kadambari jaadu premaachee - 21 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२१

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२१

कादंबरी - प्रेमाची जादू

भाग-२१

-------------------------------------------------------------------

रविवारची सकाळ उजाडली होती . खूप दिवसानंतर आजच्या रविवारी काहीही कार्यक्रम

नव्हता , त्यामुळेच की काय ..यशच्या घरातील सगळ्यांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत होते.

हे काही रविवार ..मजेत जाण्यापेक्षा..मनस्तापाचे गेलेत “ असेच सर्वांना वाटत होते .

त्यामुळे साहजिकच सकाळ अगदी आरामशीर वाटत होती.

यशचे बापुआजोबा , अम्माआजी , आई-बाबा , नाश्ता –पाणी आटोपून पेपर वाचीत बसले होते .

अंजली –वाहिनी आणि सुधीरभाऊ संडे - पिकनिक म्हणून ..त्यांच्या दोस्त कंपनीबरोबर जवळच्या

एक रिसोर्टला गेले होते.

अशा वेळी यशला एका मित्राचा फोन आला .

तो सांगू लागला ..यश ..माझ्या घरी एक प्रोब्लेम झालाय ..

आमच्याकडे आलेल्या एका सिनियर सिटीझन पाहुण्याला admit करायचे आहे ..आणि त्यांना

बहुतेक ब्लड द्यावे लागेल अशी स्थिती आहे .

आपल्या फ्रेंड्स मध्ये जे डोनर आहेत ..त्यांना प्लीज सांग ना ,गरज पडली तर ..ब्लड –डोनेटसाठी

यावे.

आपल्या मित्राला धीर देत यश म्हणाला ..

घाबरू नकोस ..मी निघतोय तुझ्या घरी येण्यासाठी ..तिथे आल्यावर बघू पुढे ..काय काय करायचे

आहे ते ..

आई-बाबांना मित्राच्या प्रोब्लेम बद्दाल सांगितले ..आणि तो बाबांना

म्हणाला ..

मी आपली मोठी गाडी घेऊन जातोय ..सोय होईल बरीचशी ,तिकडून येण्यास किती वेळ लागेल,

हे परिस्थिती पाहून तुम्हाला अपडेट देईन..

असे म्हणून यश घाई-घाईने निघून गेला .

तो गेल्यावर ..अम्माआजी कौतुकाने म्हणाल्या ..

हे सगळे पाहून वाटतय की या पोराने --

बापाचे आणि आजोबांचे गुण घेतले बरे का ..!

यशच्या आई-बाबांना हे ऐकून अर्थातच खूप छान वाटले .

यशचे बाबा म्हणाले ..

अम्मा – तुमच्या दोघांच्या इथे नियमित येण्याने ..या नव्या पिढीतील पोरांना ..खूप काही

गोष्टींची माहिती मिळते , काय करावे आणि काय करू नये ..याचे भान येते ..

आणि अशी जाणीव होत गेली की.. माणूस आणि त्याचे मन सहसा भरकटत नाही..

असा माझा अनुभव आहे.

सामाजिक कार्य , सोशल वर्क , मित्र-मंडळी , सगळ्यांशी जुळवून घेणे ..या सवयी

एकमेकांच्या सहवासात राहून स्वभावाचा भाग बनून जात असतात .

त्याही पेक्षा महत्वाचे ..म्हणजे या गोष्टी ..

बळजबरी ,जबरदस्ती करून ..कुणाला शिकवता येत नसतात , ज्याला मनाने आणि आपण होऊन

हे करावे वाटते ..तो खरा ..सोशल पर्सन असतो.

सुदैवाने ..आपली मुलं ..स्वतःहून सोशल वर्क मध्ये ..पुढाकार घेऊन सहभागी होतात ,ही मोठी गोष्ट आहे.

आणि - अशा संकटकाळी , बिकट प्रसंगी मित्रांना देखील ..

यश असो की सुधीरभाऊ यांची अशा कठीण प्रसंगी आठवण होणे “हे मला खूप महत्वाचे वाटते ..

याचे कारण असे आहे की –

सगळ्या मित्रांना , मित्रांच्या मित्रांना ..यशबद्दल ..खात्री आहे , विश्वास आहे ..की ,याला मदतीसाठी

फोन केला तर तो वाया जाणार नाही ..यश मदतीसाठी नक्की येणार.

आजोबा म्हणाले –

यशचे बाबा , हा विश्वास आणि खात्री ,हीच आपली मोलाची कमाई समजावी.

पैश्याने श्रीमंत असणे वेगळे ..अशी माणसे मनाने श्रीमंत नसतील तर काही उपयोगाचे नसते ,

त्याच्याकडे सामान्य माणसे आपणहून येणार नाहीत ..पण मनाने श्रीमंत असलेल्या माणसाकडे

येणार्यांची संख्या नेहमीच जास्त असते .

विना –पैश्याने सुद्धा खूप कामे होतात “हे पैश्याची भाषा कळणार्या माणसांना समजणार नाही.

सुदैवाने ..आपला यश ..पैशाने श्रीमंत आहेच ..त्याही पेक्षा तो मनाने गडगंज श्रीमंत आहे “,

याचा आम्हाला अभिमान आहे , आनंद आहे.

त्याच्या सर्कलमध्ये त्याला इतका आपलेपणा का मिळतो ? याचे उत्तर यशच्या सहवासात जो

येईल त्यालाच मिळेल , ..दुरून काही कळणार नाही .

यशची आई म्हणाली –

यशच्या या स्वभावामुळे ..त्याला त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा कधी प्रोब्लेम येत नाहीत ,कारण

त्याच्याकडे काम करणारे देखील त्याच्या सारखेच माणसे आहेत .

यश त्याच्या शो-रूम मध्ये , ग्यारेज मध्ये असो –नसो ..काही फरक पडत नाही ..

सगळी कामे सुरळीत पार पडत असतात .

आजोबा म्हणाले – यालाच म्हणतात ..कर भला तो हो भला ..!

---------------------------------------------------------------------------------------------

२...

दीदीच्या घरातून मधुरा बाहेर पडणार तोच बिल्डींगच्या गेटबाहेर ..उभा असलेला रुपेश तिला दिसला .

“या मजनूचे काही तरी करायला हवे आहे आता “,

मधुराच्या सगळ्या वेळा जणू या रुपेशला पाठझाल्या होत्या .. तिच्या मागे मागे तो निघायचा ..

कोलेज पर्यंत , कोलेज सुटल्यावर घरापर्यंत ..

पाहणार्याला गैर वाटावे “किंवा तो मुलींच्या मागे मागे लागलाय “असे वाटणार नाही याची खबरदारी

घेत तो मधुराला फॉलो करायचा .

काही बोलायचा नाही , फक्त तिच्याकड बघत राहायचे ..हाच त्याचा उद्योग ..

वरवरून निरुपद्रवी असणारा रुपेश ..गेल्या काही दिवसापासून ..बिल्डींगच्या आत मजले उतरत असतांना

मधुराला बोलण्याच्या प्रयत्न करून पहायचा ..

आणि याची भीती तिला वाटू लागली ..

त्याला काही न बोलता ..ती बाहेर पडून सरळ निघून जायची ..या मुळे..रुपेशला वाटू लागले की ,

ही काही उलट बोलत नाही “म्हणजे ..मधुराला ..हे चालते ..मग, काय त्याची भीड चेपू लागली ..

चार पायर्या दूर असणारा रुपेश आता मधुराच्या जवळ येऊन पायर्या उतरत बोलायचा प्रयत्न करू

लागला ..!

आता या फालतू माणसाला रोकले नाही तर .हा आपल्याला स्पर्श केल्याशिवाय रहाणार नाही ..

त्याच्या नजरेत या धाडसाची ,हेतूची झलक मधुराला दिसू लागली ..म्हणून तिला अधिकच भीती

वाटू लागली ..

आपण इतके दिवस गप्प राहिलो ..ती आपली चुकी झाली ..असे तिला वाटू लागले ..

यशच्या ऑफिसला ती निघाली ..त्याच वेळी तिला जाणवले ..

रुपेश तिच्या मागे मागे येतोच आहे ..!

आज ती पायी चालत निघाली होती ऑफिसला .आणि रुपेश त्याच्या बाईकवर होता ..

नेमक्या अशा वेळी ..समोरून यशची मोठी गाडी येतांना तिला दिसली ..तिला धीर आला ..

तिने हात दाखवला ..आणि यशने बाजूला गाडी थांबवली ..

यशने विचारले ..

आज पायी पायी का बरे ? स्कुटीला काय झाले ? काही प्रोब्लेम असेल तर आपल्या ग्यारेज

मध्ये टाक ..संध्याकाळपर्यंत ओके होईल.

मागे असलेल्या रुपेशला पाहून ..यशला शंका आलीच ..

तो म्हणाला .. मधुरा ..हा रुपेश तुझ्या मागे मागे का येतोय ?

त्रास तर देत नाही ना तुला ? तसे काही असेल तर, गप्प राहू नको.सांग आम्हाला .

आता बस गाडीत ..तुला ऑफिसला सोडतो ..आणि मग माझ्या मित्राकडे जातो ..त्याच्याकडे इमर्जन्सी

आहे ..

मधुरा लगेच यशच्या गाडीत बसून गेली आहे ..हे पाहून रुपेश त्याच्या दुकानाकडे निघून गेला .

मधुराने ..यशला ..रुपेश बद्दल सांगितले ..आणि ती इतके दिवस त्याचा त्रास का सहन करत गेली ,

हे सांगत म्हणाली ..

केवळ ..दीदी आणि जीजुंच्या घरात माझ्यामुळे काही प्रोब्लेम होणे ठीक नाही ..याची भीती आहे

माझ्या मनात .

यश म्हणाला –

मधुरा ..या रुपेश नावाच्या मजनूची तू काही पहिलीच “लैला” नाहीस ..

तो अशी फालतुगिरी फार आधीपासून करतो आहे..म्हणून तर कुणी पोरगी देत नाहीयेत याला .

त्याच्या दृष्टीने “ही मधुरा ..त्याच्या भाभीची बहिण आहे “, मग काय , त्यला काही करता

येईल ..”असे वाटते आहे ,कधी नव्हे तो ..त्याचे डेअरिंग वाढले आहे..कारण ..

तू भीतीपोटी गप्प राहणार ,तो जे करील ते तू सहन करणार “अशी त्याची समजूत झाली आहे .

मधुरा ..तुला सांगतो ..या रुपेशची या आधी सुधा ..माझ्या काही मित्रांनी धुलाई केली आहे ,

पण, हा काही सुधरत नाही.. शेपूट वाकडी ती वाकडी याची .

त्याला जेव्हा कळेल तू माझ्या ऑफिसला काम करतेस ..तो चुपचाप बाजूला होईल ..

आणि नाहीच झाला तर ..आपल्या ग्यारेज्मध्ये त्याची अशी सर्विसिंग करतील की ..हा पुन्हा तुला

त्रास देण्याची कल्पना सुद्धा करणार नाही..

शो-रूम समोर गाडी थांबली ..

गाडीतून मधुरा उतरली ऑफिसमध्ये शिरतांना तिने मागे वळून पाहिले ...

यश तिच्याकडे पाहत आहे .

तिने ही गोड हसत हात हालवून त्याला टाटा “ केला ..

यशला जाणवले –मधुरा जणू नजरेतून म्हणत आहे – यश थान्क्स , रुपेशच्या तावडीतून सोडवल्या बद्दल .

मधुराची नजर , तिचे हसणे ..तिचे दिसणे ..

आठवत यश त्याच्या मित्राकडे निघाला ..

**********

३.

यशच्या बाबांना त्यांच्या एका गायक कलाकार मित्राचा फोन आला ..

ते म्हणत होते ..

सर, माझ्या मुलीचे अर्चनाचे संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आपल्याच सिटीमधल्या

प्रसिध्द संगीत विद्यालयात ती शिक्षण घेते आहे ..तिच्या संगीत-शिक्षिका विदुषी साधनाजी ,

यांनी सुचवले आहे की ..तिच्या गायन-सभेचे आयोजन करावे ,म्हणजे ..रसिकांना एक नव्या उगवत्या

कलावतीचा परिचय होईल ..

आणि या कार्यक्रमासाठी ..तुमच्या बंगल्यातील हॉल उपलब्ध करून द्यावा “व कार्यकम करू द्यावा “

यासाठी मी तुम्हाला संपर्क करावा “अशी सुचना खुद्द साधना मैडमनी तर केली आहे , आणि

माझ्या मनात सगळ्यात आधी तुमचेच नाव आले सर ..म्हणून ..तुम्हाला फोन केलाय .

यशचे बाबा आपल्या मित्राला म्हणाले –

मित्रवर्य पांडे –तुम्ही इतका संकोच करण्याची ,आणि असा औपचारिक फोन करण्याची काही गरज

नाहीये ..

तुम्ही माझ्याकडे संध्याकाळच्या वेळी या ,आपण एकत्र बसून बोलू या ,चर्चा करू या ..

आपला हॉल तर अशा कार्यक्रमासाठी सदैव उपलब्ध असतो ..दुसरे कुणी येण्या अगोदर तुम्ही

तुमचा कार्यक्रम ,त्याची तारीख आणि दिवस- वेळ ठरवा ..

आणि तयारीला लागा ..आम्ही तर सह-कुटुंब –सह-परिवार तुमच्या पाठीशी आहोत.

पांडे म्हणाले ..

सर, तुम्ही नाही म्हणणार नाहीत ..याची खात्री ..मलाच काय ,आपल्या सर्कल मधील सगळ्यांना

आहे ..फक्त आमच्या तारखेला तो हॉल मोकळा नसेल तर कसे ? हीच भीती वाटत होती ..

सर , तुमचे आई-बाबा ..सध्या इथेच आहेत ..त्यांच्या समोर माझ्या लेकीचा –अर्चनाचा पहिला

सार्वजनिक कार्यक्रम होणार , बापूआजोबा आणि अम्मा –आजी यांच्यासारख्या रसिकांचे आशीर्वाद

मिळणे “खूप मोठा योग आहे “मी लगेच येऊन भेटतो सर तुम्हाला .

यशचे बाबा म्हणाले –

उशीर न करता येऊन पक्के करून घ्यावे ..कारण कुणीही कार्यक्रमाबद्दल विचारणा केली आणि

तारीख –दिवस फ्री असेल तर आम्ही “नाही “म्हणत नाही

बस ..इतकीच काळजी घ्यावी .

यशच्या बाबांनी घरात सगळ्यांना कल्पना दिली ..

बापुआजोबा म्हणाले – हे बाकी छान झाले ..खूप दिवसांनी छान काही ऐकायला मिळणार आहे .

आपल्या हॉलला सगळे कलाकार मांडली लकी मानतात , इथू सुरुवात केली की ..पुढे यशदायी

वाटचाल सुरु होते ..असा त्यांना विश्वास वाटतो.

या भावनेतून ..”यशच्या घरातील ..हॉलची ..निवड करतात सगळेजण .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -२२ वा लवकरच येतो आहे .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------