अन तुम्ही गाववाले ना जुना फोटो दाखवला असं लं त्यांनी ओळखलं बी नसलं कुणी.”
“बरं, त्याचा काही पत्ता देऊ शकाल का? पत्ता तर नाई पण मागल्या येळी एक नंबरं मात्र दिला होता, आता इथं रेंजचं नाई तर फोन कसा करणार ना. कुठं ठेवलाय?” त्यांनी डोक्याला हात लावला. बराच वेळ शोधाशोध केल्यावर त्याने एक कागद माझ्या हातात दिला. मोबाईल नंबरं त्यावर लिहिलेला होता.
मी लगेचच त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. लवकरात लवकर मला तिथून बाहेर निघून ‘लोढू’ला फोन करायचा होता. गाव सोडून काही अंतरावर आल्यावर माझ्या मोबाइलला नेटवर्क दिसायला लागलं. घाईघाईनेच मी तो नंबरं फोन मध्ये डायल केला.
“आपण ज्या नंबरं वर संपर्क साधू इच्छित तो आता बंद आहे.” यार खरंच, हातातला मोबाइल कुठे तरी फेकून द्यावा असं मला वाटलं.
बॅग उचली आणि रिटर्न ची बस पकडली. दुपारी स्टेशन वर शांत बसले कारण आता डोक्याचा वाजलेला तशा शांत करणं गरजेचं होतं जरा शॉर्ट टेम्पर असं ल्याने चीडचीड झाली की उगाच कोणावर तरी त्याचा भडका उडू नये याची काळजी. बाकी काही नाही. स्टेशन वर रोजच्या सारखीच वर्दळ होती. माझी ट्रेन लागायला अजून अर्धा तास वेळ होता. पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून मी मोबाईल खोलून त्या नंबरं बरं कॉल लावला. पुन्हा तेच, तो नंबरं बंद होता. शीट यार, काही फायदा नाही, रिकाम्या हाताने परत जावं लागतं आहे म्हणून मला जास्त चीड येत होती.
विचार करत करत मी स्वतःमध्ये काहीशी हरवून गेले होते. प्लॅटफॉर्मवर वेटींग चेअरवर पाय पसरून बसले होते. डावा हात शेजारच्या माझ्या सॅक वर ठेऊन हातावर डोकं टेकवून मी शांततेत विचार करी बसले होते. म्हणजे फक्त वरून तशी शांत दिसत होते पण आतून येतील तेवढ्या शिव्या स्वतःवर झाडून झाल्या होत्या. एवढ्या लांब येऊन काही फायदा झाला नाही. कोणीतरी घाई घाईत माझ्या समोरून जाताना मी पसरून बसलेली असं ल्याने पायाला पाय अडकून तोंडावर आपटलं.अरेर!! कुणीतरी धडपडलं होतं, समोर कळवळत पडलं होतं, “साला कोण तडमडलाय दिसत नाही का?” ते बिचारं गुडघ्याला लागलं म्हणून कासावीस होऊन गुडघा हातात धरून उठायला लागलं, डोळ्या वरचा चष्मा सरळ करत तो उठला, मी जागेवरून उठून त्याला बसायला जागा दिली, पडलेल्या जागेवरून उठताना त्याने टक लावून माझ्या कडे बघायला सुरवात ती नजर किती तरी वेळ तशीच ठेऊन तो मला नेहाळत होता. “ओ मिस्टर इथे येऊन तडमडलाय म्हणून बसायला जागा दिली. आता जास्तीच गणित वाढवू नका. नाहीतर कानाखाली ही तितकीच जोरात खेचता येते. प्रत्यक्षात पाहायचं असेल तर दाखवू का?” चढ्या आवाजातला दम ऐकून तो मात्र अचानक हसायला लागला.
“सुरे दम दयायची सवय अजून काही सुटली नाही तुझी.”
मी जरा चमकून त्याच्याकडं पाहत राहिले. “लोढू?”
हा लोढू तर नाही ना? पण छे हा काय असं णार. लोढू तर चांगला दीडशे किलोचा मांसाचा गोळा होता. हा तर एकदम फिट आणि फाईन दिसतोय.
“क.. काय म्हणालास?” मी पुन्हा त्याला उलट प्रश्न केला.
तो हसून म्हणाला, “अगं सुरे, तुझी अजून ती सवय गेली नाही का? खादाड कुठली. आख्ख्या दहावीचं पूर्ण वर्ष माझा डब्बा खदडला तरी माझ्यावरच हुशारक्या दाखवते. बघ ना, मी तुला पहिल्या नजरेत ओळखलं तरी तुला मी कोण ते आठवेना.
“ओह माय गॉड, साजूक तू?”
तो त्याचा दुखरा पाय सोडून उभा राहिला, “नालायक कुठे होतंस इतके दिवस. मी तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला माहितीय आणि तू एकदा ही तुला वाटलं नाही की सूरी ला एकदा भेटावं. तू जरी ऍक्टिव्ह नसला तरी माझं नाव गाव शोधून काढणं तुला जास्त जड गेलं नसत.” मी पुन्हा चिडले होते पण या वेळी मला त्याच्यावर राग काढणं जमेना.
“अगं हो. किती चिडशील?” तो पुन्हा हसला, त्याला गालाला खळी पडते हे माझ्या आता लक्षात आलं. तेव्हा ते त्याच्या गोबऱ्या गाला मुळे लक्षात येत नसावं.
“अगं सुरे, मी ही खुपदा तुझी आठवण काढली. पण मधल्या काळात खूप गोष्टी घडून गेल्या त्यातून बाहेर यायला वेळच मिळाला नाही.” पण तू अशी अचानक भेटशील असं वाटलं नव्हतं किती छान योगायोग म्हणावा.
“योगायोग म्हणण्यापेक्षा देवालाच माझी कीव आली असं म्हण ना.”
“म्हणजे?”
“म्हणजे मी तुला शोधत तू पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचले.”
“ओह माय गॉड. केवळ मला भेटण्यासाठी तू एवढे कष्ट घेतले? थँक्स टू गॉड की आपली भेट झाली.”
“नशिबाने रामू मला भेटला आणि त्याने तुझ्या बद्दल सांगितलं.”
“तुला शोधतच स्टेशन कडे आलो.”
“पण असा भेटशील असं वाटलं नव्हतं.” मी हसून म्हटलं.
“बरं ते सोड, किती बदलला रे साजूक तू. दीडशे किलो वरून साठ सत्तर वर कसा आला? एवढा change? भारीच हँडसम दिसायला लागला रे. ही जादू कशी झाली?”
“हा मी तर झालो बारीक थोडी मेहनत घेऊन, पण तु मात्र तोळाभर सुद्धा बदलू दिल नाही स्वतःला.”
“ओये मी किती improvement केली माहितीय स्वतःत. मी आता अजिबात कोणावर चिडत नाही.”
“हा असुद्या पाहिलं ते मघाशीच.”
तो हसला तस मला त्याच आधीच ते हसू आठवलं अगं दी तसच, किती निरागसता होती त्यात. तो हसायला लागला लहान बाळा सारखा वाटायचा.
“चल आता तू एवढ्या लांब आलीच आहेस तर तुला माझं गाव दाखवतो. सगळं फिरून घेऊ मग परत जा. आपण काही वेळ का होईना पुन्हा ते आयुष्य जगू निरागस आणि खेळकर, त्याने बोलताना मोठा उश्वास सोडला.” का माहीत नाही? पण त्या सोडलेला उश्वासा मागे खूप काही गोष्टी दडून ठेऊन आहे असं मला वाटलं.
“मी ज्या गावामध्ये गेले होते तेच तुझं गाव ना? ते तर मी पाहिलं आहे.”
“हो पण मी जे दाखवणारे ते नसशील पाहिलं. चल तुला दाखवतो खूप सुंदर निसर्ग आहे, सगळं टेंशन विसरशील.”
स्टेशन मागे सुटलो. आम्ही दोघे पुन्हा निघालो नव्या दिशेला. सोबत चालताना मी त्याला काहीशी न्याहाळत होते. खरंतर दहावीत असं ताना माझी उंची फार काही नव्हती, म्हणून तो मला जास्त उंच वाटायचा. बारावीत आल्यावर उंची वाढली. तेव्हा तर compare करायला तो सोबत नव्हता. आता मी त्याच्या खांद्याला लागत होते, आधीच्या जाड आणि बेढब लोढुच रूपांतर आता एक हँडसम आणि डॅशिंग युवकात झालं होतं. व्यायामही त्याच्या पिळदार यष्टी मधून झळकत होता. कसा एवढा बदल झाला? मी विचार करत होते. छान कोरून केली दाढी, डोळ्यावरचा सेन्सिअर लुक देणारा चष्मा, लोढुची जशी नव्याने ओळख झाली होती. तो माझी ट्रॅव्हलर बॅग स्वतःच्या खांद्यावर घेऊन माझ्या पुढे चालत होता, मी मात्र स्वातःचाच विचारात त्याच्या मागे निघाले होते.
“अरे माझं डोकं फुटेल आता काय चाललंय हे सगळं? तू इथे या ओसाड गावात काय करतोय? तू तर तुझ्या गावी गेला होतास? एवढा बदलास? एवढे दिवस तर जसा गायबच होतास, कुठे होतास एवढे दिवस? काय केलं? काही सांगशील का?”
“आरे हो हो, सांगतो. सगळं सांगतो.” तो माझा एकापाठोपाठ चाललेलेल्या प्रश्नांच्या भडीमराला थांबवत म्हणाला.
“काही नाही वाटलं निसर्ग जवळून अनुभवावा म्हणून इथे आलो. फार प्रसन्न वाटत इकडे आलं की आणि तू ही आवर्जून पहा इथला निसर्ग पाहशील तर प्रेमात पडलशील.”
त्याच्या जीप मध्ये बसून आम्ही गावाच्या दिशेने निघालो. गावाच्या बाहेर साधारण एक किलोमीटर अंतरावर येऊन गाडी थांबली. समोर आलिशान वाडा होता. जास्त रहदारी नसावी म्हणून जास्त काही चकाचक वाटला नाही. आत भरपूर जागा होती. वापरात नसल्याने धूळ जळमटे झालेले दिसत होते. पण तरी त्याची सुंदरता लपत नव्हती. मधोमध मोठी जागा होती, उंच इमारत सुदंर होती, लाकडी बांधकाम, दगडी रचना आकर्षून घेत होती.