दिवसामाघून दिवस जात होते. गौरवी विवेकच्या आणि तिच्याही आईबाबांची काळजी घेत आपली नोकरी सांभाळत होती तर इकडे विवेक आयशाच्या मागे फिरत होता. कुठलीच भीती नाही, कुणी रोकटोक करणार नाही, म्हणून ते दोघे मस्ती मजा करत होते. पण यात एक चांगलं की विवेक जवळपास रोजच घरी फोन जरूर करायचा. एकदिवस बाबांनी त्याला कधी येतोय म्हणून विचारलं, पण त्याने 'आता नाही जमणार खुप काम आहे' म्हणून टाळलं .
4 महिने तिकडे राहिल्यावर आई बाबांच्या रोजच्या प्रश्नाला कंटाळून त्याने भारतात आई बाबांना भेटायला यायचं ठरवलं. आणखी पुढे 2 महिन्यांतरच तिकीट बुकिंग केलं. तस आई बाबांना सांगितलं .
गौरवी बाहेर गेली होती. ती घरी येताच आईने गौरावीला विवेकच्या येण्याची बातमी सांगितली.
आई - आता तो परत आला की तू सुध्दा त्याच्यासोबत जायचं , तुझं नोकरीच वगैरे बघून घे बदली मिळवता येते का नाहीतर सोडून दे. मला माफ कर मी तुला नोकरी सोडण्याचा सल्ला देतेय नोकरी मिळवताना किती त्रास होतो हे माहिती असून सुद्धा. पण संसारही तेवढाच गरजेचं आहे ना ग गौरवी. तू तिकडे गेल्यावर शोध ना तिकडेच. आणि हो व्हिसाची तयारी ला लाग आणि तिकीट बुकींग पण बघून घे.
गौरवी - आई तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही माफी वगैरे नको मागा अजिबात. आणि हो मी एकदा विवेकशी बोलून निर्णय घेते.
आई - ठीक आहे.
आईने विवेकलाही सांगितलं होतं की "आता तू परत आला की गौरवी ला घेऊनच जाशील." गौरवी त्याच्याशी बोलली तेव्हा त्याने गौरावीला विचारलं
विवेक - तुझा काय निर्णय आहे?तू नोकरी सोडून येणार आहेस का माझ्याबरोबर?
गौरवी - हो म्हणजे तस आता सगळेच मला म्हणताहेत. आणि खर तर आता मला पण तुझ्यासोबतच राहायचं आहे.
विवेकला गौरवीच उत्तर ऐकून थोडं टेन्शन आलं होतं की हिला इकडे आणल्यावर आयशा कशी रिऍक्ट करेल. आणि हिला जर आयशाबद्दल कळलं तर ती सगळ्यांना सांगून देईल. पण आणलं नाही आता तर आईचे बोलणे ऐकावे लागतील आणि सगळेच रागावतील.
विवेक - ठीक आहे लाग मग तयारीला. 2 महिने आहेत.
गौरवी - विवेक खरंच, हो मी करते लगेच सगळं.
2 महिन्यांनी विवेक आला. गौरवीची सगळं व्यवस्थित करून ठेवला होतं आणि सगळ्यांना खूप छान सांभाळलं होतं. विवेकने घरी आल्यावर आणखी प्रयत्न केलेत गौरावीला टाळण्याचे पण त्याच्या आईच्या हट्टापुढे यावेळी त्याच काहीच चाललं नाही आणि नाईलाजाने त्याला गौरावीला त्याच्यासोबत न्यावच लागलं.
दोघांना सोडायला दोघांच्या पण घरचे आले होते यावेळी एअरपोर्ट वर आणि गौरावीला पाठवताना गौरवीचे आई वडील तसेच सासू सासरे ही हळवे झाले होते. गौरविलाही त्यांना अस सोडून जाताना खूप भरून आलं होतं. पण तिने स्वतःला सावरत लगेच आपल्या सेन्स ऑफ ह्युमर ने सगळ्यांना हसवले आणि हसतच विवेक आणि गौरवीने सगळ्यांचा निरोप घेतला.
विमानात बसण्याचा पहिलाच अनुभव असल्याने गौरवी जर घाबरली होती. विमान उडू लागताच तिच्या पोटात गोळा आला आणि तिने गच्च डोळे मिटून, विवेकच्या हात घट्ट पकडला. विवेकला तिच्या अशा वागण्याचं फार हसू येत होतं. त्याने तिला अडवलं नाही पण जेव्हा विमान स्टेबल झालं. तेव्हा हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हंटल.
विवेक - तू मला 9 तास असच पकडून बसणार आहे का?
तस तिनी डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. आणि लाजून खिडीत बघू लागली. खालची सुंदर धरती बघण्यात ती मस्त रमली होती. नंतर समुद्र आणि अचानक सूर्य मावळला आणि अंधार पडला तिला काय होतंय कळलंच नाही. तिने विवेक कडे बघितलं तर तो झोपला होता. थोडावेळ मूवी बघत बघत तिलाही झोप लागली. प्रवास कधी संपला कळलंच नाही.
दोघही घरी आलेत. घरी पोचल्यावर त्यांनी घरच्यांना पोचल्याच कळवलं. त्या दिवशी दोघांनी घरीच आराम केला आणि दुसऱ्या दिवशीपासून विवेक कामावर रुजू झाला. तिकडूनच तो आयशकडे गेला आणि तिला गौरावीला इकडे सोबत आणल्याचं सांगितलं. आयशा आधी थोडी चिढली. पण थोडावेळानी विवेकच्या समजवन्यानी शांत झाली.
आता काय करायचं असा विचार करत होते दोघही.
विवेक - आयशा आपल्याला आता आधीसारखं तुला सगळा वेळ देता येणार नाही अग. कारण गौरावीला समजायला नको नाहीतर ती सगळ्यांना सांगेल.
आयशा - हो खरच आहे, आपण अस करूयात तू फक्त झोपायला घरी जात जा फार फार तर जेवायला. रोज लवकर निघत जा आणि रात्री उशीरा पर्यंत घरी जा, सुटीही घेऊ नकोस शनिवार रविवार मित्रांकडे जातोय अस सांगून तिला टाळून घरातून निघून जात जा आणि माझ्याकडे ये. तिला कुठेच घराबाहेर घेऊन जाऊ नको, नोकरी करणारी आहे ती अस घरात बसून बसून कंटाळले की स्वतःच म्हणेल मी परत जाते म्हणून. कसा वाटला प्लॅन.
विवेक - आणि ती नाही म्हंटली किंवा नाही गेली तर?
आयेशा - बघुयात पुढचं पुढे पण आता असाच करू दुसरा काही पर्याय नाहीय.
विवेक - हम्म, बर चल मी येतो मग आता. भेटू उद्या
आयशाला बाय करून विवेक घरी येतो, गौरवी त्याचीच वाट बघत असते. जेवण बनवून त्याची वाट बघत असते. पण मी आलोय जेवण करून म्हणून फ्रेश व्हायला निघून जातो. आणि बाहेर येतच नाही. थोडावेळानी गौरवी त्याला बघायला जाते तर तो झोपलेला असतो. तिला खूप वाईट वाटतं. तीही सगळं जेवण फ्रिज मध्ये घालून तशीच झोपी जाते.
सकाळी उठून नाश्ता बनवते, तो ही जायचं म्हणून आवरून येतो नाश्ता करतो आणि निघून जातो. जेवण तिकडेच करेल म्हणून सांगून जातो. ती पण मग तीच आवरून घेते.
सुरुवातीला त्याच अस तुटक वागन्याच तिला वाईट वाटत पण नंतर तिला सवय होऊन जाते त्याच्या अश्या वागण्याची. असेच दिवस जात असतात. विवेक तिला वेळ देत नाही तिच्याशी मनमोकळं बोलतही नाही, अगदी कामपुरातच बोलायचं. तिला नोकरी पण करायची नाही असं विवेक सांगतो.