aani daag mitala in Marathi Short Stories by अपर्णा books and stories PDF | आणि डाग मिटला

Featured Books
Categories
Share

आणि डाग मिटला

आणि डाग मिटला...©अपर्णा.....

रजौरी भारत पाक बाॅर्डर वर असलेलं , निसर्गाच्या सौंदर्याची उधळण असलेलं जम्मू काश्मिर मधिल एक छोटंसं शहर. आणि या शहराजवळ वसलेलं छोटंसं गाव नौशेरा .सतत चालणार् या दहशती कारवाया आणि दोन्ही बाजूनं होणारे गोळीबार यानं भेदरून गेलेलं निसर्गाची निरव शांतता भंग पावणारं अनेक मृतदेहांचे खच पाहिलेलं गावं. याच छोट्याशा गावात , नदिमला अटक झाल्यापासून तरन्नूम आणि तीचा मुलगा फैजल सततच्या भीतीत दिवस कंठत होते.
फैजल चे अब्बू नदिम आणि तरन्नूम या नौशेरातच जन्मलेले. नदिम एक मेंढपाळ होता. मेंढ्यांचं पालन पोषण करून त्यांच्यापासून मिळणारं दुध, लोकर आणि गोष्त याच्यावर त्याच्या कुटुंबाची गुजराण चाले.
सकाळी नाष्ता उरकून मेढ्यांना टेकडीवरच्या हिरव्यागार कुरणांवर चरायला न्यायचं आणि दिवस मावळायच्या आधी परतायचं हा नदिमचा रोजचा कार्यक्रम असे.
टेकडीवरच त्याची ओळख पलिकडून घुसलेल्या काही दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या त्याच्याच वयाच्या मुलांशी झाली होती. ये हमारा हमारा मुल्क है. काफिरोंका नही. ये अल्लाह की जन्नत है. ये हरामीयोंने इसे नरक बना दिया है. हमारा साथ दो हम ये काफिरोंको मिटाकर हमारी जन्नत वापस लेंगे यही अल्लाह की मर्जी है. हे असे वेड्या वाकड्या विचारांचं विष त्यांनी नदिमच्या मेंदूत भिनवलं आणि नदिम त्या दहशतवादी संघटनेत सामिल झाला. घरात हत्यारं स्फोटकं अशा वस्तू आणून लपवू लागला.
तरन्नूम हाडाची देशभक्त. तीच्या भारतमातेचा अभिमान बाळगणारी. शिक्षण फार नव्हतं तरी हुशारी आणि देशप्रेम तीच्यामधे ओथंबून वहात होतं.
काही दिवसांपासून नदिमच्या वागण्यात झालेला बदल आणि वर माळ्यावर तासंतास काय करतो हा? तीला प्रश्न पडायला लागले होते. नदिमची सक्त ताकीद होती की माळ्यावर कोणीही जायचं नाही. एक दिवस सकाळी नदिम मेंढ्यांना घेऊन बाहेर पडला तसा ती ही त्याच्या नकळत मागे मागे गेली. मेंढ्यांना कुरणात सोडून हा पलिकडच्या बाजूनं टेकडी उतरून जायला लागला काही अंतर लांब गेल्यावर हि देखिल लपत लपत त्याच्या मागे गेली. आणि तीने जे दृष्य पाहिले त्यानं ती पुरती हादरून गेली.आणि तिथंच या अल्लाह म्हणत मटकन खाली बसली. बंदूकीची काडतूसं, बाॅम्ब, रायफल्स असं सगळं सामान त्या लोकांनी नदिमकडं सोपवलं आणि मंगल के दिन काम तमाम करना है याद रखो हम ठिक छे बजे पहुचेंगे. ©अपर्णा.....
तरन्नूम स्वतःला सावरत कशी बशी उठली आणि घाईनं घरी पोहोचली. माळ्यावर चढून गेली आणि तीथं तीला बरिचशी स्फोटकं ,बंदूकीची काडतूसं असं सामान दिसलं तीची खात्री पटली नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे.
जरूर कोई खतरनाक मनसूबा है इन लोगोंका. ये अल्लाह का रास्ता नही है. ती तशीच ताडकन उतरून खाली आली आणि परत घरातून बाहेर पडली. भारतीय सेनेच्या लष्करी तळावर पोहोचली. तिथे असलेल्या आधिकार् यांना पाहिलेला प्रकार तीने सांगितला आणि घरात साठवलेलं दहशती सामान, शस्त्रास्त्र याची माहिती तीनं दिली. लगेचच काही शिपायी आणि मेजर राणे तीच्या घरी पोहोचले बराचसा शस्त्रास्त्र साठा आणि स्फोटकं त्यांनी ताब्यात घेतली. नदिम आणि टोळीला ताब्यात घेतलं गेलं.
पतीपासून दुरावली गेल्याचं खूप दुःख तीला होत होतं पण कितीतरी शेकडो जवानांचे गरीब गावकर् यांचे प्राण वाचवल्याचा तीला आनंद वाटत होता. तीच्या गावात या भारतभूमीवर पडणार् या रक्ताच्या डांगाना तीनं वाचवलं होतं याचा तीला अभिमान वाटत होता. पण मनात सल कायम होता आपण एका देशद्रोह्याची पत्नी आहोत. आणि आपला मुलगा देशद्रोह्याचा मुलगा.
ती देशभक्तीचं बाळकडू तीच्या फैजला लहानपणासून पाजत राहिली. देशासाठी प्राणांची आहूती देणार् या क्रांतिकारकांच्या सेनानींच्या कथा त्याला ऐकवत होती रोज.
पुढे फैजलला तीनं शहरात पाठवलं शिक्षणासाठी. शिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेचे प्रशिक्षण घेऊन आज फैजल रजौरीच्या लष्करी ठाण्यात रूजू झाला बर् याच दहशती कारवाया फैजल आणि त्याच्या साथिदारांनी उधळून लावल्या. घुसखोरांशी लढताना जीवाची पर्वा न करणारा आपला मुलगा आणि सेना प्रमुखांकडून त्याचं होणारं कौतुक पाहून तरन्नूमच्या मनाला शांती मिळाली आणि देशद्रोह्याची पत्नी हा डाग धुतला गेला आणि तीची ओळख शूर सेनानीची माता ही झाली.

©अपर्णा.....

अपर्णा पाटोळे

पुणे