कॉलेज सुरळीत चालू होते , भरपूर लेक्चर मज्जा मस्ती, प्रॅक्टिकल आणि टिंगलटवाळी चालू असायची. त्यात मराठी मंडळाची पहिली बैठक गुरवारी ठेवली होती. पण नेमकी अनुजा ला बाहेर जायचे होते म्हणून ती कॉलेज ला येणार नव्हती मग निनाद आणि प्रीती दोघेच गेले मीटिंग ला...
आधी सगळ्यांची ओळख परेड झाली...मंदार ने स्वत चा परिचय करून देताना प्रीतीने त्याला नीट न्याहाळून घेतले...not bad Anu.....मनोमन अनुजा चा चॉइस सलाम ठोकला... आता मीटिंग मध्ये ग्रुप करण्याचे काम चालू झाले...नेमके निनाद , प्रीती आणि मंदार एक ग्रुप मध्ये होते तर न आलेली मंडळी वेगळ्या ग्रुप मध्ये जाणार होती....निनाद आणि प्रीतीला जाम वाईट वाटले .. जी च्या साठी केला हा आटाहास नेमकी तीच आज नाही..
सगळ्या ग्रुप ना विभागून झाले..प्रत्येक ग्रुप एक टीम लीडर दिला आणि एक एक कामगिरी वाटून देण्यात आली.पुढची मीटिंग १महिन्याने होणार होती . टीम लीडर ने सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन एक व्हॉटसअप ग्रुप बनवला. ग्रुप चा लीडर फर्स्ट इअर आर्ट्स चा विद्यार्थी होता....त्याच्या समोर सगळे नवखे. त्याने छान पैकी गाईड केले आपल्या नव नवीन कार्यक्रम बदल आणि सगळ्यामध्ये थोड्या थोड्या जबाबदारी वाटून दिल्या...
निनाद, मंदार, प्रीती आणि सोनंम ह्यांचा एक ग्रुप बनला...त्यात निनाद आणि मंदार एकमेकाशी ओळख होतीच.मग त्याने प्रीती ची ओळख करून दिली.दोंघानी एक दुसऱ्याला हॅलो केले. पुढच्या आठवड्यात भेटायचे ठरले...मग सगळे मिळून आपली आपली आयडिया घेऊन येणार होते मग त्यातली फायनल आयडिया टीम लीडर पुढे मांडली जाणार होती...
निनाद आणि प्रीती बाहेर निघाले....येवढ्या वेळ गप्प बसलेले निनाद ने लगेच विचारले ...प्रीती कसा वाटला नवीन जिजू....तुला ???
छान आहे...थोडा सीरियस टाईप आहे पण अनुजा ला सूट होईल नाही...?? तुला काय वाटते??
अनुजा अवखळ आहे...माहिती नाही त्याला ही बया किती पटेल ते..माहिती नाही किती सीरियस आहे ती...तुला शाळेत आठवतोय ना..तो..तो पण आवडायचा तिला....पुढे काही झाले नाही....निनाद म्हणाला....
हो ना..खरेच ...विसरलोच त्याला...कुठे असेल काय माहित...ह्या अनुजा ला सांभाळ उगीच कोणी दुखावणार नाही म्हणजे मिळवले....करायला जाईल एक आणि होईल भलतेच...
आता अनुजा ला कळेले ना आपण एका ग्रुप मध्ये आहोत आणि ती वेगळ्या.. तर बघ कशी भांडते आपल्याशी ते ...उगीच आपल्या डोक्याला शॉट...
आणि त्याने बोलल्या प्रमाणे झाले..अनुजा ला कळायचं ती दोघांवर खूप वैतागली...तुम्ही असे कसे करू शकता.मलाच एकटीला असे बाहेर ठेवलेत ..असे बोलली...अनुजा खूप नाराज झाली पण काहीच कोणाच्या हातात नव्हते...पुढच्या मीटिंग ला मात्र सगळ्यांनी मिळून पुन्हा प्रयत्न करून अनुजा ह्या ग्रुप मध्ये घ्यायचे असे म्हटल्यावर ती जरा शांत झाली...
तो आठवडा नंतर शांतेत गेला. अनुजा ही पटले होते की ह्यात ह्या दोंघाची काही चूक नव्हती .. आता पुढ् च्या आठवड्या ची प्रतीक्षा होती. ...
पुढच्या आठवड्यात निनाद ने कॉलेज कॅन्टीन मध्ये भेटायचं मेसेज पाठवला...सगळे कॅन्टीन मध्ये भेटले...थोड्याफार गप्प झाल्या...आपल्या डोक्यातला कल्पना एकमेकांना समोर मांडल्या...त्यातला एक दोन खरेच चांगल्या होत्या...त्या वर थोडे अजून काम करून मग त्या टीम लीडर पुढे मांडायचे ठरले ..परत एक दोन दिवसांनी भेटायचे ठरले...अनुजा मात्र कॅन्टीन मध्ये प्रीती बरोबर बसलेली होती .मंदार ला एवढ्याजवळून पहिल्यांदा बघत होती ....
मंदार ला अनुजा असे सारखे आपल्याला बघते आहे बघून मंदार ला उगीच अवघडल्या सारखे झाले.
प्रीती चा ते लक्षात आले..आणि ती ने अनुजा चा पायावर पाय मारला आणि तिच्या शी काहीतरी बोलली.अनुजा मग थोडी नाराज झाल्यासारखी दिसली. मीटिंग झाली. एक दोन दिवसांनी पुन्हा भेटायचे ठरले.....
त्यानंतर निनाद, प्रीती आणि मंदार चा गाठीभेटी वाढू लागल्या...मंदार ची सगळ्यांशी छान मैत्री झाली होती...पण त्याला कोणास ठावूक अनुजा जवळपास असेल तर बेचैन व्हायला लागायचे. तो अनुजा आली की लगेच तिथून काहीतरी कारण देऊन निघुन जायचा...
बाकी कोणाला काही कळायच्या नाही पण निनाद आणि प्रीतीला जाणवायचे..पण कोणाला समजावणार. अश्या बाबतीत जबरदस्ती थोडी ना करता येते ....!!!!
मंदार ची छान टूनिंग आता प्रीती आणि निनाद बरोबर होती. प्रीती थोडी इंत्रोवर्त होती तिला पटकन मिसळता यायचे नाही कोणा मध्ये पण निनाद मुळे बहुतेक सगळ्यांशी दोस्ती आणि ओळख होती. बरेचदा प्रीती लायब्ररी मध्ये वाचत बसलेली असायची. कधीतरी मंदार तिथे डोकवायचा. प्रीती त्याची चांगली मैत्रीण बनत होती. .निनाद एक चांगला मित्र. मंदारला आतल्या गोट्यात प्रवेश मिळाला होता....