Jodi Tujhi majhi - 27 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 27

Featured Books
Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 27


थोड्यावेळात डॉक्टर बाहेर येतात...

सगळे त्यांच्याजवळ जाऊन गौरवीबद्दल विचारतात...

डॉक्टर - ओपरेशन व्यवस्थित झालं आहे... पण अजून शुद्धीवर नाही पेशंट.. पुढच्या 12 तासात पेशंट ला शुद्ध यायला हवी.. आपण वाट बघुयात...

विवेक - डॉक्टर आम्ही तिला लांबून बघू शकतो का?

डॉक्टर - हो लांबून बघा पण पेशंटला डिस्टर्ब करू नको ..

गौरवीची बाबा - हो चालेल डॉक्टर, आपले खूप खूप धन्यवाद...

डॉक्टर - धन्यवाद नको काका, ही आमची ड्युटी च आहे... आणि डॉक्टर निघून जातात...

सगळे जण भरल्या डोळ्यांनी तिला लांबून बघतात आणि पुन्हा तिच्या रूमच्या बाहेर येऊन बसतात... विवेक गुपचूप आत जाऊन गौरावीजवळ बसतो... नर्स असते तिथे पण ती त्याला काही बोलत नाही... थोडावेळानी नर्स काही कामासाठी बाहेर निघून जाते, गौरवीच्या आईला वाटतं गौरवी एकटी असेल म्हणून त्या आत यायला जातात पण त्यांना विवेक तिथे दिसतो आणि त्या तिथेच थांबतात...

विवेक गौरवीचा हात हातात घेऊन ढसा ढसा रडत असतो, आणि आपल्या सगळ्या चूका कबुल करत असतो,

विवेक - गौरवी उठ ना ग, मला माहितीय मी खूप चूका केल्यात, तुला नोकरी करू दिली नाही तुला घराबाहेर जाऊ दिल नाही, तुझा छळ केला, तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्यात मला एकदा माफ कर ना ग फक्त एकदा.. गौरवी प्लीज माझा विश्वास कर मी तुला सगळं काही सविस्तर संगणारच होतो ग, तुला आठवते मी तुला बोललो होतो की आपण कुठे तरी फिरायला जाऊयात, तेव्हाच एक चांगला अवसर मिळताच मी तुला माझ्या भूतकाळाविषयी सगळं सांगणार होतो, पण त्या आधीच हे सगळं अश्याप्रकारे तुझ्या समोर आलं... आणि तू मला एकदाही ऐकून ना घेता तडक निघून आलीस, यात तुझी चुकी नाही ग पण मला एकदा फक्त एकदा तुझ्याशी सविस्तर बोलण्याचा चान्स दे, फक्त एकदा माझं ऐकून घे..

विवेक हे सगळं बोलत असतो त्याला वाटत त्याला कुणीच ऐकत नाहीय पण ते सगळं गौरवीची आई ऐकते, आणि त्याला काहीही न बोलता बाहेर येऊन बसते.. आता गौरावीच्या आईला पुसटशी कल्पना आली असते की नेमकं काय झालं असावं... पण सविस्तर काहीच कळत नाही... तरी तिला विवेकची अवस्था बघूनही वाईट वाटतं..

सगळे शांत असतात. गौरवीचे बाबा खोलीत वाकून बघतात तेव्हा त्यांना विवेक गौरवीच हात पकडून तिच्याजवळ बसलेला दिसतो. गौरवीचे बाबा विवेकच्या दंडाला धरून त्याला बाहेर घेऊन येतात इतक्या वेळपासून मनात साठवून ठेवलेला राग ते बाहेर काढतात.. विवेकला बाहेर आणून ते विवेकला जाब विचारत असतात की अस काय वागला तो की गौरवी भारतात निघून आली आणि इथे मैत्रिणीकडे राहतेय... त्यांना तस जाताना बघून गौरवीची आईला संशय येतो आणि त्याही त्यांच्या मागे येतात, त्यांच्याच पाठोपाठ विवेकच्या आई सुद्धा आली..

गौ बाबा- तुला मी माझी फुलासारखी मुलगी सांभाळायला दिली होती, असा सांभाळ केला तू तिचा, तुमचं लग्न झाल्यानंतर तू तिला एकटीला इथे सोडून गेला तेव्हाच मला राग आला होता पण फक्त गौरवीमुळे मी शांत होतो.. आज ती चिढून निघून आली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलं असणार, कारण माझी गौरवी बारीक बारीक गोष्टींवर चिढून एवढे मोठे निर्णय घेणाऱ्यातील नाही आहे, तिच्या सहनशक्तीच्या पुढचं काहितरी घडलंय, सांग मला काय झालंय ते...

विवेक - बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज, अस काही नाही तुम्ही शांत व्हा ना जरा...

गौरावीचे बाबा चिढून त्याच्यावर हात उचलायला जातात तोच गौरवी ची आई माघून येऊन त्यांना थांबवते,

गौ आई - अहो काय करताय तुम्ही? अस जावायावर हात उचलतात का? त्याच्यात काही झालं असेल पण चिढून सगळं निवळता येत का? शांत व्हा तुम्ही आधी...

वि आई - कशाला थांबवलत तुम्ही त्यांना ताई, तो त्याच लायकीचा आहे, त्यांनी आज हात उचलला नसता तर मीच उचलला असता..

विवेक कडे रागाने बघत त्याची आई बोलत होती...

गौ आई - ताई, तुम्ही शांत व्हा, भांडण झालंय मान्य आहे पण गौरवीनी इथे आल्यावर आपल्यापासून लपवून ठेवलं आणि मैत्रिणीकडे राहतेय यात तिची पण चूक आहे ना?

वि आई - नाही याला वाचवायसाठीच केलं असणार तिने...
(विवेककडे रागाने बघत)
विवेक तुमच्यात काय झालंय ते तुमचं तुम्हाला माहिती पण जर तुला बघून गौरवीनी तोंड फिरवलं किंवा तिला तुझ्याशी बोलायचं नसेल तर कुठलाच विचार न करता इथून परत निघून जायचं कळलं...

तेवढ्यात नर्स धावत येते ती डॉक्टरांना शोधत असते, तर विवेक पुढे होऊन "काय झालं ?" नर्सला विचारतो.

नर्स - पेशंटला शुद्ध येत आहे म्हणून मी डॉक्टरला न्यायला आली आहे... आणि हो विवेक कोण आहे?

विवेक - मी.... मी आहे

नर्स - माझ्यासोबत चला..

आणि विवेक तिच्याबरोबर निघून जातो... हे सगळे पण त्यांच्या मागोमाग... गौरवीच्या रूमकडे जातात...

नर्स - तुम्ही पुढे व्हा आणि गौरवीजवळ थांबा मी डॉक्टरांना घेऊन आलेच..

नर्स लगेच डॉक्टरांना घेऊन येते...

डॉक्टर तिला चेक करतात... ती पूर्ण शुद्धीत आलेली नसते आणि विवेकच नाव घेत असते...

डॉक्टर विवेकला आत बोलावतात त्याला काही सूचना देतात आणि गौरवीजवळ बसायला सांगतात...
गौरावीला कदाचित अकॅसिडेंन्टच्या आधीचा विवेक दिसत असावा म्हणून ती त्याच नाव घेत असेल..

विवेक तिचा हात हातात घेत तिला बोलत असतो

गौरवी - विवेक... विवेक... विवेक...
विवेक - गौरवी... गौरवी मी तुझा विवेक इथेच आहे, तुझ्या जवळ, डोळे उघड गौरवी, बघ एकदा मी तुझ्या जवळच आहे..

तो बोलत असतो पण तिचे डोळे बंद असतात आणि तिची ही अवस्था पाहून त्याचे डोळे पाझरत असतात..