राहुल - हम्म... नियती आहे boss.. अशीच खेळते ती..
बरं चलं बराच वेळ झालाय, झोपुयात अजून उद्या कामावर जावं लागेल ना...
राहुलच्या बोलण्यावरून विवेकला क्लिक होत की ऑफिसला पण जायचंय तो लगेच राहुलला पुन्हा आवाज देत..
विवेक - राहुल अरे मी मंदिरात कसा जाऊ मग?
राहुल - अरे हो, तू अस कर 2 दिवसाची सूटी घे..
विवेक - अरे पण आताच 15 दिवस सुटीवर होतो आता लगेच सुटी मिळणार नाही..
राहुल - हा ते पण आहे म्हणा, मग अस कर लवकर ये घरी आणि मग मंदिरात जा..
विवेक - हो पण माझी आणि त्यांची वेळ सारखी नसली तर... ते आधीच येऊन गेलेले असले तर..
राहुल - होऊ शकते.. अस कर वीकेंडला जा... तसही जर मंदिरात तुला गौरवी भेटली तरी ती तुझ्याशी नीट बोलणार सुध्दा नाही कारण सद्धे ती रागात आहे आणि विकेंडपर्यंत जर तिचा राग थोडा निवळला तर कदाचीत तुझं ऐकून तरी घेईल...
विवेक - हा पॉईंट आहे.. पण अरे इतके दिवस कसा राहू मी हातावर हात ठेऊन , मला प्रयत्न तर करायला पाहिजे ना.. उद्या जस्ट सोमवार आहे , पूर्ण आठवडा मी कसा राहू? आणि अरे ती तरी किती दिवस कोणाकडे राहणार?
राहुल - तिला त्रास देताना विचार केला कि ती कशी राहिली, लग्न झाल्याझाल्या इकडे निघून आला तेव्हा तिचा विचार केला? आणि आताही तिचा विचार करतच नाहीय तू.. 'मी कसा राहू' हेच पालुपद आहे तुझं...तुला बघून आणखी त्रास होईल तिला विवेक म्ह्णून सांगतोय, धीर धर जरा..
राहुल जरा चिढतच बोलला कारण विवेकच वागणं त्याला पटलेलं नव्हतंच पण त्याला त्याच्या चुकीची जाणीव आहे म्हणून राहुल त्याला काही बोलला नव्हता..
विवेक - एवढं कठोर नको रे बोलू राहुल.. मी चुकलोच, खूप मोठा गुन्ह घडला माझ्या हातून, मला मान्य आहे पण आता जे ती रुसून बसलीय माझ्यावर ते मला सहन होत नाहीय.. तुझं म्हणणं बरोबर आहे, खरच कधीच विचार नाही केला मी तिचा, पण आता करेल, नेहमी फक्त तिचाच विचार करेल, तिला वाटेल तेव्हा तिनी माफ करावं मला मी आयुष्यभर तिची वाट पाहिल..
विवेक रडत रडतच बोलत होता... त्याला चांगलाच सबक मिळाला होता..
राहुल - शांत हो विवेक, सॉरी मी तुला रागात बोललो..
विवेक - नाही रे तू अगदी बरोबर बोलला.. मला शिक्षा मिळायलाच पाहिजे ना..
राहुल त्याला जवळ घेतो, आणि विवेक त्याच्या खांद्यावर रडून आपलं मन आणि दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो.. राहुलही त्याला रडू देतो.. थोडावेळानी विवेकने स्वतःला सावरल्यावर दोघेही झोपायला जातात..
विवेकला मात्र झोप लागत नाही, तो त्याच्याच विचारात असतो..
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून तयार होतो, आणि निघत असतो की राहुलला जाग येते,
राहुल - विवेक ... एवढ्या सकाळी तयार होऊन कुठे जातोय तू?
विवेक - बर झालं राहुल तू उठलास, तू झोपला होता तर मला तुला उठवायची इच्छाच होत नव्हती, मी मंदिरात जाऊन येतो जरा..
राहुल - कायssss?? अरे काल रात्रीच पचनी नाही पडलं का तुला?
विवेक - अरे त्यासाठी नाही मी फक्त दर्शन घ्यायला जातोय, म्हणून तर एवढ्या सकाळी जातोय ना... गौरवी परत मिळू दे म्हणून प्रार्थना करून येतो देवाला... बघुयात कदाचित त्याला तरी कीव येईल माझी...
राहुल - (हसतच) असं होय... हा मग जा जा आणि एखादा नवस ही बोलून ये..
विवेक त्याला बाय करून निघून जातो.. आणि तिकडूनच ऑफिसला जातो.. 15 दिवस सुटीवर असल्यामुळे कामाचा लोड खूप वाढलेला असतो, कामात मन लागत नाहीच तरी सुद्धा काम करायचा प्रयत्न करत असतो, भरपूर चूका होत असतात सुरुवातीला इतकं परफेक्ट काम करणारा हा आता इतक्या छोट्या छोट्या चूक करतो आहे म्हणून बॉस आधी नाराज होतो पण नंतर समजून घेतो कारण राहुलने बॉसला सांगितलं असत की त्याच्यावर थोडं फॅमिली प्रेशर आहे आणि तो डिस्टर्ब आहे...
तो स्वतःला शक्य तेवढं कामात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, 4 दिवस उलटून जातात पण तो अजूनही त्याच परिस्थितीत जगत असतो... तेच सगळे प्रश्न आणि गौरवीची आठवण...
एक दिवस त्याला त्याच्या मेडिकल फाईलच काम पडतं म्हणून तो शोधा शोध करतो पण कुठेच त्याला ते सापडत नाही... "कदाचीत जुन्या घरी राहिली असेल, उद्या जाऊन बघतो" असा विचार करतो.. गौरवी सगळं किती व्यवस्थित ठेवायची ती असती तर आज ही फाईल पण तिकडे राहिली नसती.. त्याला पुन्हा गौरवीची आठवण येते पण तिचा फोन बंदच येतो..
दुसऱ्या दिवशी तो ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तो जुन्या घरी जातो आणि समोरच बघून अवाक होतो..
--------------------------------------------
क्रमशः...