रावी सांगत होती ,आणि अमन ऐकत होता . मग पुढे काय जाहाले, सोहम नी हे सगळ कबूल केल, पण त्यांनी अट घात ली की तो ही एथे शिकायला येणार, मी ही तयार जाहाले,कारण मला एथे यायच होत .माझ शिक्षण पूर्ण करायचे होते .... माझ्या स्वप्नांचा असा बळी मला नव्हता दयचा .मग काय, सोहम एथे शिकायला येणार म्हणल्यावर आई बाबा ही तयार जाहाले. आणि त्यानी मला एथे पाठवले. पण, एथे आल्यावर सोहम चे खरे रूप मला समजले . सतत हे कर, हे करू नको .....असे कपडे घाल, असे नको घालू ...ह्यांच्याशी बोल, ह्यांच्याशी बोलू नको .....तुमच्याशी कोणाशीही तो मला बोलू देत नव्हता .तो नसला, की सतत त्याच्या माणसा चा मझ्यावर पहारा असे ....थोडे दिवस मी हे सगळ सहन केल पण, आता मला हे सगळ असह्य होऊ लागले होते, मग, काय? त्यादिवशी त्याच्याशी भांडणे करून त्यानी दिलेल घर सोडले, त्याचे सगळे गिफ्ट्स परत केले ...आणि होस्टेल वर रहायला आले .मी परत त्याच्याकडे जावे म्हणून, तो मला असा त्रस्स देतोय ....पण, काही जाहाले, तरी मी त्याच्याकडे परत जाणार नाही. रावी ची स्टोरी ऐकून, अमन ला तिची दया आली, आपण तिला किती चुकीचे समजत होतो, ह्याची कल्पना आली . त्याने तिला सॉरी म्हणले ....रावीने ही हसून त्याला माफ केले .... मग, अमन नेच तिच्यापुढे मैत्री चा हात पुढे केला .रावी ही तो हात धरला .आता अमन आणि रावी मधे पूर्वी प्रमाणे घट्ट मैत्री जाहाली .ती मैत्री स्वीकारून दोघे ही खूप खुश होते .अमन नी तिला होस्टेल वर सोडवले, आणि तो ही बॉय होस्टेल च्या दिशेने निघाला .
दुसऱ्या दिवशी अमन लवकर उठला, त्याने त्याचे आवरले, आणि, तो रावीची वाट बघत, गर्ल होस्टेल च्या बाहेर उभा होता . थोड्या वेळाने रावी ही
तीच आवरून कॉलेज ला जायला , पाहाते, तो काय? अमन तिची वाट बघत बाहेर उभा होता .तिला थोड आश्चर्य वाटले, आणि आनंद ही झाला . मग अमन आणि रावी दोघेजण मारत कॉलेज मधे आले, त्या दोघाना एकत्र पाहून कॉलेज मधील सगळ्या नाच खूप विशेष वाटले . दोघे ही लेक्चर येऊन बसले . रावी अमन च्या शेजारी जाऊन बसली.एवढ्यात अमन ची सगळी गँग लेक्चर ला आली . त्यात रीधीमा ही होती ....रावीला अमनच्या शेजारी बसलेल पाहून तिला खूप दुःख जाहाले. जेव्हा पासून रावी..... अमन आणि त्याच्या गँग ला सोडून गेली होती, तेव्हा पासून, रीधीमा त्याच्या शेजारी बसत होती ... पण आज तिथे रावी ला बघून .....पण तिने तस काही दाखवले नाही ... पण त्याच्या गँगला ते बरोबर समजले. थोड्यावेळाने लेक्चर सुरू जाहाले..... सगळे जण मन लावून लेक्चर ऐकत।होते . थोड्या वेळाने लेक्चर संपले . अमन रावी ला ,किती छान लेक्चर
जाहाले आज चे ..अस म्हणला ....रावी ही हसत .....हो ...खूप छान लेक्चर होत ... अस म्हणाली ....,दोघे बोलत बोलत कँटीन मधे आले, समोर, गँग पाहून ...अमन रावी ला घेऊन तिकडे वळला. तिथे जाताच अमन ने एक खुर्ची रावी कडे सरकवली, आणि एका खुर्चीवर तो स्वतहा बसला ...अमन ने सर्क्व्लेल्या खुर्ची वर रावी सँकोचुन बसली .अमन ने वेटर ला बोलवून कोल्ड्रींक आणि समोसा ची ऑर्डर दिली . आणि गप्पा मारायला वळला . पण, अमन आणि रावी येताच सगळे शांत जाहाले .....आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले . मग अमन बोलू लागला, पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देईना . अमन आणि रावी च्या ते लक्षात आले . मग हळू हळू काहीतरी कारण सांगून, गँग मधले सगळे निघून गेले . शेवटी रीधीमा च राहिली होती, ती ही लायब्ररी त जायचय, हे कारण सांगून, निघणार, ऐत्क्यात अमन ने तिचा हात धरला, रीधीमा ने त्याच्याकडे वळून बघितले, तिच्याकडे बघून अमन म्हणू लागला, रीधीमा, तू तरी थांब, मला माहीत आहे, हे सगळे का गेले? त्याच अस वागण साहजिक च आहे . पण, तू तर माझी चांगली मैत्रीण आहेस, प्लीज मला समजून घे, आणि मझ्याशी अस नको वागू, अमन च बोलण ऐकून रीधीमा ला स्वतःचीच दया आली . ती अमन ला म्हणाली, अमन आपण चांगले मित्र आहोत ना ...मग तूझ्यावर राग्व्णयाचा अधिकार तरी दे मला .... थोडासा वेळ दे सगळ्यांना, सगळ व्यव्सतीथ होईल .....जुन्या आठवणी पुसल्या जाऊन, पुन्हा नवीन आठवणी जोडल्या जातील .आणि......हो, मी खरच लायब्ररी त चलौय, कारण तिथे माझ काम आहे . हवं, तर तू ही चल सोबत .....पण परत रावी कडे पाहत-
,तुला काम असेल, पण .........आणि ती निघून गेली ....रावी आणि अमन ला आता सर्व समजले होते, त्याचा राग कसा काढून टाकायचा ...हे मात्र त्यना समजत नव्हते . पण, ह्या वेळी अमन नी स्पष्टच बोलायचे ठरवले, ह्यासाठी त्यानी आधी निखिलशी बोलायचे ठरवले ....आपल बोलण निखिल नक्कीच ऐकेल आणि समजेल ...अस अमन ला वाटल .. तिथून तो एकटाच निखिल कडे गेला ....आणि रावी लेक्चर ला निघून गेली .
निखिल स्पोर्ट क्लब मधे क्रिक्केट ची प्रेक्टीस करत होता .अमन नी त्याच्या खांद्यांवर हात ठेवला .निखिल ने मागे वळून पहिले, पाहतो तो काय, अमन? ...अमन ला पाहून, निखिल च्या तोंडावर पुन्हा बारा वाजले ....अमन च्या ही नजरेतून ते काही सुटले नाही .. त्याने स्पष्टच निखिलला विचारले .. निखिल ... तुम्ही सगळे अस का वागताय? काय झालय ? कदचित निखिल त्याच्या ह्याच प्रश्नाची वाट पाहात होता? जसा त्याने हा प्रश्न विचारला? तसा निखिल त्याच्या वर धावून च गेला ... तू अह्म्ला वीचर्तोस हे सगळ? कधीतरी स्वतःला पण, विचारत जा ....आपण अस का वागतो? ज्या मुळे सगळ्यांना त्रस्स होतो? अरे, आमच सोड ...त्या रीधीमा चा तरी विचार करायचा ....गेली वर्ष भर ती तुझी किती काळजी घ्याची ...खूप चांगली मुलगी आहे रे, तिला नको त्रस्स देऊ ....कोणता ही स्वार्थ न ठेवता, ती सगळ्यांशी ऐत्क चांगले वागते ...तरीही तिच्या नशिबात हेच का?......ती रावी ....गेली वर्षभर शेजारून गेली, तरी आपल्याशी बोलत नव्हती .बौल्न्च काय? पण ...साधी बघत सूध्हा नव्हती .आणि आता चार दिवस नाही जाहाले त्या सोहम शी तिची भांडणे काय जाहाली, तर लगेच तुला पकडला .तू तरी तिला कसा भाळलास? .....बरोबर ....आहे ती खूप सुंदर आहे ...ना ....रीधीमा कुठे एवढी सुंदर आहे .ती पण किती वेडी आहे .दोन शब्द काय तू तिच्याशी चांगल बोललास ती तूझ्या प्रेमात च पडली . तिने तर तूझ्या वर जीव ओवाळून टाकला . पण, तुला ना तिच्या प्रेमाची कदर आहे ना तिची ...आणि ह्या गोष्टी साठी मी तुला कधीच माफ करणार नाही .....मी च काय गँग मध्ले कोणीच तुला माफ करणार नाही .एवढ बोलून निखिल निघून गेला .अमन ला तर हे सगळ ऐकून धक्काच बसला .आणि निखिल च बोलण ऐकून त्याला रीधीमा च्या मनाचा आढावा आला . म्हणजे रीधीमा ने ऐत्के दिवस आपल्या मनात हे लपवून ठेवलय. आणि आपल्याला त्याचा सुगावा सूध्हा लागून दिला नाही .