corona virus online shikshan v prashn in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | कोरोना व्हायरस ऑनलाइन शिक्षण व प्रश्न

Featured Books
Categories
Share

कोरोना व्हायरस ऑनलाइन शिक्षण व प्रश्न

14. कोरोना व्हायरस;ऑनलाइन शिक्षण व प्रश्न

कोरोना व्हायरसनं नाकी नव आणलं आहे. दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत आहे. तसेच भीतीच्या सावटाखाली देशातील जनमानस वावरत आहेत. असे असतांना शाळा सुरु करण्याची घाई पालक करीत आहेत.

पालकाचे शाळा सुरु करण्यावरुन दोन गट पडले आहेत. एक म्हणजे शाळा सध्या सुरु करु नये असे म्हणणारा गट व दुसरा शाळा सुरु करा म्हणणारा गट. सरकारही शाळा सुरु करण्यावर विचार करीत आहे. पण त्यांना वाटते की जर शाळा सुरु केलीच तर आधीच वाढणारी कोरोनाची साथ. त्यात शाळा सुरु केल्यास दुपटीने वाढ होईल. काही पालकांनाही तेच वाटते. म्हणून ते शाळा सुरु करण्याच्या पलिकडचे आहेत. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार शाळा सुरु व्हायला नको. शाळा सुरु झाल्यास संक्रमण एवढं वाढेल की त्याला थांबवणं वा त्याच्यावर रोक लावणं कठीण होवून बसेल. कारण लहान मुलांना कितीही सांगीतलं, तरीही संक्रमणाचा धोका टाळताच येवू शकत नाही. मग विद्यार्थ्यांचं नुकसान नको, ते विसरतात म्हणणारे काही श्रीमंत पालक ऑनलाइन शाळा सुरु करा म्हणत आहेत. त्यासाठी सरकारवर दबाब आणत आहेत. सरकारला पेचात पाडत आहेत. नव्हे तर आपल्याच पाल्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. ते शाळेला आणि शिक्षकांना वेठीस धरुन ऑनलाइन शिक्षण द्यायला भाग पाडत आहेत. याच भुमिकेतून काही शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरुही केले. पण यात संभाव्य धोक्याचा विचार केला नाही.

संभाव्य धोके कोणते?

१) लाकडाऊन कालावधीत प्रत्येकजण घरी होता. त्यांना कामधंदे नव्हते. त्यामुळं जवळ असणारा पुर्ण पैसा खाण्यात खर्च झाला. आता पालकांजवळ पैसे नाही. त्यामुळं त्यांना पोट भागवतांना मोबाईलमध्ये रिचार्ज टाकायला पुरेसे पैसे नाहीत. तसेच ऑनलाइन शिक्षण घेतो म्हटलं तर स्मार्टफोन घ्यायलाही पुरेसे पैसे नाहीत.

२)मोबाईल वापराबाबत सुविधा नाहीत. कारण प्रत्येकानं ऑनलाइन शिक्षण घ्यायचा विचार केलाही, तरीही शिक्षकांच्या शिकविण्याच्या वेळेस मोबाईलचीे इतर कामे पडतात. कोणाला मोबाईल ऑफिसला(कामावर) न्यायचा असतो. किंवा कोणाला अर्जंट फोन करायचा असतो. ती कामं करता येत नाहीत. खंड पडतो.

३)स्म्रार्टफोनवरुन अभ्यास करतांना मुले एवढी हुशार झाली आहेत की ते आपल्या वडालांना काही समजत नाही असा विचार ते पबजी सारखे खेळ खेळत बसतात. अभ्यासात मन न लावता. तसेच पालकांना समजतही असेल मोबाईल. तरीही त्यांच्याजवळ पुरेसा वेळ नसतो की तो, आपल्या मुलांजवळ पुर्ण तासीका होतपर्यंत बसतील. अशावेळी चांगली मुलेही बिघडण्याची शक्यता आहे.

४)कधी कधी नेटही बरोबर चालत नाही. त्यावेळी ऑनलाइन वर्ग दिसत नाहीत. अशावेळी विद्यार्थ्यांचे नुकसानही होते.

मोबाईल चांगला वापरला तर चांगलाच उपयोग आहे. पण तरुण होत असणा-या मुलांना कोण सांगेल. ते अभ्यास करीत असतांना तरुणही होत असतात. हेही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात खटलेही दाखल केले आहेत. खाजगी शाळेनं ऑनलाइन वर्ग शिकवणं सुरु केलं आहे. कारण त्यांना भीती आहे की जर त्यांनी शिकवणं सुरु केलं नाही तर त्यांना वेतन मिळणार नाही. त्यांचंही बरोबर आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेच नाही तर पालक शाळेचे शुल्क कसे भरतील?अन् पालकानं पैसे भरले नाहीत तर शिक्षकांना वेतन कसे मिळेल. म्हणून ऑनलाइन शिक्षण.

महत्वाचं म्हणजे विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण देण्याऐवजी ऑफलाइन शिक्षण द्यावे. शिकविण्यात येणारा भाग विद्यार्थ्यांना जेव्हा वेळ भेटेल, तेव्हा ते पाहतील व शिकतील. पालकांनाही जेव्हा वेळ भेटेल. तेव्हा ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतील.