College Friendship - 7 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | कॉलेज फ्रेइन्डशिप - 7

Featured Books
Categories
Share

कॉलेज फ्रेइन्डशिप - 7

भाग ७

ओंकार हा कॉलेज मध्ये जरी दाखवत असला कि तो खूप डॅशिंग आणि चांगल्या घरातला आहे तरी, प्रत्यक्षात तो एक सध्या घरातून आलेला, आई ने खूप मेहनत करून त्याचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला एक चांगली नोकरी पाहून आई ला समाधानात ठेवायचे होते. ओंकार ला फक्त एक चांगला चान्स हवा होता ज्या मुळे त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळायला मदत झाली असती.

पण त्याचे सगळे पर्यत्न निष्फळ जात होते. आणि जो रस्ता त्याने त्याच्या यशाच्या शिडी चढण्या साठी निवडला होता तो चुकीचा होता त्याला माहित होत, पण त्याच्या कडे कोणताच उपाय नव्हता.

आणि तो मार्ग होता सायली!!!!!!

सायली त्याच्या यशाची अशी शिडी होती जी त्याला कायम वरती घेऊन जाणार होती. पण आता त्यात देखील अडथळा निर्माण झाला होता, तो म्हणजे रोहित...........

रोहित ची एक ओळख जी सायली ला देखील माहित नव्हती, कारण त्या ओळखीला तो स्वतः योग्य आहे हे मानत नव्हता. पण एका कॉलेज Function मध्ये जेव्हा चीफ गेस्ट म्हणून मिस्टर. पाटील , Patil Group of Companies चे डायरेक्टर आले होते. मिस्टर पाटील म्हणजे रोहित चे वडील. रोहित ने लवकरात लवकर Business हातात घ्यावा असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. पण रोहित अजून तरी स्वतःला त्या योग्य मनात नव्हता. आणि हे जेव्हा ओंकार ला समजले तेव्हा त्याने रोहित शी मैत्री करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे सगळे प्रयत्न निष्फळ....

त्यात त्याला सायली हा एक खूप मोठा चान्स भेटला तिला स्वतःशी जवळ करण्यात त्यांनी एक हि प्रयत्न सोडला नाही .

या वेळेस त्याला दोनी बाजूनी चांगला फायदा होणार होता, त्याच पाहिलं कारण म्हणजे रोहित सायली ला खूप मानत आणि तिच्या निर्णयाचा आदर देखील करत होता.

कारण सायली ज्या कंपनी मध्ये जॉब करत असते ती कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून ती पाटील ग्रुप ऑफ कंपॅनिएस. त्या मुळे जरी रोहित कडून त्याला कोणता फायदा करून घेता नसता आला तरी त्याने सायली मार्गे काही ना काही करून कंपनी मध्ये एन्ट्री केली असती.

पण आता त्याला कळून चुकलं होतं कि, रोहित तर खूप लांब राहिला त्या कंपनी मध्ये जॉब मिळवण्यासाठी पण सायली तिच्या कडून देखील काहीच होऊ शकणार नाही. सायली खूप स्वाभिमानी, जे तिला योग्य वाटत तेच करणार, त्या साठी तिला आपल्या लोकांचं मन दुखवावं लागलं तरी ती स्वतःचे मत कधीच बदलत नसत.

या सगळ्यात ओंकार ने अजून एक प्रयत्न करण्याचा विचार केला. आणि त्याने सायलीला मानवायचे ठरवले, सायली ला मानवण्या साठी त्याने एक छान प्रकारे प्लॅन केला, तिला शनिवारी बाहेर फिरायला घेऊन जायचा ठरवलं. पण त्याला माहित नव्हतं कि सायलीचा शनिवारचा प्लॅन तयार होता. जरी तिला रोहित ने त्या पत्यावर बोलवलं असलं तरी तिचा प्लॅन हा फिक्स होता.

कारण तो तोच पत्ता होता ज्या पत्त्यावर सायली दरवर्षी त्या एका तारखेला जात असे, या कारणं मुळे सायलीला शॉक लागलं होता. कारण सायली आणि रोहित त्या एकाच तारखेला त्या एकाच पत्त्यावर जाणार होते. सायलीचा हा प्रत्येक वर्षीचा ठरलेला प्लॅन होता कारण त्या पत्त्यावर तिला तिचे आपले मानणारे वडील आणि एक बहीण भेटली होती.

मिस्टर. राजेंद्र देशमुख आधार या वृद्धाश्रमाची संस्थापक, जे आपल्या मुलीची आणि पत्नी चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व कारभार सोडून आधार आणि तेथील सर्व आई वडिलांना सांभाळत असत.

राजेंद्र देशमुख यांच्या पत्नी राधिका देशमुख यांनी या आश्रमाची स्थापना केली त्या येथील सर्वना अगदी परिवारा सारखं सांभाळत. त्यांच्या जाण्या नंतर हि संपूर्ण जबाबदारी हि त्यांची कन्या सानिका हिने घेतली.

सानिका तीच जी रोहित ची सर्वात खास मैत्रीण, जी रोहित साठी खूप महत्वाची आणि आपली होती.

आणि तीच सानिका हि सायलीची बहीण होती. सायली देखील तिच्या वडिलांच्या जाण्या नंतर न विसरता त्या आश्रमात जात असे तिथेच तिला राजेंद्र देशुमख हे वडील म्हणून आणि सानिका बहीण मिळाली. सानिका च्या जाण्या नंतर जर राजेंद्र देशमुख याना कोणी सांभाळा असेल तर ती सायली होती.

या सुंदर नात्या शी रोहित अज्ञात होता.

तशीच सायली देखील रोहित आणि सानिका च्या सुंदर मैत्री विषयी काहीच माहित नव्हतं.

उद्या हे नातं दोघांसमोर येणार होते.

काय होईल मग जेव्हा हे नातं जेव्हा त्यांना समजेल, आणि सायली ला तिची चूक समजेल कि अजून ओंकार च्या प्रेमात अडकत जाणार .............