Lost love ........ # 29. in Marathi Moral Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | हरवलेले प्रेम........#२९.

Featured Books
Categories
Share

हरवलेले प्रेम........#२९.




काही दिवसांनी सगळे भेटतात....जायची तयारी सुरू असते.....😎😎त्या दिवशी दुपारी सगळी जाण्याची व्यवस्था ऋषीच्या बाबांनी केलेली असते......

सगळे इव्हेंट डेस्टिनेशन वर जाऊन पोहचतात... छान अरेंजमेंट केलेली असते.....सगळे फ्रेश व्हायला रूम्स मध्ये जातात.... सगळ्यांचे रूम वेगवेगळे असतात... पण, अमायरा आणि रेवा एकच रूम घेतात..... दोघी फ्रेश व्हायला जातात......आधी अमायरा फ्रेश व्हायला जाते.....रेवा टीव्ही सुरू करून बसलेली असते..... डोअर बेल वाजते......

रेवा : "आता कोण असणार....??🙄🙄"

ती दार उघडते......बाहेर एक अनोळखी मुलगा उभा असतो.....चेहऱ्यावर एक हास्य असतं....😁

@@@ : "हॅलो......मी वृषभ...... वृषभ देशमुख....😎 ऋषीच्या आत्याचा मुलगा......😎"

रेवा : "मग मी काय करू....🤔"

वृषभ : "जास्त काही नाही.......म्हटलं..... ऋषीच्या मैत्रिणी म्हणून ओळखी पटलेली बरी.....😁😎"

तिकडून ऋषी येतो......

ऋषी : "ये......काय रे तुझं......नवीन मुली काय दिसल्या 🤷 तर चालला......चल निघ इथून.....लांब रहायचं.... कळतंय.....निघ.....😠"

तो रागातच निघून जातो.....

रेवा : "अरे हा काय विचित्र आहे.....😲सरळ आला ओळखी नाही काही नाही.....बिन बुलाये मेहमान...😏😏"

ऋषी : "अग तू नको टेन्शन घेऊस......तो आहेच तसा..... मूर्ख.....अत्यालाच वाटते त्याचं नवल..... बर....तुला त्रास तर नाही ना दिला...😠??"

रेवा : "तुझ्याशिवाय मला दुसरं कुणी त्रास देऊ शकतं का.....🤣🤣🤣"

अस म्हणत ती रूम मध्ये पळाली......तो ही तिच्या मागे आत शिरला.....त्याने तिचा हात पकडुन स्वतः कडे ओढले...... दोघे समोरासमोर.🥰.....नेमकी त्याच वेळी अमायरा बाहेर आली...😜.. दरवाज्याच्या आवाजाने दोघेही लांब झाले......😁

अमायरा : "अरे......तू कधी आलास.....🙂"

ऋषी : "काही नाही सहज काही हवं काय हे विचारायला आलेलो.....जातो मी....तुम्ही फ्रेश होऊन मला कॉल करा...दोघीच एकट्या नका फिरू... कळलं...🤨आणि त्या वृषभ पासून लांब........ रेवू.....ओके..."

अमायरा : "आता हा कोण नवीनच नमुना....🤨"

ऋषी : "सांगेन नंतर तुम्हा दोघींना.....🙂येतो मी....."

ऋषी जातो रेवा तिला सर्व वृषभ येऊन जे काही बोलला सांगते....

अमायरा : "Ohhh...... म्हणजे इथही मूर्ख लोक मिळणारच.....🤦🤷"

रेवा : "मूर्ख सगळेच असतात.....आपण त्यांच्या सुप्त गुणांना किती वाव देतो....यावरून त्यांचा वेडेपणा बाहेर येतो...🤣🤣"

दोघीही खूप हसतात.....🤣🤣🤣रेवा फ्रेश व्हायला जाते..... तोपर्यंत अमायरा साँग्ज ऐकत बसते....🥰रेवा फ्रेश होऊन आल्यावर ऋषीला कॉल करते.......तो त्यांना घेऊन जातो.....




बाहेर आई - बाबा सगळे असतात......तिथे सगळ्यांशी रेवा आणि अमायराची ओळख करून देतो....

ऋषी : "So, revu... meet my family.... हे काका - काकू, हा शंतनु दादा, ही त्याची बहीण मनश्री जिचं लग्न आहे, हे आत्या - मामा, हा त्यांचा मुलगा वृषभ, त्याची बहीण दीक्षा....🙂. ही रेवा आणि अमायरा माझ्या कॉलेज फ्रेंड्स....🙂"

आत्या : "कॉलेज फ्रेंड्स की, अजून काही...🤨"

ऋषी : "हे बघ आत्या, ही माझी पर्सनल लाईफ आहे माझं मी ठरवू शकतो.....😏"

आत्या : "स्वतःच रक्त नसलं की, असच होतं.....बघा.....😏😏"

ऋषी : "...😠😠😠 आत्या तू खूप जास्त बोलतेस..... आजपर्यंत माझे आई - बाबा मला इतकं खालच्या पातळीत कधीच बोलले नव्हते.... तुझ्याकडून अपेक्षाही काय ठेवावी म्हणा...😠.....स्वतःचे मुलं नाही सांभाळून होत.....काय तू दुसऱ्यांना शिकवतेस....😠😠😠😠"

रेवा : "ऋषी चल इथून.....😓"

रेवा त्याला ओढतच दुसरीकडे घेऊन जाते......

बाबा : "ताई अस कशाला बोलतेस ऋषिला......जिथं गेलीस तिथं तू तमाशे करणार आहेस वाटतं...🤨🤨"

आत्या : "तुला तर त्या परक्या मुलालाच जास्त लाड....😏"

बाबा : "मोठी आहेस म्हणून मान ठेवतो....पण, याचा अर्थ हा नाही..... की, तुला आमचा अपमान करण्याचा हक्क दिलाय.....😠😠 अग तो माझा रक्ताचा नसला ना.. तरी, जवळचा आहे तुम्हा सगळ्यांपेक्षा....तुम्ही काय....पैसे असले तोपर्यंत याल... संपले की....नातं ही संपत...हे वेगळं सांगायची मला गरज नको पडायला....नाही का ताई..... जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं.....सगळ्यांनी तोंड फिरवून गेलात ना....आणि जेव्हा सगळं आलं तेव्हा दादा - दादा करत आलात सगळे....माझं आता जास्त तोंड न खराब केलेलच बर होईल..... तुम्हा सगळ्यांसाठी...... कळतंय ना...😡आणि रमेश(ऋषीचा काका) हे असच चालणार असेल तस सांग आम्ही निघतो......आम्हाला स्वतःचा अपमान करून घेण्यात काहीही इंटरेस्ट नाही.....😡😡"

ते रागातच जायला निघतात......काका त्यांना थांबवतात.... पुढे काही न होण्याची Responsibility घेतात......

तिकडे रेवा ऋषीला समजावण्याचा खूप प्रयत्न करते...पण, तो काही शांत होतच नाही.....

ऋषी : "सगळे नेहमी हेच दाखवून देतात....की, मी त्यांचा नाहीच आहे.....पण, आई - बाबांनी कधीच मला जाणीव करून दिली नाही....आई सांगायची, जेव्हा बाबा कडे काहीच नव्हतं....... कुणी साधं त्याला विचारतही नव्हते....आज सगळं आलं तर येतात सगळे.....😭😭"

रेवा त्याला मिठीत घेते.....शांत करते.....🥰💞

रेवा : "शांत हो बाळा.....अस नाही रडायचं.... आपण खचतो.....आणि समोरच्याला तेच हवं असतं....म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याच भाषेत द्यायची.... कळलं...😎😠😡"

ऋषी शांत होतो.....रेवाला जोरात मिठीत घेतो....

ऋषी : "हो......आता म्हणू दे काही बघतोच मी.....😠😎"

रेवा : "ये... बात...👏..मेरे शेर.....🐯"

ऋषी : "हा मेरी शेरणी.....🤣🤣🤣"

दोघेही हसतात🤣🤣🤣🤣 आणि मंडपात जातात.... मेहंदीची तयारी सुरू असते.....मेहंदी आणि संगीत ceremony एकाच दिवशी असते........आणि दुसऱ्या दिवशी हळद असते.....


🎊🎉मेहंदी 🎉🎊











🎶🎶 संगीत 🎶🎶












संगीतमध्ये ऋषी आणि त्याची फॅमिली जास्त involved नसते..... सगळ्यांचा मूड ऑफ झालेला असतो.....म्हणून त्यांच्याच आत्या आणि काकांची मुलं - मुली आणि त्यांचे फ्रेंड्स एन्जॉय करतात....

रात्री सगळे झोपायला जातात.... रेवा आणि अमायरा सुद्धा जाऊन झोपून जातात...उद्या हळद असते..... मॉर्निंगला उठायचं असतं.......

रात्री रेवाला मेसेज येतो.....

ऋषी : "रूम बाहेर ये....मी उभा आहे...."

रेवा : "इतक्या रात्री...🙄🙄 कुणी बघितलं म्हणजे....😲"

ऋषी : "मी आहे ना कुणी नाही बघणार...ये...."

ती बाहेर जाते ....ऋषी उभा असतो....तिला मिठी मारतो..... आणि कपाळावर किस करतो....ती लाजते.....🥰💞

रेवा : "यासाठी बोलावलं होतं का....😌😌"

ऋषी : "हो जा झोप आता...मला छान झोप येईल.... आज....😘😘"

रेवा : "गूड नाईट.....😘😘"

ऋषी : "गूड नाईट...🥰🥰"

तो आणि ती दोघेही जातात .....मात्र कुणीतरी त्यांना लपून बघत असतो....तोच वृषभ.....आणि हसतो...😁

वृषभ : "म्हणूनच तिच्या लांब रहायला सांगतो मला...... बघतोच मी.....ऋषी आता बघ कशी मजा घेतो.... तुझ्या.... तिची.....😁😁"

सकाळ होते...... हलदी डेकोरेशन्स..🎉🎊🥰










🎉🎊🥰..नवरी..🥰🎊🎉




💞🥰आई - बाबा..🥰💞



ऋषी आणि रेवा आधी साध्या लूक वर फोटोज् काढतात....





रेवा नंतर चेंज करून लेहंगा घालून येते.......🥰दोघीही खूप सुंदर दिसतात....🥰




दोघी एका ठिकाणी बसल्या असतात......तिकडून वृषभ ज्यूस घेऊन येतो....आणि जाणून रेवाच्या कपड्यांवर सांडवून तिचे कपडे खराब करतो.....

रेवा : "डोळे फुटलेत का......😡"

वृषभ : "तोंड सांभाळ......."

रेवा : "तू तुझी नजर आणि हात दोन्ही सांभाळ.....😡😡"

वृषभ : "ये.....जास्त नको बोलुस....."

तो तिच्यावर हात उचलतो......मधात ऋषी येतो आणि त्याला लागते......ऋषी त्याचा हात मोडून मागे पकडतो......

ऋषी : "आपली लायकी विसरलो की, ही अशी लक्षणं आपल्याला दिसतात.....आणि लायकी कशी ठिकाणावर आणून द्यायची हे मी चांगलाच जाणतो.....🤬तिला हात लावून दाखव...... नाही तुझा हात तोडून फेकला...... याद राख.......🤬निघ इथून......"

तो हात सुटताच खूप रागात येतो.....आणि बरडतो.....

वृषभ : "बघून घेईल.......तुम्हा दोघांना...."

ऋषी : "अरे......जा.....आधी... स्वतःच तोंड बघ....आणि आहोत इथेच आम्ही....बघ.....🤬"

सुदैवाने तिथं कुणी फॅमिली मेंबर्स पैकी मोठं नसतं........😓

ऋषी : "रेवू....तू ठीक आहेस ना...🙄🙄 जा चेंज करून घे....😘😘"

अमायरा तिला घेऊन चेंज करायला जाते......



ऋषी तिच्याकडे बघतच बसतो...आणि तिच्यासोबत एक फोटो काढतो......📸🥰🥰

ऋषी : "काय गोड दिसते रेवू......😘🥰"

रेवा : "Thanks..😘"

ऋषी : "Always Welcome...🥰"

रेवा आणि अमायरा नवरीच्या हळदीच्या ceremony
असलेल्या ठिकाणी जातात.....तिथे वृषभ ही असतो.....तो एकदम रागात रेवाकडे बघत उभा असतो.... रेवाही मस्त attitude दाखवत उभी असते.....

नवरीला हळद लागते.....सगळे हळद खेळतात....ऋषी रेवाच्या मागे धावतो.....तिला पकडतो...आणि नाकावर एक बोट हळदीचे लावून नंतर गालावर लावतो....ती तोच गाल त्याला लावते....🥰

हे सर्व बघून वृषभ चिडतो.....आणि बाहेर निघून जातो...सगळे मस्ती करतात.......आणि नंतर जेवण करून आपापल्या रूम मध्ये जातात....

अमायराला शशांकचा कॉल येतो.....

शशांक : "Hey.....Amo...😘"

अमायरा : "Hey..... Amish.....😘😘"

शशांक : "आमची आठवण आलीच नाही वाटतं....मॅडमने एक कॉल सुद्धा नाही केला..😒.."

अमायरा : "अस काही नाही...Amish....🥰खूप आठवण येते तुझी....Infact..... Always......🥰"

आणि ती वृषभ बद्दल त्याला सर्व सांगते....

शशांक : "...🤬😡 दूर रहायला सांग......ऐकत नसेल तर तेव्हाच मला कॉल कर मी बघतो त्याला....🤬😡"

अमायरा : "तू नको काळजी करुस.... ऋषीने त्याला त्याच्या भाषेत सांगितलंय....😘😘"

शशांक : "मग ठीक आहे....असे मजनू किती असतात..... लग्नात...तू स्वतःची काळजी घे....कुणी त्रास दिलाच तर सांग माझा बॉय फ्रेंड DYSP आहे.....😎😎"

अमायरा : "बॉय फ्रेंड...🙄🙄"

शशांक : "त्यांना सांग....🤣🤣.."

अमायरा : "Fine....😏😒😒"

शशांक : "चल मी नंतर बोलतो.....😘😘"

अमायरा : "Ok....Bye....😏"

तो फोन ठेऊन विचार करतो.....

शशांक : "मला माहिती आहे अमो तुझ्याही मनात आहे काही....पण, तुला मी १४ फेब्रुवरीला सरप्राइज देईल तेव्हा तू खूप खुश होशील मला माहितीये.....😘😘"

रेवा : "काय म्हणाला तुझा शशांक....😁😁😁😁"

अमायरा : "As usual......Busy.....😏😏😒😒"

रेवा : "नको ग काळजी करुस....करेल तुला तो प्रपोज.....मी सांगते ना....चल खूप रात्र झाली उद्या लग्नासाठी रेडी व्हायला चार तास लागतील मॅडम झोपा.....😘 गूड नाईट...😘😘"

अमायरा : "गूड नाईट....😘😘"

सकाळी.....

आज लग्न असतो.....सगळे मस्त रेडी होतात.....अमयारा आणि रेवाच महत्त्वाच्या....आपल्यासाठी....🥰😘😘

रेवाचा लेहंगा अटकतो..... अमायरा व्यवस्थित करायला खाली बसते.....🥰🥰😘



तिकडून ऋषी मस्त तयार होऊन येतो....😎😎

ऋषी : "रेवू.....तू एकदम परफेक्ट आहेस बघ..... माझ्यासाठी....🥰"

रेवा : "...☺️☺️😌"

ऋषी : "चला दोघी माझ्या सोबत तो वृषभ आला की, त्रास देईल.....मग मी परत हायपर होईल.....चला...."

ते लग्न हॉल मध्ये जातात....🎊🎉🥰



वृषभ, ऋषी आणि रेवाकडेच बघत असतो....🧐🧐 लग्नात ऋषीची फॅमिली जास्त involved नसते.....ते सगळे एका राऊंड टेबल भोवती बसले असता.....एक बाई तिथे स्वतःच्या मुलीला घेऊन येते....

बाई : "नमस्कार वहिनी...मी शामला क्षीरसागर.... प्रल्हाद क्षीरसागर आहेत ना त्यांची वाइफ....ही माझी मुलगी..... शिवानी.....खूप गुणी आहे..... एम.एस.सी. झालंय हीचं.....😊हिच्यासाठी आम्ही स्थळ शोधतोय..... आम्हाला काय वाटतं ना, ऋषी आणि ही छान जोडपं शोभतील..... बघा विचार करून....हो की नाही...."

ती बाई ऋषीच्या आई - बाबांना अती उत्साही वाटते...🤣🤣

आई : "ये बाळा बस....इथे...."

शिवानी बसते....

आई : "बाळा.....मला सांग....मुलींनी करीयर करावं की, फक्त घर सांभाळावं.....🤨"

शिवानी : "घरच सांभाळावं...कारण, नवरा कमावतो ना....आणि ऋषी सारखा नवरा मिळाला की, कमवायची काय गरज आहे...☺️"

आई : "आणि जर तुला पटलं नाही त्याच्या आईच किंवा तुझ्या सासुचं वागणं म्हणजे...."

शिवानी : "म्हणजे काय....वेगळं रहायचं....कशाला डोकं खराब करून घ्यायचा.....नाही का...😏😏"

आई : "रेवा बेटा जे प्रश्न मी हिला विचारले त्याबद्दल तुझं काय मत आहे.🤨..??"

रेवा : "आई मला काय वाटतं.....जरी नवरा कितीही कमावत असला ना....तरी, बायकोने काहीना काही करावं.....अवलंबून राहू नये.....आणि रहाली गोष्ट न पटण्याची तर मला नाही वाटत....हे कठीण काम आहे...आणि तुमच्या सारखी आई असल्यावर...☺️☺️"

आई : "बघितलत....याला म्हणतात गुणाची लेक...हे बघा ताई आधी शिवाणीला वागणूक शिकवा....आणि मग मुलगा शोधा.... ऋषीची काळजी तुम्ही नकाच करू...आमच्या नजरेत आहे कुणी तरी...या आता...🤨🤨"

ती ताडकन उठून, आपल्या आईसोबत निघून जाते....

आई : "असे कितीतरी येतात.....🤨😏😏😏"

सगळे : ".....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣"

काका - काकू : "दादा - वहिनी, मुलांनो....या जेवायला.....सगळे फॅमिली मेंबर्स बसत आहोत.....या....🥰🙏🙏"

सगळे जेवायला जातात........ आत्या बोलत नाही.....म्हणून कुणीच कुणाशी न बोलता जेवण करून आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात....

दुसऱ्या दिवशी सायंकाळी रिसेप्शन असतो.....आणि त्यानंतर ऋषीची फॅमिली परत घरी येणार असते..... रिसेप्शन सायंकाळी असल्याने..... ऋषीची फॅमिली दुपारी बाहेर फिरून येण्याचं ठरवते......म्हणून जवळपास असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू बघायला जाऊ अस ठरवतात....आणि सगळे झोपतात.....

सकाळी......

सगळे ब्रेक फास्ट रूममध्ये मागवून घेतात.....आणि आवरून जायला निघतात.....काकांचा मुलगा शंतनु आणि आत्येबहिन दीक्षा त्यांच्यासोबत येण्याची जिद्द करतात.... त्यांनाही ते सोबत घेतात.....

सगळी ऐतिहासिक स्थळे बघून, सगळे अगदीच भारावून जातात..... बांधकाम, फिनिशिंग, आर्किटेक्चर.....😍😍

Ajanta Caves.
Ellora Caves.
Bibi-ka-Maqbara.
Ghrishneshwar temple.
Daulatabad Fort.
Aurangabad Caves.
The Buddhist Caves.
Sunheri Mahal.

सायंकाळी फंक्शन असल्याने लवकर घरी परतावं लागतं..... व्यवस्थित बघूनही होत नाही....म्हणून सगळे उदास होतात....पण, काय करणार वेळेत घरी पोहचण गरजेचं असतं ना....😓😓


🥰💞🎉🎊💞🥰डेकोरेशन्स🥰💞🎉🎊💞🥰

💞🎉🎊....Hall....🎊🎉💞



🎊🎉💞....Lawn....💞🎉🎊



🥰💞🎊🎉Sitting Arrangements🎉🎊💞🥰





सगळे घरी येतात.....फंक्शन साठी तयार होतात......


😍..रेवा..😍



😎..ऋषी..😎




😍..अमायरा..😍




😍..आई - बाबा..😍




सगळे लॉन मध्ये जातात......मस्त रोमँटिक साँग्ज सुरू असतात.....ऋषी रेवा कडे बघतो....पण, ती त्याला आज भाव न देण्याचं नाटक करते....🤣🤣

ऋषी : "छान दिसतेस.....☺️☺️"

रेवा : "जे नसेल माहीत मला ते सांग.🤣🤣🤣....."

ऋषी : "....😏😏😒"

सगळे : ".....🤣🤣🤣🤣"

सगळे म्हणजे फक्त त्याचीच फॅमिली......कारण, ते जास्त involved नसल्यामुळे कुणी जास्त कुणाशी बोलत नसतं....

काही वेळ सगळे बसले असतात..... प्रोजेक्टरवर ड्रोन कॅमेऱ्याचे शूटिंग दिसत असते.....अचानक.....सगळे लाइट्स आणि टीव्ही बंद होतो....आणि वेगळेच फोटोज् प्रोजेक्टर शो करू लागतो....ते फोटो असतात.....रेवा आणि ऋषीच्या रात्रीच्या भेटीचे..... जेव्हा, ऋषीने तिला बाहेर भेटायला बोलावले होते...🥰....आणि जस मी सांगितलं, वृषभ बघत होता.....हो..... तोच हे सर्व उद्योग करू शकतो....सगळे उठून उभे होतात....सगळे आता रेवा आणि ऋषिकडेच बघत असतात.....🤨🤨फक्त ऋषीच्या फॅमिलीचा पूर्ण विश्वास असतो......🥰

आत्या : "घ्या....मला वाटलच तरी.....ही आमच्या मुलाला फसवणार......पण, बोलणार कोण..?? बोललं....की, आमची तोंड दिसतात ना.....घ्या आता.....🤨😠"

बाबा : "ताई सांभाळून जास्त बोलताय.....रेवा विषयी एकही शब्द नको....पुढे....मी ऐकून घेणार नाही....."

आत्या : "म्हणजे जे इथ दिसतंय त्यानंतरही आम्ही शांत बसून, तमाशा बघावा की काय??🤨...ही अशीच असणार माहिती होतं मला....आमच्या मुली बघा वर तोंड करूनही कुणा मुलाकडे बघणार नाहीत....आणि ह्या....माहीत नाही आई - वडील सोडतात कसे...??🤨😠"

तिचं हे बोलणं ऐकून बाबा बहिणीवर हात उगारतात.....आई त्यांना मागे घेते....सगळे बघत असतात....आणि ऋषीचे लक्ष प्रोजेक्टरकडे जाते.....तिथे ऋषी वृषभला बघून एकदम रागात येतो.......आणि ओढतच घेऊन येतो....

ऋषी : "तूच केलंस ना हे सर्व......सांग....🤬"

ऋषी त्याला लाथा घालत बोलतो..... आत्या येऊन ऋषिला एक कानशिलात लगावते....तोच तो परत वृषभला हाणतो......रेवा येऊन त्याला मागे ओढते.....

रेवा : "ऋषी......ऋषी..... भानावर ये.... असल्या लोकांसाठी का स्वतःला तू त्रास करून घेतोय.....ही लोकं कधीच सुधारणार नाहीत.....म्हणून आपण बिघडून, त्यांच्या पातळीत जाऊन, त्यांना नाही ना हॅण्डल करू शकत..... कुणी सुधारणार असला ना की, बोलून अर्थ असतो..... नाहीतर काय फायदा कितीही टाळांचा गजर करा मूर्ख माणूस ऐकत नसतो....चल....इथून....🤬😠"

आत्या तिचा डावा हात पकडुन ओढते.....

आत्या : "ये काय नखरे ग तुझे.....स्वतःचा हक्क बरा दाखवतेस.....कोण आहेस कोण तू.... मैत्रिणच ना......मग इतका का भाव खातेस...त्याच्या भरोस्यावर.😠😠...."

आत्या मुलाची अवस्था बघून चांगल्याच चावताळल्या असतात म्हणून काहीही बोलत असतात.....पण, रेवा मात्र आता शांत बसणार नसते..... बघाच....😎

रेवा : "मी कोण आणि काय यापेक्षा तुम्ही स्वतः एक प्रश्न आज स्वतःला विचारून तरी बघा.....अरे तुम्ही तर ताई आहात ना बाबांच्या आणि त्यांच्याच मुलाला.....शी...😠अरे...दुसऱ्यांच्या मुलाला काहीही बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुलाला आधी सांभाळा.....आता केस टाकली की अटक होईल....पण, मी तुमच्या इतकी माझी लायकी कधीच दाखवून देत नाही.....एकदा याला चान्स देते... परत जर का हा असा वागला ना....तर, बाळा माझं नाव लक्षात ठेव....रेवा कुलकर्णी.....ओके.....आणि काय म्हणालात तुम्ही.....मी याच्या भरोस्यावर.....😏 ह्म्म.....माहिती असू द्या....मी एक बी.पी.ओ. ची फाऊंडर आहे....आणि मला कुणाच्याही भरोस्यावर रहायची काहीही गरज नाही....समजल.....आणि हो......समजलं नसेल ना, मी माझा विसिटिंग कार्ड देते.... कधी क्लासेस ची गरज पडली तर या....हो सगळ्यांना महितिस्तव एक गोष्ट सांगते.....मी इतकी बोलत कधीच नाही.....पण, जर माझ्या आणि ऋषीच्या वाट्याला जो कुणी आलं....😠🤬 त्याची मग माझ्याशी गाठ असेल....लक्षात ठेवा...म्हणून मी इथून गेल्यावर...... माझ्याविषयी तुच्छ शब्द वापरलेत तरीही मला काही फरक पडणार नाही.....😏😏😠"

ती झटक्याने तिथून जायला निघते....थोड्या दूर गेल्यावर परत मागे फिरते.....

रेवा : "आणि एक गोष्ट आत्या, माझ्या नाही ऋषीच्या....ती म्हण आहे ना...."अती शहाणं त्याचं बैल रिकामं" ती तुमच्यासारख्या लोकांना विचारत घेऊन बनवली आहे...... लक्षात असू द्या....🙏😎येते मी....."

सगळे रेवा कडेच बघत असतात.... ऋषीची फॅमिली पॅकिंग करून तेव्हाच तिथून रवाना होते......आणि घरी येते.....

सगळे हॉल मध्ये बसतात.....रेवा बाबांच्या पायाजवळ खाली बसून.....😭😭😭"

रेवा : "बाबा मला माफ करा मी जास्तच बोलले.....बोला ना बाबा काही....🥺🥺😭😭😭"

बाबा : "रेवा बेटा कुठल्या तोंडाने तुला धन्यवाद बोलू पोरी.....जे आजपर्यंत आम्ही सहन केलं.....त्याची कल्पना ही करवत नाही ग......आणि आज तू जे काही बोललीस त्यात चुकीचं काहीच नव्हतं.....उलट मी तुझे आभार मानतो..... आजपर्यंत मला गरज होती.......तर, कधीच माझ्या मदतीला कुणी येत नव्हत.... जेव्हापासून माझा बिझनेस वाढला सगळे जवळ आले......आणि या लग्नसाठीचा सगळा खर्च मीच केलाय.....पण, माझ्या भावाने मला एका शब्दाने थांबवलं नाही.... कदाचित.....यालाच स्वार्थ म्हणावे....पण, पोरी तूच खरी मालकीण आहेस माझ्या ऋषीच्या हृदयाच्या कप्प्याची......पोरी लग्न करशील माझ्या ऋषीसोबत...."

रेवा : "......बाबा...😭😭😭😭😭😭😭"

सगळे रडतात.....

रेवा : "बाबा तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला.....😭😭 खरंच मी त्याची ऋणी असेल......आणि लग्नाविषयी मी सध्या पूर्णपणे तयार नाही बाबा ...... हो....पण, आज एक वचन देते...🤝......मी ऋषीची आहे आणि नेहमी असेन...🥰💞....आणि लग्नही करेल......😌😌..पण, बाबा मला वेळ हवाय.....🥺"

बाबा : "धन्यवाद पोरी खर तर मी तुझा ऋणी असेल....😭जितका वेळ हवाय घे......आम्ही नेहमी तुझे असू..... हक्काचे....🤗🤗"

रेवा : "रडू नका ना बाबा....😭😭"

बाबा : "आज मला माझी फॅमिली पूर्ण झाल्यासारखी वाटतेय पोरी.....😭😭😘😘हे आनंदाश्रु आहेत.....आज नको थांबवू......"

दोघेही खूप रडतात...सगळे त्यांना बघून रडतात....आणि ती रात्र रडण्यातच जाते......
.
.
.
.