कादंबरी – प्रेमाची जादू
भाग -१९ वा
--------------------------------------------------------------------------------
१.
काही दिवसापासून यश मनाशी खूप काही ठरवत होता ,पण त्याच्या मनातले विचार प्रत्यक्ष्य कृतीत येऊ शकत नव्हते
कारण घरच्या आघाडीवर काही ना काही कार्यक्रम होऊ लागल्यामुळे त्याच्या सुटीचे दिवस भुर्रकन जात होते .
अशाच घाई-गर्दीत त्याच्या मित्राचा फोन येऊन गेला ..
त्यात मित्रांने यशला सावधगिरीचा इशारा देत म्हटले होते ..की ..
तू तुझ्या माणसावर लक्ष ठेवून आहेस अस अजिबात संशय येऊ देऊ नकोस ,हुशारीने काम कर ,
तुझ्याकडे कामाला असलेल्या माणसात एक संभावित चोर घुसून तुला नुकसान पोन्च्वीत आहे,हे तुला दिसेल .
इतक्या वर्षात यशच्या बाबतीत असे पहिल्यांदा घडत होते .
यशच्या बिझिनेसची होत असलेली प्रगती त्याने मिळवलेल्या विश्वासाच्या बळावर होते आहे “
,ही गोष्ट सर्वांना माहिती होती .यात महत्वाची गोष्ट म्हणजे ..
यशकडे कामाला असलेली माणसे ही त्याच्या मित्र-परिवारातली होती ..या सगळ्या मित्रांना यश
खूप आधीपासून ओळखत होता , मित्रांच्या घरातील माणसे सुद्धा ..यशच्या माहितीची झालेली
होती , वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे .. यशच्या वर्कशॉपमध्ये मजूर ,कामगार ,लेबर ,
कारागीर , मेकेनिक म्हणून कामाला असलेली माणसे ..त्याचे मित्रच होते ..
एकमेकांना एका परिवारातले आहोत या भावनेतून काम करणारे ,
अशा या मित्रांवर या पुढे -
एक प्रकारे अविश्वास दाखवून , ते कसे काम करीत आहेत ? काय काम करीत आहेत ?
यावर त्यांच्या नकळत लक्ष ठेव्याचे ?ही कल्पना यशला काही केल्या पटत नव्हती .
आपल्याच मित्रात कुणी चोर-बदमाश आहे ,जो वर्क्शोप मध्ये काहीतरी गोलमाल करतो आहे “,
असे सांगणारा मित्र ..तो ही आपलाच , तो खोटे सांगणार नाही .असा हे विश्वास यशला होता .
काय करावे ? मोठाच प्रश्न त्याला सतावत होता .
ओफिस-स्टाफशी तरी या विषयवार कसे बोलावे ? अजून पर्यंत यातल्या एकाने कधी
कुणाबद्दल कधी शंका म्हणा किंवा तशी शक्यता व्यक्त केलेली नव्हती .
एक नक्की ..की आपल्याकडे कामाचे जे वातवरण आहे ..त्याचा गैरफायदा घेणारा कुणी
आहे ..त्याला शोधायचे आहे..ते सुद्धा हुशारीने ..कारण ..मित्राने फोनवर बोलताना सूचकपणे
सांगितले होते ..
यश , एक लक्षात असू दे ..हे काम करणारा मोठा संभावित ,साळसूदपणे काम करणारा माणूस
आहे , त्यला थोडा जरी संशय आला तर तो .आपल्या हातून निसटून जाऊ शकेल ..आणि झालेले नुकसान
कसे ,किती ? हे कधीच कळणार नाही.
काही तरी तर करावेच लागणार ..ते कसे सुरु करायचे ? हे आपल्यावर अवलंबून आहे .
असे ठरवून यश ऑफिस –केबिन मधून मागच्या बाजूस असलेल्या वर्क्शोपमध्ये गेला ..
त्याच्या शोध-मोहिमेला सुरुवात आज ना उद्या ,करावीच लागणार होती.
**********
२.
गेल्या महिन्यात यशने जॉब दिल्यामुळे मधुराला खूपच मोठा दिलासा मिळाला होता . पहिला पगार
पर्स मध्ये ठेवतांना ,तिचे मन वेगळ्याच आनंदाने भरून आले . दिदिकडे आल्यापासून मनात नाही
म्हटले तरी .परावलंबी आहोत “ ही भावना ओझ्यासारखी वाटत असे . त्यामुळे मधुराला एक प्रकाराये
अवघडल्यासारखे वाटायचे , आणि हे असे वाटणे ..दीदीला जाणवता कामा नये ..तसे झाले तर आपल्या
दीदीला खूप वाईट वाटेल ..
ती मनातल्या मनात नक्कीच म्हणेल –
बघा ..आपण कितीही आपलेपणाने वागा हिच्याशी , पण, ही पोरगी मनातील परकेपणा सोडण्यास
तयारच नाही , काय करावे अशा स्वभावाला ?
खरेच आहे दीदीला असे वाटणे चुकीचे नाहीये .. चूक आपली आहे , काही केल्या मनातली भीड चेपत
नाही. एक अवघडलेपण कायम असते आपल्यात .
दीदीच्या घरात ..माणसे भरपूर ..तिचे सासू –सासरे , बाजूला शेजारी म्हणून असलेले दीर- जाऊ ,
बिल्डींगच जीजाजींच्या नातेवाईकाने भरलेली होती . त्यामुळे दीदीच्या घरात माणसांची ये-जा सतत
चालू असते .
मुळात दिदिलाच माणसांची खूप आवड ..सगळ्यांसाठी सतत काही न करणे ..तिला आवडते ,त्यामुळे
तिला ते जमते . तिच्या परिवारात ही वाहिनी सगळ्यांची लाडकी आहे , पोपुलर आहे .
२ बीएच के घर असले तरी ..इतक्या माणसाना ते अपुरे पडते .
.तरी ..अशा जागेत दिदीची फैमिली आनंदात रहाते हे मधुरा पाहत होती .
सगळ्यांचे एकमेकांशी असलेले आपलेपणाचे नाते , गैरसोय झाली तरी ..तसे न दाखवता
राहायची सवय या घरातील सगळ्यांना होती.
दीदीच्या घरच्यांनी मधुराला एक मेम्बर म्हणून आनंदाने परिवारात सामावून घेतले होते ,
कधी कधी मात्र ..दीदीच्या सासरचे इतर काही नातेवाईक येत ..त्यांच्या बोलण्यात ..क्वचित कुणी
बोलायचे ..सुनेची बहिण आलीय गावाकडून इथल्या कोलेजला , पण राहते मात्र यांच्या सोबतच...
ते मधुरा ऐकायची ..आणि काही ऐकले नाहींसे दाखवायची .
ते लोक गेल्यावर ..दीदी गुपचुपपणे माधुराजवळ येऊन तिची समजूत घात असे ..
मधुरा – माझ्या घरातील कुणी काही कधी बोलले तर वेगळी गोष्ट , बाहेरच्या लोकांचे मनावर घेउ नकोस.
इथे मी आहे , माझे घर म्हणूनच तर तू आली आहेस ना , एरव्ही कशाला आली असतीस ,
दुसर्या कोणत्या गावाला थोडीच येणार आहेस तू ? नाही ना ..! झाले तर ,
छान मस्त, मजेत राहा आनंदाने . तू माझ्याकडे आहेस म्हणून तर ..गावाकडे आई-बाबा निश्चिंत आहेत ,
तुझे विचार बदलून ..त्यांच्या चिंता , त्यांचे टेन्शन वाढवू नको .
मधुरा मनाशी विचार करायची ..
इतक्या चांगल्या मनाच्या दीदीला ..आपले इथून जाणे कधीच पटणार नाही ,आवडणार नाही..
काय करावे ? जीजुंची मदत घ्यावी का ? ते नक्की समजून घेतील ..
या शिवाय एक प्रोब्लेम सुरु झाला होता ..तो सांगावा तरी पंचाईत , न सांगावा तर .स्वताला होणारा
त्रास सहन करीत इथे मुकाट्याने राहणे..हाच उपाय आहे..पण..असे सहन करणे ..आपल्या स्वभावात
नाहीये ..आणि आपण काही बोलून बसलो तर ..दीदीच्या माणसांशी असलेले आपले नाते-संबंध ताणले
जातील ही भीती ..
दीदीची बिल्डींग तशी चार –पाच मजल्यांची , १५-२० flat होते , त्यात रहात असलेले सगळे एकाच
परिवारातले .भाऊ-भाऊ , चुलत भाऊ , लेकी- जावाई , काका असे होते.
तळमजल्यावर जीजुंचे थोरले काका फैमिलीसह होते , बिझिनेसमध्ये होते सगळेच ,या फैमिली मधला
रुपेश ..जीजूंचा चुलत भाऊ ..मधुराच्या मागे लागला होता ..
या एकतर्फी –प्रेम करणार्या मजनूने मधुराला हैराण करून सोडले होते . सगळ्यांच्या समोर काही नाही ,
पण, मधुरा कोलेज्साठी बाहेर पडली की ..हा त्याचे दुकान सोडून तिच्या मागे मागे येऊ लागला ,
बोलण्याचा आग्रह , बाईकवर बस, तुला कोलेजला सोडतो .असे म्हणू लागला ..फिरायला जाऊ, चल ..
या वेड्यापासून कशी सुटका करायची ? याचे प्रयत्न करण्यात मधुराची शक्ती खर्च होऊ लागली.
हा विषय दीदी जवळ कसा काढायचा ?
रूपेशने सगळ्यांच्या समोर .आपल्याबद्दल उलटे सुलटे काही बोलले तर ..भलतेच संकट ..!
तसे तर रुपेश तिच्या जवळ येऊन त्रास देत नव्हता हे नशीब , दुरून दुरून त्याचे उद्योग सुरु झाले
होते. पण..त्याचे डेअरिंग कधी ही वाढू शकते ..तेव्हा काय करायचे ?
अशा टेन्शन मध्ये ..
एक दिवस तिच्या क्लासमेट म्हणाल्या ..
मधुरा ..आपल्याला या वर्षी तर होस्टेल मिळत नाहीये , सिटी मध्ये लेडीज होस्टेल आहेत
त्यात वर्किंग लेडीजना डिमांड , आपल्या सारख्या कॉलेजात जाणाऱ्या मुलींना flat मिळाला
तर .शेअरिंग करून राहू या का ?
कोलेज करून , छोटा –मोठा जॉब करू, पार्ट-टाईम..
मधुराला ही आयडीया खूप आवडली ..
तिने मैत्रिणींना म्हटले –
तुम्ही एक काम करा .. घरी या .आणि माझ्या दीदीला पटवून सांगा की,
आपण तीन-चार जणी एकत्र राहणे कोलेज आणि स्टडी साठी किती गरजेचे आणि महत्वाचे आहे ,
तुमचे नक्की ऐकेल दीदी , माझ्या एकटीच्या सांगण्याचा तिच्य्वर काही परिणाम नाही होणार .
लकीली ही आयडीया कामाला आली. आणि दिदींनी मधुराला फ्रेंड्स सोबत राहण्यास परवानगी दिली ,
जीजू पण दीदीला म्हणाले ..हे बघ , कधी कधी परिस्थिती बघता निर्णय घेणे चूक नसते ,
आणि आपण आहोतच की मधुरला मदत करायला , तिच्य्वरलक्ष ठेवायला .
इथपर्यंत सगळ ठीक झाले, पण, सोयीचा वाटेल असा flat काही केल्या मिळेना ..
दीदी म्हणाली ..मधुरा तू यश आणि त्याच्या घरच्यांची मदत घे , तुझे काम नक्की होईल ,
मधुराने flat चा विषय काढला नाही , पण जॉब बद्दल मात्र यशला विचारले ..
आणि गंमत म्हणजे ..यशने क्षणार्धात त्याच्याच ऑफिसमध्ये तिला जोब देऊ केला ..
flat बद्दल कसे विचारावे याचाच विचार मधुरा करीत होती ..
कारण त्याशिवाय ..बिल्डींग मध्ये राहणर्या रुपेश्चा सुरु झालेला त्रास थांबणार नव्हता ..
********
३.
--------
यश ग्यारेज मध्ये दुपारपर्यंत सगळ्यांच्या सोबत काम करीत होता . त्याला स्वतःला बाइक्स
दुरुस्त करणे हे काम जास्त आवडायचे . त्याच्या हातात दुरुस्तीला आलेली बाईक जादू झाल्या
सारखी एकदम राईट सुरु व्हायची ,
मग या बाईकवर यश सिटीमध्ये एक चक्कर मारून यायचा किंवा एखादे पेंडिंग काम पूर्ण
करून टाकायचा .
दुसर्या दिवशी बाईक घायला आलेला कस्टमर म्हणे ..
काय कमाल आहे रे यश .. सकाळी सकाळी काय अंगात आले होते गाडीच्या ,कळाले नाही ,
ढकलत आणली इथ पर्यंत , घाम काढला या महामायेने ..
आणि बघ ..इथे तुझा हात लागला ..की झाली सुरु ..
यश खुश म्हणे – ये मेरा सिक्रेट है...
आज ही अशीच एक बिघडलेली सुपर बाईक दुरुस्त करून झाली , चकाचक झालेल्या बाईकवर
बसून यश राईड मारायला बाहेर पडला ..
दुपारच्या वेळी रस्त्यावर फारशी ट्राफिक नव्हती , तो लगेच हाय –वे ला लागला , इथून खाली
सर्व्हिस रोड वरून जाताना ..रस्त्याच्या मधोमध गर्दी दिसली ..ट्राफिक जाम झाला होता ..
बाईक बाजूला लावीत ..यश गर्दीत डोकावून पाहू लागला ..
दोन बाईकवाले .आपसात भांडत होते ..मारामारी करीत होते ..भर दिवसा दोघे फुल टाईट, त्यात
फाईट ..बघे लोक सोडवण्या ऐवजी ..टाळ्या वाजवीत .प्रोत्साहन देत होते ..
अक्सिडेंट नाहीये “याचे समाधान या जमलेल्या लोकांना वाटत होते .
फायटिंग करणार्यातला ..एकजण ..ओळखीचा चेहरा वाटत होता , पण त्या माणसाचा अवतार आणि
अंगावरचे कपडे मातीने इतके भरले होते की ..कोण आहे तो ? ओळखू येत नव्हते .
जमलेल्या लोकांनी त्या दोघांना बाजूला केले ..दोन दोन लगावल्या , तोंडावर पाणी मारले ,
इतक्यात आणखी एक बाईक आली ..त्यावरच्या दोघातल्या एकाला पाहून यश चमकला ..
अरे ,हे तर नारायणकाका .आपल्या workshop मधले जुने मेकेनिक ..इथे कसे काय ?
त्यांना दिसणार नाही अशा बेताने ..यश गर्दीत मागे सरकून उभा राहिला ..
मगाशी भांडणार्या .दोघातल्या एकाला ..नारायणकाकानि बाजूला घेतले , आणि स्वताच्या बाईकवर
मागे बसवले .आणि तिथून निघून गेले .
यशला मित्राचा फोन आठवला ..
यश ..सांभाळून लक्ष ठेव ..माणूस ओळखू येणे कठीण आहे .
बाप रे ..नारायणकाका ..असतील का ..गैरप्रकारात ? शक्यच नाही ..
ते ज्याला इथून घेऊन गेलेत तो ? कोण आहे यांचा नेमका ..शोध घ्याव्ला लागेल ..
**********
बाकी पुढच्या भागात ..
भाग -२० वा लवकरच येतो आहे .
--------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------