रात्री उशिरापर्यंत मी माझ्या कॅबिन मधे बसून होते. बऱ्याच वेळापासून रात्रीच्या अंधारात भयंकर वाटतील असे भिंतीवर ओरखडून होणारे आवाज थांबले. काही वेळ मी सुटकेचा श्वास घेतला, डॉक्टर असून मी कधी या स्थिती मध्येही असेल असं मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं, गेल्या दहा दिवसांत मी प्रत्येक क्षणाला मरत होते, त्याचा हसणारा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहायचा, मी जुन्या आठवणींत रमुन जायची, काही क्षणासाठी झालेली शांतता पुन्हा त्या भयानक आवाजाने ढवळून निघाली, काहीश्या तंद्रीत हरवलेली मी दचकून जागी झाले, पूर्णपणे काटेकोर लक्ष देता यावं म्हणून माझ्या कॅबिन शेजारच्याच वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं होतं. काहीश्या थरथरत्या हाताने मी त्याच्या खोलीच्या खिडकीतून डोकवण्यासाठी काच खाली केली. खोलीभर नजर फिरवून तो दिसला नाही. मी दचकून सभोवताली नजर फिरवली, पुन्हा नीट पाहावं म्हणून मी खिडकी जवळ तोंड नेत आत डोकावण्याचा प्रयत्न केला. तोच खिडकीवर झेपावलेला रक्ताळेला चेहरा आणि गालावरच्या ओरखडयावर नजर गेली. मी घाबरून किंचाळत मागे सरकले.
“ओ मॅडम कितीदा सांगितलं अहो येडाय तो. नीट झाला की घेऊन जा पुन्हा निदान रात्री तरी आम्हाला डोकेदुखी देऊ नका. जावा घरी.” शाम म्हणजे हॉस्पिटलचा वॉचमन आपल्या करड्या आवाजात ओरडत म्हणाला. मी स्वतःच डॉक्टर आहे हे शामलाच काय स्वतःला देखील विसरायला झालं होतं, “माफ करा. छोट्या तोंडी मोठा घास घेतोय, मान्य आहे पेशन्ट तुमचं जवळच आहे. पण किती जगणार रात्र रात्र भर ते ढोरासारखं किंकाळ्या मारत, मी बाहेर बसून मला ऐकवत नाही तुम्ही इथे कसे राहता? ते काही नाही मी पांडूला संगतो तुम्हाला घरी सोडायला आज दहा दिवस झाले. तुमची हालत पाहवत नाही, हा आहे तरी कोण नक्की? आणि या येड्यासाठी का तुम्ही आकाश पातळ एक करताय?”
हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून काम करणारा श्याम जे काही सांगत होता त्यातलं एक वाक्य मात्र कानात शिसं ओतल्यासारख त्याला झोंबलं.
का या वेड्यासाठी आकाश पातळ एक करता? सहज उच्चारलेलं त्याच वाक्य असं काही लागलं की, क्षणात रागाची एक कळ माझ्या मस्तकातुन गेली. “वेडा नाही तो.” क्षणात बदलेला उग्र स्वर त्याला ही जाणवला असावा. शाम क्षणभर नरमला.
कधी नाही तर त्याला मी असं ओरडून उत्तर दिलं हे त्यालाही अपेक्षित नसावं. कारण नेहमी शांतपणे बोलणारी मी आज असं रागवेल याचा अंदाज नसल्याने तो दचकून काहीसा गोंधळला, “अ… माफ करा चुकलं.. मला फक्त तुम्ही स्वताची काळजी घ्या इतकंच म्हणायचं होतं.” तो काहीसा बिचकत म्हणाला, “रात्रीचे एक वाजत आलेत तुम्ही अजून जागे आहात.”
मी क्षणात नरमले, भूतकाळ राहून राहून मला छळत होता. गाडी बाहेर काढून मी घराच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. वाटेत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. गाडीच्या काचेवर जोरात आदळणारे पावसाचे थेंब काही केल्या वायपरला जुमानत नव्हते, रस्त्यावर गर्दी असायचा तर प्रश्नच नव्हता रात्रीचे 1 वाजेलेला, त्यातल्या त्यात सुनसान पडलेल्या रस्त्यावर धोधो पाऊस कोसळत होता. रस्ता ओळखीचाच असं ल्याने वेग तसाच ठेवत मी भरधाव निघाले. रोज रात्री उशिरा कधी तरी अशीच भरधाव गाडी घरी आणुन बिछान्यात पडायचं आणि झोपेची गोळी घेऊन पडून राहायचं हाच आता माझा दिनक्रम झाला होता. कदाचित त्या गोळ्याही आता थकल्या असाव्यात त्यांना दिलेली झोपवण्याची जबाबदारी आता त्यांनीही नाकारली होती, दहा पंधरा मिनिटात पावसाचा जोर काहीसा ओसरला तसा रस्ता स्पष्ट दिसायला लागला.
घर अजून पंधरा-वीस मिनीटांवर असेल तोच माझा फोन खाणाणला, “हॅलो, सुर्वी मॅडम, तुमच्या पेशन्टने हाताची नस कापून घेतलीय; खूप रक्त चाललंय, तुम्ही लवकर या.” शेवटचे शब्द पुसटसे ऐकू आले असं तील मी कचकन ब्रेक दाबला. पुन्हा वाढलेला पावसाचा जोर... याची पर्वा नव्हती. काही मिनिटातच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, डॉक्टर अवस्थिनी तो पर्यंत तिथून हलवून ओटी मध्ये नेलं होतं, नशिबाने त्याला काही धरधार न मिळाल्याने आत्महत्येचा तो प्रयत्न फार काही यशस्वी झाला नव्हता. हाताच्या वाढलेल्या नखांनी हाताच्या नसेला इजा पोचवण्याचा प्रयत्न त्याने केला होता, त्याच ते भयानक रूप पाहवत नसल्याने मी कधी त्याला नीट पाहिलं नव्हतं, ओटी मध्ये पोहोचल्यावर डॉक्टर अवस्थीनि हाताचं वाहणार रक्त थांबवलं होतं. हलक्या पावलांनी मी त्याच्या जवळ गेले, का माहीत नाही पण त्याचा तो बेबस चेहरा मला पाहवत नव्हता, तो बेशुद्ध अवस्थेत निश्चल पडला होता, पूर्ण चेहऱ्यावर हातांनी ओरखडे ओढलेले दिसत होते, अंगावर जागी जागी झालेल्या जखमा पाहून नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. एक एक करून छोट्यातली छोटी जखम ही मी काळजीपूर्वक साफ केली, तो अजूनही ग्लानीत होता. शांत पहुडलेली सुर्वी, काहीतरी सांगत असावी असं वाटलं, रक्ताळेली नखं कपताना तीची हलकीशी हालचाल जाणवली. पांडू बोलवून पेशन्टला वॉर्ड मध्ये हलवा असं सांगून डॉक्टर अवस्थी निघून गेले, निवासी डॉक्टर असं ल्याने नेहमीच रात्री अपरात्री बोलावणे यायचेच याचा ताण मात्र चेहऱ्यावर दिसत होता. ते जास्त काही चर्चा न करता आपल्या निवासी घराकडे वळले.
मी मात्र बराच वेळ तो तिथंच बसून होते, तो शुद्धीवर नाही म्हणून पांडू ही काहीसा आरामात येत असावा.
त्याचे हलके हलणारे हात मला जाणवले, “सुर्वी,” त्याने कुजबुजल्या स्वरात मला हाक मारली. त्या कुबुजल्या स्वराने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तरीही हिम्मत करून मी त्याच्या चेहऱ्यावर नजर फिरवली. तो अजूनही तंद्रीतच होता, पण “सुर्वी” नाव घेतलं त्याने. अजूनही मी त्याच्या लक्षात आहे या विचारानेच माझी कळी खुलली.
“मला ओळखलं?” मी ही हलक्या आवाजात त्याला हाक मारली. पण त्या वेळी मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तिथून तो उठणारच की माझ्या हाताची पकड घट्ट झालेली मला जाणवली. मी थरथरत्या नजरेने हातावर नजर फिरवली. त्याने माझा हात घट्ट धरून ठेवला होता.
“सुर्वी…” त्याने यावेळी मारलेली हाक रोजच्यासारखीच वाटली, मी त्याच्या चेहऱ्यावर ओझरती नजर फिरवली, आणि आश्चर्य म्हणजे काय तो माझ्याकडे पाहून हलकेच हसला, तेच निरागस हसू कित्येक वर्षांनि मी पाहत होते, पण तेही तेवढ्यापुरतेच.
त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला पांडू हे सगळं पाहत होता, जागेवर खिळलेल्या त्याच्या आकृतीकडे मी एकवार नजर फिरवली. तो जागेवर खिळला होता. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मधे आम्ही दोघेच उरले होतो काहीतरी विपरीत घडल्या सारखी भयाण शांतता होती.
“सूरी…!” त्याने मोठ्या कष्टाने शद्ब उच्चारले. त्याचा नेहमीचा प्रांजळ स्वर ऐकून मी भूतकाळात हरवले,
सोमवारचा पहिला तास होता, संथ गतीनं चालत एक भक्कम धूड दरवाजातून आत आलं, आ करून आम्ही बघत ते बघायला लागलो, सहा फूट आणि रुंदीने चांगला जाड म्हणजे थोडक्यात माझ्या माहितीतल्या एकाही असा महान आत्मा नव्हता ज्याच्या हाताच्या कवेत हे नाजूक शरीर बसू शकेल असं हलणार डुलणार भक्कम शरीर आत येतना, एखादा रबराचा बॉल टप्पी उडी खात यावा तस ते धूड दिसत होतं. हलकं हलकं बॉउन्स होणारं ते नाजूक शरीर लयबद्द बॉउन्स होतं होतं. जास्त काही नाही साधारण शंभर एकशे वीसच्या पुढे वजन असावं असा माझा प्राथमिक अंदाज होता, पण ते धूड जास्त जवळ आल्यावर ते अंदाजाचे इमले धडा धड खाली कोसळले, तो बॉल दीडशेच्या खाली नसेल असं पक्क गणित मी मांडल आणि ते बरोबरं ही असावं.
“हॅलो, गुड मॉर्निंग” म्हणत ते नाजूक शरीर माझ्या शेजारी येऊन बसलं, माझी थंड रिऍकशन पाहून ते काहीसं गार झालं असावं, तस पाहता ते माझ्या पेक्षा जास्त चंचल वाटलं.