sutka part 3 in Marathi Short Stories by Sweeti Mahale books and stories PDF | सुटका पार्ट 3

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

सुटका पार्ट 3

माझ्या टोमण्यांना हसून उत्तर देणार आणि मी केलेल्या सगळ्या मस्कर्‍या हसून नेणारा माझा आता पर्यंतचा पहिला मित्र, जो मला अजून पर्यंत कधीच खडूस म्हटले नाही किंवा माझ्या स्वभावाला वैतागून माझ्याशी भांडण केले नाही, मी त्याच्या समोर बहुली दिसायचे, मोटू-पतलूची आमची जोडी प्रसिद्ध झाली ती या कारणाने की मी कोणाची तरी खोडी काढणार आणि आमचा साजूक लोढू जाऊन त्याला सॉरी म्हणणार हे मात्र आता सोबत रोजच झालं होतं.

आमच्या मागच्या बाकावर बसणारा गौऱ्या ही आमच्यात सामील असायचा पण मला मात्र आमच्यात लुडबुड केलेलं आवडायचं नाही, तसाही तो जरा जास्त हुशार आणि शिक्षकांच्या जवळचा होता, कडीमोडा धापणा अवतार मला अजिबात आवडायचा नाही.

दिवस मजेत जात होते आता मात्र मला लोढूला काही बोललेलं आवडायचं नाही. कोणी त्याला त्याच्या जाडेपणा वरून चिडवायचा प्रयत्न केल्यास त्याचा पंगा थेट माझ्याशी असायचा, आमची दहावी सुटली तशी साजूक ने जिम सुरू केली, जाडेपणा असं ला तरीही तो खूपच चंचल होता, कोणत्या ही कामात अग्रेसर असायचा. आमचे स्वभाव मात्र एकदम विरुद्ध असं ले तरी का माहीत नाही आमची मैत्री मात्र फार घट्ट होती, मी माझ्या सगळ्या गोष्टी त्याला share करायची तास तो ही माझा bestie होता तासन तास गप्पा मारून ही आमचे विषय सांपायचे नाही, लोढू होताच तसा मन मिळवू माझ्या सारख्या खडूस ला देखील त्याने माणसात आणले होते, आता हळू हळू त्याच्या सोबत मी बाकी मुलांमध्ये मिसळत होते, माझ्या इतकाच त्याला तो गौऱ्या देखील जवळचा वाटायचा, मला मात्र ते आवडायचं नाही, दहावी संपली, सुट्ट्या मध्ये लोढू ने जिम च ध्यास घेतला होता पण दम्याच्या त्रासांने त्याला जास्त काही जमत नव्हते.

दिवस जात होते आमची मैत्री अजून घट्ट होतं होती आणि तो दिवस आला दहावीचा निकाल लागला आणि लोढू त्याच्या गावी जाण्यासाठी निघाला जाताना माझ्या गळ्यात पडून मुलींसारखा रडला. खूप हळवा होता तो. मला मात्र टिपूसभर पाणी ही महाग झाले होते, पण पुढे जाणारी त्याची पाठमोरी आकृती पाहून मन भरून आलं. थोडं का होईना पण मला रडू आलं, थोडक्यात बरं वाटलं.

दिवस जात होते. आता शिक्षण पूर्ण केलं. नोकरी धरली. दरम्यान माझं कोणाशी काँटॅक्ट नव्हता जास्त मित्रमैत्रिणी जमवणे मला कधी जमलंच नाही.

आता माझा स्वभाव मात्र पहिल्या इतका खडूस आता राहिला नव्हता, रागाने धिंगाणा घालण्यापेक्षा मला शांत राहणे जास्त आवडत होते. वर्षे सरली, त्याची आठवण मला नेहमीच तो जवळ असं ल्याची जाणीव करून द्यायची. पण तरीही जी मैत्री मी कमावली होती ती मला लोढू ची आठवण करून द्यायची कसा असेल? तो काय करत असेल? आमच्या मध्ये contact नव्हता. त्यामुळे मला त्याच्या बद्दल काहीच माहिती नव्हतं. हा, एक दोनदा त्याने पत्र पाठवलेलं मला शाळेच्या पत्त्यावर. सदाशिव काकांनी मला आठवणीने ते सोपवलं होतं, किती बरं वाटलं होतं ते वाचून. त्यातही त्याचा नंबरं वैगेरे काही दिलेलं नव्हतं, मी सोशल मीडियाला ही बघून बघून कंटाळले होते. तो कधीतरी सापडेल या आशेने कित्येकदा saerch करून ही त्याचा पत्ता काही मला मिळाला नाही, पण त्याने पाठवलेल्या पत्रावर मात्र एक अड्रेस होता, पण तो इथलाच वाटत होतं, तरी मी त्यावरून शोध लावायचं ठरवलं.

दोनशे किलोमीटर दूर असं लेलं एक खेडेगावातून ते पत्र आलं असं ल्याचं कळलं. कुठलाच विचार न करता मी सरळ बॅग भरली आणि निघाले साजूकच्या शोधात. पण हा प्रवास माझं आयुष्य बदलून टाकेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. एक तासाचा ट्रेनचा प्रवास आणि तिथून पुढे गावाकडे जाणारी बस असा काहीसा तो प्रवास होता. तसा सहसा मला प्रवास आवडत नाही, पण साजूकला भेटायचा मी चंगच बांधला होता. चार-पाच तास तरी प्रवासात जाणार होते. ट्रेन मध्ये मी एक पुस्तकं वाचायला घेतलं, एक तासाने मला उतरायचं आहे असं स्वतःला सांगून वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता जे हरवून गेले की स्टेशन आल्याच ही माझ्या लक्षात आलं नाही. दोन स्टेशन पुढे जाऊन मी उतरले. अरे यार आधीच वेळ होणार जायला त्यात अजून उशीर शीट यार, मी स्वताच्याच डोक्यात मारून घेतलं

बॅग सांभाळत मी पुन्हा मागे जायला गाडी पकडली. रस्त्यात एकाला त्या गावचा पत्ता विचारला. इथून कोणती बस पकडायची? याची व्यवस्थित माहिती घेऊन मी तिथल्या मुख्य बस स्थानकावरून बस पकडली. बस मध्ये बसल्यावर माझ्या डोक्यात विचार आला, “तिथे जाऊन लोढू भेटलाच नाही तर? राहायचं कुठे? आणि..” असो, होईल. सर्व नीट होईल मी स्वतःचा स्ट्रेस स्वताशीच काहितरी समजावून कमी करत होते.

अजून दोन तीन तास तरी बस मध्ये जाणार होते, पुन्हा अर्ध राहिलेलं पुस्तक वाचायला काढलं, लोक येत होते उतरून जात होते. माझ्या शेजारी एक म्हातारी बसली होती. तोंडाच बोळक झालं होतं तिच्या. मी तिच्या कडे नजर फिरवली तशी ती गोडशी हसली, तिने हाताने कुठं? असं खुणावलं. मी गावच नाव तोंडाने सांगितलं. ती पुन्हा हसली. तिने हाताने खुणावत मी ही तिकडेच चाललेत असं म्हणायचं असावं तिला. हेच का? असं मी पुन्हा विचारलं तिला, तिने मान हलवली, तोंडाला हात लावत नकारार्थी खूण केली. कदाचीत तीला बोलता येत नसावं.

गाडी गावच्या रस्त्याला लागली. रास्ता ओबडधोबड झालेला, तशी तिची बडबड वाढली बडबड म्हणण्यापेक्षा ती फक्त खुणावून बोलत होती. काय म्हणत होती मला व्यवस्थित कळत नव्हतं, मी फक्त मान हलवत होते. एवढ्या लांब आलीय खरी पण लोढुचा काही पत्ता सापडला तर बरं, असं स्वताशीच पुटपुटले, गाडी धूळ उधळत पुढे निघून गेली. बस थांबा असं लिहिलेली एक पाटी सोडली तर तिथे बस स्टॉप सारख असं काहीच नव्हतं.

साधारण संध्याकाळ चे चार वाजले असं तील. मी माझी पाठीवरची जड झालेली ट्रॅव्हलर बॅग सांभाळत पुढे निघाले. माझ्या बरोबरं अजूनही काही लोक बस मधून उतरलेली दिसली. सोबत ती म्हातारी होतीच, ती फक्त हसत होती. डोळ्याच्या खोबण्या आत गेलेल्या, तोंडात आहे म्हणायला एकही दात शिल्लक नव्हता पण चेऱ्यावरच ते प्रसन्न हसू मात्र कायम होतं. गाव अजून पुढे आहे असं तिने हाताने खुणावल. मी चालत चालत दहावीत असं ताना काढलेला माझा आणि लोढू चा फोटो तिच्या समोर धरला, ती बारीक डोळे करून न्याहाळत होती. काहीसे इशारे करून मी याला भेटण्यासाठी आले आहे असं तिला सांगितल. तिचे हावभाव पाहून मला अजूनच टेंशन आलं, कारण तो फोटो पाहुन फोटोतली व्यक्ती तिला थोडी ही ओळखू येईना. तरी एक आशा म्हणून मी गावाकडे निघाले. थोडी चौकशी करून मी आधीच ऑनलाइन बुकिंग केलेल्या हॉटेल वर थांबणार होते. ते तिथून वीस एक किलोमीटर वर होतं. चला, निदान विचारपूस तर करूया असं म्हणून मी गावात पोहोचल्यावर लोकांना तो फोटो दाखवून नाव सांगून विचारून पाहिलं, न कोणाला ते ओळखता येईना. एवढा वजनदार माणूस जर गावात असं ता तर चेहरा ही न पाहता ओळखला असं ता.

असं तर कोणी नाही, गावात असं एकाने सांगितलं, हा पत्ता तर इथलाच आहे, मग या ठिकाणा वरुन मला पत्र कुणी पाठवलं असावं? गावात एक छोटंसं डाक घर आहे असं कळलं आजच्या जमान्यातही पत्र व्यवहार चालू आहेत ऐकून छान वाटलं.