'आई झाली का ग तुझी तयारी?? चल लवकर..प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवे', नंदिनी म्हणाली.
'हो ग बेटा, झाली माझी तयारी..चल निघुयात' ,समिधा ने साडी नीट करत म्हटले..
आज समिधाच्या जीवनातला खूपच महत्वाचा दिवस होता..आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, मेहनतीचे चिज झाले होते..
त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस..
नंदिनी आणि समिधा वेळेतच कार्यक्रमाला पोहचले..
सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता..ते पाहून दोघीही अगदी भारावून गेल्या..
तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकाने दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले..
समिधाला, तिचे खुर्ची वर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता..एकवार तिने त्या नावावरून हात फिरवला..तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले..😢
इतक्यात स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला, 'लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी स्थानापन्न व्हावे.'
त्या आवाजाने समिधा भानावर आली..
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने केली गेली..त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले..
श्रीमती वैशाली देव, समाजसेविका, तसेच 'निवारा' या सामाजिक संस्थेच्या सर्वेसर्वा.
त्यांनी कितीतरी महिलांना शून्यातून प्रगतीकडे जाण्यासाठी मदत केली होती.
म्हणूनच समाजात त्यांना मानाचे स्थान होते..आणि ह्या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या..
"वैशाली ताई!!" समिधा स्वतःशीच पुटपुटली.
इतक्या वर्षांनी त्यांना पाहून समिधा खूपच खुश झाली होती..पण एकाएकी तिचा सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला..
समिधा (सॅम), उच्चभ्रू राहणीमानात वाढलेली, अत्यंत हुशार, कलात्मक व्यक्तिमत्व असलेली मुलगी..
ती आई-वडिलांची एकुलती एक..वडिलांचा व्यवसाय असल्यामुळे ते नेहमीच परदेश दौऱ्यावर असत..तिची आई ही एक उत्तम गृहिणी होती.
सॅम ला संगीताची प्रचंड आवड आणि तिने तिच्या शिक्षणाबरोबर तिची आवड ही जोपासली होती..
तिच्या आवडीला आई-वडिलांचा ही पाठींबा होता..पण सॅमला त्यातच तिचे करिअर करायचे होते..ह्याला मात्र तिच्या वडिलांचा विरोध होता..
त्याचे कारण असे की, सॅम हे त्यांचं एकच अपत्य. त्यामुळे सॅमने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी अशी तिच्या बाबांची अपेक्षा होती..
त्यावरून दोघांत खूप वादावादी ही होत असतं..
अखेर सॅमच शिक्षण पूर्ण झाले..पण तिला संगीता मध्ये रस असल्यामुळे तिला पुढचं शिक्षण त्यातच करायचं होतं..
पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते..त्यांना तो छंद म्हणून ठीक वाटायाचा पण व्यावसायिक दृष्टया नाही..
सॅमने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही..
याचा परिणाम असा झाला की, तिच्या वडिलांनी तिला गृहीत न धरता तिचे लग्न त्यांच्या जीवलग मित्राच्या मुलाशी जमविले..
त्याचे नाव सुयश. तो ही एकुलता एक होता..तसेच ह्या संबंधांमुळे त्यांच्या दोघांच्या व्यवसायाला ही फायदा होणार होता..
सॅमचं तिच्या वडिलांपुढे काहीही चालत नव्हते..म्हणून तिला होकार द्यावाच लागला आणि काही महिन्यातच लग्न सुरळीत पणे पार पडले..
'नव्याचे नवीन दिवस' म्हणतात ना ते संपले..म्हणता म्हणता सॅम ची समिधा झाली..म्हणजेच गृहिणी..
तिच्या नवऱ्याचे तिच्यावर वर्चस्व असल्यामुळे तिला त्याचे सर्व म्हणने ऐकावे लागे..
वडिलांना काही तक्रार करायची सोयच नव्हती..त्यांनी जावयाला मुलगाच मानले होते..
तो तर घरजावाईच झाला होता..पण त्यांना काय माहीत होते की हाच मुलगा त्यांचा एक दिवस विश्वासघात करेल..😲
समिधाला ह्याची पूर्वकल्पना होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती..कारण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही हे तिला माहीत होते..
अशातच समिधाला दिवस गेले🤰..तिने एका गोंडस मुलीला👶 जन्म दिला, तिचे नाव नंदिनी ठेवले..
दोन्ही परिवार खूपच आनंदी होते..समिधाच्या बाबांना काय करू काय नको असे झाले होते..
नंदिनी मध्ये सर्वजण गुंतत चाललेले आणि इथे सुयशने सासर्यांच्या कोणत्या न कोणत्या कारणाने सह्या घेऊन सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि एक दिवस अचानक जेव्हा ही बाब समिधाच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा ते हे सहनच करू शकले नाही..
त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते मरण पावले..
समिधाला ही सुयशने नंदिनी सकट घराच्या बाहेर काढले..हा धक्का समिधाची आई नाही पचवू शकली ती ही हे जग सोडून गेली..
समिधा साठी सगळे संपले होते..सुयश इतका कठोर आणि क्रूर वागेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते..
तिने खूप गयावया केली..नंदिनी ला ही समोर ठेवले पण सुयशला पैशाची इतकी गुर्मी होती की त्याने नको नको ते आरोप समिधा वर करायला सुरुवात केली..
तिच्यासाठी आता तिच्याचं घराचे दरवाजे पूर्ण बंद झाले..
तिच्याकडे पैसेही नव्हते ना फोन की ती कोणाची मदत घेईल..तिला काहीच सुचत नव्हते की काय करावे..
तिला त्या परिसरात थांबायची ही लाज वाटत होती..ती तिथून निघाली.
पण पुढे काय?
नंदिनी ३ वर्षांची होती..नुकतीच बोलायला लागलेली.
ती समिधाला विचारू लागली, "मम्मा आपण कुते जातोय? आजा कुते आहे? पप्पा ने आपल्याला बाहेल का काढले?? मला घरी जायचंय, मला घरी जायचंय, असे म्हणून ती रडू लागली"
समिधाला काय करावे हे सुचत नव्हते..ती निवाऱ्यासाठी तिथे जवळच असलेल्या शेड खाली बसून राहिली..
नंदिनी ही रडून रडून थकून झोपली होती..असाच दिवस निघून गेला..
संध्याकाळ होत चाललेली..तिला मनात वाटत होते, सुयश रागात असेल म्हणून असा बोलला असेल, तो तर माझ्या आणि नंदिनी शिवाय राहूच शकत नाही..म्हणून तिने पुन्हा घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला..
पण चौकीदाराने तिला आत जाऊच दिले नाही..
तो म्हणाला, "साब ने आपको अंदर छोडनेसे मना किया है। और अगर फिरभी मैने छोडा, तो मेरी नौकरी चली जायेगी। माफ कर दीजीएगा मॅडम।" असे म्हणून त्याने हातच जोडले.🙏
समिधा तिथून निघून गेली..एक शेवटचे तिने घराकडे बघितले..तिला रडूच कोसळले..पण तरीही प्रश्न हाच होता की जायचे कुठे?
समिधाचे कोणीही मित्र-मैत्रीण नव्हते आणि नातेवाईकांशी सुयशने स्वतःच बोलणे कमी केलेले आणि तिच्या वडिलांनाही काहीबाही सांगून सर्वांपासून तोडले होते..
त्यामुळे समिधाच्या कुटूंबाला भावकीतून वाळीत टाकले होते..
समिधाच्या वडीलांचा सुयश वर इतका विश्वास होता की, तो कधी खोटे बोलणारच नाही ह्यावर त्याचे ठाम मत होते..त्यामुळे त्यांनी स्वतः नातेवाईकांना अंतर दिले..
एव्हाना, नंदिनी भुकेने व्याकुळ झालेली..ती रडत होती, "मम्मा भूक लागलीये,पाणी पाहिजे".
समिधाला जवळच एक पाणपोई दिसली..त्यातले ग्लासभर पाणी तिने नंदिनीला पाजले आणि स्वतः ही प्यायली..
जवळच तिला एक बस स्टॉप दिसले..आजची रात्र इथेच काढावी, असे तिने मनाशी ठरवले..
तिला जे काय होतंय ह्यावर विश्वासच बसत नव्हता..तिला एकसारखे रडू येत होते आणि नंदिनी ची काळजी पण वाटत होती..
इतक्यात सुदैवाने रात्रीच्या राऊंडउपसाठी पोलिसांची गाडी आली..त्यांनी ह्या दोघींना तिथे बसलेले पाहिले..
सब इन्स्पेक्टर माने, त्यांची बदली इथल्या पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती..
रोज रात्री २ ते ३ चकरा ते त्यांना दिलेल्या भागाच्या मारत..जेणेकरून त्याच्या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल..
इतक्यात त्यांना बस स्टॉप खाली कोणीतरी बाई बसल्याचे दिसले..मांडीवर ३ ते ४ वर्षांची मुलगी ही दिसली..एकंदरीत कपड्यावरुन त्या दोघी चांगल्या घरातल्या वाटल्या..
त्यांनी समिधाला विचारले, "इतक्या रात्री इथे का बसलात?"
समिधा कडे काहीच उत्तर नव्हते..ती खूपच घाबरलेली होती..
त्यांनी पुन्हा विचारले,"तुम्ही इथे काय करताय? इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही, तुमचे घर कुठेय? जर तुम्ही काही नाही बोललात तर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीत यावे लागेल."
समिधाकडे काहीच उत्तर नव्हते..म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोघींना गाडीत बसवले आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन आले.
इतक्यात नंदिनी बोलली,"मम्मा भूक लागलीये, माम पाहिजे"
समिधाला रडूच कोसळले..
मानेंना नंदिनीची दया आली..त्यांनी तिला खायला दिले..
पण तरीही ह्या दोघी कोण?हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.
म्हणून मग त्यांनी समिधाला पुन्हा विचारले, "तेव्हा समिधाने सगळी कर्म-कहाणी त्यांना ऐकवली.."
मानेंना सुयशचा खूपच राग आला..पण पुराव्या अभावी ते सुयशला अटक करू शकत नव्हते..
तरीही वॉर्निंग देऊन ते समिधाला घरी पाठवू शकत होते..पण नंतर जर त्या दोघींना काही झाले तर?
तसेच सुयश हा मोठा व्यावसायिक होता..त्यामुळे त्याच्या ओळखी ही तितक्याच वरपर्यंत होत्या.
म्हणजे ही लढाई मोठी होती..हे मानेंना कळले होते..
पण यासाठी समिधाला तयार होणे जरुरी होते..ते ही स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी..
त्यांनी समिधाला मदत करण्याचे आश्वासन दिले..
त्यांनी सकाळी सकाळी एक नंबर डायल केला..
तो होता श्रीमती वैशाली देव यांचा..
क्रमश:
(ही कथा कशी वाटली हे कमेन्ट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडल्यास ती आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद🙏)
@preetisawantdalvi