ti.. kojagruti pornima (bhag-don) in Marathi Horror Stories by Dhanshri Kaje books and stories PDF | ती..कोजागृती पौर्णिमा (भाग-दोन)

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

ती..कोजागृती पौर्णिमा (भाग-दोन)

लगेच विराज बोलतो. "हे बघा तुम्हाला राग येणार नसेल तर एक सजेस्ट करू का?"
सगळे एकदम हसु लागतात. विराज त्यांच्याकडे बघतच राहतो. मग हळुच कौस्तुभ म्हणतो. "काय मित्रा? तुला कधी पासुन आमची परवानगी लागु लागली..बोल..बोल" विराज हसत बोलतो. "अरे... तस नाही. काय आहे, ते आता बाहेर सगळं बघितलं न. म्हणल आपण काहीतरी चांगलं सांगायला जाणार आणि परत तेच सगळं होणार त्यापेक्षा आपण आधीच विचारलेलं बर. असो तर प्रोग्रॅम असा आहे की, आता सगळेजण बाहेर जातील मस्त थंडगार वारा सुटला आहे. तेव्हा अंगणात शेकोटी समोर खुर्च्या मांडुन बसुत पण आज नुसतं बसायचं नाहीये तर प्रत्येकांनी एकमेकांबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांगायची आहे आणि त्यांना अस का वाटत हेही सांगायचं आहे. त्यानंतर मुलं व्हर्सेस मुली अशी अंताक्षरी होईल मग एक ब्रेक असेल त्यामध्ये पावभाजीवर ताव मारायचा आणि नंतर पाच वर्षांपासुनच्या राहून गेलेल्या गप्पांमध्ये पुर्ण रात्र घालवायची आहे. कसा वाटला प्लॅन?"
सगळे एकमेकांकडे हसुन बघतात आणि एकसुरात बोलतात. "चला, म्हणजे आमचा पोपट बोलायला लागला तर." विराज जरा लाजतो. आणि सगळे खाली उतरतात. रेवती आणि सौरभ मात्र मागे मागे आपल्या विचारात चालत असतात. तेवढ्यात सौरभ बोलायला सुरुवात करतो. "सॉरी(मान खाली घालुन)." रेवती आपल्याच विचारात असते. ती लगेच भानावर येत विचारते. "अं... तु काही बोललास का?" सौरभ माफी मागत बोलतो. "हं, म्हणल आय एम सॉरी. मघाशी मी तुला एकदम अस बोलायला नको होतं." रेवती मनाशीच हसत बोलते. "जाऊ दे सोड तो विषय. मला त्याची सवय झालीये आता. तु सांग काय केलस पाच वर्षात काय करतोयस सध्या?" चालता चालता सौरभ सांगतो. "माझं काय? मी एक डायरेक्टर आहे. त्यामुळे माझ्याकडे चित्रपट येतात आणि मी करतो. तु बोल तुझं काय सुरू आहे." खुर्चीवर बसत रेवती सांगते. "मी लेखिका आहे. माझी सात पुस्तक प्रकाशित झालेली आहेत तुला तर माहीतच आहे कॉलेजमध्ये मला किती लिहायची आवड होती. बस त्यालाच आपलं प्रोफेशन बनवलय."
सगळेजण गोल करून आपापल्या खुर्चीवर बसतात. लगेच विराज आपल्या जागेवरून उठतो आणि संचालन हातात घेतो. "चला बसले सगळे आपल्या जागेवर. तर आता आपण सुरू करत आहोत 'मन की बात' या मध्ये प्रत्येकजण एकमेकांबद्दल एक वाईट गुण आणि एक चांगला गुण सांगेल ते गुण त्यांना वाईट आणि चांगला का वाटला हे ही सांगतील. हा खेळ जरा लहामुलांसारखा वाटतोय पण या खेळामुळे आपण एकमेकांना किती ओळखतो हे ही समजेल. मग करायचं श्री गणेशा."
सगळे एक सुरात ओरडतात. "हो, करा श्री गणेशा"
सगळे हसतात...
विराज बोलु लागतो. "अं.. तर मी सगळ्यात आधी रेवतीला बोलावतो. रेवती तुला सौरभमधला एक चांगला गुण आणि एक वाईट गुण सांगायचा आहे. तसच ते गुण तुला चांगला आणि वाईट का वाटतात तेही सांगायचं आहे." सौरभ मजा घेत बोलतो. "वा!..बेट्या तु तर आम्हालाच आधी पकडलस." सगळे हसु लागतात.
रेवती बोलते. "तु पण न सौरभ. बरं आता मला सौरभची एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट सांगायची आहे. तर आपल्या ग्रुपमध्ये आल्यानंतर मी सौरभला जितकं ओळखलय त्यावरून मला सौरभ जे इतरांना फटकळ पणे बोलतो ती गोष्ट आवडत नाही. मान्य आहे हे इतरांना ही माहित पण ही घटना या आधी विष बाबतीत पण घडली ये म्हणून मला बोलावसं वाटलं आता दुसरी गोष्ट सौरभला आज पर्यंत आपण स्वतःचाच विचार करताना जास्त पाहिलंय पण सौरभची आणखी एक खासियत आहे. ती म्हणजे मला तो कॉलेज चा दिवस आठवतोय त्या दिवशी आपण सगळे मुव्ही बघुन घरी जात होतो. सौरभ मला घरी सोडणार होता म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटुन आम्ही निघालो. तस आम्हाला वाटेत एक लहान मुलगा दिसला त्याला खुप थंडी वाजत होती. तेव्हा सौरभनी कुठलाही विचार न करता त्या मुलाला आपला स्वेटर घालायला दिला मी विचारातच पडले जो मुलगा नेहमी स्वतःचाच विचार करत आलाय तो इतका कसा बदलला मला सौरभची ही गोष्ट खुप आवडली." सगळे हसु लागतात. तेवढ्यात थोडीशी मजा घेत सौरभ बोलतो. "रेवती तु तर माझी इमेजच बदलुन टाकलीस की, मी इतका ही वाईट नाहीये यार. स्वतःचा च विचार करतो एन ऑल. असो." सौरभ पुढे बोलणार असतो तेवढ्यात त्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. एक क्षण तो खुप घाबरतो आणि अचानक त्याच्या तोंडुन एक नाव निघत. "(मनाशीच बोलत) पौर्णिमा" सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि म्हणतात. "पौर्णिमा? ती कशी इथे येईल तु काय बोलतो आहेस कळतय का तुला." थोडस चिडुन सौरभ बोलतो. "माझ्यावर विश्वास ठेवा ती पोर्णिमाच होती यार. जाऊ द्या सोडा माझाच भास असेल तो. तर आता मला रेवती बद्दल सांगायचं आहे. आजची घटणा सोडली तर मला रेवतीची कुठलाही विचार न करता समोरच्याला बोलणं म्हणजे एखादी व्यक्ती काही तरी बोलत असेल तर त्याला मध्येच आडवायच आणि चिडायच. हे मला तीच वागणं पटत नाही. आणि तिच्यातली चांगली गोष्ट म्हणजे. ती आज आपल्या हिंमतीवर उभी आहे. तिनी आपल्या आयुष्यात खुप काही बघीतलंय पण त्या सगळ्या गोष्टींना मागे टाकत ती आज खुप पुढे गेलीये आणि ही मला खुप चांगली गोष्ट वाटते."
विराजच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसत मनातुन विराज खुपच घाबरलेला असतो तो ग्रुप सोडुन घरात फ्रेश व्हायला जातो.
इकडे.. बाकीचे एकमेकांबद्दल सांगण्यात मग्न असतात.
काही वेळानंतर...
विराजची पाळी येते तस सगळ्यांना त्याची आठवण होते. तेव्हा मिनु काळजीने बोलते. "यार! विराजला खुप उशीर झालाय न तो नुसता फ्रेश व्हायला गेलाय. काही झालं तर नसेल न?" कौस्तुभ बोलतो. "काळजी करू नकोस आपण शोधु त्याला. त्याला काही झालं नसेल चला." सगळे घरात जाऊन विराजला शोधु लागतात. कुणी घरामागे तर कुणी खोल्यांमध्ये शोधु लागतात.
आणि अचानक...
रेवती किंचाळते. "आ...(थोडस थांबत)."
सगळेजण त्या दिशेने धावुन येतात आणि तिला विचारतात. "(जरासं घाबरत). क.… काय झालं रेवु?" रेवती समोरच्या दिशेला आपलं बोट दाखवते सगळे त्या दिशेला बघतात तर रक्ताने भिंतीवर लिहिलेलं असत. "मी... परत आली आहे." आणि जमिनीवर विराजच शव पडलेलं असत. ते बघुन सगळे स्तब्ध होतात.