Pair Your Mine - Part 16 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 16

Featured Books
Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 16



फोन उचलला पण फोन वर गौरवी नव्हती... आवाज ओळखीचं वाटला पण हे कस शक्य आहे असा विचार करून त्याने विचारलच...

विवेक - हॅलो, कोण बोलतंय? आणि गौरवी कुठे आहे?

समोरून - ओळखलं नाहीस, इतक्या लवकर विसरलास? इतकी कशी तुझी स्मरणशक्ती कमजोर आहे रे...

विवेक - हे बघा सरळ आणि स्पष्ट सांगा कोण आहेत तुम्ही? आणि माझ्या घरात काय करताहेत? आणि गौरवी कुठे आहे?

समोरून - हो हो सांगते सांगते, मी आयशा बोलते आहे.. आणि गौरवी इथेच आहे ... आता तरी ओळखलं ना?

विवेक आयशा त्याच्या घरी हे ऐकून जरा घाबरलाच.. पण स्वतःला सावरत तो..

विवेक - आयशा!!! तू माझ्या घरी काय करतेय? कशाला आली तू?

आयशा - अरे हो हो सगळं काय फोनवरच बोलणार आहेस का? घरी ये आधी मग निवांत बोलूयात...

विवेक - तू गौरावीला काय सांगितलं? तिला फोन दे..

आयशा - अजून तरी काही नाही पण तू घरी येशील तोपर्यंत सांगते सगळं... हा हे घे बोल तिच्याशी..
आणि त्याच काहीही ऐकून ना घेता ती गौरविकडे फोन देते.

गौरवी - (रडतच) विवेक ही कोण आहे? मला म्हणे मी विवेकची गर्लफ्रेंड आहे..

विवेक - गौरवी तू रडू नको प्लीज आणि तीच काही ऐकू नको.. मुळात ती आलीच कशाला काय माहिती.. असू दे मी येतो लगेच घरी तू तिच्यावर विश्वास नको ठेऊ तिने काहीही सांगितलं तरी.. मी निघालो पोचतोच 20 मिनिटांत...

गौरवी - हो ठीक आहे लवकर या....

गौरवी फोन ठेवते.. आयशा तिच्या समोरच उभी असते.. ती गौरावीला म्हणते...

आयशा - तुमच्याकडे घरी आलेल्याला पाणी विचारायची पद्धत नाही का?

गौरवी पण तिला जर रागातच उत्तर देते..

गौरवी - घरी आलेल्या पाहुण्यांना तर आम्ही पाणीच काय जेवण पण देतो , पण जे घर तोडायला येतात त्यांना मात्र आम्ही पंच देतो..

आयशा जोर जोरात हसत तिला म्हणते, "तुला माझं बोलणं खोटं वाटतंय तर.. "

आयशा - तुला जर पुरावे दाखवलेत तर विश्वास ठेवशील?

गौरवी - कसला पुरावा?

आणि आयशा तिला मोबाइल मधले तिचे आणि विवेकचे close असलेले फोटो दाखवते.. ते बघून तर गौरवी मटकन खालीच बसते... तिचा तिच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही आणि तिला लग्ना आधीचा तो दिवस आठवतो ज्या दिवशी तिने विवेकला एक मुलीबरोबर किस करताना बघितले होत आणि त्यानी तिला खोटं कारणं देऊन समजावलं होतं... आणि तिनेही त्याच्यावर विश्वास केला होता... आज पुन्हा तेच घडतंय... मी विश्वास करू की नको हा प्रश्न तिला पडला होता कारण विवेक तस फोनवर बोलला होता.. ती विवेकच्या फोनवरच बोलणं आठवून पुन्हा उभी राहते आणि आयशा ला म्हणते.

गौरवी - माझा नाही या फोटोंवर विश्वास... तू हे एडिट केले असतील तर.. कोण आहे तू आणि इथे का आली आहेस?

जरा चढ्या आवाजातच गौरवी बोलत असते...

आयशा - नको ठेऊ विश्वास, मला फरक नाही पडत... आणि मी इथे का आली ते मी सांगणारच आहे पण येऊ दे विवेकला..

गौरवी रागातच तिथून उठून खोलीत निघून जाते आणि विवेकची वाट बघत बसते.. आता परत तीच मन द्वंद्व खेळत असतं, एक मन म्हणत आयशा जे बोलते आहे ते खरच असेल का? असू शकत ना कारण लग्न झाल्यापासून विवेक जे वागत होता ते तिने अगदी अचूक सांगितलं मला... तर दुसर मन मानायला तयारच नसतं की विवेक तिला फसवत होता आणि हिने आंधळा विश्वास त्याच्यावर केला होता.. विचार करून करून तीच डोकं सुन्न व्हायला लागतं...

तेवढ्यातच विवेक येतो, घरात येत गौरावीला आवाज देतो पण विचारांच्या धुंदीत तिला आवाज येतच नाही.. आणि त्याच्या पुढे आयशा येऊन उभी राहते,

आयशा - हॅलो विवेक, अरे मी पण आहे इथे.. लवकर पोचला तू... तू पाणी वगैरे काही घेशील का? का चहा कॉफी करू?

विवेकचा पारा तिला बघून खूपच चढला होता...

विवेक - मी गौरावीला आवाज देतोय, आणि माझ्याच घरात चहा कॉफी आणि पाणी विचारणारी तू कोण ग? कशाला आली इथे आता? एवढ्या दिवसांनंतर तुला माझी आठवण कशी आली?

विवेकच्या आवाज गौरवीची कानावर पडतो आणि ती खोलीच्या बाहेर येते, आणि त्यांचं बोलणं ऐकत असते...

आयशा - (त्याच्या जवळ जात, त्याला मस्का मारत म्हणते) अरे एवढं चिढू नको चांगलं नाही ते तुझ्यासाठी, आधीच येणार होते खर तर, पण तुझा अकॅसिडेंन्ट झाला ऐकलं मी आणि मग यायला थोडा उशीरच केला..

विवेक - माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे तू नको सांगू मला.. उशिरा तरी कशाला आली परत?

आयशा - अरे तुला भेटायला, कितीही नाही म्हंटलं तरी मी गर्लफ्रेंड आहे तुझी, तुझी काळजी वाटणारच ना...

-----------------------------------------------
क्रमशः..