Live in Part - 15 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | लिव इन भाग - 15

Featured Books
Categories
Share

लिव इन भाग - 15

अमन पोटभर जेवल्यानंतर त्याच्या रूम मधे आला ....कपडे बदलून ....तो आराम करत होता ... ऐत्क्यात त्याचे बाबा घरी आले . अमन ला घरात बघून, त्यानी बडबड करयला सुरवात केली .अमन ला ते सगळ सहन होईना .पण आई च्या सांगण्यावरून त्यानी बाबांची माफी मागितली . आणि जे काही घडले ते सगळे बाबांना संगितले . त्याच बोलण ऐकून बाबांना ही खूप वाईट वाटले .शिवाय, अमन त्याची माफी मागत च होता ....त्यामुळे, बाबांनी त्याच्या कडून काही वचन घेतले, आणि त्याला माफ केले . बाबांनी माफ केल्यावर अमन खूप खुश जाहला. आता अमन च घर पुन्हा हसू खेळू, बागडू लागले . आता अमन ला घरी आलेले दोन आठवडे जाहाले . आता जॉब च कहितरि बघितले पहिजे ...अस, म्हणून अमन नी जॉब बघायला सुरवात केली .जॉब मिळे पर्यंत तो छोटी मोठी कामे करतच होता . दोन महिने उलटून गेले, होते ...तरीही अमन ला पहिजे असा जॉब मिळत नव्हता . त्याची जॉब साठी चालणारी गडबड त्याचे आई वडील रोज पाहत होते . त्याने अशी छोटी मोठी कामे केलेली त्यांना अजिबात आवडत नव्हती . हीच कामे करायची होती, तर .....एवढे शिक्षण घेऊन काय उपयोग? अमनच्या आई वडिलांचे ह्या गोष्टीवर सारखे बोलणे होत असे . पण, ते ही काहीच करू शकत नव्हते . एक दिवशी अमन खूप निराश, हताश असा घरी आला . त्यचा चेहरा खूप उतरलेला होता ....त्याला कोणताच मार्ग सापडत नव्हता .त्याला काय करावे, काहीच कळत नव्हते . खूप प्रयत्न करून ही त्याच्या हातांत फक्त अपयशच येत होते . त्याच अपयशाचे त्याला आता टेन्शन आले होते .आपल्यावर ही वेळ येईल, अस अमन ला कधीच वाटले नव्हते. अस, अपयश घेऊन त्याला कधीच जगायचे नव्हते . त्याला अयुषत यशस्वी व्हायचे ...... पण आता तो अपयशाचा पाढा वाचत होता .अमन असा हताश होऊन बसला होता, तेव्हा त्याची आई तिथे आली . तिने अमनच्या डोक्यावरून हात फिरवला . मग, अमन ला रडू आल . आई ने त्याला समजावले., अमन, अस रडू नको ....जे जाहले, ते जाहले...... चल मला तुझी मदत हवी, चल उठ मला कामात मदत कर .... अमन उठला .....आणि आई मदत करयला त्याने सुरवात कर . अमन ची आई घरोघरी जेवणाचे डब्बे पौह्च्व्त असे ....आज खूप डब्बे बनवून पौह्चवचे होते . म्हणून अमनच्या आई ने अमन ला मदततिला बोलवले होते . अमन ने सगळे डब्बे पौह्च्व्ले ... घरी आल्यावर आई ने त्याला शंभर रुपए दिले .अमन ने ही ते घेतले .त्याला खूप मज्जा वाटली .लहानपाणि सूध्हा त्यांची आई, डब्बे पौह्च्व्ले की, त्यांना खाऊ ला पैसे दयची .....आणि आज ऐत्क्या दिवसानी तिने पुन्हा तसेच केले . आपण कितीही पैसे कमावले, तरी आई वडिलांनी दिलेल्या पैशाची किंमत काही वेगळीच असते .
मग, रोज हळु हळु असेच होऊ लागले ...अमन आई चे जेवणाचे डब्बे रोज पोह्च्वू लागला .....हळु हळु बाजारातून भाजी आणून देणे ....आई ला जेवणात मदत करणे. ह्या गोष्टी ही करू लागल्या . ह्या मुळे जाहाले असे, की अमन वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकला .तो रोज नवीन पदार्थ बनवून डब्बयातुन पाठवू देऊ लागला ...त्यामुळे त्याच्या कडून डब्बे बनवून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली . हळु हळु त्याला केटरिंग च्या ऑर्डर मिळू लागल्या ....आता त्याच्या हाता खाली चार पाच माणसे काम करू लागली . तो आता खूप प्रसिध्द जाहला होता .जो तो त्याच्याकडून च डब्बे घेत होता ....आणि त्यालाच केटरिंग च्या ऑर्डर देत होता ...आता अमन ने एक हॉटेल सुरू करायचे ठरवले होते .त्या सठि थोड्या पैशांची गरज होती ...अमन ने बँकेतून लोन कढले .आणि हॉटेल सुरू केले ....आता अमन च्या हाता खाली पंचवी स माणसे काम करत होती .जो अमन नोकरी सठि दारोदार भटकत होता .त्याच्या हाताखाली आता पंचवीस माणसे होती .आता अमन फक्त यशाची एक एक पायरी चढत होता .ते ही फक्त दोन वर्षात .त्यच्या ह्या यशामुळे घरातील सगळे च खूप खुश होते .
आता त्याच्या आई वडिलांना त्याच्या लग्नाची चिंता सतवू लागली .एखादी चांगली मुलगी बघून अमन चे दोनाचे चार हात केले, म्हणजे आपण तीर्थयात्रेला जायला मोकळे ...अस त्यांना वाटू लागले .पण, अमन जवळ हा विषय काढणार कोण? कारण ...मागच्या वेळी चा गोंधळ सगळ्यांनाच माहीत होता .आणि अमन त्या रावीच्या धक्यातून सावरला की नाही, हे कोणालाच माहीत नव्हते . शिवाय, घरात एक दोन वेळा लग्नाचा विषय निघाला ,तेव्हा अमन चा मूड जायाचा. तेव्हा हा लग्नाचा विषय अमन जवळ कोण काढणार? ह्याच अमन च्या आई वडिलांना टेन्शन आल होत .
ईकडे अमन च हॉटेल जबरदस्त चालले होते .पैशाला पैसा लागत होता . सगळ मनासारखे होत होते .अमन ही खूप खुश होता .आपल्या घरात आपल्या लग्नाचा विषय चालला होता . पण, आधी झलेल्या प्रकारामुळे आपल्या समोर सगळे तो विषय काढयला घाबरतात. हे अमन ला समजत होते . आपल लग्न व्हावे, घरात सून यावी, तिने प्रेमाने सगळ्याच करावे ..... घरात पाळणा हलावा ...अस सगळ्यांना वाटत होते ...पण ....अमन ने ठरवल, की तो च घरात त्याच्या लग्नाचा विषय काढणार .
अमन संध्याकाळी दमून भागून घरी आला . आई वडिलांचे कोणत्यातरी विषयावर बोलणे चालू होते .अमन आला, हे पाहून ते शांत जाहले. अमन फ्रेश होऊन आला . आई ने पाने वाढली. सगळे हात धुवून जेवायला बसले . सगळे ही शांततेत जेवत होते .गडबड गोंधळ काहीच नव्हता. अचानक, अमन आई कडे बघत म्हणला, आई मला अस वाटतंय, की, आता तू मझ्या लग्नाचे बघावे .... अमन चे शब्द ऐकून त्याच्या आईचा तिच्या कानावर विश्वास पटेना .तिने परत अमन ला विचारले. अमन, तू काय म्हणालास.... अमन परत, तेच म्हणला, मी लग्नाला तयार आहे ....तुम्ही मुली बघायला सुरवात करा ... अमन चे बोलणे ऐकून सगळ्याना फार आनंद जाहला. अमन ची बहीण तर नाचायला च लागली . त्या सगळ्याचा आनंद बघून अमन ला अजूनच आनंद जाहला.
जाहाले, अमन ने लग्नाला परवानगी काय दिली . अमन च्या आई वडिलांनी लगेच मुली बघायला सुरवात केली .जणू काय, सून आणण्याची ह्याना घाई च जाहाली होती . अमन च्या आई वडिलांना खूप मुली पाहिल्यावर एक मुलगी आवडली ...त्यानी स्वतः जाऊन ती पाहिली ही .....त्यांना ती मुलगी अमन साठी अगदी पर्फेक्ट वाटली ....घरी आल्यावर त्यानी अमन ला तिच्या बदल संगितले. तिची स्तुती करताना अमन चे आई बाबा थकत नव्हते . अमन नी एकदा मुलगी बघून यावे, अस त्याच्या आई वडिलांनी अमन जवळ विनंती केली . पण अमन त्याना म्हणला, मी मुलगी बघून काय करू? तुम्ही लोक बघून आला ... तुम्ही तिची एवढी स्तुती करता ...म्हणजे चांगली असणार .मला पसंद आहे, मुलगी ....मी लग्नाला तयार आहे . पण, त्याची खूप ऐछा होती ...की त्याने मुलगी बघावी ...आणि त्याला पसंद असेल, तरच लग्नाला होकार द्यावा .