perjagadh - 15 in Marathi Fiction Stories by कार्तिक हजारे books and stories PDF | पेरजागढ- एक रहस्य... - १५

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

पेरजागढ- एक रहस्य... - १५

१५) रितुला ताईत मिळणे...


इन्स्पेक्टर राठोड... जेव्हापासून त्यांनी माझ्या केस वर लक्ष द्यायची वेळा चालू केली होती. तेव्हापासून एक त्यांच्या जीवनात एक वेगळाच प्रवास चालू झाला होता. कधी त्यांनाही वाटले नव्हते की जगात अस्तित्वाच्या बाहेरही विशाल जग आहे म्हणून. कारण दंतकथा पेक्षा तंतोतंत उदाहरण त्यांना फार अधिक प्रमाणात आवडायचे.

तसं राठोडला म्हणजे पोलिसांना बघण्याचा प्रत्येक गावकऱ्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे साधा माणूस जेवढा जनसामान्यात मिसळून हवी ती माहिती काढून घेतो तसा ह्या पोलिसाला जमले नसते. पण प्रयत्न आधी त्याचे चालू होते. मी कोणाची भेट घेतली? कुठे वगैरे जायचो? वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नोंदी केल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी पेरजागडावर जाण्याचा बेत करून तो आपल्या घरी चालला आला.

उद्या सुट्टीचा दिवस आहे असे म्हणत, त्याने सकाळी सकाळीच चिकन आणली घरी आणि मस्तपैकी जेवण करून सोबत्याला फोन केला.

कोण नागरे बोलतोय का?उद्या आपल्याला पेरजागडावर जायचंय. त्या प्रकरणी शिंदे यांना फोन लावा आणि त्या भिडेलासुद्धा बोलवा. सगळ्यांना पोलिस चौकीजवळ व्हायला सांगा. लवकरात लवकर हे प्रकरण संपवायला हवं. कळलं ना....मग चला लागा तयारीला.

इकडे माझी प्रकृती दिवसेंदिवस अशा पद्धतीने खालावत चालली होती, की जणू अंगावरच मास कोणी ओढून नेत आहे.कारण जागोजागी पडलेल्या जखमा आणि हाडांचा सापळा तेवढा उरला होता. प्रत्येक डॉक्टर रीतुला देवाच्या प्रतिमेकडे बोट दाखवत होता. आणि तीही बिचारी रोज गंगा-यमुना गाळत माझ्या जीवाची अभिलाषा धरून होती.एक विश्वास जो आजही तिच्या मनामध्ये जिवंत होता. एक अतुट धागा आजपर्यंत ती विणत आली होती. शेवटच्या शब्दाच्या धीराने आजही ती माझ्यात गुंतलेली होती. अगदी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत.

कधी वाटलं सुद्धा नसेल तिला, की माझ्या प्रेमाची अनुराधा जपताना तिला इतक्या विशाल यातनांना सामोरे जावे लागेल. सुख म्हणता म्हणता दुःखाच्या कितीतरी रात्री तिने सोसून काढल्या होत्या. फक्त एका विश्वासावर माझ्या परत येण्यावर.

शेवटी एका स्त्रीचं मन कोणीच जाणू शकत नाही हे मात्र खरं आहे. कारण बघा ना तिच्यासाठी केलेला त्याग सुद्धा तिला माझ्यातून घालू शकला नाही. चार चौघात केलेला अपमान सुद्धा तिच्या प्रेमाला तडा देऊ शकला नाही. इतक्या विश्वासावर तर ती सती बनुन मृत्यू देवाकडून सुद्धा माझे प्राण आणू शकत होती.आजच्या या धावपळीच्या युगात खरं प्रेम काय असतं हे जर कुणाला विचारलं तर लोकं हसतात कारण प्रेमाला खरं करण्याची तेव्हढी फुरसत उरली कुठे? सगळे टाइमपास समझतात.आणि टाईमपासच करतात.

वासनेने बरबटलेले डोळेही त्यांना नशिले वाटू लागतात. शरीर वासनेचं सुख म्हणजे प्रेम,आणि कंटाळा आला की मग प्रेमभंग, आणि मग चालते विरह, यातना, दुःख. पण लोकांना समजत कसं नाही. एवढं सगळं करताना आपल्यात असणारे प्रेम हे उरलंच कुठे होतं. याची जाणीव कधीच करणार नाही. फक्त धोका दिला म्हणून आत्महत्या करतील. नाहीतर बदला म्हणून त्यांचं बरं वाईट करून तुरुंगामध्ये जातील. पण तेच प्रेम असं निष्काम असेल तर काय जग सोबतीला नसेल. ज्याला अख्ख्या जगाने स्वीकार केलाय त्याला अपवाद काय करणार. पण कुणी त्या गोष्टीचा कधीच विचार करणार नाही.

माझं प्रेम टिकवण्यासाठी आयुष्याला एक लाभलेला धागा होता रितू. कारण ती नुसतं प्रेमच नाही तर तिच्यात मला जीवन लाभलं असं म्हणू शकतो. कारण एक स्त्री असते माणसाला घडवणारी, आणि तुडवणारी पण. माझ्या तप्त आणि क्रुश देहाकडे बघत न जाणे कोणत्या विचारात असायची. तासनतास तिलाच ठाऊक. त्या दिवशी आईच्या हट्टामुळे इतक्या दिवसापोटी हॉस्पिटलच्या बाहेर आली होती. नवीन रुग्ण किंवा त्यांचे आप्त गण रडतांना बघून तिच्यात कसलीच प्रक्रिया होत नव्हती. कारण मृत्युपणाचा आव आणून ती किती रडत असते कदाचित याचा अंदाज लावू शकत नव्हतो. तिच्या डोळ्यांना अशी शिक्षा व्हावी याचे उत्तर मात्र सतत ती त्याला मागत होती. खरं तर माझ्याकडून तिला राहणे अवघड होतं पण झालेल्या इतक्या दिवसांच्या बैठकीत मुलींच्या मनावर कसले दडपण नको यायला म्हणून आईने तिला बाहेर जबरदस्तीने पाठवले होते. कारण इतक्यात रीतुला बाहेरच्या जगाचा विसर पडला होता.मला ठेवलं होतं तेच तिची रूम आणि सर्वस्व काही झालं होतं.

आज उन्हाची प्रखर किरणे तिला बघवत नव्हती. त्यामुळे जरा चालत ती आवारात असलेल्या बदामाच्या झाडाखाली येऊन बसली. येणाऱ्या जाणाऱ्याकडे कुठेही न बघता बुंध्यावर पाय घेतले. आणि दोन्ही पाय छातीच्या जवळपास घेऊन स्वतःचा चेहरा त्यात लपवून घेतला. स्वतःला कैद करून टाकलं तिने. या धावपळीत नको होता तिला कुणाचा हसरा चेहरा फक्त माझी आठवण आणि एकांत. कारण माझ्या सोबत जोडलेलं तिचं अस्तित्व मला वगळून काहीच नव्हता.

न जाने कितीवेळ दुःखाच्या प्रखर निराशेत ति तीथे बसून होती. बदामाच्या झाडाला बुंधा बांधलेला असल्यामुळे येणारा जाणारा सावलीसाठी अलगद त्यावर जाऊन बसायचा. आणि सहज कुणाची लक्ष जाईल तरी समजून घ्यायचं की हॉस्पिटलमध्ये कुणीतरी ऍडमिट असावा. पण यावेळेस ज्याचा आभास झालं तो तिला बघून उठला नाही तर तिला ऐकू येईल अशा पद्धतीने तो तिला बोलू लागला.

दुःख उराशी आहेत, पण धीर सोडू नको बाळा. उतार-चढाव प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे.जातील दुःख हे ही अगदी तळाशी जातील, तो निघालाय प्रवासाला कारण स्वतःची ओळख करताना चुकला होता. तो मिळेल तुला.. डोळे उघड मुली, मिळेल तो तुला, पेरजागडावरून नक्की येईल.

पेरजागडाचे नाव घेतलं तसं रितूच्या मनात चांदणे चमकले.तिने डोळे उघडले पण तिला आतापर्यंतचा ज्याचा आवाज झाला किंवा ऐकू आला असं काहीच तिच्याजवळ नव्हतं. पण तिच्या बाजूला एक ताईत होता. तिने अचूक हेरले की आत्ता झालेला आभास काही साधासुधा नव्हता. नक्की कशाचा तरी निमित्त होता. आणि ताईत उचलून ती उभी झाली व तिथून पवनच्या रूम कडे जलद गतीने निघायला लागली.

नुकतेच डॉक्टर चेकअप करून निघून गेले होते आणि आई माझ्यापाशी बसून आसवें टिपत होती. केव्हा उठशील रे माझ्या राजा.. म्हणून सारखी मला विचारत होती. आई म्हणून रितुने तिच्याकडे झेप घेतली आणि दोघे पुन्हा एकदा अश्रुंच्या पावसात ओलेचिंब झाल्या. नंतर रितुने बाहेर घडलेली हकीकत तिला सांगितली आणि आईने तो ताईत माझ्या उजव्या हाताच्या दंडावर बांधला.कारण हे सगळं माझेच बोल होते की माणसाने सगळं करून सोडावं पण कधी सोडून करू नये. देव प्रत्येकाच्या पाठीशी असतो असं नाही, पण धडपड करणाऱ्याच्या तर नक्कीच असतो. आज त्या बोलण्याला यश आलं होतं.

रोजच्यासारखं मग रितुने आईला घरी पाठवले आणि माझ्यापाशी ती येऊन बसली. बसल्या बसल्या ती विचार करू लागली त्या गोष्टीवर कोण असेल तो? कोणीही असो. पण ताईतला यश येवो. माझा पवन मला माझ्या जवळ येऊ दे, इतकीच प्रार्थना.