sutka part 10 in Marathi Short Stories by Sweeti Mahale books and stories PDF | सुटका पार्ट 10

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

सुटका पार्ट 10

“थांब सुरे… डोक्यातल्या एवढया सगळ्या प्रश्नांचं ओझं घेऊन जाशील तर तुलाच त्रास होईल त्याचा.” माझी पाऊलं अडखळली.

क्षणभर थांबून मी मागे नजर फिरवली. डोक्यात हजारो प्रश्न होते. “एका मित्राला शोधायला अशी बाहेर पडते काय, तू असा अचानक भेटतो काय आणि रात्री पडणारी ती भयानक स्वप्न, स्वप्न की सत्य जर ती स्वप्न होती तर अंगावर या जखमा कशा? काय घडतंय? तू मूळचा इथला राहवासी नाही असं तूच सर्वांना सांगत फिरायचा तरीही त्याच्या पूर्वजांनी बांधलेलं वाडा, त्याचा हा वारस, रात्री बेरात्री होणारे भास नक्कीच इथं काहितरी भयानक आहे याची आता मला खात्री पटली आहे.” मी त्या वाड्याकडे नजर उंचावून पाहत म्हणाले.

बराच वेळ शांतता पसरली होती. मग हळू हळू त्यानेच त्याची कधीच व्यक्त न केलेली गोष्ट माझ्या समोर मांडायला सुरवात केली.



श्रीयश -

“दहा वर्षाचा होतो फक्त, मला आठवतंय माझे बाबा कायम आजारी असायचे आमच्या छोट्याश्या घरात देखील त्यांनी स्वत्ताची खोली होती. मी एकटा होतो. एकुलता एक पण तरी मला बापचं प्रेम असं काही मिळालं नाही. ते सहसा त्यांच्या खोलीतून बाहेर निघायचे नाही. मला कधी त्या खोलीत जाण्याची परवानगी नसायची. तस ही मला वडिलांच्या विचित्र वागण्याची भयंकर भीती वाटायची. मनाने धसका घेतला होता माझ्या. मी जास्त कोणाशी बोलायचो नाही. अबोल होतो. आई मला त्रास होऊ नये याची पुरेपूर प्रयत्न करायची. तरी ती गोष्ट माझ्या पर्यन्त पोहोचलीच जिला आई सगळ्यात जास्त घाबरायची.

त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. आई काही कामासाठी बाहेर गेली होती. मी एकटाच घरी होतो. दुपारी बाबांसाठी जेवणच ताट वाढून त्यांच्या दारावर ठक ठक केलं, ते ताट तिथं ठेऊन मी माघारी फिरायचो. त्यांच्यात आणि माझ्यात संभाषण झालेलं मला कधी आठवत नाही. दार वाजवून माघारी फिरणारच होतो की. आतून आवाज आला, “आत ये..!!!”

त्या आवाजाने मी अक्षरशः थररालो. “नाही, मी नाही येणार.”

मी तसाच माघारी पळालो. पण तो आवाज डोक्यात घुमत राहिला. ते कधीतरी बाहेर दिसायचे पण जास्त काळ त्या बंद खोलीतच घालवायचे. आईच्या शरीरावर माराचे वळ दिसायचे. तो माणूस मारहाण करायचा तिला खूप. त्याची चीड माझ्या मनात आता भयंकर थैमान घालायला लागलेली. आई आज पासून मी त्याला जेवण देईल. तू नको जाऊ त्याच्या कडे. आईचा रडवेला चेहरा पाहून माझं मन भरून आलं होतं. मी कधी तिथे जायचा प्रयत्न केला नव्हता पण आता आईसाठी मला ते पाऊल उचलणं भाग होतं. शेवटी मी ठरवलं आता जायचंच. आई समोर मी धीट म्हणून उभे राहिलो. तिलाही विश्वास वाटला असावा त्या दिवशी पासून तिने ही तिच्या नवऱ्याची म्हणजे माझ्या तथाकथित बापाची जबाबदारी माझ्या कडे दिली.

पहिल्या दिवशी मी घाबरंलो. पण तरी आत जायची हिम्मत केली. त्या अंधाऱ्या खोलीत मी आधी आलो नव्हतो असं काही नव्हतं, पण तो जेव्हा नसायचा तेव्हाच मी त्या खोली मध्ये गेलेलो. आज बापू असं ताना मी पहिल्यांदा आत जात होतो. जेवणाचं ताट थरथरत होतं हातात. ती खोली आई साफ करायची. त्या मूळे जरा नीटनेटकी दिसत असं ली तरी सतत तिथून कुजका वास यायचा. तो वास धूप दिव्यांच्या धुराने कमी जाणवत होता. आत मोठा देव्हारा आहे हे मला आता कळालं. बापू सतत त्या देव्हाऱ्या समोर बसतो असं आई कडून ऐकलेलं. आताही तो तिथेचं बसला होता, कसंलासा जप करत. मी हळूच जाऊन मागे उभा राहिलो आहे हे त्याच्या लक्षात आलं असावं. मागे वळून पाहिलं तस त्यांचा चेहरा दिसला, भस्म फासून सगळं अंग माखल होतं. ते पाहून माझी भिती जराशी कमी झाली.

आत काहीतरी भुत वगैरे असं लं त्यांच्या अंगात येत असेल असं काहीसं मला वाटत होतं. ते भूत अंगात येतं मग बाप आईला मारतो असंच काहीसं मला वाटायचं. सगळीकडे देवाच्या तसबीरी धूप दिवे पाहून जरा भीती चेपली. आत बऱ्या पैकी उजेड होता. मला वाटलं होतं तस वातावरण मात्र तिथं नव्हतं.

“बैस हितेश्वर बैस.” माझ्या पूर्ण नावाने हाक मारली आणि देव्हाऱ्या समोरून उठत ते माझ्या समोर आले. आता पर्यंत माझ्या मनात त्याच्या विषयी भयंकर चीड होती. पण का कोण जाणे तेव्हा असं वाटलं की मी त्यांना चुकीचं समजत होतो.

मला बाहेर दिसणारे माझे बाबा आणि आता दिसणारे बाबा यात जमीन आस्मानाचा फरक वाटत होता. बाहेर मला विचित्र वागणारा माणसांची ऍलर्जी असं लेला माणूस असाच तो माहीत होता. आमची गट्टी जमली बापू मला गोष्टी सांगायचा, ज्ञानाच्या गोष्टी सांगायचा, पण तो असा का खोलीमध्ये बंद असायचा कळायचं नाही. बराच वेळ तो एकटं कुणाशीतरी बडबडत असं ल्याचं मी पाहिलं आणि मी जवळ गेलो. त्या दिवशी खरी भयानकता अनुभवली. जेव्हा कधी तो नॉर्मल असायचा तेव्हा कसंलीच भीती नसायची पण. माझा बाप मानसिक रुग्ण होता. अंगात भूत संचरल्यासारखा तो वागायचा, स्वतःत भिंतीवर डोकं आपटून घायचा, त्या दिवशी त्याने मला मार मार मारलं.

त्या नन्तर मी फक्त त्याला जेवणाचा थाळा द्यायला जायचो. तो ही बाहेरूनच ठेऊन माघारी फिरायचो. काही दिवसांनी त्यांनी जेवण सोडलं असावं असं वाटलं. सलग दोन दिवस ताटं तशीच माघारी अली तेव्हा मी आत जाऊन पाहून यावं असं आईने सुचवलं.

बापू त्याच्या खाटेवर निपचित पडलेला, शांत... माझी चाहूल लागली तशी त्या निपचित पडलेल्या देहात हालचाल जाणवली.

त्या दिवशी माझ्या हातात हात घेऊन हळू आवाजात काहीतरी पुटपुटत होता. आवाज ऐकण्यासाठी म्हणून मान झुकवली. अंगातून भायानक कळ सगळ्या अंगभर पसरली. मानेवर ठेवलेला थरथरता हात अचानक ताठ झाला. ना जाणे कुठल्या ताकदीने तो गडगडाटी हसला. मानेत रुतलेली नखं, अंगावर रक्ताचे ओहळ सांडवत होती. त्या अचानक झालेल्या हल्ल्याने मी अक्षरशा थरथरत होतो. घशातून आवाज निघत निघेना. आता आपला अंत इथेच होतो की काय? असं क्षणभर वाटलंच होतं की , त्याची पकड ढिली झाली ती कायमचीच. जीव घेऊन मी तिथून पळालो.

बापू गेला तशी ती खोली कायमची बंद केली गेली. ते घर सोडलं ते कायमचं. पण तिथून सुरवात झाली त्या गोष्टींची, मला बापू दिसायचा. आमच्या सोबत आमच्या नवीन घरी राहायचा माझ्याशी बोलायचा, मला सतत तो सोबत असं ल्याचा भास व्हायचा. काही महिन्यातच मी स्वतःला वेगळं करून घेतलं. रात्री काय व्हायचं मला माहित नाही, पण सकाळी उठल्यावर माझ्या अंगावर ओरखडे आणि मराच्या खुणा मला दिसायच्या. कोण संचारत माझ्या अंगात? किंवा रात्री काय होतं याची काहीच कल्पना नसायची. पण आपल्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होतोय हे लक्षात यायला लागलं होतं. आईने मात्र या वेळी वेगळं पाऊल उचललं.

आई, आजोबा, आजी सगळेच काळजीत दिसायचे. त्या दिवशी ही मी स्वतःला खोलीत बंद करून बसलो होतो. काही लोक मला न्यायला आले होते. सरळ सांगायचं तर मी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. तिथं जे अनुभवलं ना ते आठवलं तरी अंगावर काटा येतो.

“मी वेडा नाही रे. विश्वास ठेवा.” आता मी कसं समजावून सांगू. ओरडणारी लोकं, वेडे. ठार वेडे आणि त्यातलाच एक काही मोठे काही लहान, मी वेडा होतो का? कदाचित तस असेल ही. जसं आई सांगत होती, तू दिवसा एक असं तोस आणि रात्री एक. कदाचित असेल डॉक्टरांनी ते अनुभवलं असेल कारण माझा वेडेपणा आता वाढत चालला आहे हे माझ्या लक्षात येत होतं पण माझा स्वतःवर असा कुठलाच ताबा नव्हता. दिवस दिवस खाटेला बांधून ठेवायची ही लोकं मला.”