आता त्याला कळलं की ही त्या माणसाला रात्री का सापडली नाही ते. थोडी सारवा सारव करायच्या उद्देशाने विवेक बोलला.
विवेक - " रडू नको प्लीज शांत हो आधी, अग मी परत आलो तेव्हा तू तिथे नव्हतीस मला वाटलं वॉशरूमला गेली असशील म्हणून मी किती वेळ तुझी वाट बघितली. तरी तू आली नाहीस म्हणून मग तुझी शोधाशोध सुरू केली, किती शोधलं तुला, लॉन मध्ये, हॉटेल मध्ये आजूबाजूचा सगळा परिसर शोधून काढला पण तू मिळाली नाही किती टेन्शन आलं होतं मला माहिती आहे, अशी कशी न सांगता निघून गेली, कुठे गेली विचार करून करून डोकं फाटायला आलं होतं माझं. तुझा फोनही लागत नव्हता. बर ते जाऊ दे मला सांग तू टॉयलेट मध्ये ज्याला बघितलं त्याचा चेहरा नीट बघितला होता का?
गौरवीचा राग किंचितही कमी झाला नव्हता तरीही स्वतःला शक्य तितकी शांत ठेऊन तिने विवेकच म्हणणं ऐकून घेतलं. पण त्याचे बहाणे आणि शेवटचा प्रश्न ऐकून ती आणखीच चिढली.
गौरवी - " ज्याला बघितलं म्हणजे काय हं? तुच होता तो, मला माहिती आहे. चेहरा नव्हता दिसत कारण तुझी पाठ होती माझ्याकडे पण तुझ्या अंगकाठीवरून ओळखते ना मी तुला"
तिने चेहरा बघितला नाही, हेच एक कारण त्याला मिळालं आणि त्यांनी तिला आपल्या गोड गोड शब्दांच्या जाळयात पुन्हा अडकवायचा प्रयत्न सुरू केला.
विवेक - " अग मी लेडीज टॉयलेट मध्ये कशाला जाईल, आणि अशी तुझ्या व्यतिरिक्त कुठलीच मुलगी नाहीय माझ्या आयुष्यात. अग ड्रेस कोड असल्यामुळे तुला कुणी माझ्यासारखा दिसला असेल पण तो मी नव्हतो, खरच विश्वास कर प्लीज. मी तर वॉशरूम लाच गेलो होतो पण जेन्ट्स टॉयलेटमध्ये आणि तिकडून परत येताना मला माझा एक जुना मित्र भेटला तो बाजूच्याच हॉटेल मध्ये मॅनेजर आहे. तो मला त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. मी नाही म्हणू शकत नव्हतो ग त्याला म्हणून मला उशीर झाला यायला. मी परत येऊन तुलाही घेऊन जाणार होतो पण तू दिसलीच नाही.
(याच मित्राच्या ओळखीने त्यानी एक माणूस भाड्याने घेतला होता जो त्याच्या सारखा वेष करून तिला बेशुद्ध करणार होता आणि रात्रभर तिच्यावर पारख ठेवणार होता. आणि हा सकाळी हिरो बनून तिला त्या माणसापासून वाचवल्याच नाटक करणार होता आणि रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड सोबत मजा करणार होता. ती कुठेच दिसली नाही म्हणून त्याला वाटलं की या माणसाने त्याच काम केलं असेल. पण त्याला आता समजलं होत की त्याचा प्लॅन कसा फसला होता ते. पण तिला आता मनवावं लागेल.)
गौरवी - म्हणजे तोे तु नव्हता , खर बोलायतोय ना तू की मला मनवण्यासाठी बहाणा देतोय.
विवेक - तुला विश्वास नसेल तर आता चल त्याच्या हॉटेल मध्ये सगळं खरं खोटं तुझ्या समोर होऊन जाईल.
गौरवी - आणि सकाळी जे मी बघितलं तुमच्या रूम मध्ये ते. ती मुलगी तुमच्याच बेडवर झोपलेली होती अंगावर चादर घेतली होती तिने चेहरा तेवढा मोकळा होता आणि तुम्ही... तुम्ही तर निर्वस्त्र होतात कमरेपर्यंत चादर पांघरलेली आणि पोटावर, मस्त हात पाय पसरून झोपले होतात. तुमचा दोंघांकडे बघून कुणीही तुमच्यात रात्री काय झालं असेल ते सांगितलं असतं. आणि पुन्हा रडू लागली.
विवेक - एक मिनिट तू प्लीज रडू नको, पुन्हा तीच गफलत होतेय, तू त्या झोपलेल्या माणसाला बघितलं का नीट, त्याचा चेहरा पहिला का?
गौरवी - अगदी थोडासा बाजूनी दिसला मला.. तुम्हीच होतात ते आणि ती खोली तुमच्यासाठी बुक केली होती तर त्यात कुणी दुसरं कसं असणार आहे.
विवेक - अग ती खोली काही कारणामुळे वेळेवर माझ्या मित्राच्या एक भावाला दिली आणि मला म्हणजे आपल्यासाठी दुसरी खोली दिली त्यांनी त्यामुळे तू ज्याला बघितलं त्या खोलीत तो मी नाही माझ्या मित्राचा भाऊ होता आपला रूम नं. काल रात्री बदलला होता पण तुला ते माहिती नव्हतं म्हणून तू सरळ त्या रूम मध्ये गेलीस.
या सर्व गोष्टी गौरवीचीच्या मनाला पटल्या नव्हत्या पण त्यानी इतकं व्यवस्थित प्रेमाने समजावलंं की बुद्धीला विरोध करता आला नाही. आपणच गैरसमज करून घेतला एकदाही व्यवस्तीतपणे चेहरा न बघता काहीही विचार करत बसलो. अस तिला वाटलं.
गौरवी - मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला. माझं चुकलंच जरा. पूर्ण पणे शहानिशा न करताच मी तुझ्यावर अविश्वास दाखवला.
विवेक - हम्म जाऊ दे. तुझ्या ठिकाणी कुणीही असतं तरी असाच वागलं असत कदाचित. बरं आता तुझे सगळे प्रश्न संपलेत का? की आणखी काही शंका उरली आहे मनात? असेल तर विचार पण उदास नको राहु.
गौरावीला त्यांचं लेडिज टॉयलेट मधलं बोलणं आठवते......
----------------------------------------------------------------------
क्रमशः