Prarambh - 18 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रारब्ध भाग १८

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

प्रारब्ध भाग १८

प्रारब्ध भाग १८

परेश थोडा साशंक झाला ...त्याने जास्त काही विचारू नये म्हणून
सुमन म्हणाली “एवढा काय विचार करताय ?..मामी काय खाणार आहे का आपले दागिने .?
विश्वास नाही का माझ्या माहेरच्या लोकांवर तुमचा ..?
तिचे डोळे मोठे करीत कांगावा करणारे आणि रागावलेले बोलणे ऐकुन परेश थोडा बिचकला.
समजुतीच्या सुरात तो म्हणाला ,”तसे माझे म्हणणे नाही ग ..फक्त एकदा दागिने त्यांनी नीट ठेवले
आहेत ना हे विचारून घे ..
आता पुढल्या महिन्यात दिवाळीला आपण जाणार आहोतच गावाकडे .
त्या वेळेस तुला घालायला पण होतील आणि येताना घेऊन येऊ आपण .”
“हे बघा तुम्हाला तसा काही संशय वाटत असेल तर स्पष्ट सांगा ..
उद्याच्या उद्या जाऊन मी दागिने घेऊन येईन ..”
असे म्हणत सुमन रागारागाने आत निघुन गेली .
आता हिची समजुत निघणे कठीण आहे हे परेशने ओळखले .
दहा बारा तोळ्याचे दागिने होते तेसुद्धा कर्ज काढुन केलेले ..
चौकशी तर करायला हवीच होती .
त्यात इतके रागावण्यासारखे काय आहे हे त्याला समजेना.
मग जेवण थंडपणे पार पडले आणि झोपताना पण सुमन त्याच्याकडे पाठ करून झोपली .
मनातल्या मनात तिला हायसे वाटले होते !!!
ऐन वेळेस आपल्याला ही थाप सुचली हे बरे झाले असे तिला वाटले.
आत्ताचा प्रश्न तरी सुटला होता .
दुसऱ्या दिवशी मात्र तिने मायाला निरोप दिला की ती संध्याकाळी येतेय .
मायाकडे गेल्यावर ती एकदम मायाच्या गळ्यात पडुन रडायला लागली .
“आता काय झाले तुला ...?असे विचारताच
तिने काल घडलेले सगळे सांगितले .
महिन्याभरात काहीतरी ताबडतोब पैशाची सोय करायला लागणार मला .
दिवाळीला गावी जायच्या आत दागिने हवेत माझ्याकडे .
काहीतरी उपाय सुचव तुच आता ..
असे म्हणताच माया म्हणाली
“हे बघ सुमन आता मी जे काय सांगते ते नीट ऐक .
तुझ्याकडे आता पैसे मिळवायची एकच गोष्ट आहे ..ती म्हणजे तुझे शरीर ..
हे ऐकताच सुमनचे डोळे विस्फारले ....
“काय बोलतेस माया तु ..इतक्या खालच्या थराला तु कशी जाऊ शकतेस ?
“काय वाईट बोलले मी ? माया म्हणाली
हा तर पैसे मिळवायचा खरा राजमार्ग आहे तुझ्यासारख्या सुंदर बाईसाठी .
आणि त्यात गैर काहीच नाही ...
जसे एखादी बाई आपल्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी करून पैसे मिळवते
तसेच आपण आपले शरीर वापरून पैसे मिळवायचे .
तु मला विचारत होतीस ना बंगल्याविषयी आणि मावशींच्याविषयी ..
आणि तुला उत्सुकता होती न माझ्या कामांविषयी...
ऐक तर मग
मी देहविक्रीचे काम करते याला सभ्य भाषेत “सेक्स वर्कर” म्हणतात .
..येथून काही अंतरावर एक मोठे घर आहे .
त्याला आम्ही बंगला म्हणतो .आणि त्याच्या मालकीण आमच्या मावशी आहेत .
इथे विवाहित ,अविवाहित दोन्ही प्रकारच्या बायका हे काम करतात .
इथे येणारा कस्टमर पण श्रीमंत असतो .
प्रत्येकीला कस्टमरच्या पसंतीनुसार एक दोन तासाचे चार ते पाच हजार मिळतात .
त्यातले पाचशे मावशीना तिथल्या व्यवस्थेसाठी द्यावे लागतात ,उरलेले पैसे आपले स्वतःचे .
असे मी रोज तीन चार तास काम करते ज्याचे मला भरपूर पैसे मिळतात .
मात्र इतर वेश्याव्यवसायासारखे हे घाणेरडे नाहीये .
इथे प्रत्येकीला स्वतंत्र खोली आणि सोयी सुविधा आहेत .
बंगला अतिशय निटनेटका आणि अद्यावत आहे .
कस्टमर चांगल्या घरातले असल्याने इथे खुप गुप्तता राखली जाते .
इथे देहविक्री चालते हे कोणाला समजत पण नाही .
कधीही तुम्हाला हा व्यवसाय सोडायची मुभा आहे पण शक्यतो इथे आलेली कोणीही
परतून जायला उत्सुक नसते .
तुला पैशाची गरज आहे तर तुला हेच काम करायला लागेल.
तु हो म्हणताच मी तुला उद्या तिकडे घेऊन जाते .”
हे सगळ ऐकुन सुमन डोके घट्ट धरून खाली बसली .
मायाने तिला पाणी प्यायला दिले आणि तिच्यासमोर बसली .
पाच दहा मिनिटे विचार केल्यावर सुमनच्या लक्षात आले आता याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही .
तिने मन घट्ट करून हे स्वीकारायचे ठरवले.
आपल्याला फक्त एक लाख रुपये हवे आहेत ते जमा होईपर्यंतच हे काम करायचे नंतर मात्र सोडायचे .
“मी तयार आहे हे काम करायला ,मात्र माझी आत्ताची पैशाची गरज भागली की मी बंद करेन “
तिचा होकार ऐकल्यावर माया एकदम खुष झाली .

यापूर्वी तिने मावशीना एकदा सुमन दाखवली होती .
इतकी “रूपवान” मुलगी पाहिल्यावर मावशी खुष झाल्या होत्या
सुमनला या धंद्यात आणल्यास मावशी तिला भरघोस कमिशन देणार होत्या.
माया या संधीची वाट पाहत होती.
सुमनला मोठमोठ्या हॉटेलमध्ये नेणे,सारख्या गिफ्ट देणे ,रमीची सवय लावणे.
हे सगळे तिच्या प्लानच्या अनुसार होते .
आता हे सगळे घडून आले होते ..
सुमनचा होकार ऐकताच ताबडतोब रिक्षा करून माया सुमनला घेऊन बंगल्यावर गेली .
आज सुमनची सर्वांशी ओळख करून द्यायची होती .
तो आलिशान आणि मोठा बंगला होता .
आतमध्ये एक मोठे किचन होते एक स्वयंपाकीण बाई होती कामाला .
जिथे मावशींचा स्वयंपाक आणि सर्वांसाठी लागेल तसे चहा कॉफी
किंवा नाश्त्याची पण सोय होती.
आजूबाजूला प्रशस्त पांच सहा खोल्या होत्या

मावशी बोलायला अतिशय गोड होत्या .
तिथे असलेल्या काही जणींशी सुमनची मायाने ओळख करून दिली .
त्या सर्वजणी फ्रॉक ,मिडी स्कर्ट घातलेल्या देखण्या मुली होत्या .
त्या तिच्याशी अगदी छान बोलल्या मग तिला थोडा हुरूप आला.
उद्यापासुन हे काम करायचे असे तिचे ठरले .

दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास ती मायासोबत निघाली ,मनात थोडी धाकधूक होतीच .
तिला चार नंबरच्या रूम मध्ये पाठवण्यात आले .
इथे छोट्या फ्रीज सकट सर्व सोयी होत्या.
काही वेळ वाट पाहिल्यावर दरवाजातून एक प्रौढ गृहस्थ आत आला
त्याने दरवाजा बंद करून घेतला .
मामाच्या वयाच्या असणाऱ्या त्या श्रीमंत दिसणाऱ्या माणसाला पाहून सुमन जरा घाबरली .
त्याने सुमनजवळ येऊन तिला घट्ट मिठीत घेतले आणि तिच्या अंगावरचे कपडे उतरवायला सुरवात
केली .
सुमनचा कोणताच प्रतिसाद त्याला अपेक्षित नव्हता .
तासाभरात त्याने दोन तीन वेळा शरीरसुख ओरबाडून घेतले .
तो गेल्यावर सुमन थकुन गेली .
मावशींनी तिला कॉफी बिस्किटे पाठवली आणि परत तयार राहायला सांगितले .
आज तिला दोन कस्टमर करायचे होते .
आता यापुढे कोण आहे कोण जाणे असा विचार करीत ती परत फ्रेश झाली .
आता मात्र एक पंचवीस तीस वर्षे वयाचा तरुण आत आला .
त्याला हवे तसे आणि हवे त्या पद्धतीने त्याने आपले सुख घेतले .
सुमन सर्व चुपचाप सहन करीत राहिली .
तो गेल्यावर ती आपले आवरून घरी जायला निघाली.
तेव्हढ्यात मावशींनी तिच्यासाठी जेवणाचे ताट पाठवले.
ते पाहताच तिला भूक अनावर झाली .
तिने पटापट जेवुन घेतले तोपर्यंत मावशी आत आल्या .
सुमन तु आज कस्टमरना खुष केलेस .
ही घे तुझी आजची कमाई पाच हजार रुपये असे म्हणून मावशींनी तिच्या हातावर पाचशेच्या
दहा नोटा ठेवल्या .
पहील्या दिवशीची काही तासांची इतकी कमाई पाहून सुमनला बरे वाटले .
संध्याकाळी घरी गेल्यावर मात्र तिचे अंग खुप दुखायला लागले मग तिने एक गोळी घेतली आणि
ती झोपून गेली .
परेश आला तेव्हा सगळ्या घरभर अंधार होता आणि सुमन अजुन झोपून होती .
त्याने तिची चौकशी केली तीला बरे नाही का विचारले .
पण सुमनने काहीच उत्तर दिले नाही .
दागिन्यांच्या प्रकरणा पासून तिने त्याच्याशी बोलायचे सोडुन दिले होते .
परेशला तिचा हट्टी स्वभाव माहिती झाला होता .
त्याला खुप भूक लागली होती पण घरात काहीच स्वयंपाक केलेला दिसत नव्हता .
मग नाईलाजाने त्याने फ्रीजमधले दुध काढुन दुध बिस्किटे खाल्ली आणि झोपी गेला .

क्रमशः