Ghost - 1 in Marathi Horror Stories by Prathmesh Kate books and stories PDF | भूत - भाग १

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

भूत - भाग १

.... तर हे भूत - बीत सगळं खोटं असतय. कळालं ?" मनोहरने स्ट्राइकर टोलवून शेवटची कवडी होलमध्ये पाडली, आणि कॅरमचा डाव आणि ' हा ' विषय दोन्ही संपवले.‌

रात्री साडे अकराची वेळ. अक्षय, मनोहर व सुरेश रविच्या घरी कॅरम खेळण्यासाठी जमलेले. आज फारच उशीर झाला होता. घरातील सर्व झोपले होते, त्यामुळे चौघेही बाहेर पोर्चमध्ये बसले होते. तास - दीड तास मस्त डाव रंगला होता, आणि चौघांच्या गप्पाही. बोलता बोलता सहज विषय निघाला की, भूतंखेतं, अमानवी शक्ती अशा गोष्टी खरच असतात का ? यावर मनोहरच म्हणणं होतं, भूत - बीत वैगेरे खोटं असतं. हे सगळे फक्त मनाचे खेळ असतात. याउलट अक्षय आणि सुरेशच ठाम मत होत की भूत असतातच. रवीलाही ते पटत होतं. पण मनोहरला तो चांगला ओळखत होता. मनोहर कसलेला वादपटू होता. चर्चेचा विषय कोणताही असो, तो असे काही मुद्दे मांडायचा, तेही इतक्या तडफेने की समोरचा निरूत्तर होऊन जायचा. त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही, असा विचार करून रवी गप्प बसला. आणि शांतपणे त्यांच बोलणं ऐकत होता.
अक्षय आणि सुरेशलाही हे सगळं माहीत असूनही ते मात्र ऐकत नव्हते. अगदी तावातावाने आपलंच कसं खरं ते पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. त्यासाठी आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे, त्यांच्या नातेवाईकांचे किस्से तिखटमीठ लावून, रंगवून सांगत होते. अक्षयच्या काकांना तमाशा पाहण्याची आवड. एकदा रात्री उशिरा घरी येताना त्यांना वाटेत त्यांच्याच वयाचा इसम भेटला. त्याने काकांकडून विडी मागितली. त्यांनी दिली. मग बोलत बोलत ते पुढे चालू लागले. त्या दिवशी पौर्णिमा होती. लख्ख चांदण पडलं होतं. थोड्या वेळाने काकांच जमिनीकडे लक्ष गेलं. त्यांना दिसल की त्या माणसाची सावली नाहीये. सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला. खाली मान घालून त्यांनी मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. जरा वेळाने वर पाहिले तर तो माणूस गायब. सुरेशचे आजोबा एकदा आपल्या मित्राच्या घरी गेले होते. रात्री घरामागील परसात गेले. जवळच विहीर होती. तिथे त्यांना काहीतरी हालचाल जाणवली. काकांनी आपल्याकडची बॅटरी उचलून तिकडे वळवली. विहीरीच्या काठावर एक सफेद साडी नेसलेली स्त्री उभी होती. बॅटरीचा उजेड अंगावर पडताच तिचं संपूर्ण शरीर थरारल. तिने रागाने आजोबांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात बुबुळेच नव्हती. क्षणभरच त्यांच्याकडे बघून तिने विहीरीत उडी मारली. तो प्रकार पाहून आजोबांची बोबडीच वळाली. सगळ उरकून कसाबसा धोतराचा कासोटा सावरत त्यांनी घराकडे धूम ठोकली. आपलच हसं होईल असा विचार करून त्यांनी ते कुणालाच सांगितल नाही, तो नक्की काय प्रकार होता याची शहानिशा करायचा प्रयत्न केला नाही. पण त्यानंतर पुन्हा कधीच ते त्या मित्राच्या घरी गेले नाही.
अक्षय व सुरेशकडे अशा किश्शांचा भरपूर साठा होता. कुणाच्या काकाला भूत दिसलेलं, तर कुणाच्या मित्राला. आता त्यात किती तथ्य आहे ते त्यांनाच ठाऊक. पण आपला अनुभव कुणी सांगत नव्हते. ' मी स्वत: भूत बघितलं आहे ' असं कुणी छातीठोकपणे बोलू शकत नव्हत. नेमका हाच पॉइंट पकडून मनोहरने त्यांच्यावर मात केली होती.
" चला, आज लैच उशीर झाला." उभा राहत सुरेश म्हणाला. तिघेही उठून पोर्चवरून खाली उतरले. सुरेशने तिघांचा निरोप घेतला, आणि सायकलवर टांग मारून घरी निघाला.
" चल अक्ष्या." मनोहर अक्षयला म्हणाला. दोघांची एकमेकांच्या जवळच होती. इथून ते एकत्रच घरी जायचे.
" नाय रे, मला शेतावर जायला सांगितलय पप्पांनी. तू जा." अक्षय‌.
" बरं बाबा." असं म्हणून मनोहर निघाला. अक्षयने रवीकडे पाहून स्मित केल, आणि ' येतो ' असं दर्शवत हात उंचावला. रवीने हसत मान डोलावली. अक्षय शेताकडे गेला.

क्रमशः