Saitani Peti - Last Part in Marathi Horror Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | सैतानी पेटी अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

सैतानी पेटी अंतिम भाग

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे)

दोन्ही मुली आता लिसाच्या घरी राहायला लागल्या. एकेदिवशी रिहाना तिच्या रूममध्ये बसलेली होती. तेव्हा तिच्या हातात तो दात होता, जो तिला त्या पेटीमध्ये मिळाला होता..काही वेळात अचानक पणे तिचे डोळे सफेद व्हायला लागले, तसेच तिचा चेहराही ओबडधोबड झाला जसा तिच्या चेहऱ्याच्या आत कोणाचा तरी हाथ असावा असा.....

पीटरला राहून राहून ह्या सगळ्याचे मूळ ती पेटीचं वाटत होती..त्यादिवसानंतर तो ती पेटी परत घरी घेऊन आला आणि ती पेटी घेऊन पीटर त्याच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना दाखवायला गेला..त्यांना कदाचित ह्या पेटीबद्दल थोडे फार माहीत असेल ह्याची त्याला पूर्ण खात्री होती.

जेव्हा त्याने त्याच्या प्राध्यापकांना ती पेटी दाखवली तेव्हा त्यांनी लक्षपूर्वक त्या पेटीचे निरीक्षण केले. त्यांना पौराणिक वस्तूंचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी लगेच ह्या पेटीला ओळखले व ते म्हणाले, "ही पेटी Jewish प्रांतातील आहे आणि ह्यावर हिब्रू भाषेत काहीतरी कोरले गेलेय..ही एक dybbuk पेटी आहे..dybbuk म्हणजे जिवंत माणसाच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या वागण्याबोलण्यावर नियंत्रण ठेवणारा मृत व्यक्तीचा आत्मा..judaism धर्मामध्ये लोक चांगल्या व वाईट आत्म्यांमध्ये भरोसा ठेवायचे..त्यांनीच dybbuk ही पेटी बनविली होती..जिथे ते वाईट आत्म्यांना बंद करून ठेवत असत..ह्यामुळे ह्या पेटीला खोलने सोपे नाही.. कारण ही पेटी बनवणाऱ्यांना हे आवडणारच नाही की, ती पेटी खोलून तुम्ही त्या वाईट आत्म्याला मोकळे कराल.." आणि त्यांनी पीटरला ही पेटी न उघडण्याचा सल्ला ही दिला.

हे सगळे जाणून घेतल्यावर पीटरने इंटरनेटवर ही ह्याबाबत शोध घेतला..आणि त्याला काही jewish मंत्रतंत्र मिळाले जे खूपच त्रासदायक होते.. आणि त्याला कळून चुकले की रिहाना खूप मोठ्या संकटात आहे म्हणून पीटर लगेच लिसाच्या घरी गेला व त्याने रिहानाच्या जवळ बसून इंग्रजी अनुवादित हिब्रू बायबलच म्हणायला सुरुवात केली.. रिहानाने हे सर्व बघितले आणि तिची नजर पीटरवर पडताच त्याच्या हातातील पुस्तक लांब जाऊन पडले..

इतक्यात अचानक लिसा तिथे आली आणि तीने पीटरचे काही ऐकून न घेता त्याला घरातून बाहेर काढले..पीटर लिसाला खूप विनवणी करत होता..पण तिने त्याचे एक नाही ऐकले..

ह्यानंतर दुसरा मार्ग म्हणून तो दुसऱ्याच दिवशी ब्रूक्लीन या शहरात गेला. तिथे तो स्टीव्हन नावाच्या माणसाला भेटला..जो hesidic संघाशी संबंधित होता..स्टीव्हन पीटरला त्याच्या वडिलांना भेटवयास घेऊन गेला..जे खूपच पारंपरिक विचारवादी होते, तसेच त्या ठिकाणी त्यांच्या संघातील अजूनही काही अनुभवी लोक उपस्थित होते..पीटरने स्टिव्हनच्या वडिलांना dybbuk पेटी दाखवली..त्या पेटीला बघताच सगळे लोक मागे सरकले..जणू काही अशुभ पाहिल्या सारखे!!

स्टिव्हनने त्याच्या वडिलांना पीटरचे इथे येण्याचे कारण सांगितले..ते ऐकूण स्टिव्हनच्या वडीलांनी पीटरला विचारले की, "तू ही पेटी उघडलीस आहे का?"
त्यावर पीटर त्यांना असे म्हणाला की, "ह्या पेटीला माझ्या लहान मुलीने म्हणजेच रिहानाने उघडले होते"
असे बोलून त्यानंतर जे जे घडले ते सर्व पिटरने स्टिव्हनच्या वडिलांना जशासतसे सांगितले.

हे ऐकताच काही लोक त्या रूममधून बाहेर निघून गेली..पण पीटर आशेने स्टिव्हनच्या वडिलांकडे पाहायला लागला..कारण आता तेच त्याला मदत करू शकत होते..

तेव्हा स्टिव्हनचे वडील पीटरला म्हणाले की, "ही एक dybbuk पेटी आहे आणि ह्या पेटीमध्ये जी वाईट आत्मा होती तिला एक शुद्ध आत्मा हवी होती..ही आत्मा रिहानाला ३ अवस्थांमध्ये वश करेल..पहिल्या अवस्थेत त्या व्यक्तीला स्वप्न पडतील आणि विचित्र आवाज ऐकायला येतील..दुसऱ्या अवस्थेमध्ये ती रिहानाचे रक्षण करून बाकी लोकांशी वेगळे ठेवेल किंवा दूर घेऊन जाईल.. आणि तिसऱ्या अवस्थेत ती पूर्णपणे रिहानाच्या शरीरावर कब्जा करेल..ज्यामध्ये रिहाना आणि ती वाईट आत्मा एकरूप होतील..आणि रिहाना आता शेवटच्या अवस्थेत आहे..आणि लवकरच काही केले नाही तर ती पूर्णपणे त्या आत्म्याच्या कब्जात जाईल..ह्या आत्म्याला थांबविण्याचा एकच मार्ग आहे..तो असा की, तुला त्या सैतानी आत्म्याचे नाव घेवुन त्याला आदेश द्यावा लागेल की, 'तू त्या पेटीच्या आतमध्ये परत जा' आणि तो आत्मा आत गेल्यावर तुला ती पेटी कुलूपबंद करावी लागेल.."

पण पीटरला त्या सैतानी आत्म्याचे नावच माहीत नव्हते म्हणून त्याने स्टिव्हनच्या वडीलांकडे याबाबत मदत मागितली..पण त्यांनी ती देण्यास साफ नकार दिला...कारण कोणतेही मंत्रतंत्र करने अशा प्रथा आजकालच्या जगात बेकायदेशीर झाल्या आहेत..त्यामुळे मी तुला काहीही मदत करू शकत नाही.

हे ऐकून उदास होऊन पीटर ती पेटी घेऊन तिथून परत जायला निघाला..तेव्हा स्टिव्हन धावत त्याच्या पाठी आला आणि त्याने पीटरला शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले..

इथे रिहाना हळूहळू त्या आत्म्याच्या वश होत होती. त्या रात्री खूपच विचित्र घटना घडली..लिसा मध्यरात्री पाणी संपले म्हणून स्वयंपाकघरात गेली असताना तिला स्वयंपाकघरात थोडा उजेड दिसला..तिने पुढे होऊन पाहिले तर फ्रिज उघडे होते..आणि त्याचा अंधुक प्रकाश खोलीभर पसरला होता..तिला थोडे अजब वाटले..ती अजून पुढे जाणार इतक्यात तिला तिथे कोणीतरी असल्याचा भास झाला..पण नंतर तिला जे दृष्टीस पडले, ते इतके किळसवाणे होते की, पुढे जाण्याची तिला हिम्मतच होत नव्हती..तिथे दुसरे तिसरे कोणी नसून रिहाना होती आणि ती फ्रिजमध्ये ठेवलेले कच्चे मांस अगदी जनावारांसारखी खात होती..हे चित्र बघून लिसा खुपच घाबरली..इतक्यात रिहानाचे लक्ष लिसा कडे गेले.

रिहाना अगदी मृदू आवाजात लिसाला सारखी सारखी बोलत होती, "मम्मा मी नाहीये इथे..मी हे नाही करत आहे.." असे बोलता बोलता ती अचानक आक्रमक झाली आणि तिने चक्क तिच्या आईच्या म्हणजे लिसाच्या अंगावर काचेची भांडी फेकायला सुरुवात केली..पण अजूनही रिहाना पूर्णपणे त्या आत्म्याच्या काबीज न झाल्यामुळे तिने खूप ताकदीने स्वतःला रोखले..

ह्या घटनेमुळे लिसा खूपच घाबरली होती..तिने घडलेली सगळी हकीकत तिच्या प्रियकराला सांगितली. त्याला ही काही दिवसांपासून रिहानाचा स्वभाव थोडा बदलेला जाणवत होता..पण त्याने उगाच लिसाला त्रास नको म्हणून त्याबद्दल तिला तो काहीही बोलत नव्हता..त्याने लिसाला धीर दिला आणि त्याने यावर उपाय म्हणून रिहानाला एखाद्या चांगल्या मानसशास्त्रज्ञाकडे दाखवायला हवे असे लिसाला सुचविले..त्यानंतर ते दोघे झोपी गेले..

दुसऱ्या दिवशी सकाळी लिसाचा प्रियकर कामानिमित्त जाण्यास त्याची कार गेटच्या बाहेर काढत होता..इतक्यात त्याला त्याच्या गाडीच्या समोर रिहाना उभी असलेली दिसली..त्याने तिला बाजू होण्यास सांगितले..पण रिहानाने त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही..उलट ती एकटक त्याच्याकडे सारखी विचित्र नजरेने बघत होती..म्हणून तो गाडीतून खाली उतरून रिहानाला बाजूला करायला जाणार इतक्यात तिथे अचानक जोरात हवा सुरू झाली आणि लिसाच्या प्रियकराच्या तोंडातून अचानक रक्त यायला लागले आणि त्यातच त्याचे सगळे दात तुटुन बाहेर पडले..त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. हे इतके अचानक झाले की, तो घाबरून तिथून पळून गेला..

हे सगळे बघता बघता लिसा आणि जुलिया घरातून बाहेर आल्या आणि बघतात तर पुन्हा रिहानाच्या तोंडातून एक कीडा बाहेर पडला आणि रिहाना तिथेच बेशुद्ध झाली..

इथे स्टिव्हन dybbuk पेटी ची पाहणी करत होता..तसेच ती पेटी खोलण्याचा प्रयत्न ही करत होता..काहीवेळाने त्याने काही मंत्रोच्चार करायला सुरुवात केली आणि कोण आश्चर्य ती पेटी आपोआप उघडली गेली..

ती पेटी उघडताच त्यात त्याला एक आरसा दिसला..त्याने लगेच त्या आरश्याला तोडले. तो आरसा तोडल्यावर त्याला दिसले की, त्या आरशाच्या पाठीमागे त्या पेटीवर त्या वाईट आत्म्याचे नाव कोरलेले होते..आणि त्या आत्म्याचे नाव होते "अबीजू".

इथे रिहाना बेशुद्ध झाल्यावर लिसा तिला इस्पितळात घेऊन गेली आणि ती शुद्धीवर येण्याआधी तिने डॉक्टरांना रिहानाचा MRI स्कॅन करायला सांगितला..जेणेकरून हे कळेल की तिच्या तोंडातून किडा कसा बाहेर आला..डॉक्टर स्कॅन करत असताना लिसाला संगणकामध्ये रिहाना च्या शरीरात एक विचित्र अशी दानवी आकृती दिसली..ती हे बघून इतकी घाबरून गेली की, काय करावे हे तिला सुचत नव्हते..

तेवढ्यात त्या इस्पितळात पीटर, जुलिया आणि स्टिव्हन पोहोचले..पीटर आणि स्टिव्हन जेव्हा ती पेटी घेऊन लिसाच्या घरी गेले. तेव्हा जुलियाने पीटरला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि मग ते तिघेही इस्पितळात यायला निघाले..लिसाला त्या सर्वाना पाहून खूप धीर आला..

स्टिव्हनने सर्वाना सांगितले की, जर आपल्याला रिहाना ला पहिल्यासारखे करायचे असेल तर इथेच तिच्यावर मंत्रोच्चार करावे लागतील..मग लिसा, पीटर, स्टिव्हन आणि जुलिया हे चौघे रिहाना ला इस्पितळाच्या फिजिकल रूम मध्ये घेऊन गेले आणि इथे सुरू झाली रिहानाच्या मंत्रोच्चाराची प्रक्रिया..

मंत्रोच्चार सुरू झाल्यावर स्टिव्हनने परिवारातील सगळ्यांना काहिनाकाही ह्या पेटीमध्ये टाकायला सांगितले..जे त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचे असेल अर्थात घडयाळ, स्वतःचे केस, फॅमिलीचा फोटो, लग्नाची अंगठी इत्यादी..

जशी स्टिव्हनने मंत्रोच्चाराच्या विधीला सुरूवात केली तशी रिहाना तिच्या सैतानी रुपात येऊन सगळ्यांवर हल्ला करायला लागली..हे पाहून पीटर जोरजोरात त्या आत्म्याला बोलवायला लागला.. जेणेकरून रिहाना चे शरीर सोडून देऊन त्या आत्म्याने पीटरला स्वतः शिकार बनवावे..पण रिहाना धावत जाऊन मुद्दाम दुसरीकडे लपून बसली..पीटरही तिच्या पाठी पाठी गेला आणि रिहाना पीटर वर हल्ला करणारच होती, पण तो त्यातून कसातरी वाचला..

पण विधी सुरू असताना अचानक त्या आत्माने रिहानाचे शरीर सोडून पीटर च्या शरीरात प्रवेश केला आणि ती तिथेच बेशुद्ध झाली..पीटर रिहानाला घेऊन परत सगळे होते त्या ठिकाणी आला..

सगळ्यांना वाटले की, तो सैतानी आत्मा पळून गेलाय..पण स्टिव्हन समजून होता की, त्या आत्म्याने दुसऱ्या एका शरीराला वश केले आहे..स्टिव्हन जोरजोरात "अबीजू" हे त्या आत्म्याचे नाव घेऊन त्या आत्म्याला dybbuk पेटीमध्ये परत जाण्याचा आदेश द्यायला लागला..

तेव्हा अचानक पीटर च्या शरीरावरचे हावभाव बदलताना दिसले आणि त्याच्या तोंडून एक सैतानी आकृती बाहेर येताना दिसली..ती दूसरी तिसरी कोणी नसून "अबीजू" होती..स्टिव्हनने दिलेल्या आदेशामुळे ती त्या पेटीमध्ये खेचली जात होती आणि एकदाची ती सैतानी आत्मा त्या dybbuk पेटीमध्ये बंदीस्त झाली..स्टिव्हनने ती पेटी पुन्हा मंत्रोच्चाराने बंद केली व या परिवाराचा निरोप घेतला..तसेच 'रिहाना आता पूर्णपणे बरी झाली आहे', असेही तो म्हणाला. पीटर व लिसा दोघांनीही स्टिव्हन चे आभार मानले आणि त्याला निरोप दिला..पण ह्या सर्व घटनांमुळे लिसा आणि पीटर पुन्हा एकमेकांच्या जवळ आले.. तसेच ते दोघे आणि जुलिया व रिहाना सगळे सोबत एकत्र आनंदाने राहू लागले..

इथे स्टीव्हन त्या पेटीला घेऊन ब्रूक्लीनला निघाला. तेव्हा वाटेत त्याची कार अचानक एका ट्रकला आदळली आणि त्याच्यात स्टीवनचा जागीच मृत्यू झाला. पण ह्या अपघातात ती dybbuk पेटी रस्स्यावर फेकली गेली..

म्हणजे आता दुसरे कोणी त्या सैतानी पेटीला उघडेल आणि "अबीजू" त्याला त्याची शिकार बनवेल..!!!!!!

~समाप्त~

[ही सत्यकथा २००० सालची आहे. केविन नावाच्या माणसाने एका १०३ वर्षाच्या महिलेच्या जुन्या इस्टेटीमधून ती पेटी विकत घेतली होती..ती महिला तिच्या नातीला ती पेटी उघडायला मनाई करत असे..जेव्हा केविन ने ती पेटी विकत घेतली तेव्हा त्याला त्याच्या एका सहकाऱ्याचा फोन आला..की, खालच्या दुकानात कोणीतरी तोडफोड करत आहे..जोपर्यंत केविन तिथे पोहोचला तोपर्यंत तो सहकारी तिथून पळून गेला होता..आणि तिथे फर्निचर व काचेचे तुकडे पडलेले होते..केविन चा तो सहकारी परत कधी नाही आला..त्यानंतर केविन ने ती पेटी त्याच्या आईला भेटवस्तू म्हणून दिली..ती पेटी देताच त्याच्या आईला एक अटॅक आला त्यात तिची बोलण्याची क्षमता गेली..त्यानंतर केविनने त्याच्या परिवार आणि मित्र-मैत्रिणींनाही ती पेटी देण्याचा प्रयत्न केला..पण ते सर्व काही दिवसातच त्या पेटीला परत देत असत..जो पण ती पेटी घेत असे त्याच्याबरोबर काहींनाकाही वाईट जरूर घडत असे..आणि सगळे लोक म्हणत होते की, ही पेटी कोणत्या ना कोणत्या कारणाने शापित आहे..कोणाच्या घराचा दरवाजा आपोआप उघडायचा, तर कोणाच्या घरात जास्मिन या फुलाचा किंवा मांजराच्या मुताचा वास येत असे..
असे म्हणतात, अशाप्रकारच्या शापित पेटीला तोडू नाही शकत कारण असे केल्यास त्यात असलेला तो सैतानी आत्मा मुक्त होऊन एखाद्या व्यक्तीला वश करायला बघतो..अशातच केविन ला भीतीदायक स्वप्न पडू लागली होती..तसेच त्याच्या परिवारातील लोकांनाही तशीच स्वप्ने पडत होती..
१३ तारखेच्या शुक्रवारी केविनच्या घरातील फिशटॅन्क मधले १० मासे त्याला मरून पडलेले दिसले..मग कंटाळून केविन ती पेटी ebay नावाच्या वस्तू खरेदी विक्री संकेतस्थळावर एका विद्यार्थ्याला विकली..त्याचे नाव नेटस्की होते..तो म्हणाला ती पेटी त्याने विकत घेतल्यापासून त्याच्या खोलीतील सहकाऱ्यांना वाईट अनुभव आले..ते आजारी पडू लागले, याचबरोबर कीटक आणि मेलेले उंदीर ही त्यांच्या खोलीत मिळू लागले..तसेच त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणेही खराब होऊ लागली..आणि नेटस्कीचे तर केस ही गळायला लागले.. सध्या तो बॉक्स एका संग्रहालयात आहे..तेथील माणसे बोलतात की, ह्या पेटीमध्ये अश्या आत्मा असतात ज्याच्या इच्छा अपुऱ्या राहतात..आणि ह्या पेटी द्वारे त्या ते पूर्ण करतात..]

(ही कथा आवडल्यास ह्या कथेला लाईक आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ह्या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नाही..ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती )
©preetimayurdalvi