प्रारब्ध भाग २०
शनिवारी दुपारी जेवताना सुबोधने परेशला सांगितले
उद्या सहज म्हणुन तुझ्या घरी मी येतो ,माझी वहिनींची ओळख करून दे .
हल्ली मी रविवारी दुपारी तिकडेच येतच असतो ..
सध्या एक खास “पाखरू” सापडले आहे एकदम देखणे ..
पण ते फक्त दुपारच्या वेळेतच सापडत असते, संध्याकाळी नसते ते
इतर वारी दुपारी आपण ऑफिसला असतो .
पण रविवारी मात्र मी त्या पाखराची भेट चुकवत नाही ..”
सुबोधच्या चेहेरा “मिश्कील” झाला होता .
परेशला वाटले खरेच इतके सारे याच्या आयुष्यात होऊन सुद्धा हा किती आनंदी राहतो.
“ठीक आहे ये तु उद्या घरी मग बघू “परेश म्हणाला .
त्याने ठरवले आता उद्या तरी घरी रहा असे सुमनला सांगायचे .
मित्र पहिल्यांदाच घरी येतोय .
संध्याकाळी घरी तो घरी गेला तेव्हा सुमन निवांत टीव्ही पाहत होती .
हल्ली ती परेशची काहीच दाखल घेत नसे .
परेश आतुन फ्रेश होऊन आला आणि बेडवर एका कोपऱ्यात बसला .
“सुमन ऐकते आहेस का ....एक बोलु का ..?
सुमनने काहीही प्रतिक्रिया दिली नाही .
“उद्या ऑफिसमधला एक मित्र घरी येतोय तु आहेस ना घरी ?
“कशाला ?माझे काय काम आहे घरी ?
अग त्याला तुझी ओळख करून घ्यायची आहे .
“मला कुणाचीही ओळख नकोय ,आणि उद्या माझे महत्वाचे काम आहे बाहेर
मला जायलाच लागेल .
“काय महत्वाचे काम ?मायाकडे गप्पा मारायच्या हेच ना ?
परेश असे म्हणताच सुमन एकदम चिडली ..
आणि मग जोरदार भांडणाला तोंडच फुटले ..
“मायाचे नाव तुम्ही घ्यायचे काही कारण नाही ,आणि मी कुठेही जाईन त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही
“संबंध नाही कसा ?बायको आहेस तु माझी ..मी प्रेम करतो तुझ्यावर
“बायको असले म्हणजे काय तुम्ही मला विकत नाही घेतलेले ..
आणि तुमच्या मनाप्रमाणे वागायला मी बांधील नाही माझे तुमच्यावर अजिबात प्रेम नाही.
सुमनची अशी भाषा ऐकुन सुद्धा नरमाईने परेश म्हणाला .
“काय झालेय तुला ?काय हवेय सांग ग मला ..अशी का वागतेस तु हल्ली ?
“मला काहीही झालेले नाही आणि मला काय हवेय ते द्यायची तुमची ऐपत पण नाही.
“असे का बोलतेस ?माझे काही चुकले का ..ते तरी सांग ..
अजुनही परेशने मनावर संयम ठेवला होता .
“माझेच सगळे चुकले आहे .
तुमच्याशी लग्न करून पस्तावा करण्याची वेळ आलीय माझ्यावर
तुमची आर्थिक परिस्थिती इतकी सामान्य आहे हे मला आधी समजले असते
तर मी तुम्हाला माझ्या दारात सुद्धा उभे नसते केले “
हे ऐकल्यावर मात्र परेशचा ताबा सुटला आणि तो रागाने म्हणाला .
“काय कमी आहे ग माझ्यात ?चांगली नोकरी आहे.. घर आहे .
तु तर सगळी चौकशी करूनच मला होकार दिला होतास.
तुला तेव्हा कोणी जबरदस्ती केली होती का ?
तुझी सगळी हौस पुरवली मी लग्नात .
कर्ज काढुन तुला हौसेने दागिने केले.
सुमन कुत्सित हसली ..
“हे एवढेसे घर आणि ती चाळीस पन्नास हजार पगाराची नोकरी ?
आणि काय ते दहा तोळ्याचे दागिने...
ह्याचे कसले कौतुक ? माझी स्वप्ने वेगळी होती .
आणि ती तुम्ही पूर्ण करूच शकणार नाही .
स्पष्टच सांगते मला तुमच्यासोबत राहायचे नाही .
मला वेगळे आयुष्य जगायचे आहे.
परेश आता मात्र भडकला ..
“काय बोलते आहेस ते तुझे तुला तरी समजते आहे का ?
डोके ठिकाणावर आहे न तुझे ?
असे म्हणून त्याने तिला उठवून गदा गदा हालवले .
सुमन बेसावध होती तिने त्याच्या हातून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न केला आणि
तीच धाडकन खाली पडली तिच्या हाताला बेडची कडा लागली आणि ती कळवळली ..
चवताळून उठून तिने त्याला ढकलुन दिले आणि म्हणाली
“आता माझ्या अंगावर हात टाकेपर्यंत तुमची मजल गेली का?
लायकी आहेका तुमची मला हात तरी लावायची ..?
अजुन बरेच काही असंबद्ध सुमन बोलत राहिली ..
खरेतर अचानक त्याच्या हातुन सुटल्यामुळे सुमन पडली होती ..
परेश पण वरमला होता
तिला मारावे असा त्याचा काहीच हेतू नव्हता ..
तिचा भडीमार ऐकुन परेश चुप्प बसला .
एका लहान खेड्यातली अति सामान्य शिक्षण असलेली ही मुलगी ...
जरा बरे रूप होते म्हणून,मुंबईच्या चांगल्या शिकलेल्या मुली सोडुन
इतक्या हौसेने हिच्याशी लग्न केले..
हिची कोडकौतुके पुरवली आणि ही तर
आपल्यालाच “लायकी” दाखवते आहे ..
काय म्हणावे आता या बाईला ...
परेश सुन्न होऊन बसून राहिला ..
सुमन मात्र आत जाऊन टकाटक तयार होऊन आली आणि आपली पर्स घेऊन बाहेर पडली .
जाताना तिने दार रागाने जोरात आपटले.
किती तरी वेळ परेश असाच सुन्न बसून राहिला .
मग कधीतरी उठून तो जेवला आणि पडून राहिला .
काही वेळातच बेल वाजली .
सुबोध आला होता .
दार उघडताच परेशचा चेहेरा पाहिल्यावर सुबोधने ओळखले काहीतरी बिनसले आहे .
त्याने काही विचारायचा अवकाश जे घडले ते परेशने भडाभडा त्याला सांगुन टाकले .
त्याचे लग्न ठरल्या पासून पार अगदी आता सुमनचे घरातून निघून जाणे हे सगळे सगळे तो बोलला
खुप दुखावला होता तो मनातून ..
“आता काही नको वाटते बघ....
जीव द्यावा असे वाटते आहे ..असे तो म्हणल्यावर
सुबोध म्हणाला ..”वेडा आहेस की काय ?असल्या बायकोपायी तु जीव का देणार ?
आणि तुझा जीव काय स्वस्त झालाय इतका ?
शांत हो बरे काय करायचे ते पाहु पुढे .
आणि ऐक माझे आपले आयुष्य आता आपल्या मनाप्रमाणे जगायला शिक
माझा मित्र आहेस न ..!
तुझ्यासारखे संकट यापूर्वीच माझ्या आयुष्यात आलेय .
मी डगमगलों का बघ बरे ..
चल तयार हो तुझे मन रमेल त्या ठिकाणी तुला घेऊन जातो..
माझ्या पाखराला बघुन खुष होशील तु... आणि तीही खुष करेल बर तुला .
माझ्या खर्चाने तुझी पहिली वेळ “साजरी” होऊ दे ..
परेशने ओळखले आता तो आपल्याला त्याच्या “खास” ठिकाणी नेणार .
यापुर्वी कधीच कोणत्या बाईसोबत परेशने सेक्स केले नव्हते .
त्याने फक्त सुमनवर प्रेम केले होते आणि तिच्यासोबतच सेक्स केले होते ..
पण इतके चांगले वागून सुद्धा असे झाले होते ...
गेले कित्येक दिवस सुमन त्याला अंगाला हात पण लावु देत नव्हती
त्यामुळे तो शरीरसुखापासून वंचित झाला होता ..
आता मात्र त्याने ठरवले आपण स्वतःला बदलायचे .
तो तयार झाला आणि बाहेर पडताना सुबोधने त्याच्या खिशात एक निरोधचे पाकीट
टाकले आणि त्याच्याकडे बघुन डोळा मारला .
दोघे बाहेर पडले आणि सुबोधच्या टू व्हीलर वरून निघाले .
शहराच्या थोड्या बाहेर एका मोठ्या बंगल्यापाशी सुबोधने गाडी थांबवली .
दोघे आत गेले .
तो एक प्रशस्त आणि आधुनिक बंगला होता .
बाहेरच एका मोठ्या सोफ्यावर एक प्रौढ बाई नटून थटून बसल्या होत्या .
सुबोधला पाहून त्या हसून म्हणाल्या .”या या मी म्हणले आमचे नेहेमीचे
रविवारचे कस्टमर गेले कुठे ?”
“मावशी आज नवीन कस्टमर आणलाय बघा ..
आमचा “खास माल” आज याला दाखवा .
आम्ही दुसरीवर “समाधान” करून घेऊ आज ...”
“असे आहे काय ..चालतय की मग ..!!
“नमस्कार बर का साहेब “
..मावशींनी परेशला नमस्कार केला आणि म्हणाल्या .
“आत्ताच रिकामी झालीय तिची खोली ...पाच मिनिटात जा आत.”
सुबोधने “बेस्ट लक” अशा अर्थाने परेशला खुण केली, परेश हसला .
काही वेळात परेश मावशींनी दाखवलेल्या खोलीकडे गेला आणि सुबोध दुसऱ्या खोलीत गेला
परेश त्या खोलीत गेला तेव्हा आधुनिक वेशातील एक तरुणी खिडकीपाशी उभी होती .
दाराचा आवाज येताच त्या तरुणीने मागे वळून पाहिले आणि त्याच्या दिशेने येऊ लागली .
तिला पाहताच परेशने जवळच्या बेडचा आधार घेतला आणि तो मटकन खाली बसला .
कारण ती तरुणी म्हणजे चक्क त्याची बायको सुमन होती ..
त्यानेच शरमेने आपल्याच हातांनी आपला चेहेरा झाकून घेतला ..
स्वतःच्या ज्या “प्रारब्धाचा” त्याला अभिमान वाटायचा
तेच प्रारब्ध त्याला “वाकुल्या” दाखवत होते .
स्वतःच्याच बायकोने एक वेश्या म्हणून समोर येणे हेच अखेर त्याचे “प्रारब्ध “होते ..!
समाप्त ..