💕 तिचं Heartbeat...(भाग3)💕
सुगंधा आज अनंत आल्यावर त्याला रागावणार होती.....तस पक्क ठरवलं होतं तिने......कारण इतके वर्षांत कधी असं घडलं नव्हतं......लग्नाला तिच्या आता जवळपास 7 वर्षं झाली होती.....…B.com झाल्याबरोबर लग्न झाले होते... तिच्या नवऱ्याने पुढे शिकवलं....नोकरीला लावलं.....मग मुलं झाली....हळूहळू ती घर आणि कॉलेज यात गुरफटून गेली.....त्यामुळे माहेरी जाणं-येणं नाही किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरणं कधी झालंच नाही.….....त्यातच स्वतः ला कधी स्वतः च्या नजरेने पाहिलं नाही.......फक्त नवरा सांगेल ते करायचं....तो सांगेल तसच जगायचं....हेच तीच समीकरण होतं..... सारखा तिच्या डोक्यात एकच विचार येत होता तो म्हणजे अनंतने तिच्याकडे असं का पाहिलं?.......सुगंधाला तिचा six सेन्स काही वेगळंच सांगत होता......पण तिला या सगळ्यात पडायचं नव्हतं....तिला तीच घर जास्त महत्त्वाचं होतं..... आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्या नवऱ्याला तिने कोणाशी बोललेलं चालायचं नाही.....अगदी दूध घेताना दुधवाल्याशी ही नाही.....त्यामुळे तो तिला बाहेरचे काम नाही करू द्यायचा.......पण तो मनानं फार चांगला होता....घरकामात तिला मदत करायचा....मुलांनाही कधी सांभाळायचा.....फक्त स्वभाव त्याचा सुगंधा बाबत जरा doubty होता....कारणही तसंच होत.....सुगंधा दिसायला त्याच्यापेक्षा सुंदर होती....अशी बायको मिळणं मिळणं भाग्यच!.....असे त्याचे मित्र म्हणायचे.....म्हणून त्याला काळजी जास्त होती....त्याच्या जागी तो बरोबर होता.....फक्त त्याचं प्रेम तिच्यासाठी आता नजरकैद बनून चाललं होतं.... हे त्याला कळतं नव्हतं....पण सुगंधा मात्र त्याच्या इच्छेनुसार वागायची....तो जे म्हणेल तसच करायची .....कारण तिला विश्वास होता की एक दिवस हे सगळं बदलेल........तिला तो तिच्या मनासारखं वागू देईल.....तिला काय हवं होतं?....सगळं तर होतं तिच्याकडे!.....नव्हतं ती फक्त एक चांगली मैत्रीण...... जिला ती सगळं सांगू शकेल!.....पण काय माहित, तिच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार आहे ते!.....
दुसरा दिवस उजाडला..... सुगंधा कॉलेजला पोहोचली.....lecture वगैरे आटपून स्टाफरूम मध्येबसली होती....तेवढ्यात अनंत आला.....
"मॅम, मला हे कळलं नाही,जरा सांगाल,आणि जरा pointout पण करा ना plzz, म्हणजे मी ते लिहून काढेल....."सुगंधाने त्याला समजवल,कसं लिहायचं आहे ते....आणि म्हणाली," हा topic जरा net वर शोध,मग मी सांगेन,नाहीतर मला search करून पाठव,मग मी सांगेन,कसं लिहायचं ते!..."
"ok मॅम, मग नंबर द्या तुमचा!....."
"हो,पण personal मेसेज नको....."
"हो,ok मॅम, मला link मिळाली की send करतो तुम्हाला...."
अस म्हणत,त्यानं पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं......दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली.......तिने लगेच नजर फिरवली आणि म्हणाली,"तुझं हे काय चाललंय?..."
"हे बघ,मला हे आवडत नाही, मी......एक कानाखाली देऊन तुला हे समजवू शकते...but मला अशा प्रकारे समजवणं आवडत नाही... आपण माणसं आहोत...जनावरं नाही सारखं मारायला.....समज.....concentrate कर,अभ्यास कर,यशस्वी हो....."अनंतने मान हलवली......
अनंत घरी गेला....अरे पण मॅम ला ते पान द्यायचं राहूनच गेलं........असू दे..... ते प्रोजेक्टच्या subject बद्द्ल लिंक शोधायची होती..…..तो शोधतो....आणि पाठवतो....
"hiii mam"
"www.******.com"
मला नोट्स पाठवा..…
तेव्हा रात्रीचे 10 वाजलेले असतात.....अनंतला काहीतरी सुचत तो लिहतो..........
" शायद गहरे राज छुपे है,
तुम्हारी इन नशैली आखों में,,
मार ना युं मुझे तुम,
तेरी अनकही बातो में,,💕
सिमटना चाहता हूं,
तेरे हर आंसू को अपने दिल में,
कही खफा ना हो जाना,
मेरे इस प्यारभरी गुस्ताखी से,,💕
दिल बस तुझे बेइम्तहा हैं चाहता,
और कुछ नहीं,,
तू चाहे न चाहे मुझे,
तेरा इंतजार रहेगा और कुछ नहीं,,,💕
.अनंतसाठी 10 ला रात्र सुरू होते.. पण सुगंधासाठी रात्रीचे 10म्हणजे निम्मी रात्र..... त्यात तिला unknown no. वरून आलेला एक मेसेज तिच्या जीवनात किती मोठं वादळं आणू शकतो...याची अनंतला तिळमात्र कल्पनाही नसते......
त्यात नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याने तिचा मोबाईल चेक करायला सुरुवात केली...... पाहिलं....unknown नो.वरून मेसेज........त्याने साधं तिला विचारल पण नाही.....
मेसेज टाईप केला.. ."hiii
तिकडून..... hiii
" link पाठवली आहे,नोट्स पाठवा,"
" जेवलात?....."
.........हो,तू काय जेवलास?...
..........तुमच्या book मधून एक पेज पडलंय, त्यावरची poem छान आहे ,बरं......
.........हो,का....तुला आवडली .....धन्यवाद.....
......तुम्ही उद्या या..….मलाही तुम्हाला एक poem ऐकवायची आहे....चालेल ना😊....
.......हो,नक्कीच......👍
........आता मग by, tc....
........by.......
हे सगळे मेसेज तिच्या नवऱ्याने केलेले असतात....जे तिलाही माहीत नसतं आणि अनंतलाही.......
दोघेही अनभिज्ञ असतात यापासून......... त्याला वाटतं मॅम हे सगळं बोलल्या आणि तिला काहीच कल्पना नसते याबद्दल.......
हे सगळं घडतं तेव्हा ती तर तिच्या किचनमध्ये busy असते....तिची काय चूक?..…....मेसेज याने केले....उलटसुलट हाच बोलला.....तीने तर आजच अनंतला सुनावलं होतं ना!....पण समोरच्याचा रिप्लाय बघून आपण रिप्लाय देतो ना!....मग यात अनंताची तर काय चूक?......त्याला वाटलं मॅम बोलताहेत म्हणून बोलला तो!......
तीच काम आटोपून सुगंधा किचनमधून आली,मुलांना झोपवलं....मग तिचा नवरा तिच्याकडे रागावतो.... डोळे लालबुंद.... आग ओकत असतात त्याचे.....
" सुगंधा,हा कोणाचा no. आहे?....."
"कोणता?....मला नाही माहीत!....."(तिने save केलेला नसतो,तिच्या लक्षात येते नाही ,चटकन.....)
तिचा नवरा खाडकन एक कानाखाली मारतो....
डोकं एकदम सुन्न होते तिचे...... काही कळत नाही.....
"मग त्याने तुला जेवलास का?...कसं विचारलं......सांग ना....कॉलेजला तू शिकवायला जातेस की हे चाळे करायला?....लाज वाटत नाही का तुला?...."
परत 2,3 कानाखाली ठेवून देतो.....तिला काही कळतच नाही,ती फक्त विचार करते की तिने कोणाला नंबर दिला....
मग आठवत......अरे सकाळी अनंतला नंबर दिला होता....
तोपर्यंत तो truecaller ला नंबर चेक करतो......
"हा अनंत कोण?....."
"student आहे......"
"फक्त student की आणखी कोण?.....कोणती poem लिहून दिली आहे त्याच्यावर?......हल्ली शायर झाल्यात का मॅम!......इतक्या वर्षात माझ्यावर कोणती poem केली नाहीस ती?......लाज वाटतं नाही का तुला ही थेरं करताना?....."
"अहो,पण मी काहीच केलं नाही,तो फक्त student आहे,प्रोजेक्टच्या संदर्भातली link पाठवली आहे,त्याला notes हव्या आहेत...."
"मग तू त्याच्यवर कोणती कविता लिहली आहे?...."
"मी असं काही लिहलं नाही,खरंच!...."
"खोटं, बोलू नको,मला माहित आहे, काहितरी आहे तुझं आणि त्याचं......हल्ली जास्तच छान छान कपडे घालून मिरवायला लागली आहेस!....लाज वाटू दे थोडी.....दोन मुलं आहेत,तुला!....हे सगळं करायचं असेल तर चालती हो,माझ्या घरातून!....."
"अहो,असं काही नाही,खरं"
"बघतो मीच,उद्या फोन माझ्याकडे राहील,बघतो काय काय करते तू?...."
इतकं सगळं बोलून तो बेडवर पलीकडे डोकं करून झोपला.....तिला काही केल्या झोप लागत नव्हती.....अनंतला सांगितले होते मेसेज करू नको....का केला असेल मेसेज त्याने?.....मला उगीचच 4,5 कानाखाली खाव्या लागल्या........पूर्ण डोकं सुन्न झालंय....... माझी काय चूक त्यात?......मी कोणती कविता केली?......तीही त्याच्यावर!......अनंत असं खोटं का बोलला?......काही काही कळत नव्हतं.......डोकं खूप बधिर झालं होतं...... ती झोपण्याचा प्रयत्न करत होती.......पण डोक्यात विचारांनी कल्लोळ माजवला होता.....झोप कशी लागणार?........चेहराही फार दुखत होता.........हातांचे ठसे गालावर उमटले होते.......त्यात महत्त्वाचे काम असल्याने उद्या कॉलेजमध्ये जावे तर लागणारच!.......कसं जायचं?....कोणी विचारलं तर काय सांगायचं?.....हे सगळे प्रश्न तिला झोपू देत नव्हते...........
💕 "पता नहीं अब कल क्या होगा,
ये नसिब का मजाक,
हमें क्या कयामत तक ले जाईगा?...💕
क्रमशः
(ही कथा पूर्णता काल्पनिक आहे,त्यामुळे तिचा कोणाशीच संबंध नाही, जर कोणाशी चुकून निघाला तर हा केवळ निव्वळ योगायोग समजावा)
.....Heartsaver.....