विवेक आणि गौरवी परत दोघेच होते रूम मध्ये.
गौरवी - तु काही खाल्लं नाहीय ना तर मी ज्यूस घेऊन येऊ का तुझ्यासाठी? भूक लागली असेल ना. आले मी लगेच तोपर्यंत आराम कर.
विवेक - हो पण 2 आणशील हं.
गौरवी - बर ठीक आहे.
ती लगेच हॉस्पिटलमधून बाहेर गेली आणि जवळच्या मार्टमधून 2 फ्रेश जूस घेऊन आली. विवेक तिचीच वाट बघत होता.
गौरवी - अरे आराम करायचा ना थोडा. (आणि जुस त्याच्या हातात देत) घ्या हा झाला की दुसरा देते.
विवेक - मला एवढंच पुरे होतो, दुसरा जूस मी तुझ्यासाठी मागवला होता, मला माहिती आहे तू ही काही खाल्लं नसणार रात्रीपासून. घे चल आपण सोबत घेऊ.
तिला त्यानी अशी तिची काळजी केलेलं खूप आवडलं होतं. दुसरा जूस तिने घेतला. आणि दोघांनीही cheers म्हणत जूस पिला.
दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स आलेत, सगळे नॉर्मल होते, डॉक्टरांनी लगेच सुटी दिली पण आठवडाभर घरीच आराम करायला सांगितलं. गौरवी त्याला घेऊन घरी आली. त्याला हॉलमध्येच बसवून पटापट सगळं आवरलं. त्याची खोली खूप छान मोहक बनवली, सुंदर रंगबिरंगी फुलांनी सजविली जेणेकरून त्यालाही फ्रेश वाटावं. आता तो तिच्याशी पूर्वीसारखा व्यवस्थित बोलायचा, तिचा मान ठेवायचा, तिची विचारपूस करायचा. तिला खूप छान वाटत होतं हे सगळं.
तो घरी आहे सोबतीला याचा गौरवीला खूप आनंद होता कारण आजपर्यंत तो घरात तिच्यासोबत कधी राहिलाच नव्हता. तिला हे क्षण हवे होते पण त्याचा अकॅसिडेंट झाला याची मात्र खंत होती. आठवडाभर तिनी त्याची खूप काळजी घेतली. तो जरा हलला जरी तरी ती पळत येऊन त्याला काय हवं नको ते विचारायची. त्यातून तीच प्रेमही स्पष्ट दिसत होतं. तीच प्रेम तर होतच फक्त त्याच्या डोळ्यावर दुसऱ्या कुणाच्या प्रेमाची पट्टी होती, ज्यामुळे ते त्याला आतापर्यंत दिसल नव्हतं. पण आता तो तीच प्रेम अनुभवत होता. आपण केलेल्या चुकीबद्दल त्याला राहून राहून पश्चाताप होत होता.
आठवडाभर घरीच राहिल्यामुळे त्याला कळलं की खरच घरात किती कंटाळवाणं वाटतं, ही कशी रहात असेल दिवसभर घरात? हा प्रश्नाही त्याला पडला. नंतर त्याला अचानक काही आठवलं आणि तो गौरवीकडे वळला.
गौरवी घरात काम करत होती , किचन ओट्याजवळ भांडी आवरत होती, तो अचानक माघून आला आणि तिच्या बाजूनी ओट्याला टेकून उभा राहिला. त्याला पाहून तिला जर आश्चर्य वाटलं.
गौरवी - काही हवं होतं का ? मला बोलवून घ्यायचं ना, आवाज दिला असता तर मी आले असते. तु कशाला आलास? आणि बरं वाटतेय ना? काही हवय का?
विवेक - हो. काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत.
गौरवी - (आणखीच अचंबित होऊन ) काय? कुठल्या प्रश्नांची उत्तरं? विचार?
विवेक - तुझं आवरलं की जरा बाहेर जाऊयात दोघे, चालेल का? घरात कंटाळा आलाय आणि आपण कुठेच गेलो पण नाहीय ना कधीचं. आपल्याला मोकळ्या हवेत मनमोकळं बोलत येईल.
गौरवी - हो चालेल जाऊयात. तू इथे आल्यानंतर पहिल्यांदा मला बाहेर सोबत जायला विचारतोय, मी नाही कस म्हणणार, पण एक अट आहे
विवेक - कसली अट?
गौरवी - आपण आधी डॉक्टर कडून तुमचं चेक अप करून घेऊ मगच जाऊयात बाहेर.
विवेक - अग मी फार लांब कुठे जाण्यासाठी नाही म्हणत आहे इथेच जाऊयात फेरफटका मारुन येऊ परत. आणि मला आता बरं वाटतंय.
गौरवी - हो पण तरी सुद्धा एकदा डॉक्टर कडून चेक करून घेऊयात. जवळच आहे त्यांचं हॉस्पिटल येतील ते लगेच, मी फोन करते त्यांना.
अस म्हणत तिने फोन हातात घेऊन लावला देखील. डॉक्टरही लगेच पोचलेत. त्ववट्याला चेक करत होते आणि गौरवी सुद्धा तिथेच त्यांच्या मागे उभी होती. विवेकला डॉक्टरांशी बोलायचं होत पण गौरवी समोर त्याला बोलत येणार नव्हतं. काही सुचवत विवेक बोलतो,
विवेक - गौरवी अग पाणी तरी विचारशील की नाही त्यांना?
गौरवी - अरे हा विसरलेच, आलेच हा लगेच घेऊन. म्हणून ती वळली आणि विवेक डॉक्टरांशी बोलू लागला.
विवेक - डॉक्टर तुम्ही मी ठणठणीत बरा झालोय असच सांगा ना गौरावीला, ती खूप जास्त काळजी करते आणि मी पण कंटाळलोय घरात बसून. थोडं तिच्यासोबत बाहेर फेरफटका मारायला जाणार होतो पण तुम्ही ओके म्हंटल्याशिवाय ती मला नाही निघू देणार. तेव्हा तुम्ही मला ओक करा ना प्लीज.
डॉक्टर - विवेक सुधारणा आहे पण थोडा आणखी आराम करायला हवा तू. एखादा फेरफटका मारू शकतो पण तुला काळजी घ्यावीच लागेल.
तेवढयात गौरवी पाणी घेऊन येते. पाण्याचा ग्लास डॉक्टरांना देत विचारते,
गौरवी - " डॉक्टर सगळं ठीक आहे ना, याना बाहेर फिरावंस वाटतंय तर जाता येईल का?"
डॉक्टर एकदा विवेक कडे बघतात तो डोळ्यांनीच त्यांना विनवत असतो.
डॉक्टर - हो जाता येईल की, थोडी काळजी घ्या बस बाकी काही नाही. सगळं ठीक आहे, बरीच सुधारणा आहे. खूप व्यवस्थित काळजी घेत आहेत तुम्ही.
चला मी निघतो काही वाटलंच तर लगेच फोन करा. किंवा हॉस्पिटलमध्ये या मी असेलच.....
क्रमशः