरी सांगणार होतास ना मला? मला तुझे विचार जाणून घ्यायचे आहेत..आणि काय झालं होत ऑफिस मध्ये?" खर तर राजस च्या बोलण्यात सुद्धा हे आल होतं पण राजस ने डिटेल मध्ये काही सांगितले नव्हते..त्यामुळे आभा ची उत्सुकता आता ताणली गेली होती.. तिला अंदाज आला होता की काहीतरी बरच घडले आहे आणि रायन ने स्वतःच हा विषय काढल्यामुळे आभा सगळ जाणून घेणार होतीच..
"येस येस.. मी तुला काहीतरी सांगत होतो पण उगाच विषयांतर झालं ना.. म्हणजे मीच केल विषयांतर.. आता सांगतो, मी माणूसच आहे.. आणि चूक होऊ शकते.. मी फार काही भारी वागलो नाही ग.. म्हणजे चुकीचाच वागलो होतो.. मी एका मुलीला त्रास दिला होता..माझ्याकडून एक मोठी चूक झाली होती.." इतक बोलून रायन शांत झाला. रायन खर तर आपल्या चुका कधी मान्य करायला तयार नसायचा..पण आभा शी बोलतांना त्याला काय वाटले कोण जाणे.. रायन एकदम खर बोलून गेला.. आपण इतक सगळ डिटेल आभा ला का सांगतो आहे हे रायन ला कळलंच नाही.. आभा तशी होतीच एकदम चार्मिंग.. तिच्याशी बोलताना लोकं भान हरपून बोलले नाही तरच नवल होतं.. राजस झाला आणि आता रायन सुद्धा... तिच्या समोर बोलतांना रायन स्वत:चे भान हरपून गेला.. त्याच्या प्लान मध्ये फक्त आभा ला जनरल त्याच्या भूतकाळा बद्दल सांगायचे होते पण अनावधाने त्यापुढे जाऊन पण रायन बोलून गेला.. आभा ला आता आपण काय वागलो होतो ह्याची जाणीव होऊन ती कदाचित निघून जाईल अशी भीती रायन ला वाटून गेला.. रायन तसा धीट होता... कोणाला घाबरायचा नाहीच.. कारण त्याला माहिती होते की काही झाले तरी त्याच्या मदतीला त्याचे वडील येणारच.. पण आज सगळाच विचित्र होत होते.. आधी आभा ला इम्प्रेस करण्यासाठी रायन त्याच्या भूतकाळा बद्दल बोलून गेला होता आणि आता अनावधाने काय झालं होत हे सुधा आभा ला सांगितले होते. रायन चे पूर्ण लक्ष आभा कडे होते.. तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलत होते... तिला राग येतोय ह्याची जाणीव रायन ला झाली पण स्वतः ला सांभाळून घेत रायन पुन्हा बोलला..
"खूप मोठी चूक केली होती.. खर तर त्या दिवशी दारूच्या नशेत चुर्र होतो..मला दारू लगेच चढते.. तरी मी जास्ती दारू पीत नाही पण पिली त्यादिवशी.. आणि म्हणून माझ्याकडून अक्षम्य चूक झाली होती.. पण नंतर मला खूप त्रास झाला.. मग मी स्वतःला बदलायचा निर्णय घेतला.. आणि ती चूक सुधारण्याचा फक्त प्रयत्न करतोय..आय होप यु अंडरस्टँड.." रायन बोलला आणि शांत झाला.. त्याला आभा बद्दल काहीच माहिती नव्हत सो आभा कश्या प्रकार ह्या गोष्टीवर प्रतिक्रिया देईल त्याचा अंदाज रायन ला येत नव्हता.
आभा ने रायन चे बोलणे ऐकून घेतले. तिला जी गोष्ट राजस ने सांगणे टाळले होते ती गोष्ट रायन ने स्वतः सांगितली होती.. होष्ट नकारात्मक होती पण ती रायन ने आपणहून सांगितल्यामुळे अर्थात ह्या गोष्टीचा आभा वर सकारात्मक इफेक्ट झाला होता. आभा ची मते क्लिअर होती.. तिच्या मते माणूस म्हणले की चुका ह्या होणारच.. पण त्या चुका मान्य करण्यासाठी एक प्रकारचे करेज लागते.. आणि ते करेज रायन मध्ये होते.. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले.. पण रायन ला आभा च्या मनात काय चालूये काही कळत नव्हत. रायन जरा विचारात पडला.. त्याला हे वाटून गेले की आपण काय झाले हे सांगून मोठी चूक तर नाही ना केली? तो थोडा गोंधळलेला दिसत होता.. आभा ने एक नजर रायन कडे पाहिले... पण रायन ची आभा च्या डोळ्यात पहायची हिम्मत होईना.. पण आता आभा काय बोलणार ह्याकडे रायन चे लक्ष लागून राहिले होते. आभा ने बोलायला चालू केले.
क्रमशः..