💕 तिचं Heartbeat..(भाग5)..💕
सुगंधा रोज घरचे आवरून कॉलेजमध्ये जायची...पण नेहमीपेक्षा आता तिला शिकवण्यात हुरुप वाढला होता...यावर्षीही प्रिन्सिपॉल सरांनी तिच्यावर जबाबदाऱ्या वाढवल्या होत्या.....ती सगळं अगदी नीट सांभाळत होती.....घरही आणि कॉलेजही.....त्यातच आता रोजच आनंतशी बोलणं वाढलं होतं..... कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त तो तिच्याशी बोलायचा.... उद्देश दोघांचा काही वाईट नव्हता.....तो कॉलेजमध्ये हुशार असल्याने त्याच्यावर बरिच कामे सोपवली जायची..... दोघेही आपली काम चोखपणे करत होते.....कधीतरी थोड्या गप्पा व्हायच्या त्यांच्या.....
आज असंच सुगंधा कॅन्टीनला गेली होती...अचानक अनंत आला....
"hii .....मॅम....
"हॅलो,..............कसा चाललाय स्टडी?...कसा आहेस?...
"एकदम cool...... मस्त.....सध्या सगळं बंद, उगीचच उनाडणं, हिंडण, बागडण, pub, पार्टी सगळं बंद..... only.....study, काम मस्त चाललंय ....,तुम्ही कशा आहात?.....सर काय म्हणतात?....एखादी नविन poem, लिहली की नाही आजकाल?....लिहा,छान लिहता तुम्ही!....."
"छान आहे सगळं,सर पण मजेत.....हम्मम,लिहीन काहीतरी.....साहित्य लिहिण्याचं एक अँप आहे त्यावर लिहीन म्हणते....पण....."
"लिहा ना....मी पण वापरतो ते अँप,छान स्टोरी,poem, गजल,शायरी सगळं सगळं लिहता येत.....वाचकही छान प्रतिसाद देतात....मीपण लिहतो कधी कधी......मन मोकळं करता येतं....."
"हम्मम...विचार करते..."
"विचार नका करू एवढा, एकच जन्म मिळतो आपल्याला.... त्यातच सगळं जगून घ्यायचं,life मध्ये enjoy करायचं,माहीत नाही पुढचा क्षण जगायला मिळेल की नाही,so just enjoy each and every movement of the life,and don't worry be happy....….Keep smiling 😊😊😊....sorry...चुकीचे बोललो असेल तर.....but life खूप छान आहे, टेन्शन घेऊ नका जास्त....."
हे बोलताना अनंताच्या डोळ्यातील चमक काही वेगळंच सांगत होती....सुगंधा पण काही क्षण त्यात हरवली.....खरंच जीवन खूप सुंदर आहे.... आपणही लिहुया काहीतरी...आणि भावनांना वाट करून द्यावी..... पण विक्रमने विचारले तर....सांगूया ना.....लिहायचं तर आहे....
शेवटी घर तर imp आहे ना,बाकीच नंतर....
दुसऱ्या दिवशी सकाळी अनंत कॉलेजमध्ये दिसतो....सुगंधा दिसते...आज हॅप्पी असते....
अनंत........"आज happy😊,अरे वाह,मस्त,.......तुमची कविता वाचली मी!....काय लिहता तुम्ही?....सुंदरच!....अप्रतिम!....."
सुगंधा........."खरंच, अरे खूप कमी वेळेत खूप जास्त लोकांनी वाचली.....
मलाही खूप आनंद झाला.... खरं सांगू, खूप बरं वाटलं.... मनातलं कोणालातरी सांगितले असं वाटलं......मन हलकं झालं....."
अनंत............."मनाला आवडतील त्या गोष्टी कराव्यात माणसानं.... थोडसंच असतं जगणं,पण मन भरून जगायचं....प्रत्येक क्षण अविस्मरणीय असायला हवा....."
सुगंधा..........."तुझ्या प्रत्येक शब्दात किती अर्थ असतो.....मला वाटलं,तू फक्त असाच आहेस,serious नाहीस कोणत्याच गोष्टीत....पण तू खूप विचारी आहेस....अर्थपूर्ण बोलतोस...."
अनंत.....…....."serious....मी जर झालो तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल, मला पाहायला....😂😂
सुगंधा.........."नको,नको,तू असाच बरा आहेस....,"
अनंत..........."तुम्ही पण serious नका राहू,हसू फार छान दिसतं तुमच्या चेहऱ्यावर..... always keep smiling...😊"
अनंत एकटक सुगंधाच्या डोळ्यात पाहत असतो.....तीही काही क्षण सगळं विसरते...त्याच्या डोळ्यात पाहते...
अनंत म्हणतो......
"माना जादा बात पसंद नहीं तुझे,
तेरी आदत नहीं मैं, बनना चाहता हूं,,
पता है हमसफर नहीं मैं तेरा,
हमदर्द जरूर मैं, बनना चाहता हूं!....💕"
सुगंधा म्हणते,"काय?.....काय बडबडतोस?....चल,bye..."
अनंत...".काही नाही...असंच..."
दोघेही जातात...पण अनंतला सुगंधाचे डोळे सारखे आठवतात....खूप राज जसे लपलेले आहेत....खूप दुःख जसं लपलेले आहे.....
------////-----------////---------////-----------////-------////---
आज सुगंधा खूप खुश होती.....तिची anniversary होती....त्यामुळे तिने आज ब्लू कलरची साडी नेसली होती.... हातात बांगडय़ा, घड्याळ,... matching hairings,लाइट मेकअप.... अगदी सुंदर दिसत असते ती......विक्रम तिला पाहून भलताच खुश होतो....
.विक्रम म्हणतो.......
"सुट्टी टाकायची का आज,राणीसाहेब?...जाऊया,बाहेर....."
सुगंधा...." गेलो असतो,पण आज काम आहे,घरीच celebrate करूयात का?...."
विक्रम....."उ...हम्मम...ठीक आहे पण next time नक्की बाहेर जाऊयात....."
सुगंधाने मॅन हलवली.....ती कॉलेजमध्ये पोहोचली......lectures आटोपले.....सगळे काम झालं....पण तिचं मन अस्वस्थ होतं.... का माहीत नाही.....आज नेहमींसारखं काही नव्हतं......म्हणजे काय राहील?...तेच कळत नव्हतं?....
"आज दिल खाली-सा क्यों हैं,
सब हैं, पर दिल नाखूष क्यों हैं?..."🤔
तेवढ्यात अनंतचा मित्र दिसतो, ती त्याला विचारते,
"आज अनंत नाही आला का ?...का नाही आला?....त्याला.बरं नाही का?...any प्रॉब्लेम?...."
"नाही नाही....बरा आहे तो....पण काही काम असल्याने तो आज नाही आला...."
सुगंधा विचार करते.....का नसेल आला बरं?....रोज तर येतो.....कोणतं काम असेल?.....यायला हवा होता मला बोलायचं होतं त्याच्याशी?....अरे पण मला काय बोलायचं होत?.....त्याच्याशी बोललं की माझा day happy जातो.....तो माझा lucky charm आहे.....खरंच......."
अरेरे, पण मी त्याचा इतका विचार का करते?.....का मी त्याला miss करते?.....तो माझा फक्त एक student आहे,बस......."
क्रमशः
....Heartsaver....
(ही कथा पूर्णता काल्पनिक आहे,त्यामुळे तिचा कोणाशीच संबंध नाही, जर कोणाशी चुकून निघाला तर हा केवळ निव्वळ योगायोग समजावा)