Prem mhanhe prem asat.. 13 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेम म्हणजे प्रेम असत- १३

Featured Books
Categories
Share

प्रेम म्हणजे प्रेम असत- १३

प्रेम म्हणजे प्रेम असत- १३

जय ला जाग आली.. त्याने मोबाईल वर किती वाजलेत पाहिजे.. तितक्यात त्याला एकदम आठवलं.. आज रितू आणि त्याच्यासाठी खास दिवस होता.. त्याने शेजारी शांत झोपलेली रितू पहिली आणि त्याला राहावलं नाही.. रितू झोपेत सुद्धा खूप सुंदर दिसत होती.. म्हणजे झोपेत तिच सौंदर्य खुलून निघालं होतं... जय हसला.. आणि त्याने रितू च्या गालावर किस केल.. रितू झोपेतच हसली.. जय ला राहवलं नाही आणि त्याने परत एकदम रितू च्या गालावर किस केल.. रितू ने एक डोळा उघडून जय कडे पाहिलं.. आणि गोड हसली..मग तिने जीभ बाहेर काढून जय ला वेडावून दाखवले.. पण बोलली मात्र नाही... फक्त हग घेण्यासाठी हात पुढे केले.. मग अर्थात जय ने सुद्धा रितू ला एक टाईट हग दिली.. मग तो रितू शी बोलायला लागला,

"ओह हो.. रितू, तू जागी होतीस.. ह..? तू थांबली होतीस वाटत मी कधी किस करतो हे पाहायला?"

"हो हो जय.. नवरोबा!! तू पहिली किस केलीस तेव्हाच जाग आली.. मग मला पहायचं होत, अजून किती रोमेंटिक होतोस.."

"I am very romantic... तुला फक्त ते माहिती नाहीये!"

"हो का...बर बर!! पण मला माहिती नाही तू किती रोमेंटिक आहेस? यु आर किडिंग जय!! "

रितू हे बोलली आणि दोघे हसायला लागले..

"बाय द वे जय.. आज कोणता दिवस आहे.. आहे का तुझ्या लक्षात?"

"बायको... आजचा दिवस कसा विसरेन ग? आजच्याच दिवशी तू ऑफिशियली माझ्या आयुष्यात आलीस.. आणि माझ्या हक्काची झालीस.."

"येस येस.. आय लव्ह तू जय!! खूप म्हणजे खूप प्रेम करते मी तुझ्यावर!!"

"मी तुझ्यापेक्षा थोड जास्त... यु सी?"

"नो नो.. मी जास्ती प्रेम करते..."

"ऐकून घेणार नाही काही.. आय लव्ह यु मोअर!! बस. आता हा विषय बंद.." जय नाटकी हसला आणि त्याने परत एकदा रितू च्या गालावर हळुवारपणे हात फिरवला आणि एक किस घेतली... "आज तुझ्यावर इतक प्रेम येतंय रितू! तुला मिठीत घेऊन तुझ्या मऊ गालांवर हात फिरवत बसावस वाटतंय.. सो सांग, आपके इतने मुलायम गालोन्का राज बताओ.." जय बोलला आणि तोंडावर हात ठेऊन हसायला लागला..

"गप बस जय..किती नाटकी वागतोस रे.. आपण एक फेमस डॉक्टर आहोत हे विसरू नका..."डोळे बारीक करून रितू बोलली..

"ए रितू, डॉक्टर आहे पण सगळे मास्क बाहेर ग..आपल्या घरी आणि तुझ्या बरोबर मी फक्त जय आहे.. रितू चा जय!! कळल? सो मी मुक्त वागणार...तुझ्यावर भरभरून प्रेम करणार.. आणि मला हे करण्यापासून कोणी आडवी शकत नाही... तू पण नाही..लग्न करून संसार थाटला आहे तुझ्या बरोबर सो हक से... ओके?" जय ने सूर थोडा बदलला.. आणि त्यच्या बोलण्यावर रितू ला एकदम हसूच आल.

"हो हो.. मला हवच आहे तुझ प्रेम.. इतके दिवस मी एकटीने जगले...पण आता डबल जगणारे..." रितू जय चा हात हातात घेत बोलली..

"होच.. तुला जे जे हवं ते आणि तू खुश राहा फक्त!! बाकी सगळ मी पाहीन!! आता तू मस्त रीलाक्स.. तुझासाठी आणि तुझ्याबरोबर मी आहे.."

"ओह हो..आय नो जय!! आणि तू पण खुश हवी आहेस मला..आपण आपला संसार असाच फुलवत राहू आणि एकमेकांची साथ नेहमीच देत राहू.. आणि नाईस.. रितू चा जय तू ... आणि मी जय ची रितू!! अजून कोणीच नको... हे दिवस कधीच संपू नये असं वाटत रे.. आणि आज सरप्राईज ची वाट पहातीये.. आज लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल....आपण काहीतरी मस्त प्लॅन करू"

"1 वर्ष झाल सुद्धा? कळल पण नाही ना....कधी संपल एक वर्ष... मला तर आपण काल भेटल्यासारखे वाटतय... आजही इतक फ्रेश आहे आपल नात... थॅंक्स टू यु!!"

"हो न.. तुझ्या बरोबर दिवस कसे गेले कळल पण नाही... काही कळायच्या आत वर्ष संपल सुद्धा.. आणि मला पण आत्ताच आठवलं......आत्ता कॅलंडर पाहील तेव्हा लक्षात आल 1 वर्ष पूर्ण होईल उद्या! आणि हीच तर आपल्या नात्यातली जादू आहे..तुझी जादू.. "

"जादू तर आहेच...आणि तू आहेस माझ्यासाठी जादुगार.. जादूची छडी फिरवलीस आणि माझा संपूर्ण आयुष्य चेंज झालं.. तू इतका बिझी असतोस तरी माझ्यासाठी वेळ काढतोस..." रितू म्हणाली..

"म्हणजे काय? मी डॉक्टर आहे म्हणून बायकोला वेळ देणार नाही अस कस करेन? वचन दिलय तुला...”

“वचन? तू मला वचन कधी दिलस? मला नाही आठवत!” रितू विचार करत बोलली..

“हो का? तू विसरलीस... पण मी नाही ह.." जय थोडा सिरिअस होऊन बोलला

"नाही आठवत रे.. सांग कधी!!"

"ह.. म्हणजे लग्न शास्त्रोक्त पद्धतीने केले तुझ्यासाठी.. सगळ तुझ्यासाठी आणि तूच विसरलीस.." जय बोलला... रितू ने जीभ चावली..

"सॉरी.."

"लग्नाच्या वेळी सप्तपदी केलेली की आपण... तेव्हा मी तुला वचन दिलेलं... एक नाही सात वचन!!! तुझा मित्र बनून राहीन आयुष्याभर.. तुझ्या सुख दुखात तुझ्याबरोबर असेन.. मी काय टाइमपास म्हणून धार्मिक पद्धतीनी लग्न नव्हत केल! मुद्दामूनच प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतलेला!” जय रितू च्या खाद्यावर हात ठेवत बोलला..रितू त्याच्याकडे पाहून हसली..

“तुझ्या लक्षात आहेत सात वचन? तू भारी आहेस जय..”

“म्हणजे काय ग रितू!! मी सगळ नीट लक्ष देऊन ऐकल होत! मला धार्मिक पद्धतीनी लग्न करण्यात काही इंटरेस्ट न्हवता पण तुझा हट्ट म्हणून तुला हव तस लग्न अगदी मनापासून केल... मला फक्त लग्न रजिस्टर केल असत तरी पुरेस होतं.. पण तुझी हौस.. आणि तुझ्या इच्छे विरुद्ध काहीच नाही... सो लग्न मनापासून केल. सगळे विधी मनापासून केले आणि प्रत्येक गोष्ट समजून घेतली! मी कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक करतो,यु नो!”

“मला नव्हत माहित... तू लग्न पण लक्षपूर्वक केलेलस! हे गुड आहे एकदम!! मी आपल्या लग्नात फक्त तुझी होऊन लग्न केलेलं.. बाकी कशाकडेच लक्ष दिलं नव्हत.. ” थोड ऑकवर्ड होऊन रितू बोलली. पण जय ने तिला दोलाय्ने नकार दर्शवला.. मग रितू च्या चेहऱ्यावर हसू आले..

“इतक काय रितू... माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस हे कदाचित तुला माहिती नाही... तू हसल्यावर खूप गोड दिसतेस... अशीच हसत राहा नेहमी!! तुझ्या या हास्यासाठी मी काही करू शकतो! खरच!! बाय द वे,तू खरच खुश आहेस ना?”

“ओह.. थॅंक्यू जय! हो मी खूप खुश आहे! तुझ्यासारखा इतका समजूतदार हुशार नवरा मिळालय मला मग खुश असणारच ना? तू मला जपतोस.. अगदी फुलासारखा!!! मला आयुष्याकडून अजून काहीही नको...”

“गुड गुड..आता सांग,लग्नाच्या वाढदिवसाला काय करायचं? तुला काय गिफ्ट हव आहे नवऱ्याकडून!!! काहीही माग.. तुला हव ते माग!! आणि मी सुट्टी सांगतो फोन करून! तू ठरव काय करायचं...” जय म्हणाला..

“तू सुट्टी नको काढूस जय... तुझी गरज सगळ्यांना आहे...तू आलास कि आपण घरीच साजरा करू लग्नाचा वाढदिवस!”

“ठीके... संध्याकाळी तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे... ओके? आता मी जातो हॉस्पिटल ला... भेटूच संध्याकाळी... तुला काय गिफ्ट हवय ते नक्की सांग! मी वाट पाहतोय!” इतक बोलून जय निघाला...

क्रमशः...