नवीन महाविद्यालय नवीन मैत्रिणी स्वप्ना, अंकिता, समता, काजल तर होतीच आणि खूप जणी.👭👭👭👭👭👭👭👭..
वाणिज्य शाखेत प्रतीक्षाने एडमिशन घेतले होते.... कारण, अकाउंट📋 आवडता विषय.......अकरावी अशीच ओळखी पटवून घेण्यात गेली.......😂😂
आले मग बारावीचे वर्ष....... अत्यंत आव्हान होते...... त्यामुळे, अकाउंटचा क्लास बाहेर लावावाच लागतो....😟😟😥 नाहीतर तो विषय निघत नाही..... हाच समज असल्याने, पैसे नसताना सुध्दा जिद्द करून क्लास लावला.... क्लासमध्ये मुलींचा अभ्यासापेक्षा सजन्यात जास्त लक्ष असायचा......कुणी नवीन ड्रेस👗🧥 घालून आली.... की, तीच वर्गात अप्सरा असायची..... पण, प्रतीक्षा आपली साधी सरळ जायची....... कारण, तितके नखरे करायला पैसे कुठून येणार..... क्लासच खूप अडचणीतून करते..... ही तिला जाणीव होतीच...... आणि तसही तिला अभ्यासात लक्ष द्यायचं होतं....😏
पण, काही मुली होत्याच मग....... तिला नाव ठेवणाऱ्या.....😏😏. तू दोनच ड्रेस का घालून येतेस म्हणणाऱ्या... त्यावर प्रतीक्षाच उत्तर असायचे
प्रतीक्षा : "मी इथे शिकायला येते फॅशन शो साठी नाही"
त्यांना गप्प करण्यासाठी, हे पुरेस आहे असच तिला वाटत होते....... पण, नाही...नंतर ती एकटी राहू लागली...... इकडे काजलने तिच्या वेगळ्या मैत्रिणीचा गट बनवलेला आणि हसणं खिदळन त्यांचं सुरू होतं....... त्यातही, ती इतरांच्या सोबतीने प्रतीक्षा ची टिंगल - टवाळकी करण्यातच जास्त गुंतली असायची.... प्रतीक्षा मात्र शांतपणे आपला अभ्यास करायची....📚📚
स्वप्ना जी एक ड्रीम गर्ल💁👰 पेक्षा कमी नव्हती...... कदाचित, म्हणूनच तिचं नाव "स्वप्ना"😄😉...... तीला असच काजलने, रस्त्याने जेव्हा त्या एका मुलाच्या घरासमोरून जातात तेव्हा तो तीलाच बघत असतो अस सांगून तिचं त्याच्याशी जुळवून दिलं होतं.... हे प्रतीक्षाला माहित होतं...... कारण, तो मुलगा तिच्याच लहान भावाचा मित्र....
अशीच काजल कुणाचही कुणाशी जुळवण्याचा प्रयत्न करायची...... ते प्रतीक्षाला आवडत नसल्याने, ती त्यांच्यात नसायचीच.......तीने चक्क एकदा काजलला चांगलं झापलही होतं........
प्रतीक्षा : "मुलींच्या मागे मुल लावून तुला त्यात कसला आनंद मिळतो..."
तेव्हा काही दिवस काजल तिच्याशी बोलली देखील नव्हती....😏😏
असेच काही दिवस गेले.....
भावना जी दिसायला तितकी उठावदार नव्हती...... पण, फक्त रंगाने गोरी असल्याने, मुलं आकर्षित व्हायचे...... तिच्याही कडे कुणी तरी रवी नावाचा मुलगा बघतो.... अस सांगून तिचं त्याच्याशी जुळवून देण्यात काजल पुढे होती....😠😠 आणि एकदा त्याच्याच म्हणजे, रवीच्या बहिणींचं लग्न म्हणून, काजल आणि भावना जाणार होत्या..... प्रतीक्षाला सोबत येण्याची विचारणा केली....... तिने आधीच नाही म्हणून सांगितल...... कारण, घरी अस चालायचे नाही.........रात्री तर मुळीच नाही.......त्यामुळे, तिने घरच्यांना न विचारताच नकार सांगितला.......
काजलने दुसऱ्या दिवशी प्रतीक्षाला..... एक मुलगा तिच्या बद्दल विचारतो क्लासचाचं आहे अस सांगून फासण्याचा प्रयत्न केला.... पण, तिने तिच्या गोष्टी कडे दुर्लक्ष😒 केले...... कारण, तिला बारावीत चांगले गुण घ्यायचे होते आणि या गोष्टींमध्ये रस नव्हता....तरीही काही दिवस जेव्हा काजल तिच्या मागोवा सोडत नव्हती आणि त्या मुलाला प्रतीक्षा सोबत बोल असच तिने सांगितल होतं...... तेव्हा मात्र प्रतीक्षाचा पारा चढला आणि ती त्या मुलावर चांगलीच चिडली.......
प्रतीक्षा :"तुला किती टक्के होते दहावी मधे?"
त्या मुलाला एकदम attitude मधे.🤨
मुलगा : "५०%....... पण, तू हे का विचारतेस मला........? मला तू आवडतेस त्याबाबत बोलुयात ना आपण?"
मुलगा त्याचं नाव शिवम...... जाड उंच वगैरे प्रतीक्षाला त्याचा जाम राग यायचा..... कारण, तो वेगळ्याच नजरेने तिला घुरायचा.🧐....... आज तिच्याकडे संधी होती त्याला झापण्याची तिने ती न गमावता चांगली त्याची इज्जत काढली.....
प्रतीक्षा : "काय रे ५०%....... काठावर...... लायकी आहे का तुझी? आणि हो मी आवडते म्हणण्यापेक्षा अभ्यास कर........ कळलं का....... नाहीतर दुसऱ्या कुणाला तू नाही आवडणार..."
आणि ती धक्का देऊन तिथून निघून जाते....
दुसऱ्या दिवशी.........
काजल : "अग तू त्याला इतकं वाईट का बोललीस.... नाही म्हणायचं ना! इतकी इज्जत काढायची काय गरज होती..?🤔🤔"
प्रतीक्षा तिच्या कडे बघत😡
प्रतीक्षा : "काल त्याची काढली आज तुझी इज्जत काढेल...... तुला काय इतकेच काम आहेत का ग.....😠 याच - त्याच जुळवून द्यायचे.... इतकंच असेल तर मग इकडे काय करतेस जा कुणाचे लग्न नसतील जुळत ते जोडून दे....."
इतकं बोलल्यावर परत काजल काही दिवस बोललीच नाही.......
काही दिवस असेच जातात........ प्रतीक्षाची चांगली तयारी सुरू असते.....शेवटी तो दिवस येतोच ज्याची तिला आतुरतेने वाट होती..... ज्या साठी तीने खूप मेहनत घेतली होती.........
बारावीच्या निकालाचा तो दिवस....... प्रतीक्षाला ६५.००% पडतात........ तिला दहावी पेक्षा कमीच गुण मिळाले याचं दुःख😒 होतच...... पण, वर्गात तिसरा क्रमांक आल्याने आनंदही😊 होतो...कारण तिच्या पुढे फक्त दोन मुली आल्या असतात आणि ती ज्यांच्या सोबत क्लासमध्ये जायची त्या सगळ्या ६०.००% च्या खालीच असतात.......अभ्यास न करण्याचा हा विपरीत परिणाम झालेला त्यांना जाणवतो आणि त्या दुःखी असतात......
प्रतीक्षा पुढचा विचार करत असते आणि एका विचाराने तिच्या मनात धास्तावते ते म्हणजे की, "पुढच्या शिक्षणाचे काय...?"
कारण तिच्या घरी शिकवण्याची मानसिकता नसल्याने तिला कमी फीस असलेले महाविद्यालय शोधणे भाग असते.....आणि तिला फक्त बी. कॉम. नसते करायचे..... कुठला तरी प्रोफेशनल कोर्स करून पुढे चांगलं करिअर करायचे अस ठरवून ती बी. सी. सी. ए. करायचे ठरवते....... पण, त्या कोर्स ची फिस ३०,०००/-₹ ते ४०,०००/-₹ खाजगी महाविद्यालयात असते....... तिची तितकी येपत नसल्याने ती परत निराश होते..😒😒..... आणि काही दिवस ती असच विचारात असते... काहीच दिवसांनी एक announcement होते ते खाजगी महाविद्यालय असते... पण, इतर मागास वर्गांसाठी सुट असते....... आणि कमी फिस असल्याची ती घोषणा होताना पाहून प्रतीक्षा खूप खुश होते.... त्यात कमी फीसमध्ये तोच कोर्स करता येऊ शकतो अस म्हटलेलं असते..... घरच्यांना एडमिशनसाठी कसे विचारायचे हे ठरवलेले असते आणि तिचे एडमिशन पार पडते.......इकडे तिच्या सगळ्या मैत्रिणींनी फक्त बी. कॉम. घेतले असते त्या दुसऱ्या महाविद्यालयमध्ये प्रवेश घेतात......त्यामुळे प्रतीक्षा थोडी समाधानी असते...... कारण, तिला आता मोकळेपणाने अभ्यास करता येऊ शकणार असतो..... काजल सुध्दा दुसरीकडे प्रवेश घेते.. कारण, काजलला मराठी माध्यम परवडेल हेच वाटत असते..... दोघीही त्यांच्या अभ्यासक्रमात व्यस्त होतात.....
त्यानंतर प्रतीक्षा आणि काजल वेगळ्या महाविद्यालयात पदवी घेण्यात मग्न असतात...... पण, स्वप्ना मात्र प्रतीक्षा सोबत एकाच महाविद्यालयात प्रवेश घेते त्यानंतर सुरू होतो प्रतिक्षाचा एक यशाचा नवा प्रवास......कारण, आता ती पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या जिद्दीने अभ्यासाला लागलेली असते...... पण, तेव्हाच अस काही अनपेक्षित घडते.... आणि ते काय असेल हे आपण पुढच्या भागात बघू.......
आता इथून पुढे ही दोघी जास्तच दूर गेल्या असल्या.......... तरी, मनाने जवळ होत्या...... पण, आता त्या मनाने ही दुरावणार होत्या अशी कोणती घटना घडली ते आपण पुढील भागात बघणार आहोत......😊 So, keep in touch....☝️