परदेशात आल्यामुळे गौरवीला तिचा जॉब मात्र सोडावा लागला. इकडे आल्यानंतर विवेकने तिला कुठेच बाहेर नेलं नाही. जवळ जवळ 2 महिने उलटून गेले होते, घरात बसून ती ही कंटाळली होती....
म्हणून एक दिवस ती बाहेर पडली. पण अनोळखी देश, अनोळखी लोक, आणि अनोळखी शहर तिला कुठे जायचे काहीच सुचत नव्हतं. असच चालत चालत ती एका मंदिरापर्यंत पोचली. तिला फार आनंद झाला, काही नाही तर देव आणि मंदिर तर ओळखीचं भेटलं. ती रोज काम आवरलं की रिकाम्या वेळात तिथे जाऊ लागली. हळूहळू तिची तिथे येणाऱ्या काही लोकांशी ओळखी झाली. आणि आता ती ही खुलली. पण तिने विवेकला यातलं काहीच सांगितलं नव्हतं ( ती घराच्या बाहेर पडते आणि मंदिरात जाते असं.) कारण विवेक देव जास्त मानत नव्हता, आपण सांगितलं तर उगाच चिढेल आपल्यावर अस वाटलं तिला. दोघांमध्ये जास्त संभाषण होतच नसे खूप काम आहे, ऑफिस नवीन आहे अश्या थापा मारून तो रोज त्याची गर्लफ्रेंड आयशा बरोबर वेळ घालवायचा. आणि बरेचदा ड्रिंक करून घरी यायचा. अवघे 4 महिने झाले असतील इकडे येऊन आता विवेकने गौरवीवर अत्याचार करणं सुरू केल होतं, रोज ड्रिंक करून यायचा आणि नशेत तिला घालून पाडून बोलायचा , बाहेर काही झालं त्याचा संपूर्ण राग तिच्यावर काढायचा, तिच्या अंगाला ओरबडायचा, तिचे लचके तोडायचा. विवेकने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता. कारण त्याच्या गर्लफ्रेंडनी म्हणजेच आयशाने त्याला सोडून दिलं होतं आणि त्याच कारण गौरवी आहे असं त्याला वाटत होतं. म्हणून तो तिला त्रास देत होता. पण तिला कुठे हे माहिती होतं.
सुरुवातीला तिला वाटलं अति कामामुळे तो वैतागला असावा, म्हणून असा वागत असेल, त्यात घरचे पण जवळ नाहीत म्हणून चिडचिड होत असावी आपणतरी समजून घ्यावं त्याला असा विचार करत तिने खूप सहन केलं, तिने त्याला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच वागण्यात काहीच फरक पडत नव्हता उलट दिवसेंदिवस ते वाढतच होतं. ती देखील वैतागली होती आता, तो शुद्धीवर आला की तिची माफी मागायचा आणि ती ही मोठ्या अंतःकरणने त्याला माफ करायची पण पुन्हा रात्री तेच सगळं घडायचं. तींने त्याला बराच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की नोकरीवर ताण वाढत असेल तर सोडून दे आपण परत जाऊयात आपल्या लोकांमध्ये. तिकडे नक्कीच चांगली नोकरी मिळेल तुला आणि मलाही. पण तो मात्र ऐकत नव्हता. त्याला वाटायचं आज ना उद्या आयशा त्याचा जवळ परत येईल आणि तो रोज तिला आपल्या आयुष्यात परत आणान्याचा प्रयत्न करायचा पण ती आता त्याच्याशी कुठलाच संवाद करत नव्हती , तिला जे पाहिजे होते ते मिळालं होतं तीच यश आणि ती त्यातच खुश होती, मग्न होती, तिने तर आता नवीन बॉयफ्रेंडही बनवला होता. पण तिच्या अशा वागण्याचा विवेकला त्रास होत होता आणि सहन मात्र गौरवी करत होती. जवळ जवळ आणखी 3 महिने तिने सहन केलं पण त्याला कधीच उलटून काही बोलली नाही.
"आज आपण बोलूयात नेमकं काय चालू आहे त्याच्या मनात जाणून घेऊयात" अस गौरवीनी ठरवलं होतं. विवेक आला नेहमीप्रमाणे ड्रिंक करून आणि अधाष्यासारखा तिला ओरबाडू लागला. गौरवीला हे रोजचच झालेलं. पण तरी आज तिने प्रतिकार केला आणि तो मात्र चवताळला, आणखी धावून गेला तिच्या अंगावर, संयम ठेऊन ती त्याला सांभाळायचा प्रयत्न करत होती पण त्याचा राग मात्र अनावर होत होता. रागारागातच तो तिच्यावर धावून गेला ती त्याच्या हातून निसटली, त्याचा तोल गेला आणि तो पुढच्या नोकदार शोपीसवर जाऊन आदळला. त्याच्या डोक्याला लागलं , खूप रक्त वाहत होतं. गौरवीला काही सुचत नव्हतं काय करावं, विवेकला उचलून घेऊन जाणं तिला जमलं नसतं, तिने त्याच्या डोक्याला पक्की पट्टी बांधली आणि मंदिरात ओळखी झालेल्या जवळच राहणाऱ्या काकांना फोन केला, ते ही लगेच आले आणि त्यांच्या मदतीने तिने त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं. गाडीत बसताना तिने त्याच डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं आणि त्याला कुरवाळत होती, स्वतःलाच दोष देत होती, माझ्या मुळेच झालं असं म्हणून आपलाच हात कपाळावर मारून घेत होती आणि सतत रडत होती, त्याला डोळे उघडण्याची विनवणी करत होती.
विवेकचे डोळे बंद होते पण तो पूर्ण बेशुद्ध झालेला नव्हता, तिची धडपड आणि तगमग तो बघत होता, अनुभवत होता.
10 मिनिटांमध्ये ते हॉस्पिटल मध्ये पोचलेत, तिथे गौरवी डॉक्टरांना अगदी विनवणीच्या सुरात विवेकच्या सलामतीबद्दल बोलत होती. डॉक्टरांनी त्याला ओपरेशन गृहात नेलं, आणि इकडे ही देवापुढे हात जोडून प्रार्थना करत होती. डॉक्टर बाहेर येताच त्यांच्या कडे पळतच गेली आणि त्याच्या तब्येतीबद्दल विचारत होती.
डॉक्टर - आता धोका टळलाय पण अजूनही ते बेशुद्ध आहेत, सकाळ पर्यंत शुद्धीत येतील तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकाल.
गौरवी - ओके डॉक्टर.
आणि पुन्हा देवापुढे जाऊन बसली. कुठल्या तरी विचारात एकटक कुठेतरी बघत भिंतीला डोकं लावून बसली होती.
अशीच पहाट झाली आणि नर्स तिला शोधतच बाहेर आली. तिला मंदिरात बघून धावतच तिच्याकडे गेली. विवेक शुद्धीवर आला होता आणि तिच्याबद्दल विचारत होता.
नर्स - तुमची प्रार्थना ऐकली देवाने, तुमचे मिस्टर शुद्धीवर आले आहेत आणि ते तुम्हाला बोलावत आहेत.
गौरवी -( आनंदाने) खरचं का?
आणि पळतच त्याच्याकडे गेली. पण दाराजवळच थांबली.
------------------------------------------------------------------------