kadambari Premaachi jaadu part 20 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२०

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२०

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- २० वा

--------------------------------------------

यशकडे मिळालेली नोकरी सोडून देण्यापेक्षा , सकाळचे ८ ते १२ कॉलेज झाल्यावर ..

दुपारी २ ते ७ असे पाच तास यशच्या ऑफिस चे काम केले तर चालेल का ?

नाही तरी नवख्या मधुराकडे कस्टमर attend करणे हे जबाबदारीचे काम नव्हते ,

त्यामुळे बील ,पेमेंट , ऑफिस रेकॉर्ड , बँक रेकॉर्ड ..असे स्वरूपाचे काम दुपारच्या वेळेत केले तरी चालण्यासारखे होते .

मधुराने यशला ही विनंती केली ..तेव्हा यशने मेनेजरकाकांना केबिनमध्ये बोलावत म्हटले –

काका –ही मधुरा काय म्हणते आहे ,तिचे ऐकून घ्या ,आणि त्यवर तुमचे काय मत आहे ते सांगा ,

योग्य की अयोग्य ..काही असो ..तुमचे मत महत्वाचे आहे .

मेनेजरकाका मधुराला म्हणाले – हे बघ , तू या ऑफिसमध्ये नवीन स्टाफ असलीस तरी ..तुझी

अडचण , तुझा प्रोब्लेम अगदी निसंकोचपणे सांगू शकतेस .. आता इथे यशच्या समोर सांगितले तरी

हरकत नाही..

तू यशला सांगितले असणार , आता पुन्हा आम्हां दोघांना एकाचवेळी ऐकु दे तुझे म्हणणे , म्हणजे

मला माझे मत सांगणे व त्यावर आम्हाला निर्णय घेणे , सोयीचे होईल ..

मधुराने पुन्हा एकदा दोघांना सगळे सांगितले आणि या प्रमाणे तिच्या कामाच्या स्वरूपात आणि वेळेत बदल करून दिला तर ..

कमवा आणि शिका , अर्न एंड लर्न “ असे हेतू साध्य होतील .

यशने तिचे ऐकून घेतले आणि शांत बसून राहिला ..मेनेजरकाकांचे मत ऐकणे जास्त महत्वाचे होते.

म्यानेजरकाकांनी ..मधुराचे एकूण घेत ..यशला म्हटले ..

हे बघ यश ..आपल्याकडे या अगोदर असा कुणी स्टाफ मेंबर नोकरीला नव्हता , आणि आहे त्यापैकी

कुणाला असे करण्याची गरज नव्हती ..

त्यामुळे .आहे त्या स्टाफकडून कामच्या वेळेप्रमाणे काम करूनघेणे “अशीच सर्वमान्य पद्धत आहे.

आणि या मधुराच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी इतकेच म्हणेन –

या मुलीला इथे तू तुझ्या अधिकारात जॉब दिला आहेस ..,तिचा इंटरव्ह्यू वगरे मी घेतला नाही ,

तिला अनुभव आहे कि नाही ? हे प्रोसीजर सुद्धा हिच्यासाठी झाले नाही ..हे बाकीच्या स्टाफला माहिती

आहे .

असे असले तरी ..माझ्या दृष्टीने महत्वाची आहे ते ही की –

एक गोष्ट या मधुराने कधी ही कुणाला जाणवू दिलेली नाही ..ते म्हणजे ..

आपण यशसाहेबाच्या फ्यामिली मेंबर पैकीच आहोत “ ,यामुळेच इथे मी आहे ..असे न करता ती नेहमी

अगदी नॉर्मल स्टाफ सारख आपले काम करीत असते ,

आणि सगळ्यांशी तिने छान जुळवून घेत ..स्वताची इमेज तयार केली आहे .

तिला “वशिल्याने नोकरी मिळवलेली स्टाफ “, असे नाही म्हणत .

त्यामुळे ..आपण जर मधुराला तिच्या सोयीच्या वेळेनुसार कामावर येण्यास परमिट केले तर ,

बॉसने खास मर्जी केली आहे “असे कुणास वाटणार नाही. हे मात्र मी सांगू शकतो.

आणि समजा ..असे झाले नाही आणि मग मधुराला तिचे कॉलेज महत्वाचे आहे म्हणून

..तिला जोब सोडावा लागला ,तर आपल्याला पुन्हा नवा माणूस शोधणे भाग पडेल..

माझ्या मते असे करण्यापेक्षा ..मधुराला दुपारच्या वेळेत कामावर येण्यास परवानगी देणे आपल्या

सोयीचे होईल .आणि तिच्यासाठी तर खूपच सोयीचे होईल. या बदलत्या वेळेचा पगार .वगरे गोष्टी

आपण हिशेबाने ठरवू या .

म्यानेजर काकांचे बोलणे यश लक्षपूर्वक ऐकत आहे “हे मधुरा पहात होती ..आणि म्यानेजरकाकांच्या

मनात तिच्याविषयी असलेल्या भावना ऐकून तिला आनंद वाटत होता “,

वरकरणी उग्र चेहेर्याचे , कठोर स्वरात –कडक शब्दात बोलणारे ,वागणारे म्यानेजरकाका ,ऑफिसमध्ये

एक शिस्तशीर वातावरण नेहमी असते ते यांच्यामुळे .

असे हे म्यानेजरकाका आपल्याबद्दल इतके बोलत आहेत म्हणजे .

.किती बारकाईने सगळीकडे लक्ष असते त्यांचे ,बाप रे ..

म्हणूनच या ऑफिसमध्ये असलेल्या सोबतच्या तिघी-चौघीजणी अगदी सेफ असल्यासारखे निश्चिंत मनाने काम करीत असतात .

मागे असलेल्या workshop मधले उत्साही पोरं ,किंवा कस्टमर म्हणून येणारे

हिरो –पोरं .ऑफिसमध्ये आल्यवर नीटपणे येतात ,आणि व्यवस्थित वागतात ..

याचे क्रेडीट म्यानेजर काकांना द्यावे लागेल.

तसे पाहिले तर ..यशचे हे शो –रूम , आणि ग्यारेज –वर्क्शोप ..नव्या –जुन्या अशा सगळ्या प्रकारच्या फोर व्हीलर ,टू- व्हीलर ,

एव्हढेच नव्हे तर ..प्रोब्लेम मध्ये असलेल्या हेवी –अवजड वाह्नासाठीचे पण एक

मदत केंद्र आहे”असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.

अशा फेमस ..यश –कार शो-रूम मध्ये एक स्टाफ आपण आहोत ..याचा मधुराला खूप आनंद वाटत होता.

याच बरोबर यशच्या आजी-आजोबांच्या गावचे आपण असल्यामुळे ..इथे आल्यावर या फ्यामिली कडून

खूप छान वागणूक मिळते ..या आनंदात ..आपण परक्या ठिकाणी आहोत असे वाटत नाही.

मधुरा तिच्याच विचारात गढून गेलेली आहे हे पाहून ..

यशने आवाज दिला ..

मधुरा – अगोदर तू तुझ्या कोलेज टाईम टेबल , परीक्षा कधी कधी असतात , कोलेज इव्हेन्ट, त्यातील तुझा सहभाग ..

या सगळ्या गोष्टीबद्दल म्यानेजर काकांना एक विनंती अर्ज दे ,..म्हणजे ते त्या प्रमाणे तुझ्या ऑफिस

येण्याच्या वेळेत तसे बदल करून देतील .तुझा अर्ज ऑफिस रेकॉर्डवर असू दे ,म्हणजे सगळे नियमानुसार केले गेले आहे “असे सर्वाना वाटणे महत्वाचे आहे.

कुणाचा गैरसमज होऊ न देणे “ याची काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे.

मधुरा –

तुझ्या कोलेजच्या वेळेत अडथळा येऊ नये .तुझ्य्वर आर्थिक भार पडू नये ..यासाठी तू करीत असलेला

हा तुझा जॉबही सुटू नये ..याचा विचार करून ..मी तुझ्या विनंती अर्जास मान्यता देतो.

मधुराच्या मनावरचे भले मोठे ओझे उतरले ,या नोकरीच्या पैशातून तिला इथले सगळे खर्च भागवणे

सहज शक्य होणार होते , यापुढे गावाकडून बाबांनी पैसे पाठवन्या ऐवजी ..आपणच त्यांना ..फुल ना ..

फुलाची पाकळी “असे थोडेफार पैसे पाठवून त्यांना आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देऊ या.

यश कामासाठी बाहेर पडला , म्यानेजरकाका आणि मधुरा .आपापल्या कामाला लागले ..

************

२.

दुपारच्या वेळी आज घरात यशचे आजी आणि आजोबा दोघेच होते . अंजलीवहिनी आणि सुधीरभाऊ

ऑफिसला गेलेले . आणि यशचे आई आणि बाबा ..बाहेरगावी गेले होते ..एका ठिकाणच्या साहित्य –

संमेलनात दोघांना सहभाग निमंत्रण होते . साहित्य –अभ्य्सक आणि समीक्षक –हे यशच्या बाबांची

ओळख ,आणि जेष्ठ कवयित्री म्हणून यशच्या आई ..गेली अनेक वर्षे काव्यलेखन क्षेत्रात सक्रीय आहेत ,

दोघी ही भाषा विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक , त्यामुळे साहित्यिक उपक्रम असले की त्यात या दोघांचा

समावेश ,सहभाग असायचा .

साहित्यिक –कवी अशी इतकीच ओळख नव्हती या दोघांची ..संगीत आणि नाटक या दोन्हीचे एक जाणकार रसिक

आणि आश्रयदाते “या आवडीने त्यांना सगळीकडे खूप आदराचे स्थान होते .

आजी-आजोबांचा वारसा जणू या दोघांनी पुढे चालवला होता . कारण ..गावाकडच्या वातावरणात

यशच्या बापुआजोबांचे घर ..म्हणज आड –वळणाच्या गावात असलेले एक हक्काचे व्यासपीठ होते.

बापुअजोबांना संगीताची उत्तम जाण,आणि आवड होती ..नवोदित आणि नामांकित अशा गायक –

वादक कलाकारांच्या मैफिली ते आयोजित करीत ..जणू दर्जेदार संगीताच्या मेजवानीची सवय त्यांनी

पंचक्रोशीतल्या लोकांना लावली ..अनेक कानसेन ..अव्वल रसिक आणि श्रोते बापुअजोबांनी घडवले .

त्यातूनच अनेक कलावंत उदयाला आले ..

मोठ्या शहरात तर सगळ उपलब्ध असते ..त्याचे अप्रूप काही काळानंतर वाटेनासे होते ..

पण..बापुआजोबांच्या मैफिलीच्या निमंत्रणाची आतुरता लहान –मोठ्या , नव्या-जुन्या कलाकारांना

असे ..कारण ..बापुआजोबांच्या वाड्यात होणारा संगीत सोहोळा गायकांना –वादकांना आणि श्रोत्यांना

स्वरानंद देणारा असतो “ आणि हा अनुभव घेण्यासाठी दूरदूरचे लोक येत असत .

बापुआजोबांच्या सहवासात राहूनच ..मधुराचे बाबा ..एक उत्तम गायक कलावंत म्हणून उदयास

आले , गावातल्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी करीत ..त्यांनी संगीत –शिक्षण देण्यास

सुरुवात केली , त्यांचे हे संगीत विषयक प्रचार आणि प्रसारकार्य गावाच्या सीमा ओलांडून सगळीकडे

पसरले ..आता त्यांना आदराने ..पंडितजी म्हटले जाते ..

तसे तर ..यशचे बाबा आणि हे पंडितजी ..बालमित्र , शेजारी असणारे ..पण या मैत्रीत .

पंडितजींची गरिबी .आणि यशच्या बाबांची श्रीमंती ,आणि नावलौकिक या गोष्टी दोन्ही फैमिलीच्या

मैत्री-संबंधात कधीच आडव्या आल्या नव्हत्या .

आजी-आजोबा , यशचे आई-बाबा ..यांच्या नंतर ..सुधीरभाऊ आणि यश यांचे गावाकडे येणे नसायचे .

त्यामुले या नव्या पिढीत ..जुन्या पिढी इतके भाव-बंध नाहीयेत ..ही गोष्ट तर मान्य करायला हवी .

मधुराचे आई-बाबा ..आपल्यागावातच राहून संगीत सेवा आणि संगीत कार्य करण्यांत आनंद मानीत .

आपले हे जग ,आनंद देण्यास पुरेसे आहे ..असे म्हणून ते बापुअजोबांना म्हणत ..

बापू ..तुम्ही कायम जवळ केलात आम्हाला .कधी आपल्यात अंतर ठेवल नाहीत ..

आज मला सगळीकडे पंडित जी या बहुमानाने ओळखले जाते ..हे सगळे मिळाले आहे ते केवळ ..

तुमच्या आश्रयाला आहे म्हणून , एरव्ही ..इतके मोठे अवकाश माझ्या साठी कधी खुले होऊच शकले

नसते .

पंडितजीच्या पाठीवर हात ठेवीत बापुआजोबा म्हणत ..

अरे बेटा – ही सगळी इच्छा त्या पांडुरंगाची ..तो करवून घेतो ..आपण फक्त निमित्त असतो ,

या बापूच्या मेहेरबानीने तुला हे कला वैभव , नावलौकिक मिळाले आहे “ असे बिलकुल नाही ,

तुझी संगीत साधना , तुझे मेहनत ,हे तुझ्याजवळ आहे म्हणून तुला प्राप्त झाले आहे.

फक्त एक मात्र लक्षात ठेव..

वृथा अहंकार , अभिमान यापासून दूर ठेव स्वतःला .. माणसे जोड नेहमी ..

तुला काही कमी पडणार नाही ..माझा आशीर्वाद सदा तुझ्या पाठीशी आहे.

मधुरा नेहमी विचार करायची ..देव पण न कधी कधी काम्माल्च करतो ..

हेच बघा ना ..

बापुअजोबानचे घर ..एका मोठ्या तालेवार ..श्रीमंत व्यक्तीचे घर ..आणि त्यांच्या बाजूला असलेले

मधुराच्या आई-बाबांचे छोटेसे ..साधारण घर ..

पण परिस्थितील फरक असला तरी ..बापुआजोबा ,अम्माआजी यांनी कुणाच्याही बाबतीत कधीही

दुजाभाव केला नाही. या दोन मोठ्या मनांच्या माणसांनी आजूबाजूच्या सगळ्यांना कायमच आप्लेपानाना

दिलाय .

या दोघांनी आपल्या आई-बाबांना समजवले ..आणि मगच त्यांनी आपल्याला दिदिकडे राहून शिकण्यास

परमिशन दिली ..आणि एका नव्या जगात येण्यास मिळाले .

केवळ आजी आणि आजोबांच्यामुळे यशच्या घरात आपण येतो जातो ..एरव्ही ..इतक्या मोठ्या घरात

येणे –जाणे “याची कल्पना पण करणे आपल्यासाठी शक्य नव्हते .

मधुराचे मन समाधानाने भरून आले ..

**********************************************************

बाकी पुढील भागात

भाग -२१ वा लवकरच येतो आहे.

----------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------