अमन रात्र भर रावी ची वाट बघत होता .वाट बघत बघत त्याला झौप कधी लागली ....त्याच त्याला च समजले नाही ....सकाळी हल्क्श्या आवाजाने त्यला जाग आली ...पाहतो तो काय? रावी हळूच दार उघडून घरात येत होती .तिच्या त्या आवाजाने च अमन ला जाग आली .....अमन सोफ्यावरून उठून तिच्याकडे गेला ....पाहतो तो काय ...रावी तोल जाऊन खाली पडली ..अमन ला काहीच समजेना .....रावी खूप दारू प्याय्ली होती .....तिला स्वता चीच शुध्द नव्हती .तीच ते वागण पाहून अमन ला फार मोठा धक्का बसला ....ह्या आधी रावीने कधीच दारू प्यय्ली नव्हती . त्यामुळे तिला त्या अवस्तेत बघून अमन ला धक्काच बसला . तो विचार करू लागला ....रावी ने स्वतः दारू प्यय्ली, की ही ला कोणी पाज्ली ....पण, हे सगळ रावी शुधी वर आल्याशिवाय नव्हते समजणार .रावी तिच्या बेडरूम मधे झोप्ली होती . अमन ने ही ऑफीस मधे कळवले होते, की तो आज कामावर येणार नाही ,.म्हणून ....रावीला ह्या अव्स्तेत सोडून जाणे त्याला योग्य वाटत नव्हते . तो तिच्या उठण्याची वाट बघत हॉल मधेच बसला . दुपार होत आली होती, सूर्य डोक्यावर आला होता ...पण तरीही रावी उठण्याची काही चिन्ह दिसेना .
दुपारी दोन-तीन च्या सुमारास तिला शुध्द आली .दारू पहिल्यादा च प्यय्ल्या मुळे तिचे डोके गरगरत होते . अमन ने तिला लिंबू सरबत आणून दिले ..ते लिंबू सरबत प्यायल्यावर तिला बरे वाटले .अमन रावी वर खूप चिढ्ला, होता .तीच वागण त्याला अजिबात आवडले नव्हते .तिला जाऊन अस काही सून्वावे, अस त्यला वाटत होते .पण त्यला माहीत होते, की तस बोलून काहीच फायदा नाही, रावीचा स्वभाव त्यला चांगलाच माहीत होता .त्यामुळे त्याने तिला काही न बोलण्याचा निर्णाय घेतला . त्यामुळे तो शांत होता .अमन किचन मधे गेला ...आणि त्यानेसंध्याकाळ चा स्वयंपाक बनवायला घेतला . तस स्वयंपाक दोघे मिळवून बनवायचे .पण, रावी ची अव्स्ता बघून तो काहीच बोलला नाही .रावीच्या लक्षात आले,होते की अमन ला आपला राग आलाय....तो आपल्या कडे दुर्लक्ष करतोय . तिने अमन चा राग काढायचा ठरवला . ती अमन कडे किचन मधे गेली .तिने अमन शी बोलायचा प्रयत्न केला ...पण अमनने तिच्याकडे लक्ष न देता शांत पणे त्याच काम करत राहिला .तिने अमन तिच्याशी बोलावा म्हणून खूप विनवण्या केल्या, त्याच्या खूप हाता पाया पडली ....मग अमन लाच तिची दया आली, आणि तो तिच्याशी बोलू लागला ......रावी, तू जे वागलीस ते फार चुकीच होत ... तू दारू पिऊन आलीस ...का? मला तूझा वाढदिवस खूप छान साजरा करायचा होता ...म्हणून मी महाबळेश्वर चा प्लान केला होता .पण, तू दुसऱ्या दिवशी मला न सांगता निघून गेलीस .....का? बरं.... तूझ्या कामाच्या मधे मला नव्हत यायच म्हणून मी ...तुला काहीही न बोलता ....संध्याकाळी छोटीशी पार्टी अर्रेँज केली .पण, त्यात ही तू काय केलस ?....अमन शांत जाहला. आता अमन चा राग काढण्यासाठी रावी बोलू लागली .हे बघ अमन ...आपण दोघे ही स्ट्रगल र आहोत ...आपल कामच आपला देव आहे ... आपण एथे आपली स्वप्न पूर्ण करण्यसाठी आलो आहोत . मझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सुट्टी घेतली होती .पण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी अचानक फोन आला .....की छोटासा रोल आहे ....करणार का? माझ स्वप्न आहे रे, मला काम करायचय ...मला फार मोठी हेरॉईन व्हायचंय ... म्हणून मी गेले .आणि मी संध्याकाळी लवकर घरी येणार होते .पण, जेव्हा तिथे समजल की माझा वाढदिवस आहे, तेव्हा त्यानी तो साजरा करायचा ठरवल . मग, त्यात मी सगळ्याच्या आग्रहाखातर घेतली थोडीशी ड्रिंक ......रावी मान खाली घालून बोलली .अमन ने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला .रावी ला थोड घाबरल्या सारखे जाहले.... तिने कान धरून माफी मागितली ...आणि पुन्हा अस करणार नाही ..म्हणून त्यला वचन दिले .मग अमन ने तिला माफ करून टाकले .मग दोघेही पुन्हा वाढदिवस साजरा करू लागले . अमन तिला आणलेले गिफ्ट दिले .रावीला ही गिफ्ट फार आवडले .दोघेही खूप खुश होते
रावी यशाची एक एक पायरी चढत होती .पण, अमन ला अजून पहिजे अस यश मिळत नव्हत .त्यामुळे त्याच्यात आता नैराश्य येऊ लागले होते . रावी ही बिज़ी असल्यामुळे त्यला वेळ देऊ शकत नव्हती .शिवाय घरी असल्यावर ही कुठे स्क्रिप्ट वाच, कुठे ड्यालोग पाठ कर ...हे सगळ तीच चालू असे .... पण, अमन कडे वेळ च वेळ असे ...सुट्टीच्या दिवशी तर घर त्यला खायला उठत असे .....त्यात नोकरी चे ताणतणाव .....शिवाय घरच्यांचे टेन्शन,.... आता अमन चे घरचे अमन च्या लग्ना विषयी विचार करू लागले होते .एखादी चांगली मुलगी बघायची, आणि अमन च दोनचे चार हात करायचे. अमन ला त्याच टेन्शन होत ते वेगळच.... कारण, त्याच्या बाबांना प्रेमविवाह मान्य नव्हता . त्यामुळे त्यां ना रावी विषयी कस सांगावे? त्याला काहीच कळेना .त्यात रावी फिल्म मधे काम करते ...हे कल्यावर तर ते कसे रिक्शन देतील, हे खरच त्यला माहीत नव्हत . हे सगळ त्यांना वेगळ्या पध्तीने समजण्या आधी आपण त्याना हे सगळ सांगून टाकावे ...अस अमन ला सारख वाटत ........पण, रावी कडे बघून तो नेहमी गप्प बसे .....नोकरी आहे पण, योग्य प्रकारे पगार नाही .हे सांगणे तर त्याच्या जिवावरच यायचे ....मग हळू हळू घरून आता फोन वरून त्याला पुण्यात च नोकरी बघ, असे सल्ले मिळू लागले ...अमन ला आता घरच्यांची लपवून कंटाळा आला होता ..त्याने हे सगळ घरी सांगायच ठरवल . पण, हे सगळ फोन वर सांगणे, तर शक्य नव्हते .त्यामुळे त्याने दोन दिवसाची ऑफीस मधून सुट्टी घेण्याची ठरवली . तो घरी येणार आहे, हे त्याने घरी कळवले. आणि तसे रावी ला ही संगितले .मग, रावी ने त्याच्या सोबत पुण्याला जायचा हट्ट च धरला .तिचे पुढचे शुत्तिंग पुण्यात च होणार होते, त्यामुळे आपण एकत्र पुण्याला जाऊ आणि एकत्र परत येऊ ... अमन ने ही ते कबूल केले .खूप दिवसानी त्यांना असा एकत्र घालवायला वेळ मिळणार होता . दुसऱ्या दिवशी दोघे ही उरकून पुण्याला जायला निघाले. दोघे ही खूप खुश होते .एक छोटी ट्रीप च होती दोघांसाठी .....दोघे ही प्रवासात एकमेकांची पूर्ण काळजी घेत होते . पण, अजून ही अमन ने आपण पुण्याला कोणत्या कारणानी आलो ते संगितल नाही .अमन आणि रावी चा प्रवास एवढा छान झाला .की, त्यांना पुणे कधी आले, कळलेच नाही . पुणे येताच अमन त्याच्या घरी आणि रावी हॉटेल वर गेली .तिथून ती तिच्या शूटिंग च्या ठिकाणी जाणार होती . अमन घरी येताच त्याच्या घरत्ल्याणा खूप आनंद झाला .त्याची आई जशी त्याच्या वाटेकडे डोळे लावून च बसली होती . अमन घरी आल्यामुळे घरात खूप छान वातावरण होत . अमन च्या आई ने त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते .सगळे जेवायला बसले .अमन ची बहीण सारखी त्यला चिढ्व्त होती .तर त्याची आई त्याला आग्रह करून करून जेवायला घालत होती . अमन च्या बाबा च्या आणि त्याच्या गप्पा चालू होत्या .