फोन ठेऊन तो परत गौरवीच्या खोलीत येतो, गौरवी शांत झोपली असते आणि रुपाली तिच्या बाजूनी बसून पुस्तक वाचत असते...
आज त्याच हृदय आक्रंदत असतं, गौरवी असा काही विचार करेल अस त्याला वाटलंच नव्हतं, चिढली आहे, रागात आहे, काही दिवसांनी राग शांत झाला की बोलेल माझ्याशी ऐकून घेईल मला असंच त्याला वाटत होतं...
त्याला रुपलीशी बोलायचं असतं, म्हणून तो तिला बाहेर बोलावतो..
विवेक - तू आत गेल्यावर काही बोलली का गौरवी तुझ्यासोबत??
रुपाली - अ.. हो मी तिला विचारलं की तू रस्त्यावर काय करत होतीस?
विवेक - मग... काय बोलली ती?
रुपाली - तिने त्या हॉटेलमध्ये तुम्हाला बघितलं होत आणि भावनेच्या भरात तुमच्याकडे पळत सुटली इकडे तिकडे काहीच बघितलं नाही... थोडी नाराज होती माझ्यावर की मला माहिती असून सुद्धा मी तिला सांगितलं नाही... पण मी समजावलं तिला...
विवेक - किती वेडी आहे खरंच... अस कुणी करत का? किती प्रेम करते माझ्यावर.. आणि मी आहे की...
रुपाली - ठीक आहे ना जीजू आता तर कळलं ना तुम्हाला... ती बरी झाली की तिच्याशी बोलून सगळं व्यवस्थित करून घ्या आता...
विवेक - हो ग मी वाट बघतोय तिची ठीक होण्याची... कारण आता बोलून जास्त ताण नाही द्यायचा मला तिला आणि विषय निघाला तर तिला ताण येईलच म्हणून गप्प आहे सद्धे...
रुपाली - हम्म..
तेवढ्यात तिकडून संदीप येतो... रुपाली पुन्हा तिच्याजवळ जाऊन बसते आणि विवेक आणि संदीप खोली बाहेर बोलत बसतात... विवेकला आता जरा थकवा जाणवत असतो त्यामुळे तो बाहेर बोलत बोलत बेंचवरच झोपी जातो... त्याला जाग येते तेव्हा 4 वाजले असतात.. गौरावी काय करतेय ते बघायला तो आत डोकावतो तर गौरवी उठलेली असते आणि तिचा फोन चाळत असते... रुपाली बाजूलाच हातावर डोकं ठेऊन झोपली असते.. विवेकच्या आत येण्याने रुपलीला जाग येते.. विवेकला तिथे थांबवून ती फ्रेश व्हायला निघून जाते.. तेवढ्यात डॉक्टरही तपासणीला येतात... तिला तपासून बरीच सुधारणा आहे, लवकरच गौरवी चांगली होईल असं सांगतात आणि काही खायला द्या यांना सांगून निघून जातात...
संदीपने येताना फळं आणलेली असतात, विवेक तिच्याशी काहीही न बोलता तिच्या शेजारी बसून, सफरचंद कापत असतो, तो चाकु त्याच्या हातावर येतो आणि बोटाला लागतो... कळवळतच तो "आई ग...." बोलतो.. त्याच्या कळवळण्याने गौरवी पण त्याच्या कडे बघते आणि त्याच्या बोटाला रक्त बघून पटकन त्याच बोट आपल्या तोंडात पकडते...
गौरवी - असा कसा रे वेंधळा आहेस तू विवेक?? कशाला ते कापतोय??
एक हाताने त्याच्या हातातली प्लेट फळ चाकू हिसकावून घेते..
विवेक - अग आता नाही का डॉक्टर सांगून गेलेत, म्हणून तुला खायला देत होतो...
गौरवीकडे एकटक बघत तो बोलतो, पण तीच लक्ष सगळं विवेकच्या बोटाकडे असतं..
गौरवी - मला डोक्याला लागलं, हात चांगले आहेत माझे, थोडंस खरचटलं आहे फक्त... माझं मी खाऊन घेईल... तू हे सगळे पराक्रम नको करुस... आणि तसही तू आज आहे उद्या नसशील, माझी सवय मलाच करावी लागणार आहे ना..
तो अजूनही तिच्या डोळ्यातच बघत असतो, अतीव प्रेम असत तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी... विवेक तिला हलकेच हाक मारतो
विवेक - गौरवी....( तस ती वर बघते, तिच्या डोळ्यात खोलवर बघत) किती प्रेम करतेस ग माझ्यावर... एवढं प्रेम असताना सुद्धा, वेगळं व्हायचा विचार का करतेय??
त्याच्या नकळत तो बोलून जातो...
गौरवी लगेच नजर चोरत आणि त्याच्या कापलेल्या बोटावर लक्ष केंद्रित करत
गौरवी - प्रेम आहे म्हणून ते मिळेलच असं नसतं ना विवेक, जगात किती तरी लोक आहेत ज्यांचा प्रेमभंग होतो, आणि इथे तर प्रेमभंग आणि विश्वासघात या दोन्ही गोष्टींना मला सामोरं जायचं आहे...
बोलत बोलतच बाजूला ठेवलेल्या बँडेड पट्टीने त्याच्या बोटाला बँडेड करूनही देते.. विवेक तिचा हात हातात घेत..
विवेक - एवढं कठोर नको ना ग बोलू, खूप लागतंय मनाला.... आणि मला एक तरी संधी दे ना ग बोलायची, अस कसं तू इतक्या सहज माझं काही ऐकून न घेता नात संपण्याच्या निर्णय घेऊ शकतेस ? तू तर किती समजदार आहेस मला नेहमी समजून घेतलंस आता फक्त एकदा माझं ऐकून तर घे ना..
गौरवी - मी निर्णय नाही घेतला विवेक, मी फक्त विचार केलाय.. निर्णय घ्यायला मला तुझ्याशी बोलावं लागेलच ना तुला तयार केल्याशिवाय निर्णय कसा होईल? असो ...
आणि अचानक माझी इतकी काळजी का घेतोयस तू?
विवेक - कारण जे झालं ते माझ्यामुळे झालं, म्हणून... आणि तुझी संमती असेल तर आयुष्यभर अशीच काळजी घ्यायला तयार आहे मी...
गौरवी - (विवेकच्या हातातून तिचा हात सोडवत ) किती विरुद्ध वागतोय ना विवेक तू, अचानक एवढा बदल!!! मला पुन्हा जाळ्यात फसवण्यासाठी का रे??
विवेक - मला माझी चुकी कळलीय गौरवी, मी खरच खूप मोठी चूक केलीय, तुझा गुन्हेगार आहे मी... मी समजू शकतो तुझी मनःस्थिती.. तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी पण आपलं नात संपवायचं नको बोलू ना ग... एकदा संधी दे फक्त एक संधी पुन्हा कधी तुला तक्रार करायची संधी नाही देणार मी... एकदा माझं सविस्तर सगळं ऐकून घे ना..
-----------------------------------------------------