दुसऱ्या दिवशी विवेक सकाळीच मंदिरात जातो कारण आता थांबण त्याला शक्यच होत नाही.. आणि तिथेच बसून तो गौरवीची किंवा काकांची वाट बघत असतो, 4 तास होतात तो तसाच तिथे एक कॉपऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बघत असतो... 3 वाजेच्या आसपास काका काकू मंदिरात येतात पण सोबत गौरवी नसते.. त्यांना पाहून तो खुश होतो पण गौरवी नाही दिसली म्हणून थोडा नाराजही होतो, तरीही एक आशेचा किरण मिळाला म्हणून तो लगेच उठून त्यांच्याकडे जातो...
विवेक - नमस्कार काका काकू, कसे आहात?
काका - अरे विवेक तू इथे? आम्ही मस्त मजेत आहोत बेटा, तू कसा आहेस?
विवेक - बस ठीक आहे,
त्याच्या चेहऱ्यावर नातळराजीचे भाव दिसतात, तो विचारातच असतो की गौरवीच विषय कसा काढू? तेवढ्यात काका त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून..
काका - गौरवीची आठवण येतेय का बेटा?
विवेक - (विवेक आश्चर्यचकित होऊन) हो काका.. ती तुमच्याकडे आहे का?
काकांना त्याचा हा प्रश्न जर विचित्रच वाटतो ते लगेच त्याला विचारतात..
काका - नाही आमच्याकडे नाहीय ती आता, ती तर भारतात परत गेली ना काही दिवसांसाठी? तुला माहिती नाही का? तुला सांगून नाही गेली का ती? भांडला का रे तिच्याशी? तरीच म्हंटल जाताना तू तिला सोडायला का नाही आला ते!!
विवेकला हे अगदीच अनपेक्षित होतं त्याने विचारच केला नव्हता की गौरवी अगदी भारतात निघून जाईल ... त्याचा चेहरा एकदम पडला अगदी रडकुंडी आला होता जसा...
तो काकांच्या बोलण्यावर काहीच उत्तर ना देत सरळ निघाला आणि रूमवर आला... तो जणू शॉकमधेच गेला होता...
घरी आल्यावरही तो राहुल कडे ना बघता सरळ खोलीत निघून गेला, राहुल त्याच्याशी बोलत होता पण त्याला जणू काहीच ऐकू येत नव्हतं, त्याच्या डोक्यात काकांचेच शब्द फिरत होते... त्याच्या मागोमाग राहुल पण त्याच्या कडे आला...
राहुल - विवेक अरे केव्हाचा आवाज देतोय मी, काय झालं भेटले का काका किंवा वहिनी? काय बोलले ते?
विवेक - गौरवी भारतात निघून गेलीय.
राहुल - (ओरडातच) काsssssय? मग आता? आता काय करणार तू?
विवेक - माहीत नाही, माझं डोकं तर बंद पडलंय...
जाण्या आधी तिला एकदाही मला सांगावस नाही वाटलं का रे... आणि मी तिला इकडेच शोधण्याचा प्रयत्न करतोय..
राहुल - अरे रागात होती ती तुला सांगून कशी जाणार, ते जाऊ दे पण तिकडे ती घरीच गेली असेल ना मग तुला घरचे काही बोलले कस नाही गौरवी आली वगैरे ते...
विवेक - (आपल्या विचारांतून बाहेर येत, आणि राहुलच्या बोलण्यावर विचार करत) अरे हा घरचे मला काहीच कस नाही बोलले, कदाचित तिच्या घरी गेली असेल, तरी पण काल परवाच तर बोललो मी तिच्या आईशी त्यांनी पण काही सांगितलं नाही.. म्हणजे गौरवी नक्की गेली की नाही?? आणि जर गेली तर कुठे गेली?? राहुल माझं डोकं फाटायला आलंय, एक चान्स तरी द्यायचा नारे तिनी मला इतकी कशी रागावली माझ्यावर ...
त्याच्याही नकळत त्याचे डोळे आसू गालात असतात... आता काय करावं पुन्हा तोच प्रश्न त्याच्यापुढे येतो... घरी विचारलं आणि गौरवीने काही नसेल सांगितलं तर त्यांना ताण येईल उगाच.. गौरवी हरवली म्हणून...
इकडे गौरवी आणि रुपाली एक मार्ट मध्ये सामान घेण्यासाठी येतात तिच्या घरचे त्या मार्टमध्ये कधीच येणार नाही हे तिला माहिती असतं, त्यामुळे ती बिनधास्त वावरत असते, पण विवेकचा एक जवळच मित्र तिला बघतो.... त्याला वाटत विवेक पण इथेच असेल तो इकडे तिकडे शोधतो पण त्याला विवेक दिसत नाही म्हणून तो त्याला whtsapp कॉल करतो...
विवेक विचारात असतांनाच त्याचा फोन वाजतो, काही विचार करून तो लगेच फोन उचलतो,
संदीप - ( विवेकचा मित्र) हॅलो अरे विवेक कुठे आहे तू? भारतात येऊन पण सांगत नाही साल्या, लवकर सांग कुठं आहे मी येतो भेटायला...
विवेक - अरे मी अजून भारतात नाही आलो मी इकडेच आहे...
संदीप - हो का.. अरे मला वहिनी दिसली तर मला वाटलं तू पण असशील सोबत, वहिनीला एकटीलाच पाठवलं का मग इकडे पुन्हा...
विवेक - मी नाही पाठवल रे, तीच आली, बर कुठे आहे तू सद्धे? कुठे दिसली ती तुला?
संदीप - अरे माझ्या घराच्या जवळ जे मार्ट आहे ना तिथे आलीय बहुतेक खरेदी करायला सोबत एक मुलगी आहे, मैत्रीण असेल बहुतेक ..
विवेकला परत एक आशेचा किरण दिसतो, आणि तो संदीपला सगळं सांगतो आणि ती आता कुठे राहतेय माहिती करून सांग अस काम त्याच्यावर सोपवतो..
संदीप - हो सांगतो तुला, चल ठेवतो बाय..
फोन ठेऊन संदीप सरळ गौरवी कडे जायला निघतो पण तोपर्यंत गौरवी निघून जाते....
इकडे विवेक त्याच्या घरी फोन करून खुशाली विचारतो, त्याला वाटत जर गौरवी माझ्या घरी गेली असेल तर आईबाबा सांगतीलच मला, पण होत उलटंच, त्याची आईच गौरवीबद्दल त्याला विचारते आणि तो गोंधळून जातो... कसबस आईला काहीतरी सांगून वेळ मारून नेतो आणि लगेच फोन ठेऊन देतो... आता त्याच्या कडे फक्त एकच पर्याय उरतो... तो म्हणजे संदीपच्या फोनची वाट बघणे..
---------------------------------------------------------
क्रमशः