Prarambh - 12 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रारब्ध भाग १२

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

प्रारब्ध भाग १२

प्रारब्ध भाग १२

यानंतर काही दिवस चांगले गेले .
सुमन आता मुंबईच्या आयुष्याला सरावली होती .
ती खुष असल्यावर परेशला सुद्धा बरे वाटत असे .
किती झाले तरी त्याचे प्रेम होते तिच्यावर..
एके दिवशी संध्याकाळी तो घरी आला तेव्हा सुमन खुप खुशीत होती .
“कपडे बदलुन जेवायला बसल्यावर त्याने विचारले
“काय ग आज खुशीत दिसते ..
“ हो आज मामांचा फोन आला होता.
सोसायटीच्या सेक्रेटरीचे काही काम आहे मुंबईला त्यांच्यासोबत मामा उद्या येत आहेत .
आपल्याकडेच येणार आहेत मुक्कामाला
मला म्हणत होते माहेरपणाला चल ,लग्न झाल्यापासुन आलीच नाहीस तु गावी .
“वा छान झाले मामा येत आहेत ते ,आणि तु पण खरेच लग्न झाल्यापासुन गेलीच नाहीस
गावाकडे ..ये जाऊन त्यांच्या सोबत गावी ,काही दिवस ...
आपल्या घरीही राहशील दोन तीन दिवस .
आई बाबा पण विचारत आहेत तुम्ही इकडे कधी येता असे ..
मी येईन आणायला तुला दोन दिवस सुटी घेऊन पुढील आठवड्यात
चालेल का ?
सुमन हा प्लान ऐकुन आनंदी झाली .
तिलाही गावाकडची आठवण येत होती ,चिंटू पिंटू फोन वर बोलायचे
पण त्यांना प्रत्यक्ष भेटावेसे वाटत होते .
तिचा होकार घेतल्यावर परेशने आपल्या आई बाबांना हे सांगितले .
त्यांना पण आनंद झाला .
रात्री झोपताना सुमनने गावी जायची थोडी तयारी करून ठेवली
आपल्या साड्या ,कपडे , मेकअपचे साहित्य एका ब्यागेत भरून ठेवले .
मुंबईचे कपडे ती गावी घेऊन जाऊ शकत नव्हती .
पण मध्यंतरी तिने लग्नातल्या साड्यांवर नवीन फ्याशनचे मुंबई स्टाईल ब्लाउज
शिवून घेतले होते,त्या साड्या तिने बरोबर घेतल्या .
मग ती परेशला म्हणाली ,
“अहो गावी जाताना मला खर्च करायला पैसे हवेत .
“तुझ्याकडे मी दहा हजार रुपये दिले होते ना ,
ते असतीलच की शिल्लक
“ते तर कधीच संपले ,शिवाय माझ्याजवळ दोन हजार होते ते पण संपलेत .
सुमन म्हणाली ..
“काय दहा हजार रुपये सगळे संपले ??
एवढे काय केलेस .?..परेशचा आवाज अचानक थोडा वाढला
साहजिकच होते ,घरातली भाजी दोन तीन दिवसांनी तोच ऑफिसमधून येताना आणत होता .
घरात लागणारा किराणा माल व दुध दुकानदार आणुन पोचवत होता त्याचे बिल परेशच देत होता .
मग सुमनने इतके पैसे कशासाठी वापरले असे त्याला वाटले ..
त्याचा चढलेला आवाज ऐकुन सुमनने नेहेमी सारखे डोळे मोठे केले ..
“मी ते पैसे माझ्यावर खर्च केले माझा मेकअप बॉक्सच तीन हजाराचा आहे ..
शिवाय कपडे शिवले त्याची शिलाई ..इतर मला लागणाऱ्या अनेक गोष्टी ..
सगळा काय तुम्हाला आता हिशोब देत बसू का .?
मला रोज जेवताना मिठाई लागते माहित आहे का ?
तुम्ही कधी विचारलेत का मला काय काय लागते ते ?
तिच्या मेकअप बॉक्सची किंमत आणि सगळे बोलणे ऐकुन परेश थक्क झाला ..
एक महिन्याच्या अवधीत तिने एकूण जवळ जवळ बारा हजार रुपये स्वतःवर खर्च केले होते.
ज्यात महिन्याभराचा किराणा माल आला असता .
ही एका लहान गावची मुलगी एकदम इतके पैसे खर्च करू शकते हे त्याला पटेना
त्याला काय बोलावे समजेना ..
खरे तर तिला काय हवे ते न मागताच त्याने घेऊन दिले होते ..
कपडे ,पर्स ,चप्पल ..नुकताच मोबाईल दिला होता
आणखी काय हवे सांगितले असते तर तेही दिले असते ..
वेगळे काय विचारायचे होते त्याने ..?
पण आता अधिक वाद घालण्यात अर्थ नव्हता .
त्याने आपल्या जवळचे दोन हजार रुपये तिला दिले
बास ना इतके ?असे विचारल्यावर ..
ठीक आहे मी चालवुन घेईन असे उत्तर आले .
रात्री मामा आणि त्याचे मित्र दोघेही आले .
सुमनचे अद्ययावत घर बघुन खुष झाले.
सुमनने त्यांच्यासाठी भरपुर पदार्थ केले होते शिवाय मिठाई पण आणली होती .
त्यांच्या थोड्या गप्पा झाल्यावर परेश पण आला .
सगळे एकत्र जेवले ,पुन्हा रात्री गप्पा करीत बसले .
उद्या सकाळी सुमन त्यांच्याबरोबर जाईल हा बेत पण पक्का झाला .
रात्री झोपायच्या वेळी बेडवर मामा आणि त्यांचे मित्र झोपले .
सोफ्यावर परेश झोपला ..आता त्या खोलीत जागाच नव्हती .
सुमन मग मागच्या बाजुच्या बाल्कनीत असलेल्या छोट्या बेडवर झोपली .
तिला तिथे फार अडचण वाटली,नीट झोप पण नाही लागली .
पहिल्यांदाच तिच्या लक्षात आले की तिचे घर फारच लहान आहे.
संडास बाथरूम तर अगदीच अडचणीचे आहे .
सकाळी उठून चहा ,नाश्ता झाल्यावर सगळे गावी जायला निघाले .
परेश केव्हाच त्यांचा निरोप घेऊन ऑफिसला गेला होता .
जाण्यापुर्वी स्वयंपाकघरात घट्ट मिठीत घेऊन त्याने तिचा निरोप घेतला होता .
ते तिघे गावी पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती .
मामी आणि चिंटू पिंटू वाट पाहत होते .
गेल्या गेल्या दोघे ताईला बिलगले ...
“अरे ,अरे ताईला आत तरी येऊ देतासा का न्हाय .?’.मामी म्हणाल्या .
सुमनने एका हाताने त्यांना बाजूला केले आणि हात पाय धुवुन आली ..
मामीने लगोलग तिची नजर उतरवली ..
खरोखर इतकी देखणी दिसत होती सुमन ..!!
लग्न आणि मुंबईचे राहणीमान तिला मानवले होते .
अंगाने भरली होती आणि चेहऱ्यावर एक तेज आले होते .
सुमनने आधी देवाला ,मामा ,मामींना नमस्कार करून मग पोरांना जवळ घेतले
त्यांना मुंबईचा खाऊ आणि खेळणी दिली , मामीला आणलेली साडी दिली .
रात्री दमल्यामुळे गप्पा करताना कधी झोप लागली समजलेच नाही तिला ..
दुसऱ्या दिवशी पासुन शेजारच्या पाजारच्या बायका तिला भेटायला बघायला येऊ लागल्या .
सुंदर दिसणारी सुमन ,तिच्या साड्या ,ब्लाउज ,मेकअप या गोष्टी बघुन
सगळ्याजणी अगदी थक्क होत होत्या .
तालुक्याहून तिच्या मैत्रिणी पण आल्या होत्या भेटायला .
अगदी तिच्या आवडत्या मिनुशी सुद्धा ती मोजकेच बोलली .
बघणाऱ्या प्रत्येकावर तिची मोहिनी पडत होती .
मामींनी दोन तीन दिवस तिच्या आवडीचे पदार्थ केले .
आला गेला ,चहा पाणी, यात मामीचा सगळा वेळ जात होता .
पण सुमनला बघुन समाधान वाटत होते त्या दोघांना .
सुमनला मात्र बिलकुल चैन पडत नव्हते .
येण्याऱ्या कोणाशीच बोलायला तिला फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता .
खरेतर याच गावात तिचे आयुष्य गेले होते ..
पण आता हे गाव तिला लहान वाटू लागले .
लोकांशी बोलायला,त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला तिला कंटाळा येत होता .
मामींनी तिला तिचे मुंबईचे आयुष्य ,तिचे घर याविषयी अगदी कुतुहुलाने बरेच प्रश्न विचारले .
पण ती फारशी उत्सुक नव्हती सांगायला ..
नाराजीने एकदा म्हणाली ,”अग मामी इतके लहान घर आहे आमचे मुंबईचे .
इकडे तिकडे हलायला पण जागा नाही बघ ...इथल्यासारखे प्रशस्त नाहीय काही .”
मामी आणि मामा दोघांना हे ऐकुन नवल वाटले ..
मामा म्हणाले ,”सुमे अग हे काय बोलणे तुझे ..?
मुंबईत सगळ्यांची घरे लहानच असतात .
आणि छान आहे की घर, घरात सगळे नवीन फर्निचर आहे ..
नुकताच नवा मोठ्ठा टीव्ही घेतलाय हिच्या हौशीखातर
किती नशीबवान आहे आपली सुमी !!!
नवरा सरळ साधा आहे निर्व्यसनी आहे ,हिची प्रत्येक इच्छा पुरी करतो ..”
मामा मामींना म्हणाले ...
मामींनी पण हे ऐकुन मान डोलावली.
सुमन मात्र काहीच न बोलता झोपायला निघुन गेली.
“काय ह्ये पोरीच वागन म्ह्नायच ..काय झाला आता हीला ..”
मामी थोड्या त्राग्याने म्हणाल्या ..

क्रमशः ..