कादंबरी –प्रेमाची जादू
भाग – १८ वा
---------------------------------------------------
१.
---------
गेल्या महिन्यात अशा काही गोष्टी एका पाठोपाठ घडत गेल्या की ,त्यामुळे यश भांबावून गेला होता.
घरगुती वातावरण ,बाहेरच्या जगातील व्यावहारिक परिस्थितीत त्याला अनेक नवे झटके दिले ,
फटके दिले , माणसांतील वेगवेगळ्या स्वभावाचे जे नमुने त्याला पाहायला मिळाले ..त्यामुळे ..
आपण या आधी जसे होतो तेच बरे होते ..कारण ..
लग्न करावे म्हणून –घरच्यांचा एक सारखा दबाव आणि आग्रह चालू झाला होता . या नव्या गोष्टीने
यशला एक शिकवले की ..
ऐकीव माहिती आणि समक्ष भेटीत दिसलेली व्यक्ती .हे समजून घेत असतांना
जास्त करून त्रास होतो .
कारण “आजकाल माणसे स्वताच्या सोयीनुसार वागणे ,बोलणे , दिसणे यात
बिनदिक्कतपणे बदल करून वेळ भागवून नेतात . “
मला जे हवे त्यासाठी , समोरच्या माणसांना ..सहजपणाने फसवणे , मूर्ख बनवणे ..
या गोष्टी करतांना अशी माणसे काहीच विचार कसा करीत नसतील ?
या प्रश्नाने यशला खूप त्रास होत होता .
काही दिवसापुर्वीची गोष्ट ..
अंजलीवहिनीशी संपर्क साधून ..गीतांजली नावाची मुलगी ..तिच्या आई-वडिलांना घेऊन एका रविवारी
यशच्या घरी आली ..
सकाळी आलेली ही फ्यामिली दुपारी चारचा चहा घेऊनच परतली ..एवढ्या सगळ्या वेळेत ..आपण यशला
भेटण्यासाठी आलोत, त्याचे स्थळ आपल्या मुलीसाठी योग्य आहे की नाही ? हे विषय दूरच राहिले ..
त्याऐवजी ..गीतांजली ,तिची आई ,आणि मुलीला वडील आहेत “ हे केवळ दाखवायला म्हणून सोबत आलेले वडील
.. हे तिघेजण सतत फोनवर बोलण्यात बिझी होते , आणि आपण सगळ्यांशी
कसे संपर्कात असतो , आमच्याशिवाय कुठे काही होत नाही , सगळ्यांना कार्यक्रमासाठी म्हणून आमची
गीताच हवी असते “,
हे सांगण्यात गीताच्या आईचा वेळ जात होता ,
गीतांजली तर समोर यश बसलेला आहे” हे विसरून
फोनवर बोलत असलेल्या जुन्या ओळखीच्या बॉय-फ्रेन्द्चा रुसवा काढण्यात बिझी होती.
तिचे बोलणे , बोलण्याची पद्धत ,सारे काही नाटकी ढंगात चालू होते .
या सगळ्या प्रकारावरून यशच्या घरातील सगळ्यांना प्रश्न पडला ..ही फ्यामिली ..इथे आली तरी
कशासाठी ?
आपण कोण आहोत हे दाखवण्यासाठी ? की ..आमची मुलगी तुमच्या मुलाला पसंत करणार आहे “
बघा ..किती नशीबवान आहात तुम्ही सारे ..!हे दाखवण्यासाठी ?
आल्या पासूनचे -चार-पाच तास फक्त ..
आम्ही. आमचे , आमची गीतांजली ,आणि तिचे कौतुक “ हे अखंड ऐकवणे चालू राहिले होते ,
जणू गीतांजली आणि तिच्या आईने ..यशला आणि त्याच्या फ्यामिलीला गृहीत धरले होते की ..
आपण फक्त जायचा आवकाश ..
आपल्या गीतांजलीला ही मंडळी क्षणात होकार “ देणार.
आजोबांना राहवले नाही ..त्यांनी विचारले ..
काय हो ..गीताच्या आई ..
तुम्ही आणि तुमची ही गुणवंत कन्या ..इतक्या व्यस्त असता ..इतर कोणत्याच गोष्टीसाठी
विचार करण्यास तुम्हाला वेळ मिळत नाही ..मग,
लग्नसारखी महत्वाची गोष्ट ..त्या नंतरचे पारिवारिक जीवन ..नवरा-बायकोचे सहजीवन ..
या गोष्टी तर तुमच्यासाठी अगदीच किरकोळ असतील ना ?
आजोबांच्या बोलण्यातील अर्थ त्या माय –लेकींच्या डोक्यात शिरणे शक्यच नव्हते ..
स्वताच्या कौतुकात आकंठ बुडून गेलेल्या ..गीतांजलीचे कौतुक त्याच उत्साहाने सांगत तिची मम्मा
आजोबांना म्हणाली ..
त्याचे कसे आहे ना ..आजोबा ..
माझ्या सर्कल मधल्या मैत्रिणीं त्यांच्या मुलींचे ..लग्न पटापट उरकून घेत आहेत , आणि मस्त
एका ओझ्यातून मुक्त होऊन एन्जोय करीत आहेत , मला त्याचे टेन्शन आले ..
मग विचार केला ..
आपण का मागे राहायचे ? उगीच इकडे तिकडे .लांबच्या स्थळाच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा
लोकल –मुलगा परवडतो आपल्याला .
तो या घरी राहिला काय .किंवा आमच्या घरी येऊन राहिला काय , आम्हाला नथिंग फरक ..
गीतांजली अगदी तिच्या मनाप्रमाणे सोशल वर्क करू शकेल ..
म्हणूनच .आम्ही तुमच्या फ्यामिलीला जास्त पसंती देतोय ..कारण..
आमच्या लेव्हलशी .थोडा फार जुळू शकणारी तुमची फ्यामिली आहे..
यशच्या करिअरशी आम्हाला काही देणे-घेणे नाही ,
तुम्हला , आम्ही आमच्याबद्दल सांगितले ,आणि तुमच्याबद्दल आम्हाली आवश्यक तितकी माहिती
मिळवली आहे ..
माझ्या मते ..तुम्ही फ्यामिली डिसिजन सांगावे ..म्हणजे आम्ही पुढच्या तयारीला लागतो.
गीताच्या आईचे हे मनोगत ऐकून ..
यशच्या घरातील सगळ्यांनी .मनातल्या मनात ..कपाळावर हात मारून घेतला.
ठीक आहे मग , संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी रेडी व्हायचे आहे..सो, आम्ही आता निघतो ..
तुम्ही तुमचा “होककळवण्यास उशीर करू नका .असे म्हणून ..ती फेमस फ्यामिली निघून गेली.
*******
२.
दुसरे दिवशी यशच्या आईने तिच्या काही मैत्रिणींना ..गीतांजली आणि तिची आई-वडील यशसाठी
येऊन गेले “असे सांगत म्हटले ..
तुझे काय मत आहे ग ?
हे ऐकून सगळ्या मैत्रिणीनी यशच्या आईला सांगितले ..
का ग बाई ..तुला आवडली की काय गीतांजली ?
चुकून या फ्यामिलीच्या नादाला लागू नका ..चक्कर मध्ये आलात तर ..फार घोळ होऊन बसेल .
त्यामुळे ..यशच्या सुखाचा विचार कर आधी ..मग.अशा स्थळांचा ..
स्पष्ट आणि सरळ शब्दात ..नकार कळव ..तो देखील त्यांच्याच स्टायलिश शब्दात ..
मग त्याच दिवशी ..यशच्या आईने ..गीतांजलीच्या आईला फोन केला आणि म्हटले ..
हेल्लो ..गीताच्या आई ,
तुम्ही गीतान्जालीसाहित आमच्या घरी येऊन गेलात ,थान्क्स , तुम्हाला पाहून ,भेटून
इम्प्रेस झालोत आम्ही .
.पण ..सोरी हं..
आम्ही खूप विचार करून पाहिला ...आम्ही तुमच्या स्टेट्स नाही आहोत हेच खरे ..
“आपला योग नाही “ एवढेच सांगते. बाय .
हे बोलणे झाल्या नंतर –मात्र -
गीतांजलीच्या आईने ..सगळ्या सोसायटीत सांगायला सुरुवात केली ..यशची फ्यामिली किती
पुअर माइंडची आहेत “ गीतानाज्ली सारखी मुलगी त्यांना जर आवडू शकत नसेल तर त्यांच्या
आवडी-निवडीचे लेव्हल किती आणि कसे आहे ? तुम्हीच विचार करा ..
पण अशा गोष्टी मनावर न घेता रोजच्या कामात लक्ष देयायचे “ हे यशच्या घरातील सगळ्यांना
माहिती होते.
या सगळ्या झमेल्यात कधी नव्हे तो त्याला मधुराचा कॉल आला होता
आजी –आजोबांना फोन करायच्या ऐवजी ..तुलाच फोन करून विचारते आहे ..
माझे काम आहे ..त्यासाठी तुझी मदत हवी आहे ..येऊ का आता घरी लगेच ?
यशला .मोनिका आली होती ..त्यादिवशी ,नेमकी मधुरा आल्यामुळे काय गोंधळ झाला होता ,
हे आठवले ..आज पुन्हा तसे नको ..
तो म्हणाला ..
आता सध्या गेस्ट आलेले आहेत , तू उद्या ऑफिसला येशील त्यावेळी सांग तुझा प्रोब्लेम ,
तिथे बोलायला काही हरकत नाही ,
मधुरा म्हणाली –
काही हरकत नाही ,
उलट मला वाटले होते की ..पर्सनल गोष्टी ..ऑफिस मध्ये विचारणे तुला आवडणार नाही ..
म्हणून ..घरी यावे असा विचार केला ..आणि त्या निमित्ताने सगळ्यांची भेट होईल.
यश म्हणाला –
तुझे बरोबर आहे हे , पण, आज नकोच ..तू उद्या ऑफिसमध्ये सांगशील मला ..
मग जास्त न बोलता मधुराने कॉल कट करून टाकला .
******
३.
मोनिका आणि गीतांजली .दोन मुली आणि या दोन घटनांनी यश चक्रावून गेला ,
लग्नासाठी मुलगी पाहणे “हे त्याचे स्वताचे काम बाजूला राहिले ,
स्वतः मुलगी भेटायला येते आहे “ हा नवीन अनुभव तो घेऊ लागला .
त्याने अंजलीवहिनींना सांगितले –
यापुढे ..तुम्ही परस्पर असे काही ठरवू नका , तुमच्या काळात जितके साधे आणि सरळ वातवरण होते ,
आता तसे काही राहिलेले नाहीये .
तुम्ही अजिबातच काही करू नका ,असे मी म्हणत नाहीये , फक्त ..यापुढे एक करू या ..
आपण मिळून प्रोफाईल पाहू ,आपलयाला योग्य वाटेल त्यांना इंटरेस्ट पाठवू ,ज्यांचा रेस्पोंस येईल
त्यांना नक्की भेटू ..
एखाद्याने त्यांचा इंटरेस्ट कळवला ..या एका गोष्टीवर आपण लगेच .या या , भेटू या ..
असे अजिबात ठरवायचे नाही ..
तुम्ही पाहिलेत ना ..
मोनिका काय आणि गीतांजली काय ..समोरच्यांना गृहीत धरून ..वागतात ,बोलतात ,
त्यांच्या समोर बसलेले आपण निव्वळ मूर्ख आहोत , नासमज आहोत “ अशा समजुतीत त्या जसे
वागतात “ एकवेळ मी मनावर घेणार नाही ..या गोष्टींना ..
पण..तुम्हा मोठ्या माणसांशी कुणी असे वागलेले मी सहन नाही करू शकणार .
तेव्हा या पद्धतीने काही करणे प्लीज थांबवा .
यशच्या बोलण्यातील हा सच्चेपणा जाणवला आणि अंजलीवाहिनी त्याला म्हणाल्या –
यश , तू जे म्हणतो आहेस ते अगदी योग्यच बोलतो आहेस ,
माझ्याकडून जरा घाईच झाली या दोन्ही मुलींच्या बाबतीत ..त्यामुळे तुझ्या सांगण्याचा मला राग
आलाय “असे अजिबात समजू नकोस .
आम्ही म्हणजे मी “ असे जास्त उत्साहात येऊन घाई घाई करणे ठीक नाहीये ..
शांतपणे ,विचारपूर्वक एकेक स्टेप घेत शोध-कार्य सुरु ठेवायचे “हे मी लक्षात ठेवीन.
कारण मोनिका काय किंवा ही गीतांजली काय ..दोन्हीमुळे तुला तसा मन:स्ताप झालाय “,हे मला
दिसले आहे आणि जाणवले आहे .
पण, खरे सांगू का यश ..
जमाना बदलतो “हे मात्र खरे ..बघ ना ..दोन वेगवेगळ्या वातवरणात रहाणार्या फ्यामिलीत किती
प्रचंड फरक पडत चालला आहे.
आचार –विचार –संस्कार ,या गोष्टी लोक ठरवून विसरून जात आहेत की काय ?
असा प्रश्न मला .मोनिकाला भेटल्यावर पडला , तसाच तो ..गीतांजलीच्या फ्यामिलीला भेटल्यावर
सुद्धा पडला ..
“स्वतःच्या पलीकडे जाऊन ..बघण्यास ही मंडळी तयारच नाहीत ..
आधुनिकतेच्या नावाखाली ..स्वैर वागण्याला .. “व्यक्ती-स्वातंत्र्य “ लेबल लावून मिरवणारे भवती
वाढत गेले तर ..?
मला तर भीती वाटायला लागली आहे .
यश म्हणाला ..
अंजलीवहिनी ..तू नको करू इतका विचार ..त्रास होतो अशाने ..
बी होपफुल ....
***************
बाकी पुढच्या भागात
भाग- १९ वा लवकरच येतो आहे.
-----------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------