एक वेगळी प्रेम कथा मी आज इथे लिहत आहे,कशी वाटली नक्की कळवा....
💕 .... तिचं Heartbeat......💕
"हे बघ अनु,आपल्याला दोघांना आता वेगळं व्हायला हवं मनानं!....आपली मन एकमेकांत फार अडकली आहेत,मान्य आहे मला!......पण आपली मैत्री,आपलं प्रेम समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे........ कदाचित कोणीही ते समजू शकणार नाही.....निस्वार्थी प्रेम असू शकते, हे या जगाला मान्य नाही,ते फक्त शारीरिक प्रेम पाहू शकतात आणि किंबहुना त्यांना सवय आहे ते पाहण्याची.......आपल्याला हे बदलायचं आहे.......मानसिक बंध हे शरीरापेक्षा अधिक ओढीने एकमेकांना बांधून ठेवू शकतात,हे यांना दाखवायचं......प्रेम म्हटलं की,.पुन्हा एकदा सगळ्यांना राधा-कृष्ण आठवायला हवे......असं काहीतरी करायचंय......."सुगंधा आपल्या अनंतला सांगत होती......पत्रातून........डोळे भरले होते त्याचे,काही सुचत नव्हते............
पत्र वाचत वाचत अनंत फ्लॅशबॅक मध्ये जातो...........त्याला आठवत.........
मी अनंत......s.y.चा विद्यार्थी...... अत्यंत हुशार..... घरची परिस्थिती चांगली..... डॉक्टर व्हायचं होतं पण....... वडील वयाच्या 10व्या वर्षी गेल्यामुळे बिझनेस सांभाळायला लागणार होता त्यासाठी मग आताB.com करायचे ठरले.... मुळातच सगळा इंटरेस्ट science मध्ये होता .........पण आईच्या सांगण्यामुळे कॉमर्स line निवडावी लागली......म्हणून timepass म्हणून मी B.com complete करत होतो.....
असा मी आपल्या स्टोरीचा हिरो बरं का!.....टाईमपास म्हटलं की वायफळ बाईकवरून फिरणं,टिंगलटवाळी करणं,late night party ला जाणं, सगळं सगळं करायचो....gf किती असतील मला,मलाच ठाऊक नसेल.......पैसा भरपुर होता पण शांतता माहीत नव्हती मला..…....प्रेम काय असतं, हे मला माहीतच नव्हतं......माझ्या आयुष्यात कधी ते येईल असं मला वाटलही नाही.........पण माझं आयुष्य बदलणार होते कुणाच्यातरी येण्याने........मला त्याची चाहूल सुद्धा नव्हती........
सुगंधा......एक इकॉनॉमिक्स teacher, माझ्याच कॉलेज मध्ये शिकवायची.....सुसंस्कृत गृहिणी......नवरा,दोन मुलं असं सुंदर, सुरेख चौकोनी कुटुंब....... कॉलेज आणि घर हेच तिचं आयुष्य..... कुठं जाणं नाही की येणं नाही...…...मित्र,मैत्रीणी कुणीही नव्हतं तिच्या आयुष्यात...... किंबहुना कोणाशी बोलण्याची तिला परवानगी नव्हती...... तिच्या नवऱ्याला तिने कोणाशी बोललेलं आवडायचं नाही....
तिलाही आता याची सवय झाली होती....... कॉलेजमध्ये सुद्धा एखाद्या दुसऱ्या सहकाऱ्यांशी बोलणं होतं असेल तिचं..... जास्तीत जास्त एक छोटी smile..... ना खळखळून हसणं, ना मनमोकळं बोलणं.....असं तीच आयुष्य...…..
तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती.........पण ते येणार होत,लवकरच!.......
एक दिवस eco चं lecture चालू होतं.....सुगंधा मॅम शिकवत होत्या......तेवढ्यात अनंतचा फोन वाजतो.....(साकी साकी रे,साकी साकी....आ पास आ.. रह ना जाये कोई ख्वाहिश् बाकी........)अनंत फोन कट करतो.......
."फोन allow नाही ,माहीत नाही का?...useless fellow!......get out from my class!......." सुगंधा मॅम अनंतला रागवतात.......
" मॅम sorry चुकून झालं,next time नाही होणार!...." अनंत...
" I said,get out!......"सुगंधा....अनंत रागाने books आपटून निघून जातो......
" ही मॅम स्वतः ला काय समजते,काय माहीत?...."
स्वतःशीच बडबडतो.......
पंकज त्याचा मित्र त्याला समजवतो,
"chill मार यार, जाऊ दे,हे घे,cooldrink पी!.".....
" आज रिझल्ट आहे,माहीत आहे ना?...पंकज अनंतला म्हणाला.....
."माहीत आहे यार!......म्हणून तर भीती वाटते...eco सुटला पाहिजे, नाहीतर त्या बाईचे बोलणे ऐकावे लागेल.....ती प्रोजेक्ट देते यार खूप,मग खूप bore होतं..........!"
result लागला जे व्हायचं तेच झालं,अनंतचा eco लटकला....... आता सामना करावा लागणार.....
fail झालेल्या student ला केबिन मध्ये बोलावून प्रोजेक्ट देण्यात आले.......ओरडा पण बसला.......next time पालकांना बोलावलं जाईल असे सांगितले गेले.......
सगळे जाऊन आले,आता अनंतचा नंबर आला.....
"तू हुशार आहेस,मग अभ्यास का नाही करत?.....हा विषय घेऊन प्रोजेक्ट कर,नीट अभ्यास कर,नक्की पास होशील......"सुगंधा मॅम अनंतला सांगत होत्या......
.पण अनंत तर त्यांच्याकडे पाहतच राहिला......एरव्ही सतत रागवणाऱ्या मॅम चांगलेही बोलू शकतात, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता........
त्यात सुगंधाने आज cream कलरची साडी घातली होती,नेहमीसारखेच क्लचरने केस थोडे बांधले,थोडे मोकळे होते...........एक लटकत कानातलं heart shape चं....... हातात दोन चार हिरव्या बांगड्या आणि एका हातात मनगटी घड्याळ.......साधस तिचं राहणं.... ...मानेवर रूळणारे ते केस पाहून तो तिच्यातच हरवून गेला.....
रोज त्याच दिसणाऱ्या मॅम आज काहितरी वेगळ्या भासत होत्या......त्यांचं बोलणं आज त्याला टोचत नव्हतं.......आज त्यांचं ते देखणं रूप आज त्यानं पाहिलं होतं...........
"excuse me!.....अनंत.....where r u?..."
अनंत भानावर आला......"अ... हो,yes mam, नक्की करतो.....thank you......." म्हणून तो तिथून निघाला खरा.....पण त्याला तो चेहरा डोळ्यासमोरून जाईना......
💕....सौ.प्रिया मनोज....💕
(अजून यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, ते आपण लवकरच पाहू ,पुढच्या भागात,पुढचा भाग लवकरच प्रकाशित करेन,तोपर्यंत कथा कशी वाटली नक्की कळवा)